जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ६१/२०११
तक्रार दाखल दिनांक – २८/०३/२०११
तक्रार निकाली दिनांक – २३/१२/२०१३
१) श्री.अमृतसिंग बाबुसिंग पाटील,
उ.व. – सज्ञान, कामधंदा – नोकरी,
२) सौ. मंदाकिनी अमृतसिंग पाटील,
उ.व. – सज्ञान, कामधंदा – घरकाम,
३) कु. हर्षदा अमृतसिंग पाटील,
उ.व. – सज्ञान, कामधंदा – शिक्षण
४) चि. तेजस उर्फ राहुल अमृतसिंग पाटील,
उ.व. – सज्ञान, कामधंदा – शिक्षण
नंबर ३ ते ४ तर्फे अपाक वडिल म्हणून
तक्रारदार नंबर १
सर्व राहणार – १२९, शांतीनाथ नगर,
जैन मंदीरासमोर, साक्री रोड, धुळे. ................ तक्रारदार
विरुध्द
१) श्री. श्रीराम हरीकृष्ण नागरी सहकारी
पतसंस्था मर्यादित, धुळे, ता.जि. धुळे
अनुराग, ३५, ग.स. बॅंक कॉलनी,
म. फुले पुतळयाजवळ, धुळे
(नोटीसीची बजावणी – प्रशासक, श्री.शिवाजी फकीरा भदाणे
रा.मु.पो. दुसाणे, ता.साक्री, जि.धुळे)
२) प्रशासक,
श्री.शिवाजी फकीरा भदाणे
रा.मु.पो. दुसाणे, ता.साक्री, जि.धुळे
३) श्री.रविंद्र त्र्यंबक भदाणे (व्यवस्थापक)
रा.शिरधाने, ता.जि. धुळे
४) श्री.लक्ष्मण फकिरा भदाणे (चेअरमन)
रा. कै.पो.ता. पाटील माध्यमिक विद्यालय,
कुंडाणे (वार), ता.जि. धुळे
५) श्री. बाबुलाल मोतीराम पाटील (संचालक)
रा.पोलीस लाईन, ब्लॉक नं.५६, रूम नं.६०७,
फाशीपुलाजवळ, पोलीस क्वार्टर, धोडीपारबाब समोर,
धुळे, ता.जि. धुळे.
६) श्री. अशोक कौतिक पाटील (संचालक)
रा.गोवर्धन कॉलनी, चावरा इंग्लिश मेडियम स्कुलजवळ,
वाडिभोकर रोड, देवपूर धुळे.
७) सौ. रेखा अशोक पाटील (संचालिका)
रा.गोवर्धन कॉलनी, चावरा इंग्लिश मेडियम स्कुलजवळ,
वाडिभोकर रोड, देवपूर धुळे.
८) श्री.रामभाऊ सुकदेव पाटील (संचालक)
रा.कुंडाणे वार, ता.जि. धुळे.
९) श्री.शरद फकिरा भदाणे (संचालक),
रा.दुसाने, ता.साक्री, जि.धुळे.
१०) श्री.शांतीलाल सिताराम पाटील (संचालक),
रा.गोवर्धन कॉलनी, चावरा इंग्लिश मेडियम स्कुलजवळ,
वाडिभोकर रोड, देवपूर धुळे.
११) देवराम धनाजी बागुल (संचालक)
पत्ताः- कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय,
पारोळा रोड, धुळे, ता.जि.धुळे.
१२) तालुका उपनिबंधक सो.,
सहकारी संस्था, जुने जिल्हाधिकारी कार्यालय,
धुळे, ता.जि.धुळे. ............ जाबदेणार
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड. श्री.पी.बी. कुलकर्णी)
(जाबदेणार तर्फे – एकतर्फा)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्या पतसंस्थेत मुदत ठेव पावती अन्वये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
१. तक्रारदार यांनी सर्व तक्रारदारांच्या वतीने एकत्र हिंदु कुटू्ंबाचा कर्ता या नात्याने तक्रारदार नंबर १ यांनी सदर तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, जाबदेणार ‘श्री. श्रीराम हरीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, धुळे’ (यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत मुदत ठेव पावतीत रक्कम गुंतविली होती त्याचा तपशील खालील प्रमाणे.
