Maharashtra

Ahmednagar

CC/14/250

Dr.Manisha Sanjay Ladda - Complainant(s)

Versus

Shri Rajesh Shashikant Trivedi,Bhavik Constructions - Opp.Party(s)

Mundada

24 Oct 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/14/250
( Date of Filing : 10 Jul 2014 )
 
1. Dr.Manisha Sanjay Ladda
Dhanwantari Hospital,Varur Road,Shevgaon,Tal Shevgaon,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Rajesh Shashikant Trivedi,Bhavik Constructions
Khara Kuwa,Aurangabad
Aurangabad
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Mundada, Advocate
For the Opp. Party:
Dated : 24 Oct 2019
Final Order / Judgement

निकालपत्र

(द्वारा मा.सदस्‍य : श्री.महेश निळकंठ ढाके)

____________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.    तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदार हे मौजे शेवगाव येथील रहिवासी असुन तक्रारदाराच्‍या मालकीची व वहीवाटीची शेवगाव येथील गट नं.६९६/४ व गट नं.६९६/५/१ पैकी प्‍लॉट नं.३५ यांसी ग्रामपंचायत घर नं.७७६० ही मिळकत आहे. सदर मिळकतीवर तक्रारदारास स्‍वतःला राहण्‍यासाठी बंगला बांधावयाचा होता. सामनेवाले हे सिव्‍हील कॉन्‍ट्रॅक्‍टर असुन सदरील मिळकतीवर नियोजित बांधकामासाठी सामनेवाले हे बांधकाम कॉन्‍ट्राक्‍टर म्‍हणून काम करण्‍यास तयार झाले. सदरचे बांधकाम हे नियोजित वेळेत आणि चांगल्‍या  दर्जाचे करून देण्‍याची सामनेवाले यांनी हमी घेतलेली होती व आहे. तसेच कामाचा दर्जा समाधानकारक नसल्‍यास तक्रारदारास झालेल्‍या नुकसानीपोटी एकुण रकमेच्‍या १० टक्‍के रक्‍कम परत करण्‍यात येईल, असे उभयतात ठरले होते. तक्रारदार व सामनेवाले यांच्‍यामध्‍ये ठरलेल्‍या नियम शर्तीनुसार दिनांक २६-०५-२०१२ रोजी करारनामा झालेला होता व आहे. त्‍यातील मजकुर, नियम व शर्ती उभयतांवर बंधनकारक होत्‍या व आहे. कराराप्रमाणे नाशिक येथील श्री.नंदन मालानी यांच्‍या प्‍लॅन नुसार स्‍ट्रक्‍चरल इंजिनिअर यांच्‍या डिझान नुसार काम करणे अपेक्षीत होते आणि सदरील काममध्‍ये सामनेवाले यांनी खोद काम, मुरूम भराई, आर.सी.सी. काम, विट काम, प्‍लास्‍टर व कोब्‍याची गच्‍ची करणे बंधनकारक होते. सदरील बांधकामाचे रेट बिल्‍डींग मटेरीअलसह रूपये ९७५/- प्रती चौरस फुट असे ठरले होते. सदरील बांधकामासाठी लागणारे सर्व मजुर, अवजारे, मशिनरी, सेंट्रींग, कॉंक्रेट व्‍हायब्रेटर इत्‍यादीचा खर्च सामनेवाले यांनी करावयाचा होता.  तसेच काम पुर्ण झाल्‍यानंतर कामावरचा राडा-रोडा साफ करून स्‍वच्‍छ  अवस्‍थेत मिळकत करून द्यावयाची जबाबदारी सामनेवाले यांची होती. एकुण संपूर्ण बांधकामाचे अंदाजे खर्च रूपये ४५,००,०००/- येईल असे सामनेवाले यांनी तक्रारदारास सांगितले होते. अशा प्रकारे सामनेवाले यांनी दिनांक १५-०३-२०१३ पावेतो सदरील बांधकाम पुर्ण करून द्यावयाचे होते. तसेच त्‍यापेक्षा जास्‍त उशीर झाल्‍यास सामनेवाले यांनी १० टक्‍के पेनल्‍टी देण्‍याचे मान्‍य व कबुल केले होते. असे असतांना सामनेवाले यांनी स्‍थानीक मजुरांना पैसे अदा केले नाही, मटेरीअल सप्‍लयर्सचे पैसे दिले नाही त्‍यामुळे सदरचे पैसे तक्रारदाराला द्यावे लागत होते. तक्रारदाराने त्‍याबाबत विचारणा केली असता सामनेवाले यांनी अचानकपणे काम अर्धवट सोडुन निघुन गेले, तक्रारदाराने वेळोवेळी सामनेवाले यांना फोनद्वारे तसेच प्रत्‍यक्ष भेटुन कराराप्रमाणे काम पुर्ण करून देण्‍याची विनंती केली, परंतु सामनेवाले यांनी त्‍याची कोणतीही दखल घेतली नाही व टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रारदारास विविध कामापोटी जसे की इलेक्‍ट्रीशीयन, प्‍लंबींग, टाईल्‍स फिटींग, पि.ओ.पी. यापोटी ठरविलेल्‍या दरापेक्ष जादा रक्‍कम द्यावी लागणार आहे आणि निष्‍कारण मोठ्या प्रमाणावर भुर्दंड सोसावा लागले. सामनेवाले यांनी कामाच्‍या दर्जाची आणि नियोजित वेळेची दक्षता न घेता दिरंगाई करून निकृष्‍ट दर्जाचे आणि अपुर्ण बांधकाम करून तक्रारदारास मनस्‍ताप दिलेला आहे. शेवटी नाईलाजाने तक्रारदारांनी श्री.नंदनमालानी यांच्‍याकडुन कामाचे परीक्षण करून घेतले, त्‍यानुसार सदरील कामामध्‍ये अनेक प्रकारे अपुर्णता व त्रुटी होत्‍या म्‍हणुन शेवगांव येथील सिव्‍हील इंजीनिअर श्री.डि.के. ठोंबरे यांच्‍याकडुन अपुर्ण काम पुर्ण करून घेण्‍याचे ठरविले त्‍याचा अपेक्षित खर्च १,६६,०००/- रूपये आहे. तक्रारदाराने सामनेवाले यांना आजपावेतो वेळोवेळी एकुण रक्‍कम रूपये ७०,०७,८२०/- अदा केलेले असुनही सामनेवाले यांनी काम पुर्ण केले नाही म्‍हणुन तक्रारदारास जादा भावाने काम देवुन अपुर्ण काम पुर्ण करून घेणे भाग पडलेले आहे. यासाठी केवळ सामनेवाले हेच जबाबदार होते व आहेत. म्‍हणुन तक्रारदारांनी सामनेवाले यांस कराराप्रमाणे नुकसान भरपाई व पेनल्‍टीची रक्‍कम द्यावी तसेच जादा कामाची रक्‍कम देवुन मनस्‍तापापोटी भरपाई द्यावी, अशी मागणी केली.  परंतु सामनेवाले यांनी त्‍यास नकार दिला.  सामनेवाले यांनी अवलंबविलेल्‍या अनुचित व्‍यापारी प्रथेमुळे आणि पुरवलेल्‍या  सदोष बांधकाम सेवेमुळे तक्रारदारास मोठ्या प्रमाणात आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्‍हणुन तक्रारदाराने मे. न्‍यायमंचासमोर तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारदाराची कोणतीही दखल घेतली नाही आणि तक्रारदारास निष्‍कारण त्रास दिला म्‍हणुन तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज दाखल केला आहे.   

३.   तक्रारदार यांनी अशी विनंती केली आहे की, तक्रारदारास कराराप्रमाणे १५/०३/२०१३ पावेतो काम पुर्ण करून दिले नाही, तसेच सामनेवाले यांनी निकृष्‍ट दर्जाचे असमाधानकारक काम केलेले असल्‍यामुळे म्‍हणुन कराराप्रमाणे घेतलेल्‍या  रकमेवर १० टक्‍के पेनल्‍टी प्रमाणे रक्‍कम रूपये ७,००,०००/- तक्रारदारास देण्‍याचा हुकुम व्‍हावा. तसेच सदर रकमेवर दिनांक १५-०३-२०१३ पासुन प्रत्‍यक्ष रक्‍कम पदरी पडेपावेतो द.सा.द.शे. १८ टक्‍के व्‍याजदराने तक्रारदारास अदा करावी, असा आदेश व्‍हावा. सामनेवाले यांनी अपूर्ण व निष्‍कृष्‍ठ दर्जाचे काम केलेले असल्‍यामुळे कराराप्रमाणे झालेल्‍या कामाच्‍या १० टक्‍के रक्‍कम म्‍हणजे रूपये ७,००,०००/- नुकसान भरपाई म्‍हणुन परत देण्‍याचा हुकुम व्‍हावा. सामनेवाले यांनी अपुर्ण व निष्‍कृष्‍ठ दर्जाचे काम केलेले असल्‍यामुळे तक्रारदारास पुन्‍हा दुस-या इंजिनीअरकडुन अपूर्ण काम पुर्ण करून घेणे भाग पडले त्‍याचा खर्च रूपये १,६६,३००/- तक्रारदारास देण्‍याचा सामनेवाले विरूध्‍द हुकुम व्‍हावा.  सामनेवाले यांनी नियोजीत वेळेत काम पुर्ण न केल्‍यामुळे तक्रारदारास विविध कामाचे ठरविल्‍यापेक्षा १५ टक्‍के जादा रक्‍कम देणे भाग पडले त्‍याचा खर्च रूपये २,००,०००/- तक्रारदारास देण्‍याचा सामनेवालेविरूध्‍द हुकुम व्‍हावा. सामनेवाले यांच्‍या हलगर्जीपणामुळे व निष्‍काळजीपणामुळे तक्रारदारास फार मोठा आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला त्‍याचे नुकसान भरापाईपोटी रक्‍कम रूपये २,००,०००/- देण्‍याचा सामनेवाले यांना हुकुम व्‍हावा. या तक्रार अर्जाचा संपुर्ण खर्च रूपये २०,०००/- तक्रारदारास सामनेवाले यांचेकडुन मिळावे.

