Maharashtra

Satara

CC/15/6

shri sadashiv Dhandev shind - Complainant(s)

Versus

shri ram sah sakhar karkhana - Opp.Party(s)

mahadik

02 Jul 2015

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

 

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

            मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                               मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

 

 

                           तक्रार क्र. 6/2015.

                            तक्रार दाखल दि.1-1-2015.

                                    तक्रार निकाली दि.2-7-2015. 

 

श्री.सदाशिव ज्ञानदेव शिंदे,

रा.राणंद, ता.माण, जि.सातारा.                ....  तक्रारदार

  

         विरुध्‍द

1. श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.

   फलटण तर्फे- चेअरमन-

   डॉ.बाळासाहेब पंढरीनाथ शेंडे.

2. श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.

   फलटण तर्फे- कार्यकारी संचालक-

   श्री.एच.के.निंबाळकर.                     ....  जाबदार

 

                तक्रारदारातर्फे अँड.एस.एस.महाडीक. 

                 जाबदारातर्फे अँड.व्‍ही.एस.खताळ.                                            

 

                        न्‍यायनिर्णय  

 

सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सुरेखा हजारे,सदस्‍या यानी पारित केला

                                                    

1.       तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.

       सदर तक्रारदार हे मौ.राणंद, ता.माण, जि.सातारा येथील रहिवासी असून त्‍यांची तेथे वडिलोपार्जित शेती आहे.  ते शेतीचा व्‍यवसाय करतात.  तसेच जाबदार क्र.1 चेअरमन तर जाबदार क्र.2 कार्यकारी संचालक म्‍हणून श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.फलटण येथे कार्यरत आहेत.  जाबदारांच्‍या संस्‍थेचा ऊस गाळप करुन साखर उत्‍पादन करणे हा महत्‍वाचा व्‍यवसाय आहे.    सन 2002-03 मध्‍ये साखर कारखान्‍यांपुढे दुष्‍काळ ऊसावर पडलेला मावा रोग इ.कारणांमुळे कारखान्‍यांची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली होती.  जाबदारांची संस्‍था ही आर्थिक तोटयात चाललेली होती.  त्‍या काळात तक्रारदार हे जाबदारांमार्फत किंवा त्‍यांचे संलग्‍न शिक्षण माध्‍यमिक शिक्षक म्‍हणून कामास होते.   जाबदारांचा सहकारी तत्‍वावर असलेला साखर कारखाना आर्थिक तोटयापासून बाहेर काढणेकरिता  जाबदारानी सभासद तसेच कर्मचारी इ.लोकांना आव्‍हानित करुन कारखान्‍याकडे रक्‍कम स्‍वरुपात भांडवलासाठी पैसे जमा केले त्‍याबाबत जाबदार क्र.1 व 2 यानी लोकाना मुदत ठेवीच्‍या पावत्‍या दिल्‍या.   तक्रारदारानी जाबदारांच्‍या सहकारी साखर कारखान्‍याकडे रक्‍कम रु.10,000/- व रक्‍कम रु.39,000/- या रकमा मुदतठेव म्‍हणून ठेवलेल्‍या असून त्‍याचा तपशील खालीलप्रमाणे.

अ.क्र.

ठेवीदाराचे नाव

पावती क्र.

ठेव ठेवलेची तारीख

मुदत संपलेची तारीख

रक्‍कम रु.

व्‍याजदर द.सा.द.शे.