अ. तक्रारदार नंबर १, श्री.अमृतसिंग बाबुसिंग पाटील यांचे नावेः-
अ.क्र. |
पावती क्रमांक |
ठेव दिनांक |
ठेव रक्कम |
ठेव देय दिनांक |
व्याजदर |
मुदतअंती मिळणारी रक्कम |
०१. |
११८१ |
०६/११/०४ |
१५,०००/- |
०६/०९/१० |
दामदुप्पट |
३०,०००/- |
०२. |
१४५० |
०७/०४/०५ |
१५,०००/- |
०६/१०/१० |
दामदुप्पट |
३०,०००/- |
०१. |
१४८९ |
३१/०५/०५ |
१५,०००/- |
३०/११/१० |
दामदुप्पट |
३०,०००/- |
एकुण |
४५,०००/- |
|
९०,०००/- |
ब. तक्रारदार नंबर २, सौ.मंदाकिनी अमृतसिंग पाटील यांचे नावेः-
अ.क्र. |
पावती क्रमांक |
ठेव दिनांक |
ठेव रक्कम |
ठेव देय दिनांक |
व्याजदर |
मुदतअंती मिळणारी रक्कम |
०१. |
१०७७ |
२०/०९/०४ |
१५,०००/- |
२०/०७/१० |
दामदुप्पट |
३०,०००/- |
०२. |
११८० |
०६/११/०४ |
१५,०००/- |
०६/०९/१० |
दामदुप्पट |
३०,०००/- |
०३. |
१२०१ |
१६/११/०४ |
१५,०००/- |
१५/०९/१० |
दामदुप्पट |
३०,०००/- |
०४. |
१२९६ |
१०/०१/०५ |
१५,०००/- |
१०/०७/१० |
दामदुप्पट |
३०,०००/- |
०५. |
१४५१ |
०७/०४/०५ |
१५,०००/- |
०६/१०/१० |
दामदुप्पट |
३०,०००/- |
एकुण |
७५,०००/- |
|
१,५०,०००/- |
क. तक्रारदार नंबर ३, कु. हर्षदा अमृतसिंग पाटील (अपाक वडिल – श्री.अमृतसिंग पाटील) हिचे नावेः-
अ.क्र. |
पावती क्रमांक |
ठेव दिनांक |
ठेव रक्कम |
ठेव देय दिनांक |
व्याजदर |
मुदतअंती मिळणारी रक्कम |
०१. |
०७६७ |
०८/०५/०४ |
१५,०००/- |
०६/०५/१० |
दामदुप्पट |
३०,०००/- |
०२. |
११२६ |
०८/१०/०४ |
१५,०००/- |
०८/०८/१० |
दामदुप्पट |
३०,०००/- |
०३. |
१२०२ |
१६/११/०४ |
१५,०००/- |
१५/०९/१० |
दामदुप्पट |
३०,०००/- |
०४. |
१२९४ |
१०/०१/०५ |
१५,०००/- |
१०/०७/१० |
दामदुप्पट |
३०,०००/- |
एकुण |
६०,०००/- |
|
१२०,०००/- |
ड. तक्रारदार नंबर ४, चि.तेजस अमृतसिंग पाटील (अपाक वडिल – श्री.अमृतसिंग पाटील) याचे नावे-
अ.क्र. |
पावती क्रमांक |
ठेव दिनांक |
ठेव रक्कम |
ठेव देय दिनांक |
व्याजदर |
मुदतअंती मिळणारी रक्कम |
०१. |
०७६६ |
०८/०५/०४ |
१५,०००/- |
०८/०५/१० |
दामदुप्पट |
३०,०००/- |
०२. |
०७९९ |
१८/०५/०४ |
१५,०००/- |
१८/०५/१० |
दामदुप्पट |
३०,०००/- |
०३. |
११२७ |
०८/१०/०४ |
१५,०००/- |
०८/०८/१० |
दामदुप्पट |
३०,०००/- |
०४. |
११८९ |
१०/११/०४ |
१५,०००/- |
१०/०९/१० |
दामदुप्पट |
३०,०००/- |
०५. |
१२०३ |
१६/११/०४ |
१५,०००/- |
१५/०९/१० |
दामदुप्पट |
३०,०००/- |
०६. |
१२४६ |
२०/१२/०४ |
१५,०००/- |
२०/१०/१० |
दामदुप्पट |
३०,०००/- |
०७. |
१२९३ |
१०/०१/०५ |
१५,०००/- |
१०/०७/१० |
दामदुप्पट |
३०,०००/- |
०८. |
१२९५ |
१०/०१/०५ |
१५,०००/- |
१०/०७/१० |
दामदुप्पट |
३०,०००/- |
०९. |
१४४९ |
०७/०४/०५ |
१५,०००/- |
०६/१०/१० |
दामदुप्पट |
३०,०००/- |
एकुण |
१,३५,०००/- |
|
२,७०,०००/- |
२. तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडे वरील देय रक्कमेची वेळोवेळी मागणी केली असता जाबदेणार यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना दिली नाही. सबब तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडून मुदत ठेव पावतींमधील मुदतीअंती एकूण देय रक्कम रूपये ६,३०,०००/- व त्यावर देय तारखेपासून संपूर्ण रक्कम अदा होईपावेतोचे द.सा.द.शे. १८ टक्के प्रमाणे व्याज. तसेच मानसिक, शारिरिक त्रासापोटी व आर्थिेक नुकसानीपोटी रक्कम रूपये १,००,०००/- आणि अर्जाचा खर्च रक्कम रूपये २५,०००/- जाबदेणार यांचेकडून मिळावा, याकामी सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला.
३. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ मुदत ठेव पावतींच्या छायांकित प्रती नि. ५/१ ते ५/२१ वर दाखल केलेल्या आहेत.
४. जाबदेणार नं.१ ते ११ यांना नोटीसची बजावणी होवूनही मुदतीत हजर न झालेने त्यांचे विरूध्द ‘एकतर्फा’ आदेश पारित करण्यात आला आहे.
५. जाबदेणार नं.१२ यांनी हजर होऊन मुदतीत खुलासा न दिलेने त्यांच्या विरूध्द‘नो से’ आदेश पारित करण्यात आला आहे.
६. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, पुराव्यासाठी दाखल कागदपत्रे पाहता व विद्वान वकीलानी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
१. तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक आहेत काय ? होय
२. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
कमतरता केली आहे काय ? होय
३. तक्रारदार हे जाबदेणार यांच्याकडून देय रक्कम
व त्यावरील व्याज मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
४. तक्रारदार हे जाबदेणार यांच्याकडून मानसिक
त्रास व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम वसुल होऊन
मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
५. अंतिम आदेश ? खालीलप्रमाणे विवेचन
७. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी मुदत ठेव पावतींच्या छायांकित प्रती नि. ५/१ ते ५/२१ दाखल केलेल्या आहेत. जाबदेणार यांनी तक्रारदार यांची मुदत ठेव पावतींमधील रक्कम नाकारलेली नाही. मुदत ठेवपावतींमधील रक्कमेचा विचार होता तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा क्र.२- प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत मुदत ठेव पावती अन्वये रक्कम गुंतविली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडे गुंतवलेली रक्कम परत करणे हे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही रक्कम न देणे ही जाबदेणार यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.२ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
९. मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी दाखल केलेल्या मुदतठेव पावतींमधील व्याजासह होणारी रक्कम जाबदेणार ‘चेअरमन/संचालक मंडळ’ श्री. श्रीराम हरीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, धुळे, ता.जि. धुळे यांच्याकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. परंतू या संदर्भात मा.मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.५२२३/०९ सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्द राजश्री राजकुमार चौधरी या न्यायिक दृष्टांतामध्ये पुढील प्रमाणे मत व्यक्त केले आहे.
As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceededagainst and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain ableagainst the society, the Directors of members of the managing committee cannot be heldresponsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To holdthe Directors of the banks/members of the managing committee of the societiesresponsible, without observing the procedure prescribed under the Act, would also beagainst the principles of co-operation, which is the very foundation of establishment oftheco-operative societies.
वरील न्यायिक दृष्टांतामध्ये संचालकांना रक्कम देण्यासाठी वैयक्तीकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्व विषद करण्यात आले आहे. त्यामुळे जाबदेणार यांना वैयक्तिकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही. या सर्व बाबींचा विचार होता तक्रारदार हे जाबदेणार पतसंस्था श्री. श्रीराम हरीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, धुळे, ता.जि. धुळे यांचेकडून मुदतठेव पावतींमधील मुदती अंती एकूण देय रक्कम रूपये ६,३०,०००/- सदर आदेश तारखे पासून संपूर्ण रक्कम फीटेपर्यंत द.सा.द.शे. ६ टक्के दराप्रमाणे व्याजासह, अशी एकूण रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.३ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१०. मुद्दा क्र.४- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदतठेव पावतींमधील व्याजासह होणारी रक्कम जाबदेणार यांच्याकडुन परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना जाबदेणार पतसंस्था श्री. श्रीराम हरीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, धुळे, ता.जि. धुळे यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे जाबदेणार यांच्या कडून मानसिक त्रासापोटी रु.१०००/- व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.५००/- वसुल होऊन मिळण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुदद क्रं.४ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
११. मुद्दा क्र.५- वरील सर्व विवेचनावरून पुढील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२. जाबदेणार श्री. श्रीराम हरीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, धुळे, ता.जि. धुळे यांनी, सदर आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांचे आत, तक्रारदारांना खालील प्रमाणे रक्कमा दयाव्यात.
(१) मुदतठेव पावतींमधील मुदतीअंती असलेली एकूण देय रक्कम रू.६,३०,०००/-(अक्षरी रूपये सहा लाख तीस हजार मात्र) व या रकमेवर देय दिनांकापासुन द.सा.द.शे. ६ टक्के दराने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत व्याज दयावे.
(२) मानसिक त्रासापोटी रक्कम रू.१,०००/- (अक्षरी रूपये एक हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रू.५००/- (अक्षरी रूपये पाचशे मात्र) दयावेत.
३. वर नमुद आदेशाची अमंलबजावणी (अध्यक्ष/संचालक/व्यवस्थापक/अवसायक) यापैकी वेळोवेळी जे कोणी पतसंस्थेचा कारभार पाहात असतील त्यांनी करावी. तसेचक्र.२मधीलरकमेपैकीकाहीरक्कम अगर व्याज दिले असल्यास, त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
धुळे.
दि.२३/१२/२०१३.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.