(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 06.12.2014)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायद्याचे कलम 14 सह 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदाराने स्वतःचे स्वयंरोजगाराकरीता ट्रक क्र.एम एच 34 एम 2363 खरेदी करण्याकरीता गैरअर्जदाराकडून रुपये 7,00,000/- चे कर्ज घेतले व गैरअर्जदाराने अर्जदाराच्या छापील कागदपञांवर 80 ते 90 ठिकाणी सह्या घेतल्या. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून वरील ट्रक घेण्याकरीता घेतलेल्या रुपये 7,00,000/- कर्जाची परतफेड दि.22.2.2007 ते 22.12.2010 पावेतो 47 महिण्यात दरमाह हप्ता रुपये 23,113/- प्रमाणे एकूण रुपये 10,86,311/- एवढे भरावयाचे होते. अर्जदाराने कर्ज परतफेडीच्या हप्त्याची रक्कम नगदी तर कधी बॅंके मार्फत केलेली आहे. अर्जदाराने रुपये 7,00,000/- कर्ज घेतल्यानंतर गैरअर्जदाराकडून या ट्रक करीता इतर कोणतेही कर्ज घेतले नाही. गैरअर्जदाराने अर्जदारास पुन्हा दि.21.10.2010 रोजी याचा ट्रक करीता रुपये 6,00,000/- कर्ज दिल्याचे दाखवून या कर्जाचे रुपये 9,51,572/- वसुल करणे सुरु केले. गैरअर्जदाराने अवलंबीलेली अनुचीत व्यापार पध्दती आहे. त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेली सेवा न्युनतापूर्ण व अनुचीत व्यापार पध्दती ठरविण्यात यावी. गैरअर्जदाराने अर्जदारास ट्रक क्र.एम एच 34 एम 2363 चे कर्ज संबंधात झालेला करारनामा, कर्ज परतफेडीचे परिशिष्ट, चालु विमा पॉलिसी व अर्जदारास दिलेल्याकर्ज परतफेडीचा सन 2007 पासून आजपावेतोचा खातेउतारा द्यावा. गैरअर्जदाराने अर्जदाराचा ट्रक जप्त करु नये. गैरअर्जदाराने अर्जदारास झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 50,000/- व केसच्या खर्चापोटी रुपये 5,000/- अर्जदारास देण्याचा आदेश गैरअर्जदाराविरुध्द पारीत करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
2. अर्जदाराने नि.क्र.4 नुसार 6 दस्ताऐवज, नि.क्र. 5 नुसार अंतरीम अर्ज दाखल केला. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदाराने नि.क्र.13 नुसार अंतरीम आर्जवर उत्तर व नि.क्र.14 नुसार 10 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदाराने नि.क्र.18 नुसार लेखीउत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदाराने नि.क्र.13 व 18 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरातील विशेष कथनात नमूद केले की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडून ट्रक क्र.एम एच 34 एम 2363 खरेदी करण्याकरीत दि.22.1.2007 ला रुपये 7,00,000/- चे कर्ज घेतले होते. अर्जदाराला कर्जाच्या रकमेची व्याजासह परतफेड नियमितपणे दरमहा रुपये 23,113/- प्रमाणे दि.22.2.2007 पासून 22.12.2010 पर्यंत 47 किस्तीमध्ये एकूण रुपये 10,86,311/- ची परतफेड करावयाची होती. अर्जदाराने दि.2.2.2008 रोजी गैरअर्जदाराकडून कर्ज रक्कम रुपये 1,00,000/- घेतले व सदर कर्जासाठी अर्जदाराने गैरअर्जदाराला डिमांड प्रामिसरी नोट करुन दिली होती. तसेच अर्जदाराने रुपये 17,100/- चे विमा कर्ज दि.14.12.2009 रोजी घेतले होते, त्याची परतफेड करायची होती. अर्जदार कर्जाच्या किस्तीची रक्कम नियमितपणे भरीत नव्हता. अर्जदाराने दि.8.10.2010 रोजी गैरअर्जदाराकडे अर्ज करुन नवीन कर्ज मागीतले. अर्जदाराने दिलेल्या अर्जानुसार दि.22.01.2007 चे कर्जाचे रुपये 15,49,365/-, बुलेट लोन चे रुपये 1,39,201/- व विमा कर्जाचेरुपये 20,277/- असे एकूण रुपये 17,08,843/- अर्जदाराकडून घेणे होते. अर्जदाराने रुपये 7,36,042/- भरले व उर्वरीत रुपये 6,00,000/- करीता दि.21.10.2010 ला नीवन करारनामा करुन रुपये 6,00,000/- चे गैरअर्जदाराने कर्ज दिले. याशिवाय अर्जदाराने गैरअर्जदाराकडून विमा कर्ज घेतले. अर्जदार हा नियमितपणे कर्जाची किस्त रक्कम भरीत नाही. अर्जदार थकीतदार आहे. अर्जदाराकडून गाडी संबंधी कर्जाचे रुपये 6,80,140/- घेणे होते. त्यापैकी, अर्जदाराने फक्त रुपये 2,77,325/- व विमा कर्जाचे रुपये 18,389/- व रुपये 7,620/- भरलेले आहे. अर्जदाराने जुन 2012 पासून कोणतीही कर्जाची किस्त रक्कम भरलेली नाही. अर्जदाराकडून थकीत कर्जाची रक्कम रुपये 4,22,584/- व्याजासह घेणे आहे. अर्जदाराने सत्य माहिती मंचापासून लपवून ठेवली. अर्जदार व गैरअर्जदार यांचेमध्ये झालेल्या करारनाम्याचे अटीप्रमाणे सदर तक्रार चालविण्याचा अधिकार लवाद न्यायालयाला आहे. दाखल तक्रार तथ्यहीन असल्यामुळे खारीज होण्यास पाञ आहे.
4. अर्जदाराने नि.क्र.19 नुसार शपथपञ, नि.क्र.21 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. गैरअर्जदाराने नि.क्र.20 नुसार शपथपञ दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयाण, दस्ताऐवज, शपथपञ, अर्जदाराचे लेखी युक्तीवाद, दोन्ही पक्षांनी दाखल केलेले केस लॉ व दोन्ही पक्षाचे तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : नाही.
(2) अंतिम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. गैरअर्जदाराने नि.क्र.14 वर दाखल दस्त क्र.ब-6 ची पडताळणी करतांना असे दिसते की, अर्जदाराने गैरअर्जदाराला जुने लोन खाते बंद करुन नवीन लोन मीळण्याकरीता अर्ज केला होता. सदर अर्जामध्ये अशी नोंद आहे की, अर्जदाराने गाडी क्र.एम एच-34-एम 2363 व गाडी क्र.एम एच-34 एम-2364 वर गैरअर्जदाराकडून लोन घेतले होते. यावरुन असे सिध्द होते की, अर्जदाराकडे दोन ट्रक होते. सदर तक्रार अर्जदाराने गाडी क्र.एम एच 34- एम -2364 च्या बद्दल कोणताही उल्लेख केलेला नाही व त्या ट्रकचा वापर कोणत्या प्रकारे केल्या जात होत याबाबत सुध्दा कोणताही खुलासा अर्जदाराने प्रकरणात दाखल केलेला नाही.
मा.राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगानी दिलेल्या न्यायनिवाडयानुसार :
II (2014) CPJ 87 (NC),
Jasobanta Narayan Ram –Vs.- L & T Finance Limited
Decided on 4.3.2014.
(i) Consumer Protection Act, 1986 – Sections 2(1)(d), 21(a)(ii) – Consumer – Loan raised for purchasing vehicles – Commercial transaction – Purchase of two trucks with loan raised from Bank – Complainant not given any clarification about use of operation of other truck – Complainant not consumer.
वरील नमूद असलेल्या न्यायनिवाडयामध्ये असलेले तथ्य व सदर तक्रारीतील तथ्य सारखेच आहे. सबब, वरील न्यायनिवाडयाचा आधार घेता मंचाच्या मताप्रमाणे अर्जदार हा ग्राहक संज्ञेमध्ये मोडत नाही. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. मुद्दा क्रं. 1 च्या विवेचनावरुन खालील आदेश पारीत करण्ण्यात येत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
(2) उभय पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
(3) उभयपक्षास आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक – 6.12.2014