1

सदाशिव ज्ञानदेव शिंदे

1265

25-11-02

24-11-07

10000/-  

11%

2

सदाशिव ज्ञानदेव शिंदे

2118

18-12-03

17-12-08

39,000/-  

11%

    तक्रारदारानी वर नमूद ठेवीच्‍या पावतीची मुदत संपले तारखेपासून वेळोवेळी जाबदारांचे कारखाना कार्यालयात जाऊन मुदतठेव रक्‍कम व त्‍याचे होणारे व्‍याजाची मागणी सतत केली होती.  परंतु जाबदारानी कारखान्‍याची स्थिती हलाखीची आहे, आज देतो, उदया देतो असे म्‍हणून टाळाटाळ सुरु ठेवली.    दि.11-5-13 रोजी तक्रारदारानी जाबदार क्र.1 व 2 यांचेकडे रक्‍कम मागितली असता, आमचे संस्‍थेची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली होती, त्‍यामुळे तुम्‍हांस देय असलेली रक्‍कम देऊ शकलो नव्‍हतो, तथापि तुम्‍हांस देय असलेली रक्‍कम विजयादशमीच्‍या 2013 सणापूर्वी मूळ मुद्दल व त्‍यावर होणारे आजपर्यंतचे व्‍याज अशी पूर्ण रक्‍कम देऊन टाकतो, असे सांगितले.  परंतु जाबदार 1 व 2 यानी रक्‍कम दिली नाही वा तक्रारदारांशी संपर्कही साधलेला नाही.    तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असून उभयतांमध्‍ये ग्राहक व मालक असे नाते निर्माण झालेले आहे.  तक्रारदारांची माण तालुक्‍यातील दुष्‍काळामुळे आर्थिक परिस्थिती अत्‍यंत हलाखीची झालेली आहे.  सदर रक्‍कम तक्रारदारांचे मालकी हक्‍काची आहे. ती तक्रारदारांना देणे जाबदार 1 व 2 यांचेवर कायदयाने बंधनकारक आहे.  सदरची रक्‍कम पर‍त मिळणेकरिता तक्रारदारानी दि.22-7-14 रोजी अँड.डी.एल.जाधव यांचेतर्फे जाबदार क्र.1 व 2 याना रजि.नोटीस पाठवून मुदतठेवपावती मधील व्‍याजासह सर्व रक्‍कम परत करणेकरिता कळविले.  सदरची नोटीस मिळूनही जाबदार क्र.1 व 2 यानी त्‍या नोटीसीस उत्‍तर पाठविले नाही वा नोटीसीतील नमूद रक्‍कम तक्रारदाराना आजपर्यंत परत केलेली नाही म्‍हणून सदर तक्रार या जिल्‍हा मंचाकडे दाखल करणे भाग पडले आहे.    तक्रारदारानी अन्‍य कोणत्‍याही न्‍यायालयात याबाबत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.    तक्रारदारानी दि.22-7-14 रोजी रजि.नोटीस पाठवूनही जाबदार क्र.1 व 2 यानी तक्रारदाराना मुदत ठेव पावतीवरील रक्‍कम सव्‍याज परत केली नाही त्‍यावेळी अर्जास कारण घडले व घडत आहे.    जाबदार क्र.1 व 2 हे या मे.कोर्टाचे स्‍थळसीमेत रहात असून सदर तक्रारअर्ज चालवणेचा अधिकार या कोर्टास आहे.  सबब तक्रारदारानी खालीलप्रमाणे मे.मंचाला विनंती केली आहे- अर्जातील तपशील 1 मध्‍ये दाखवल्‍याप्रमाणे ठेव पावती क्र.1265 रक्‍कम रु.10,000/- तसेच ठेव पावती क्र.2118 रक्‍कम रु.39,000/-अशा दोन्‍ही ठेवपावत्‍यांपोटी होणारी एकूण रक्‍कम व्‍याजासह परत करणेबाबत जाबदाराना आदेश व्‍हावेत. आर्थिक व मानसिक त्रासापोटी तक्रारदाराना रु.25,000/- जाबदार 1 व 2 कडून देववावेत, तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.10,000/- तक्रारदाराना जाबदाराकडून मिळावेत. 

2.      जाबदार क्र.1 व 2 यानी नि.8 अन्‍वये त्‍यांचे म्‍हणणे खालीलप्रमाणे दाखल केले आहे-

        तक्रारदारानी केलेला अर्ज व त्‍यातील संपूर्ण मजकूर खोटा व लबाडीचा असून तो जाबदारास मान्‍य व कबूल नाही.  जाबदार हा सहकारी साखर कारखाना असून ऊसापासून साखरेचे उत्‍पादन करणे हा व्‍यवसाय आहे.  शेतकरी, सभासद हे कारखान्‍याचे मालक असतात, त्‍यामुळे तकारदार व जाबदारांमध्‍ये ग्राहक हे नाते निर्माण होत नाही.  तक्रारदारानी त्‍यांचे अर्जात ग्राहक हे नाते संस्‍थेशी कसे निर्माण झाले याबाबत किंवा न्‍याय कक्षेबाबत कोणतेही वर्णन दिलेले नाही.  या कारणासाठी तक्रारअर्ज फेटाळणेत यावा.  तक्रारदारानी श्रीराम सहकारी साखर कारखान्‍याचे चेअरमन याना जाबदार म्‍हणून सामील केले आहे, परंतु चेअरमन यांची कोणत्‍याही कागदपत्रावर सही नाही.  तक्रारीचे कलम 6 मधील मजकूर खोटा व लबाडीचा असून तक्रारदारानी जाबदाराना 22-7-04 रोजी लेखी पत्राने मागणी कली हे म्‍हणणे खोटे व लबाडीचे असून अशा प्रकारचे पत्र दिलेले नाही.    तक्रारदारानी जाबदाराना महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था अधिनियम कलम 164 नुसार नोटीस देऊन दोन महिने थांबणेची आवश्‍यकता होती, परंतु तकारदारानी जाबदाराना नोटीस पाठवलेली नाही, त्‍यामुळे महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था अधिनियमाचे कलम 164 नुसार सदर अर्ज जाबदाराविरुध्‍द दाखल करता येत नाही यासाठीही तक्रारअर्ज फेटाळणेत यावा.   तक्रारदारानी कलम 7 मध्‍ये केलेली खर्चाची मागणी, मानसिक त्रासापोटी केलेली मागणी व व्‍याजाची मागणी चुकीची असून ती मान्‍य व कबूल नाही.  सबब जाबदारानी तक्रारअर्ज फेटाळणेची विनंती त्‍यांचे म्‍हणण्‍यात केली आहे. 

3.       नि.1 कडे तक्रारअर्ज, नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.3 कडे अँड.महाडीक यांचे वकीलपत्र, नि.4 कडे कागदयादीने कागद दाखल.  नि.4/1 कडे जाबदार क्र.1 व 2 याना तक्रारदारानी पाठवलेल्‍या रजि.नोटीसची प्रत, नि.4/2 कडे तक्रारदारानी दोन्‍ही जाबदाराना पाठवलेल्‍या नोटीसच्‍या पोचपावत्‍या, नि.4/3 कडे तक्रारदारानी पाठवलेल्‍या नोटीसच्‍या पोचपावत्‍या, नि.4/4 कडे तक्रारदाराच्‍या नावे असलेली रक्‍कम रु.10,000/-ची मुदतठेवीची व्‍हेरिफाईड प्रत व नि.4/5 कडे रक्‍कम रु.39,000/-ची मुदतठेवीची व्‍हेरिफाईड प्रत, नि.5 कडे पत्‍तामेमो, नि.5/1 कडे मंचाने जाबदाराना पाठवलेली नोटीस, नि.6 कडे जाबदार क्र.2 ची पोहोचपावती, नि.7 कडे जाबदार 1 ची पोहोचपावती, नि.8 कडे जाबदार क्र.1 व 2 तर्फे म्‍हणणे दाखल. नि.9 कडे जाबदार क्र.2 चे प्रतिज्ञापत्र, नि.6/1 कडे जाबदार क्र.1 व 2 तर्फे अँड.खताळ यांचे वकीलपत्र, नि.7/1 कडे जाबदार 1 व 2 यांचा पत्‍तामेमो, नि.10 कडे जाबदार कारखान्‍याच्‍या संचालक मंडळ सभेचा ठराव क्र.8(3), नि.11 कडे तक्रारदाराची पुरावा संपलेची पुरसीस, नि.12 कडे तक्रारदाराचे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.13 कडे तक्रारदाराचे कागदयादीने कागद दाखल, नि.13/1 कडे तक्रारदाराची रु.39,000/- दाखवणारी मुदतठेव पावती, नि.13/2 कडे रु.10000/- ची मुदतठेवपावती, नि.14 कडे जाबदारांची पुरावा संपलेची पुरसीस इ.कागदपत्रे तक्रारदार व जाबदारानी दाखल केली आहेत.

4.       तक्रारदारांची तक्रार, त्‍यासोबतचे प्रतिज्ञापत्र, पुरावे, जाबदारांनी दाखल केलेले म्‍हणणे व कागदपत्रे तसेच लेखी व तोंडी युक्‍तीवाद यांचे अवलोकन करुन सदर तक्रारीचे निराकरणार्थ मे. मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-

 अ.क्र.           मुद्दा                                          निष्‍कर्ष

 

 1.  तक्रारदार व जाबदार यांचेत ग्राहक व सेवापुरवठादार

     असे नाते आहे काय?                                         होय.                                                 

 

 2.  जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय?      होय.

 

 3.  जाबदार हे तक्रारदारांच्‍या रकमा देणे लागतात काय?                होय.

