( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष ) आदेश ( पारित दिनांक :28 एप्रिल, 2011) यातील तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, गैरअर्जदार हे कमिशन एजंटचे म्हणुन ठोक व्यापा-यांकडुन माल घेवून घाऊक व्यापा-यांना माल विकत देण्याचे काम करतो. यावर त्यांचे कुटुंबाचा चरितार्थ चालू आहे. तक्रारकर्त्यांनी रुपये 19,800/- चा बी सुदर्शनलाल आणि कंपनी यांचेकडुन माल खरेदी केला आणि तो भंडारा येथे पाठविण्याकरिता गैरअर्जदार यांना यांच्या नागपूर- गोदींया रोडवेज या नावाने व्यावसाईक प्रतिष्ठानामार्फत दिला. त्याबाबत दिनांक 8/2/2010 रोजी पावती मिळाली तिचा क्रमांक 9672 आहे. पुढे सदरचा माल भंडारा येथे पोहचलाच नाही याबाबत गैरअर्जदार यांचेशी वेळोवेळी संपर्क केला मात्र काही उपयोग झाला नाही. कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही म्हणुन गैरअंर्जदार यांना दिनांक 19/5/2010 रोजी वकीलामार्फत नोटीस दिली. त्यास गैरअर्जदाराने कुठलेही उत्तर दिले नाही. गैरअर्जदाराने नोटीस मिळुनही त्यांतील सुचनांचे पालन केले नाही म्हणुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल करुन तीद्वारे गैरअर्जदाराने मालाच्या नुकसानीबद्दल रुपये 19,800/- आणि तक्रारकर्त्यास झालेल्या त्रासाबद्दल रुपये 15,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- मिळावा अशी मागणी केली. तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून दस्तऐवजयादी नुसार एकुण 5 कागदपत्रे दाखल केली. त्यात माल पाठविण्याचा कॅश मेमो, कन्साईनी कॉपी, नोटीस नोटीसची पोचपावती, इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे. सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेने नोटीस देण्यात आली. नोटीस मिळुन गैरअर्जदार हजर झाले नाही व लेखी जवाब दाखल करुन आपला बचाव केला नाही म्हणुन प्रकरण त्यांचे विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 18/03/2011 रोजी पारित करण्यात आला. -: का र ण मि मां सा :- सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने रुपये 19,800/- चे माल घेतल्याबाबतचे देयक दाखल केलेले आहे. तसेच गैरअर्जदार यांचे मार्फत माल पाठविल्याबाबतची पावती दाखल केली आहे. गैरअर्जदारास दिलेल्या नोटीसच्या पोस्टाची पावती आणि पोचपावती दाखल केली आहे. अशाप्रकारे तक्रारकर्त्याने आपली तक्रार प्रतिज्ञालेख व दस्तऐवज याआधारे सिध्द केलेली आहे. गैरअर्जदार यांना मंचाकडुन नोटीस प्राप्त होऊनही ते उपस्थित झाले नाही व आपला बचाव केला नाही व आपले म्हणणे मांडले नाही. यावरुन तक्रारदाराने आपली तक्रार सिध्द केलेली आहे व गैरअर्जदार यांचे सेवेतील त्रुटी उघड आहे. वरील सर्व बाबींवरुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारित आहोत. -//-//- आदेश -//-//- 1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर. 2. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास मालाची किंमत रुपये 19,800/- परत करावी. सदर रक्कमेवर नोटीसचे दिनांक 25/5/2010 पासुन रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो 9 टक्के द.सा.द.शे. व्याजासह मिळुन येणारी रक्कम द्यावी. 3. गैरअर्जदाराने तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रुपये 2,000/-,(रुपये दोन हजार फक्त) तक्रारीचा खर्च रुपये 1000/- (रुपये एक हजार फक्त) द्यावे. 4. सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे न पेक्षा गैरअर्जदार 9टक्के ऐवजी 12 टक्के व्याज देय लागतील. (जयश्री येंडे ) ( विजयसिंह ना. राणे ) सदस्या अध्यक्ष अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |