(मंचाचे निर्णयान्वये, श्री.सादिक मो.जव्हेरी, मा.सदस्य) (पारीत दिनांक : 26.08.2011) अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कल म 12 अन्वये तक्रार दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदाराने त्याचे शिवाजी नगर, पुणे येथील नातेवाईक नामे श्री आशिष खेडकर यांना गैरअर्जदाराचे चंद्रपूर येथील कार्यालयाचे मार्फतीने दि.30.5.2009 रोजी चंद्रपूर येथील धान्य व्यापारी चिंतावार ट्रेडर्स, गंजवार्ड, चंद्रपूर यांचेकडून उच्च प्रतीचा तांदूळ 3 कट्टे प्रत्येकी 30 किलो, एकूण 90 किलो, दर रुपये 3100/- प्रती क्विंटल प्रमाणे 90 किलो चे रुपये 2,790/- खरेदी केले, तसेच, 2 कट्टे तांदूळ प्रत्येकी 25 किलो, एकूण 50 किलो, दर रुपये 3500/- प्रमाणे 50 किलो चे रुपये 1775/- खरेदी करुन पाठविला. सदर तांदळाचे एकूण 5 कट्टे चांगल्या स्थितीत चंद्रपूर येथील गैरअर्जदाराचे कार्यालयात अर्जदाराचे नातेवाईकाला पुणे येथे पाठविण्याकरीता अर्जदाराने आणून दिले. अर्जदाराने सदर माल तांदूळ पुणे येथे पाठविण्याकरीता आवश्यक असणारे गैरअर्जदाराचे पार्सल पेड पावती क्र.5454299 व्दारे गैरअर्जदाराचे वाहतुकीचा पुणे येथे पाठविण्यासाठीचा खर्च एकूण रुपये 647/- गैरअर्जदाराचे चंद्रपूर कार्यालयात जमा करण्यात आले. गैरअर्जदाराचे चुकीचे माल वाहतुक यंञणेव्दारे व मालाची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे, अर्जदाराने पुणे येथे पाठविलेला तांदूळ मालवाहतुकीत पुणे येथे दि.2.6.09 ला पोहचताच मानव जातीला खाण्यायोग्य राहिला नाही. अर्जदाराचे नातेवाईक नामे आशिष खेडकर पुणे येथे सदर माल तांदूळ गैरअर्जदाराचे पुणे येथील वाहतुक कार्यालयात घेण्याकरीता गेले असता, ही बाब लक्षात आली. अर्जदाराचे नातेवाईक आशिष खेडकर यांनी ही बाब गैरअर्जदाराचे पुणे येथील कार्यालयात लक्षात आणून दिली व अर्जदाराने गैरअर्जदाराचे माध्यमातून पाठविलेला 5 कट्टे उच्च प्रतीचा तांदूळ मनुष्य जातीला खाण्यायोग्य नसल्यामुळे, त्याचा स्विकार केलेला नाही व झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मागीतली. 2. अर्जदाराने दि.13.8.09, 8.3.11 रोजी गैरअज्रदाराचे औरंगाबद येथील कार्यालयाला तथा दि.15.6.09, 9.3.10 ला गैरअर्जदाराचे चंद्रपूर येथील कार्यालयाला कळविले. तसेच, दि.6.5.2011 रोजी अधि.दिवसे यांचेव्दारे गैरअर्जदाराला नोटीसाव्दार कळविले. गैरअर्जदाराने पञ व्यवहाराची साधी दखल सुध्दा घेतली नाही व नुकसान भरपाई सुध्दा दिली नाही. त्यामुळे, अर्जदार, गैरअर्जदाराकडून तांदळाची किंमत एकूण किंमत रुपये 4,565/-, त्याची हमाली रुपये 70/-, पार्सल पेड रुपये 647/- असे एकूण रुपये 5,282/-, तसेच, अर्जदारास मानसिक, शारीरीक ञासापोटी, पञ व्यवहाराकरीता आलेल्या खर्चापोटी, वकिलांनी पाठविलेला नोटीसचा खर्च रुपये 1500/- असे मिळून एकञित रुपये 1,00,000/- ची मागणी केली आहे. 3. अर्जदाराने निशाणी क्र.5 नुसार 12 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदारास नोटीस प्राप्त झाल्याची पोहचपावती निशाणी क्र.9 नुसार रेकॉर्ड दाखल आहे. गैरअर्जदारास नोटीस मिळून सुध्दा हजर झाला नाही व लेखी उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे, निशाणी क्र.1 वर गैरअर्जदारास नोटीस तामील होऊन सुध्दा हजर झालेला नाही, सबब प्रकरण त्याचे गैरहजेरीत पुढे चालविण्यात यावे, असा आदेश दि.6.8.2011 ला पारीत करण्यात आला. तसेच, अर्जदाराने निशाणी क्र.10 नुसार शपथपञ दाखल केले. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता असतांना, गैरअर्जदार यांनी हजर होऊन लेखी उत्तर सुध्दा सादर केला नाही, त्यामुळे प्रकरण एकतर्फा चालविण्यात यावे असा आदेश झालेला असल्यामुळे, तक्रार गुणदोषावर निकाली काढण्यात यावे, असा आदेश दि.16.8.2011 ला निशाणी क्र.1 वर पारीत करण्यात आला. अर्जदाराने दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ व उभय पक्षाचे वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. @@ कारणे व निष्कर्ष @@ 4. अर्जदाराने, गैरअर्जदाराच्या ट्रान्सपोर्ट मार्फत दि.30.5.2009 ला तांदूळ 5 पोते पाठविले आहे, हे अर्जदाराचे दाखल दस्तावेजावरुन सिध्द होते. तसेच, अर्जदाराचे अ-2 नुसार दाखल देयकावरुन रुपये 4,565/- चे तांदूळ खरेदी केलेले आहे, हे ही सिध्द होत आहे. 5. गैरअर्जदाराच्या यवतमाळ ट्रान्सपोर्ट कार्यालय वरुन पुणे कार्यालयात माल पाठवतांना, सदर तांदूळ शेती औषधी सोबत ठेवल्यामुळे व औषधी पूर्ण फुटल्यामुळे अर्जदाराचे तांदूळ पूर्ण औषधाने भिजल्यामुळे खराब झाले, असे आशयाचे पञ गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले आहे, पञ अ-3 नुसार सदर पञावरुन ही बाब सिध्द होते की, अर्जदाराचे तांदूळ गैरअर्जदाराच्या अनुचीत हाताळणीमुळे खराब झालेले आहे. एकंदरीत, अर्जदाराने, गैरअर्जदाराकडून घेतलेली सेवा गैरअर्जदाराने बरोबर न दिल्यामुळे व अर्जदाराने वारंवार पञ व्यवहार करुन सुध्दा त्या पञांना व नोटीसाला उत्तर न देऊन, न्युनतापूर्ण सेवा देऊन, अनुचीत व्यापार पध्दती अवलंबलेली आहे, असे या न्यायमंचाचे मत असून, या तक्रारीचा अंतीम आदेश खालील प्रमाणे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार मंजूर. (2) गैरअर्जदाराने, अर्जदारास रुपये 5282/- तक्रार दाखल केल्याचा दि.23.5.2011 पासून 9 % व्याजाने पदरी पडेपर्यंत द्यावे. (3) गैरअर्जदाराने, अर्जदारास शारिरीक, मानसीक ञासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 500/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आत द्यावे. (4) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यांत यावी.
| [HONORABLE Shri Sadik M. Zaweri] Member[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT | |