ग्राहक तक्रार क्र. 24/2013
अर्ज दाखल तारीख : 04/02/2013
अर्ज निकाल तारीख: 09/12/2014
कालावधी: 01 वर्षे 10 महिने 05 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच उस्मानाबाद
1) सौ. जयश्री पुरुषोत्तम ठाकरे,
वय- 59 वर्षे, धंदा- घरकाम,
रा.माणिक चौक, उस्मानाबाद.
ता.जि.उस्मानाबाद. .....तक्रारकर्ती.
-वि रु ध्द -
1. उपअभियंता, एक.के.पवार,
म.रा.वि.वि.कं.लि., उस्मानाबाद,
2. कार्यकारी अभियंता,
ललीतकुमार दत्तात्रय ठाकूर,
म.रा.वि.वि.कंपनी लि., सोलापूर रोड,
जि. उस्मानाबाद. ....विरुध्द पक्षकार.
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2)मा.श्रीमती विदयुलता जे. दलभंजन सदस्य.
3) मा.श्री.एम.बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : श्री. ए.एस.गांधी.
विरुध्द पक्षकारांतर्फे विधीज्ञ : श्री. व्ही.बी.देशमूख.
निकालपत्र
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
विरुध्द पक्ष (विप) यांनी तक्रारकर्ती (तक) हिला चुकीचे वीज बिल दिल्यामुळे ते दुरुस्त होवून मिळावेत म्हणून ही तक्रार तिने दाखल केली आहे.
1) तक्रारी मधील थोडक्यात कथन असे की तक्रारकर्ती उस्मानाबाद येथे राहणारी असून तिच्या घरी माणिक चौक येथे वीज जोडणी विप मार्फेत मिळाली आहे. मिटर क्र.आर.19101 हे बसविण्यात आलेले आहे. साल 2006 पासून जून 2012 पर्यंत तक हिने वेळोवेळी बिल भरले. त्यानंतर विप यांनी स्वत: मिटर बदलून क्र.590010345211 चे मिटर बसविले. दि.20/05/012 ते 20/06/2012 चा वापर 98 युनिट दाखविला. चालू रीडींग 109 दाखविले. तर मागचे रीडींग मागच्या मिटरप्रमाणे दाखविले. नंतर दि.20/09/2012 पर्यंत बील दिले नाही पण रु.60 बिलापोटी भरुन घेतले दि.20/10/2012 रोजी संपण्या-या महिन्यासाठी मागील रीडींग 1,710 तर चालू नॉट अव्हेलबल असे दाखविले व 69 युनिटचे रु.357.16 पैसे व थकबाकी रु.393.80 पैसे दाखविले. पुन्हा दि.20/11/2012 अखेर रीडींग न दाखविता 69 युनिट वापर व बिल रु.767.01 व थकबाकी रु.758.60 दाखविली. दि.20/12/2012 अखेर मागिल रीडींग 1 युनिट व चालू रीडींग 658 युनिट असे दाखवून बिल रु.2,790/- चे दिले. अशा प्रकारे चुकीचे बिल दिले आहे व जोडणी तोडण्याची धमकी दिली आहे व सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
तक्रारीसोबत तक्रारदाराने वीज बिले, तक्रार अर्जाच्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
2) विप यांनी दि.03/07/2013 रोजी आपले म्हणणे दाखल केले आहे. तक हिला वापराप्रमाणे बिल दिले असे म्हंटलेले आहे. जे चुकीचे बिल दिले होते ते दुरुस्त करुन देतो असे सांगितले होते.दि.30/05/2012 रोजी मिटर बदलले तेव्हा युनिट 6,95 होते जून 2012 ते एप्रिल 2013 या कालावधीत तक हिने 1119 युनिट वापल्याचे दिसून आले. त्या कालावधीसाठी बिल दुरुस्त करुन रु.1,320/-चे देण्यात आलेले आहे. कोणतेही व्याज अगर दंड लावलेले नाही त्यामुळे तक्रार रदद होण्यास पात्र आहे.
3) तक हिचे कथन विप यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांवरुन आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही खालील कारणांसाठी दिलेली आहेत.
मुद्दे उत्तरे.
1) विप यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) हुकुम कोणता ? होय.
कारणमिमांसा.
4) मुद्दे क्र. 1 व 2:
विप यांनी तकचे मिटर जून 2012 मध्ये बदलले याबददल वाद नाही. नवीन मिटरवर सुरवातीला कोणतेही रीडींग येणार नाही. त्यानंतर वापराप्रमाणे रीडींग येत जाईल. दि.20/06/2012 अखेरच्या बिलाप्रमाणे मागील रीडींग 6919 तर चालू 109 व वीज वापर 98 युनिट असे दाखविले आहे. त्यापुर्वीच्या 11 महिन्यात 86,97,138,65,70,0,161,32,78, 194,128 युनिट वीज वापर दाखविलेला आहे. दि.20/08/2012 रोजीच्या परीस्थितीत मागील रीडींग 6969 व चालू 7010 म्हणूनच 41 युनिट वीज वापर दाखविलेला आहे. त्यापुढील बिलात मागील रीडींग 7010 व चालू रीडींग माहीत नाही व वापर 69 युनिट दाखविण्यात आला आहे. दि.20/11/2012 रोजी पुन्हा तसेच रीडींग दाखविण्यात आले आहे. दि.20/12/2012 रोजी मागील युनिट 1 व चालू रीडींग 658 म्हणजेच वीज वापर 657 दाखविला आहे व एकूण बिल रु.2,790/- दिले आहे. महीन्याच्या महिन्याला रीडींग न घेवून एकदम जास्त युनिटचे बिल विप यांनी तक यांना दिल्याचे दिसते. सर्वसाधारणपणे विप यांची हीच कार्यपध्दती दिसुन येते म्हणजेच विप हे आपल्या सेवेत त्रुटी करत आहेत. जेवढा वापर ग्राहक करतो तेवढयाच वापराचे बिल विप यांना मागण्याचा अधिकार आहे. आधी मर्जीप्रमाणे कोणतेही रीडींग दाखवून अगर न दाखवून बिलाची मागणी करण्यात आली व नंतर अचानक प्रत्यक्ष रीडींगप्रमाणे अवास्तव मागणी करण्यात आली. हे उघड आहे. विप यांचे म्हणणे आहे की जून 2012 ते एप्रिल 2013 या 11 महिन्याच्या कालावधीत तक हिने एकूण 1,121 युनिटचा वापर केला. म्हणजेच दरमहा सुमारे 100 युनिटचा वापर केला. परंतू त्या कालावधीसाठी निरनिराळे रीडींग दाखवून विप यांनी तक कडून बिल वसूल केले आहे. आता विपचे म्हणणे आहे की तक कडून रु.1,320/ बिल येणे होते. दि.04/03/2013 रोजीचे अंतरीम आदेशाप्रमाणे तक हिला रु.1,396/- भरण्यास सांगण्यात आले आहे.
5) कुठल्याही परीस्थितीत विप यांना दोन वेळा स्थिर आकार मागता येणार नाही. तसेच अचानक जास्त युनिटबददल मागणी विप यांना करता येणार नाही. त्यामुळे मागील 12 महिन्याच्या सरासरीप्रमाणे युनिट काढून विप यांना तककडून बिलाची मागणी करता येईल. विप यांनी अवास्तव बिल देवून सेवेत त्रूटी केली आहे त्यामुळे तक अनुतोषास पात्र आहे. म्हणून आम्ही मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे हुकुम करतो.
हुकुम
1) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदार हिला दिलेले दि.20/11/2012 ते 20/12/2012 या कालावधीचे 657 युनिट वीज वापराचे बिल रदद करण्यात येते.
2) या महिन्यासाठी मागिल 12 महिन्याच्या वीज वापराची सरासरी काढून तेवढयाच वापराचे बिल विरुध्द पक्षकार यांना तक्रारदारा कडून वसूल करण्याचा अधिकार आहे. तेथपासून पूढे प्रत्यक्षा वीज वापराप्रमाणेच तककडून बिल वसूल करण्याचा विप यांना अधिकार आहे.
3) तक्रारदार यांनी जी रक्कम मंचाच्या आदेशाप्रमाणे भरली ती तक्रारदार यांच्या बिलामध्ये अॅडजेस्ट करण्यात यावी.
4) विरुध्द पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च म्हणून तक यांना रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) दयावे.
5) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा रहावे.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.