 

 4.  अंतिम आदेश काय?                                तक्रार अंशतः मंजूर. 

 

विवेचन-

5.         मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.  जाबदार साखर कारखाना हा सहकारी तत्‍वावर चालत असून साखर कारखान्‍याने आर्थिक तोटयापासून बाहेर पडणेसाठी सभासद तसेच कर्मचारी इ.लोकांना आवाहन करुन कारखान्‍याकडे रक्‍कम स्‍वरुपात भांडवलासाठी पैसे जमा केले व त्‍याबाबत जाबदार क्र.1 व 2 यानी मुदतठेवीच्‍या पावत्‍या दिल्‍या.  म्‍हणजेच जाबदारानी लोकांकडून ठेवस्‍वरुपात रकमा जमा करुन घेतल्‍या व त्‍यामोबदल्‍यात त्‍याना त्‍यावर व्‍याज देणार असलेचे सांगितले व त्‍याप्रमाणे त्‍याना मुदतठेवीच्‍या पावत्‍या करुन दिल्‍या.  प्रस्‍तुत कामी तक्रारदारांच्‍या रकमा जाबदारांकडे मुदतठेव स्‍वरुपात ठेवल्‍या गेल्‍या त्‍यामुळे ते जाबदार कारखान्‍याचे ग्राहक आहेत हे सिध्‍द होते.  तसेच जाबदार कारखान्‍याने रकमा ठेवून घेऊन त्‍यावर व्‍याज दयावयाचे ठरविलेने  जाबदार पतसंस्‍था ही ग्राहकाना सेवा पुरवठा देणारी संस्‍था ठरते.  तक्रारदारानी मुदत संपलेनंतर रकमांची मागणी करुनही जाबदारानी तक्रारदारांच्‍या रकमा परत केल्‍या नसल्‍यामुळेच जाबदारांच्‍या कर्तव्‍यात कसूर झाली आहे व ग्राहकाला त्‍यांचेकडून दयावयाच्‍या सेवेत त्रुटीही निर्माण झालेली आहे.  आजपावेतो जाबदारांनी तक्रारदारांची रक्‍कम सव्‍याज परत केलेली नाही, ती त्‍यांनी त्‍यांना सव्‍याज वेळेत परत करावयास हवी होती या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत.  सदर तक्रारअर्जात cooperative corporate veil नुसार तक्रारदारांचे पैसे देणेस जाबदार क्र.1 व 2 यांना हे मंच वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या जबाबदार धरीत आहे.  सदर बाबतीत आम्‍ही मे. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या रिट पिटीशन नंबर 117/2011 मंदाताई संभाजी पवार वि. स्‍टेट ऑफ महाराष्‍ट्र या न्‍यायनिवाडयाचा व त्‍यातील दंडकांचा आधार घेतला आहे.

 

6.         सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-

                          आदेश

1.    तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.

2.  तक्रारदार यांना रक्‍कम रु.10,000/- वर दि.25-11-2002 पासून आदेश पारित तारखेपर्यंत जाबदार कारखान्‍याच्‍या नियमाप्रमाणे होणारे व्‍याज अशी एकूण सव्‍याज रक्‍कम जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या अदा करावी.

3.   तक्रारदार यांना रक्‍कम रु.39,000/- वर दि.18-12-2003 पासून आदेश पारित तारखेपर्यंत जाबदार कारखान्‍याच्‍या नियमाप्रमाणे होणारे व्‍याज अशी एकूण सव्‍याज रक्‍कम जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या अदा करावी.

5.    तक्रारदाराना जाबदार क्र.1 व 2 यानी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या मानसिक व आर्थिक नुकसानीपोटी रक्‍कम रु.22,000/- तसेच अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/-अदा करावेत.

6.     वरील आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाचे आत जाबदार क्र.1 व 2 यानी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या करावयाचे आहे, तसे न केलेस एकूण होणा-या रकमेवर तक्रारदाराचे हाती रक्‍कम पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्‍के दराने व्‍याज दयावे लागेल.

7.   जाबदारानी विहीत मुदतीत म्‍हणजे 45 दिवसाचे आत वरील आदेशाचे पालन न केलेस तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्‍वये दाद मागू शकतील. 

8.  सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला. 

9.  सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

 

ठिकाण- सातारा.

दि. 2-7-2015.

 

        सौ.सुरेखा हजारे  श्री.श्रीकांत कुंभार  सौ.सविता भोसले

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

 

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.