Maharashtra

Satara

CC/14/117

jayprakash datatraye jadhave - Complainant(s)

Versus

shri ram sakhar karkhana ltd. - Opp.Party(s)

kadam

06 Feb 2015

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

 

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

            मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                               मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

 

                           तक्रार क्र. 117/2014.

                            तक्रार दाखल दि.16-8-2014.

                                    तक्रार निकाली दि.6-2-2015. 

 

श्री.जयप्रकाश दत्‍ताजीराव जाधव,

रा.पुसेगांव, ता.खटाव, जि.सातारा.               ....  तक्रारदार

  

         विरुध्‍द

1. श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.

फलटण, ता.फलटण, जि.सातारा.

2. श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.

फलटण, तर्फे चेअरमन- बाळासाहेब शेंडे.

3. श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.

फलटण, तर्फे कार्यकारी संचालक-

श्री.हणमंत किसनराव निंबाळकर,

क्र.2 व 3 रा. श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.

फलटण, ता.फलटण, जि.सातारा.                 ....  जाबदार

 

                 तक्रारदारातर्फे अँड.ए.आर.कदम.

                 जाबदारातर्फे अँड.व्‍ही.एस.खताळ.  

                                                   

 

                        न्‍यायनिर्णय  

 

सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा यानी पारित केला

 

1.       तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात कथन खालीलप्रमाणे-

      तक्रारदार हे पुसेगांव, जि.सातारा येथील कायमस्‍वरुपी रहिवासी आहेत.  त्‍यांनी जाबदार कारखान्‍यात मुदत ठेवस्‍वरुपात खालील कोष्‍टकात नमूद केल्‍याप्रमाणे रक्‍कम गुंतवली होती व आहे-

अ.क्र.

ठेव पावती क्र.

ठेवीची तारीख

ठेव रक्‍कम रु.

मुदत संपलेची तारीख

1

2114

18-12-2003

39,000/-

17-12-2008

2

1268

25-11-2002

12,000/-

24-11-2007

 

     सदर ठेवपावत्‍यांची मुदत सन 2007-2008 मध्‍ये संपलेली आहे.  मुदत संपलेनंतर तक्रारदारांनी वेळोवेळी सदरची रक्‍कम सव्‍याज जाबदाराकडे परत मागितली असता जाबदारांनी तक्रारदारांस रक्‍कम देणेची टाळाटाळ केली आहे व आजपर्यंत रक्‍कम अदा केलेली नाही.  त्‍यामुळे तक्रारदाराना जाबदारानी सदोष सेवा दिलेली असल्‍याने तक्रारदारानी मे.मंचात सदर तक्रारअर्ज दाखल केलेला आहे. 

2.     तक्रारदारानी सदर कामी जाबदारांकडून ठेवपावत्‍यांवरील रक्‍कम रु.51,000/- व्‍याजासह वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या परत मिळावी, दि.25-11-2012 पासून रक्‍कम रु.51,000/-वर रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.18 टक्‍के दराने जाबदाराकडून व्‍याज मिळावे, तक्रारदारास झालेल्‍या मानसिक, शारिरीक त्रासापोटी जाबदाराकडून रक्‍कम रु.25,000/- मिळावेत तर अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- जाबदाराकडून वसूल होऊन मिळावेत अशी विनंती सदर कामी तक्रारदारांनी केलेली आहे. 

3.      तक्रारदारांनी सदर कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 व 5/2 कडे ठेवपावत्‍यांच्‍या व्‍हेरिफाईड प्रती,नि.12 चे कागदयादीसोबत नि.12/1 कडे जाबदार कारखान्‍याचा ठराव, नि.13 कडे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र नि.14 कडे दुरुस्‍तीअर्ज, नि.15 कडे दुरुस्‍ती अर्जाचे प्रतिज्ञापत्र, नि.16 कडे दुरुस्‍ती प्रत, नि.18 कडे लेखी युक्‍तीवाद वगैरे कागदपत्रे मे.मंचात दाखल केली आहेत. 

4.     सदर कामी जाबदारांनी नि.9 कडे म्‍हणणे, नि.10 कडे म्‍हणण्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.19 कडे लेखी युक्‍तीवाद दाखल केला आहे.  नि.12/1 कडे कोर्ट कामकाजासाठी अधिकार दिल्‍याचे अधिकारपत्र व संचालक मंडळाचा ठराव दाखल केला आहे.  जाबदाराने त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदारांचे तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळली आहेत.  त्‍यांनी म्‍हणण्‍यामध्‍ये स्‍पष्‍ट केले आहे की, तक्रारदारानी जाबदारांना महाराष्‍ट्र सहकार संस्‍था अधिनियम कलम 164 नुसार नोटीस देऊन दोन महिने थांबणेची आवश्‍यकता होती परंतु तक्रारदाराने जाबदाराना नोटीस पाठविलेली नाही त्‍यामुळे तक्रारदाराने महाराष्‍ट्र सहकार कायदा कलम 164 नुसार प्रस्‍तुत जाबदाराविरुध्‍द तक्रार दाखल करता येणार नाही.  प्रस्‍तुत अर्ज दाखल करणेस कोणतेही कारण घडलेले नाही.  केवळ जाबदार साखर कारखान्‍याची बदनामी करणेचा उद्देश असलयाचे स्‍पष्‍ट होते.  तक्रारदारांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा व तक्रारदाराकडून कॉंम्‍पेंसेशन कॉस्‍ट म्‍हणून रु.2,500/- जाबदाराना वसूल होऊन मिळावी. 

5.     सदर कामी तक्रारदार व जाबदारांनी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे.मंाने तक्रारअर्जाचे निराकरणार्थ खालील मुद्दयांचा विचार केला.

अ.क्र.        मुद्दा                                         उत्‍तर

 1. तक्रारदार व जाबदार हे नात्‍याने ग्राहक आहेत काय?            होय.

 2. तक्रारदाराना जाबदारांनी सदोष सेवा पुरवली आहे काय?         होय.

 3. अंतिम आदेश काय?                         शेवटी नमूद केलेल्‍या आदेशाप्रमाणे.

 

विवेचन मुद्दा क्र.1 व 2

6.       वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देतो कारण तक्रारदारानी जाबदार कारखान्‍यात खाली नमूद केलेप्रमाणे मुदत ठेव योजनेत रक्‍कम गुंतवली होती व आहे.  

अ.क्र.

ठेव पावती क्र.

ठेवीची तारीख

ठेव रक्‍कम रु.

मुदत संपलेची तारीख

1

2114

18-12-2003

39,000/-

17-12-2008

2

1268

25-11-2002

12,000/-

24-11-2007

  

       वर नमूद रक्‍कम तक्रारदारानी जाबदारांकडे मुदतठेव योजनेत गुंतवले होते ही बाब तक्रारदाराने नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 व 5/2 कडे दाखल ठेवपावत्‍यांच्‍या व्‍हेरिफाईड प्रतींवरुन सिध्‍द होत आहे, तसेच तक्रारदाराना जाबदारानी सदर रक्‍कम वारंवार मागणी करुनही परत  अदा केली नाही ही बाब तक्रारदाराने शपथेवर व प्रतिज्ञापत्रात म्‍हटले आहे.  तर जाबदारानी या मुदतठेवीची बाब त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये स्‍पष्‍टपणे नाकारलेली नाही.  त्‍यामुळे तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत व जाबदारानी तक्रारदाराना त्‍यांचे मुदतठेवीची रक्‍कम वारंवार मागणी करुनही परत अदा केलेली नाही म्‍हणून जाबदाराने तक्रारदारास सदोष सेवा पुरवली असल्‍याचे निर्विवादपणे सिध्‍द होते.  म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी दिलेले आहे. 

7.      वरील सर्व मुद्दयांचा, विवेचनाचा तसेच तक्रारदार व जाबदारांचे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र, युक्‍तीवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन सदर कामी जाबदारानी तक्रारदाराना सदोष सेवा पुरवली असल्‍याचे मे.मंचाचे स्‍पष्‍ट मत झालेले आहे.  सबब प्रस्‍तुत कामी जाबदार 1 ते 3 यांना lifting up co-operative corporate veil नुसार वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या रक्‍कम अदा करणेसाठी जबाबदार धरणे न्‍यायोचित होणार आहे.  सबब सदर कामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-

                        आदेश

1.  तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

2. जाबदार क्र.1 ते 3 यांना तक्रारदारांना खालील कोष्‍टकात नमूद केलेल्‍या ठेवीच्‍या रकमा सव्‍याज अदा करणेसाठी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या जबाबदार धरणेत येते.       

अ.क्र.

ठेव पावती क्र.

ठेवीची तारीख

ठेव रक्‍कम रु.

मुदत संपलेची तारीख

1

2114

18-12-2003

39,000/-

17-12-2008

2

1268

25-11-2002

12,000/-

24-11-2007

  

3.   जाबदार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदारांचे वर नमूद कोष्‍टकातील ठेवीची ठेवपावतीवरील नमूद व्‍याजासह रक्‍कम तक्रारदाराना अदा कराव्‍यात.

4.   प्रस्‍तुत ठेवपावत्‍यांच्‍या व्‍याजासहित रकमेवर ठेवीची मुदत संपले तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज जाबदार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदारास अदा करावे.

5.   तक्रारदारास झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासापोटी जाबदार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या रक्‍कम रु.10,000/- (रु.दहा हजार मात्र) अदा करावेत.

6.  तक्रारअर्जाचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.5,000/- (रु.पाच हजार मात्र) जाबदार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदारास अदा करावेत.

7.   वरील आदेशांचे पालन जाबदारानी आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात करावे.

8.   सदर आदेशाचे पालन जाबदारानी विहीत मुदतीत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25 व 27 अन्‍वये दाद मागू शकतील.

9.   सदर न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

10.   सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

ठिकाण- सातारा.

दि.6-2-2015.

           (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

             सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

                जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.