Maharashtra

Kolhapur

CC/10/200

Dilip Bapu Bankar - Complainant(s)

Versus

Shri Sadguru Gajanan Maharaj Nag. Sah. Pat Sanstha Ltd. and Others - Opp.Party(s)

B.V. Sankeshwari

27 Sep 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/200
1. Dilip Bapu BankarRukadi Tal. Hatkanangale Dist. Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Shri Sadguru Gajanan Maharaj Nag. Sah. Pat Sanstha Ltd. and OthersKolhapur, Khasbag, Kolhapur2. (A) Anandrao Nanaso DesaiKadgaon, Tal. Bhudhargad, Dist. Kolhapur3. (B) Govind Ramchandra PistankarNear S.T. Stand , Kadgaon, Tal. Bhudhargad, Dist. Kolhapur 4. (C) Yashwant Tukaram TorseVaghapur, Tal. Bhudhargad, Dist, Kolhapur5. Anandkumar Dhodiba Araker,Shengaon, Tal. Bhudhargad, Dist. Kolhapur6. Umesh Gajanan BhogaonkarBazar Bhogaon, Tal. Panhala, Dist. Kolhapur7. Baburao Balwant Repe Narthwade, Tal. Radhanagari, Dist. Kolhapur8. Bajirao Pandurang ChouguleHaldi, Tal. Karveer, Dist. Kolhapur9. Anandrao Raoso BhosaleBehind State Bank of India,Pachgaon, Tal. Karveer, Dist. Kolhapur10. Devchand Namchand PurohitNear Birdev Mandir, Peth Vadgaon, Tal. Hatkanangale, Dist. Kolhapur11. Sou. Vasant Balasaheb SapalePanori. Tal. Radhanagari, Dist. Kolhapur12. Sou. Meena Laxmin RajputShivaji Vidhyapeeth Colony, E Ward, Kolhapur13. Sou. Rashmi Rajan YadavC.C. No. 966, A Ward, Shivaji Peth, Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :B.V. Sankeshwari, Advocate for Complainant
S.K.Dandge, Advocate for Opp.Party

Dated : 27 Sep 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

 

 

 

 नि का त्र :- (दि.27/09/2011) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला.    सामनेवाला क्र. 2, व 4 व 6 हे हजर झाले परंतु त्‍यांनी त्‍यांचे म्‍हणणे दाखल केले नाही. तसेच, सामनेवाला क्र.  1-ब, 5, 7, 10 यांना नोटीसा लागू होऊन ते गैरहजर आहेत.    सामनेवाला क्र. 1-अ, क, 8, 9 यांचे पोस्‍टाच्‍या शे-यानिशी परत आलेले लखोटे प्रस्‍तुत कामी दाखल आहेत. सामनेवाला क्र. 3, 6, 8 व 9 यांना नोटीस लागू झाली नसलेमुळे स्‍थानिक वृतपत्रात जाहीर नोटीस प्रसिध्‍द केली. सामनेवाला क्र. 3 यांनी  म्‍हणणे दाखल केले.  उर्वरित सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांचे वकील गैरहजर. सामनेवाला क्र. 3 वकीलांनी युक्तिवाद केला. उर्वरीत सामनेवाला गैरहजर आहेत.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
          
     यातील सामनेवाला ही महाराष्‍ट्र सहकार कायद्याखाली नोंद झालेली सहकारी पतसंस्‍था आहे. सामनेवाला क्र. 2 हे पूर्वीचे चअरमन व सामनेवाला क्र. 3 ते 10 हे सामनेवाला संस्‍थेचे संचालक आहेत. यातील तक्रारदार यांनीने सामनेवाला पतसंस्‍थेकडे कॉल डिपॉझिट रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-
 
अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
1.
7263
15,000/-
24/04/2002
2.
7295
5,000/-
23/07/2002
 
(3)        सदर ठेवींची मुदत संपल्‍यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे रक्‍कमांची वारंवार मागणी केली आहे. तक्रारदारांना सदर रक्‍कमांची आवश्‍यकता आहे. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्‍कमा देण्‍यास टाळाटाळ केली. सदरच्‍या रक्‍कमा अदा करणेची सामनेवाला यांची वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या जबाबदारी असतानाही सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(5)        सामनेवाला क्र. 3 यांनी त्‍यांच्‍या ए‍कत्रित म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, तक्रारदारानी संस्‍थेकडे ठेवी ठेवल्‍याचे मान्‍य नाही. तक्रारदारांना त्‍यांच्‍या ठेवीवरील व्‍याज दिलेले आह. तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही.   तक्रारदारांची तक्रारीतील मागणी चुकीची आहे. प्रस्‍तुत सामनेवाला हे निवडून आलेले संचालक नाहीत. प्रस्‍तुत सामनेवाला हे स्विकृत संचालक आहेत. संस्‍थेच्‍या कोणत्‍याही व्‍यवहाराशी प्रस्‍तुत सामनेवाला यांचा संबंध व माहिती नाही.   प्रस्‍तुत सामनेवाला यांचेकडून कोणतीही सेवा त्रुटी झालेली नाही. सबब, तक्रारदारांचा प्रस्‍तुत तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा अशी विनंती केली आहे.      
 
(6)        या मंचाने तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्‍हणणे व उपलब्‍ध कागदपत्रे यांचे अवलोकन केले आहे. प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेमध्‍ये कॉल ठेव ठेवली आहे व त्‍याची मागणी करुनही सामनेवाला यांनी ठेव रक्‍कमा व्‍याजासह दिलेल्‍या नाहीत. त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे. वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे कॉल ठेव रक्‍कम ठेवली आहे. व मागणी करुनही सदर रक्‍कम सामनेवाला संस्‍थेने दिलेली नाही. त्‍यामुळे सदर ठेव रक्‍कमा व्‍याजासह देणेची जबाबदारी सामनेवाला क्र.1 संस्‍थेची येत आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.   प्रस्‍तुत सामनेवाला यांची वैयक्तिक जबाबदारी रक्‍कम देणेबाबत आहे असे तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत कथन केले आहे. परंतु, महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था अधिनियम 1960, कलम 73 (ए) व (बी), कलम 78, 88 यातील तरतुदीचा विचार केला असता संस्‍थेच्‍या कामकाजासंदर्भात वैयक्तिक जबाबदारी निश्चित करणेबाबतचे अधिकार सहकार निबंधकांना आहेत. याचा विचार करता तक्रारदारांनी प्रस्‍तुत सामनेवाला यांची त्‍याप्रमाणे वैयक्तिक जबाबदारी निश्चित केलेली आहे. तसेच, सामनेवाला संस्‍थेचे ऑडीट होवून सदर सामनेवाला यांचे सदर कलम 88 प्रमाणे वैयक्तिक जबाबदारी निश्चित केली आहे याबाबत कोणताही पुरावा प्रस्‍तुत प्रकरणी दाखल नाही. त्‍यामुळे प्रस्‍तुत सामनेवाला यांची ठेव रक्‍कम व्‍याजासह देणेबाबत वैयक्तिक जबाबदारी येत आहे याबाबतचे तक्रारदारांचे कथन हे मंच फेटाळत आहे. परंतु, ठेव रक्‍कमा व्‍याजासह देणेची जबाबदारी ही सामनेवाला क्र.1 संस्‍थेची येत आहे. सदर विवेचनास पूर्वाधार म्‍हणून मा.ना.उच्‍च न्‍यायालय, मुंबई (औरंगाबाद खंडपीठ) यांनी रिट पिटीशन नं.5223/2009 - सौ.वर्षा रविंद्र ईसाई वि. राजश्री राजकुमार चौधरी वगैरे - आदेश दि.22.12.2010 याचा आधार हे मंच घेत आहे. सदर पूर्वाधारातील महत्‍त्‍वाचा मुद्दा खालीलप्रमाणे :-
 
“The complaint can be instituted against the society before the Consumer Forum by a depositor or a member of the society and a relief can also be granted as against the society. However, so far as members of the managing committee/directors are concerned, they stand on a different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra Co-operative Society Act, 1960 is followed and unless the liability is fixed against them, they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.”
 
(7)        तसेच, तक्रारदारांनी कॉल डिपॉझिट पावत्‍यांच्‍या स्‍वरुपात रक्‍कम ठेवली आहे. म्‍हणजेच, तक्रारदारांनी सदर पावत्‍यांची रक्‍कम मागणी करताच सामनेवाला यांनी रक्‍कम व्‍याजासह देणे आवश्‍यक होते. तथापि, तसे सामनेवाला यांनी केलेले नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे  ठेवींच्‍या रक्‍कमांची मागणी केलेली आहे. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर कॉल ठेव रक्‍कमा ठेव तारखेपासून  ठेवीच्‍या मुदतीपर्यंत ठेव पावत्‍यांवर नमूद व्‍याजासह व त्‍यानंतर द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजाने मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(8)        तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आ दे श
 
(1)   तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
(2)   सामनेवाला क्र.1 संस्‍थेने तक्रारदारांना खालील तपशिलातील कॉल ठेवींच्‍या रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर ठेव तारखेपासून ठेवीच्‍या मुदतीपर्यन्‍त  ठेव पावतीवरील  नमूद व्‍याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.
    
अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
1.
7263
15,000/-
24/04/2002
2.
7295
5,000/-
23/07/2002
   (3) सामनेवाला क्र.1 संस्‍थेने तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

 


[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT