Maharashtra

Nagpur

CC/217/2017

Narendra Mataprasad Mishra - Complainant(s)

Versus

Shri Sadguru Builders and Developers - Opp.Party(s)

Adv. C.D.Bokde

04 Jun 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/217/2017
( Date of Filing : 11 May 2017 )
 
1. Narendra Mataprasad Mishra
R/o. Flat No. 303, Maa Bamleshwari Apartment, Quetta Colony, Bhandara Road, Nagpur 440008
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Sadguru Builders and Developers
Office- Jayant Nagri-IV, Block No. G-32, Opp. Podar Jumbo Kids, Near Purti Super Bazar, Besa Manish Nagar Road, Besa, Nagpur 440034
Nagpur
Maharashtra
2. Kishor Mangal Waghmare (Partner)
R/o. Lane No. 10, Vishwakarma Nagar, Nagpur 44027
Nagpur
Maharashtra
3. Rahul prabhakar Mahulkar (Partner)
R/o. Amba Shivshakti Nagar, Manewada Besa Road, Nagpur 440027
Nagpur
Maharashtra
4. Vikas Mahulkar (Partner)
R/o. Amba Shivshakti Nagar, Manewada Besa Road, Nagpur 440027
Nagpur
Maharashtra
5. Shyam Mahajan Barde (Partner)
R/o. Jayant Nagari-IV, Block No. G-32, Opp. Podar Jumbo Kids, Near Purti Super Bazar, Besa Manish Nagar Road, Besa, Nagpur 440034
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 04 Jun 2020
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. विरुध्‍दपक्ष क्रमांक १ ही फर्म असुन विरुध्‍द पक्ष क्रमांक २,३,४ आणि ५ हे  फर्म चे भागीदार आहेत. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचे मौजा वेळाहरी खसरा नंबर ५५/१ येथील प्‍लॉट नंबर ५४, एकुण क्षेञफळ १४४७.२५ चौरस फुट एकूण रुपये १०,८६,०००/- इतक्‍या रकमेत विकत घेण्‍याचा करार (टोकन अॅग्रीमेंट) दिनांक १/९/२०१६ रोजी केला. विक्री कराराचे दिवशी तक्रारकर्त्‍याने प्‍लॉट खरेदीपोटी विरुध्‍द पक्षाला धनादेश क्रमांक ०४९५६६, आय.सी.आय.सी.आय. बॅंक गांधिबाग, नागपूर, रुपये २१,०००/- इतक्‍या  रकमेचा धनादेश दिला. विक्री करारात नमुद करण्‍यात आले होते की, विरुध्‍द पक्षाला स्‍थानिक वर्तमानपञातुन जाहीर नोटीस काढल्‍यानंतर रुपये २,५०,०००/- अदा करण्‍यात येईल आणि उर्वरीत रक्‍कम रुपये ८,३६,०००/- राष्‍ट्रीयकृत बॅंकेतुन कर्ज उपलब्‍ध झाल्‍यानंतर देण्‍यात येईल. विक्रीकराराचे दिवशी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला आश्‍वासीत केले होते की, विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याला प्‍लॉट चे विक्रीपञ करुन देईल.
  3. विरुध्‍दपक्षावर विश्‍वास ठेवुन तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाशी झालेल्‍या खरेदी विक्री व्‍यवहाराबाबत स्‍थानिक वर्तमानपञातुन जाहिर नोटीस काढुन त्‍याबाबत आक्षेप मागविण्‍यात आले. तक्रारकर्त्‍याने काही वेळा आक्षेपाची वाट बघीतली व त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाशी संपर्क साधला व विक्री करार दिनांक १/९/२०१६ नुसार रुपये २,५०,०००/- देण्‍याची तयारी दर्शविली. परंतु विरुध्‍द पक्षाने विक्री करारानुसार पुर्तता न करता तक्रारकर्त्‍याला विक्री पञाबाबत नमुना बनवुन आणण्‍यास सांगितले. तक्रारकर्त्‍याने प्‍लॉट चे विक्रीसंबंधात विक्रीपञाचा नमुना बनवुन विरुध्‍द पक्षाकडे गेला असता त्‍याने विक्रीपञाचे नमुन्‍यामध्‍ये आवश्‍यक सुधारणा करण्‍यास सांगितले व दिनांक ८/१०/२०१६ रोजी भेट देण्‍यास सुचविले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने वारंवार विरुध्‍द पक्षाचे कार्यालयात विक्री बाबतचा नमुना बनवुन भेटी दिल्‍या परंतु प्रत्‍येक वेळेस विरुध्‍दपक्षाने या व त्‍या  कारणावरुन दिनांक १/९/२०१६ च्‍या  विक्री करारानुसार पुर्तता केली नाही. तक्रारकर्त्‍याने दिनांक १७/२/२०१७ रोजी विरुध्‍द पक्षाला नोटीस पाठवुन दिनांक १/९/२०१६ चे करारानुसार पुर्तता करण्‍याबाबत विनंती केली. परंतु विरुध्‍द पक्षाने करारातील अटीचे पालन केले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दिनांक १७/३/२०१७ ला विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली व त्‍याव्‍दारे विरुध्‍द पक्षाला राष्‍ट्रीय बॅंकेतुन कर्ज घेण्‍याकरीता आर.एल. लेटर, मंजुरी दस्‍तावेज, एन.आय.टी. आणि एन.एम.सी. चे एन.ओ.सी. इत्‍यादी दस्‍ताऐवजाची मागणी केली व नोटीस प्राप्‍त झाले तारखेपासुन १५ दिवसाचे आत विक्रीपञ करुन देण्‍याबाबत कळविले. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला चुकीचे नोटीस चे उत्‍तर पाठविले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍दपक्षाला निर्देश द्यावे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला मौजा वेळाहरी खसरा नंबर ५५/१, तहसिल जिल्‍हा नागपूर येथे लेआऊट प्‍लॉट नंबर ५४, एकुण क्षेञफळ १४४७.२५ चौरस फुट चे विक्रीपञ करुन द्यावे आणि प्‍लॉटचा ताबा द्यावा किंवा जर विरुध्‍द पक्षाला प्‍लॉट चे विक्रीपञ करुन देणे शक्‍य नसल्‍यास तर विरुध्‍द पक्षाने रुपये ७,२१,०००/- २४ टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदा होईपर्यंत अदा करावे.
  2. तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक व मानसिक ञासाकरीता व नुकसान भरपाई म्‍हणुन रुपये ५,००,०००/- अदा करावे व तक्रारीचा खर्च अदा करावे.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ही पार्टनरशिप फर्म असुन विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ते ४ हे त्‍या फर्म चे भागीदार आहेत. विरुध्‍द पक्ष क्रमांक ५ हा जमिनीचा मालक आहे. विरुध्‍द पक्षाचा प्‍लॉट पाडुन प्‍लॉट विकण्‍याचा व्‍यवसाय आहे. तक्रारकर्ता यांनी विरुध्‍द पक्षाचे फर्म चे भागीदार क्रमांक ४ यांचेशी संपर्क साधला. तक्रारकर्त्‍याने इतर भागीदारांचे अनुपस्थितीत प्‍लॉट खरेदी करण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली आणि त्‍याप्रमाणे फर्म चे लेटर पॅड वर विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ ला लिहीण्‍यास सांगितले आणि त्‍याला रुपये २१,०००/- चा धनादेश देऊन त्‍यावर त्‍याची स्‍वाक्षरी घेतली. वर्तमान पञातुन जाहीर नोटीस काढल्‍यावर तक्रारकर्त्‍याला ७ दिवसाचे आंत विक्री करार करावयाचा होता. परंतु तक्रारकर्ता संपूर्ण प्‍लॉट चे किंमतीचे ४० टक्‍के रक्‍कम देण्‍यास अपयशी ठरला. त्‍यामुळे तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांचे मध्‍ये करार होऊ शकला नाही. मध्‍यंतरी जेव्‍हा तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाकडे आला  त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याला वरीलप्रमाणे बाब सांगण्‍यात आली आणि तक्रारकर्त्‍याला सांगण्‍यात आले की, त्‍याचे टोकन रद्द झाले आहे आणि रुपये २१,०००/- घेऊन जाण्‍याबाबत कळविले. तरीही तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला चुकीची नोटीस पाठविली. तक्रारकर्त्‍याने दिनांक १५/३/२०१५ अन्‍वये पाठविलेल्‍या  नोटीसला विरुध्‍द पक्षाने त्‍याचे पञ दिनांक २४/३/२०१७ अन्‍वये उत्‍तर पाठविले व त्‍याव्‍दारे तक्रारकर्त्‍याने दिलेले टोकन रद्द झाल्‍याबाबत कळविण्‍यात आले आणि धनाकर्ष क्रमांक ८०९४५९, दिनांक २४/३/२०१७ अन्‍वये रुपये २१,०००/- चा धनाकर्ष तक्रारकर्त्‍याला पाठविण्‍यात आला. तक्रारकर्ता हा व्‍यवसायाने वकील असुन त्‍याने विरुध्‍द पक्षाकडुन किंमती प्‍लॉट चुकीच्‍या पद्धतीने मिळविण्‍याचा उद्देशाने सदरची चुकीची तक्रार मंचासमख दाखल केली आहे. सदरची तक्रार दिवाणी स्‍वरुपाची असल्‍यामुळे ती मंचासमक्ष चालु शकत नाही. त्‍यामुळे ती खारीज करण्‍यात यावी.
  2. उभयपक्षांनी मंचासमक्ष दाखल केलेले दस्‍ताऐवज, लेखी जबाब व तक्रारकर्त्‍याचा लेखी युक्‍तीवाद व तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करण्‍यात आले.

      

    अ.क्र.                         मुद्दे                                                                  उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                                  होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?                        होय
  3. काय आदेश ?                                                                       अंतिम आदेशाप्रमाणे 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचेकडुन मौजा वेळाहरी खसरा नंबर ५५/१ येथील प्‍लॉट नंबर ५४, एकुण क्षेञफळ १४४७.२५ चौरस फुट एकूण रुपये १०,८६,०००/- इतक्‍या रकमेत विकत घेण्‍याचा टोकण बयाणापञ विरुध्‍दपक्षाचे लेटरपॅडवर दिनांक १/९/२०१६ रोजी केले. टोकण बयाणपञाचे दिवशी विरुध्‍द  पक्षाला प्‍लॉट नंबर ५४ चे विक्रीपोटी तक्रारकर्त्‍याकडुन धनादेश क्रमांक ०४९५६६ अन्‍वये रुपये २१,०००/- प्राप्‍त झाले. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक ४  वर दाखल दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे. विरुध्‍द पक्ष यांनी सदर मिळकत अकृषक करुन देऊन विकसनाबाबत सेवा देण्‍याचा करार केला आहे. तसेच मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या M/s Narne Construction Pvt. Ltd. Vs. Union of India and Ors. Etc. II (2012) CPJ 4 (SC)  या प्रकरणातील निर्णयाप्रमाणे या मंचाला प्रस्‍तुत प्रकरण चालविण्‍याचे अधिकार आहे.
  2. दिनांक १/९/२०१६ रोजी तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्षकार यांचेमध्‍ये मौजा वेळाहरी खसरा क्रमांक ५५/०१ येथील प्‍लॉट नंबर ५४ चे खरेदीबाबत टोकण बयाणपञ करण्‍यात आले. टोकण बयाण हा करारणामाच आहे व त्‍यामध्‍ये  वर्तमान पञातुन जाहीरात प्रकाशीत करण्‍यात येईल व प्रकाशन अवधी संपल्‍यानंतर विक्री करारनामा करण्‍यात येईल असे नमुद करण्‍यात आले होते. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने दिनांक ३/९/२०१६ रोजी वर्तमान पञातुन जाहिरात दिली व त्‍यानंतर स्‍वतः तक्रारकर्ता टोकण बयाणपञाप्रमाणे रक्‍कम रुपये २,५०,०००/- घेऊन विरुध्‍द पक्षाकडे गेला परंतु विरुध्‍द पक्षाने रक्‍कम स्विकारलेली नाही. त्‍यानंतर लगेचच दिनांक १७/२/२०१७ रोजी विरुध्‍द  पक्षाला नोटीस देऊन करारनाम्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने कुठेही चुक केलेली नाही. ‘Promise made through a deed is covenant.’ या तत्‍वाप्रमाणे टोकण बयाणापञ हा करारनामाच आहे. विरुध्‍द पक्षाच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्षकार यांचेमध्‍ये करार झाला नाही. विरुध्‍द पक्षाने टोकण बयाणाप्रमाणे वचन दिले होते आणि तक्रारकर्त्‍याने मोबदला रक्‍कम दिली आहे सबब करारनामा झाल्‍याचे स्‍पष्‍ट होते. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ता हा करारनाम्‍याप्रमाणे पूर्तता करण्‍यास तयार नव्‍हता आणि रक्‍कम देण्‍यास तयार नव्‍हता म्‍हणून करारनामा रद्द केला आणि नोटीस च्‍या उत्‍तरासोबत रुपये २१,०००/- चा डी.डी. पाठविला असा बचाव घेतलेला आहे. परंतु विरुध्‍द  पक्ष यांनी तक्रारकर्ते यांनी करारनाम्‍याप्रमाणे पूर्तता केली नाही याबाबत कोणताही पञव्‍यवहार तक्रारकर्त्‍याशी केला नाही आणि तक्रारकर्त्‍याने स्‍वतःहुन करारनाम्‍याची पूर्तता करावी अशी नोटीस पाठविल्‍यानंतर करारनामा रद्द केल्‍याचे कळविले आहे. सबब विरुध्‍द पक्ष यांचे हे वर्तन सेवेमधील ञुटी तसेच अनुचित व्‍यापारी प्रथांचा अवलंब केला आहे असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे. करारनामा झाल्‍यापासुन विरुध्‍द पक्षाने कोणत्‍याही प्रकारची पुर्तता न करता तक्रारकर्त्‍याप्रती ञुटीपूर्ण सेवा दिल्‍याचे निदर्शनास  येते असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.   करारनाम्‍यातील कराराची विरुध्‍द पक्षाने वचनपूर्ती केली नाही ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्त्‍याप्रती ञुटीपूर्ण सेवा आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ५ यांना वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ५ यांनी तक्रारकर्त्‍याकडुन मौजा वेळाहरी, खसरा नंबर ५५/१, येथील प्‍लॉट नंबर ५४ चे विक्रीपोटी उर्वरीत रक्‍कम रुपये १०,६५,०००/- स्विकारुन तक्रारकर्त्‍याला प्‍लॉट चे विक्रीपञ नोंदणी करुन द्यावे. विक्रीपञाचा खर्च तक्रारकर्त्‍याने सोसावा.

किंवा

  तक्रारकर्त्‍याला कायदेशीररित्‍या व तांञिक दृष्‍टीने मौजा वेळाहरी, खसरा नंबर ५५/१, येथील प्‍लॉट नंबर ५४ चे विक्रीपञ करुन देणे शक्‍य नसल्‍यास विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ५ यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या  तक्रारकर्त्‍याकडुन प्‍लॉट नंबर ५४ चे विक्रीपोटी  स्विकारलेली रक्‍कम रुपये २१,०००/- तक्रारकर्त्‍याला अदा करावी व सदर रकमेवर दिनांक १/९/२०१६ पासुन द.सा.द.शे. १२ टक्‍के दराने व्‍याज रक्‍कम प्रत्‍यक्ष तक्रारकर्त्‍याला अदा होईपर्यंत द्यावे.

  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ५ यांना वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या  निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ५ यांनी तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक व शारीरिक ञासाकरीता रुपये २०,०००/- तसेच तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- तक्रारकर्त्‍याला अदा करावा.
  2. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  3. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  4. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.