४.   तक्रारदाराने तक्रारीसोबत नि.२ वर शपथपत्र तसेच नि.६ सोबत तक्रारदार व सामनेवाले यांचेदरम्‍यान झालेला करारनामा दिनांक २६-०५-२०१२, तक्रारदाराने सामनेवाले यांना दिलेल्‍या रकमेचा तपशीलाची छायांकीत प्रत, डि.के. ठोंबरे अॅण्‍ड असोशिएटस यांचा अपुर्ण कामाचा दाखलाची छायांकीत प्रत दि.०५-०३-२०१४, अपुर्ण कामाच्‍या फोटोंच्‍या झेरॉक्‍स प्रती नि.६/४,६/५,६/६,६/७,६/८, ६/९,६/१०,६/११, ६/१२,६/१३,६१४,६/१५,६/१६, ६/१७, ६/१८, ६/१९, ६/२०, फोटोचे बिलाची छायांकीत प्रत दाखल केली आहे. 

५.   तक्रारदाराची तक्रार दाखल करण्‍यात येऊन मे. मंचातर्फे सामनेवाले यांना नोटीस पाठविण्‍यात आली. सामनेवाले यांनी प्रकरणात हजर होऊन नि.१२ वर तक्रारीस खुलासा दिला, तो पुढीलप्रमाणे.

     तक्रारदाराने इमारत बांधण्‍यासाठी या सामनेवाललेंना तक्रारीतील म्‍हणणेमधील अटी व नियमावली नमुद करण्‍यात आल्‍या होत्‍या, हे बरोबर आहे.  अटी व शर्तीनुसार बांधकामाचे काम या सामनेवालेंना देण्‍यात आले आणि त्‍याप्रमाणे तक्रारदार व सामनेवाले यांच्‍यामध्‍ये  लेखी      करारनामा    दिनांक      २६-०५-२०१२ करण्‍यात आला. या मर्यादेपर्यंत तक्रारदाराच्‍या तक्रारीतील परिच्‍छेद   क्रमांक १ बरोबर आहे.  तक्रारदाराच्‍या तक्रारीतल परिच्‍छेद क्रमांक २ प्रमाणे खर्चाची प्राथमिक अंदाज किंमत रूपये ४५,००,०००/-, रपये ९१५/- प्रती चौरस फुट  ठरलेली हाती, हे म्‍हणणे बरोबर आहे.  रक्‍कम रूपये ४५,००,०००/- ही किंमत अंदाजानुसार ठरविण्‍यात आली होती व अंतीम रक्‍कम ही बांधकाम पुर्ण झाल्‍यानंतर ठरविण्‍यात येणार होती. सदरील करार हा दोन्‍ही पक्षांवर बंधनकारक होता.  याच करारामध्‍ये बांधकामाच्‍या विविध चरणांचे डिझाईन बदलण्‍यात आले आणि त्‍यामुळे बांधकाम करणेविषयी आवश्‍यक बाबींचा समावेश करण्‍यात आला होता. त्‍याच प्रमाणे कराराप्रमाणे बांधकामास जास्‍त उशीर झाल्‍यास कॉन्‍ट्रॅक्‍टरला १० टक्‍के पेनल्‍टी द्यावी लागेल, असे नमुद केले होते. हे तक्रारीतल परिच्‍छेद क्र.२ मधील म्‍हणणे मान्‍य आहे. सामनेवाले यांनी असे म्‍हटले आहे की, बांधकामाचे काम करीत असतांना व इतर काम करीत करतांना बांधकामाचा आराखडा बदलण्‍यात आला. त्‍यामुळे बांधकामास उशीर झाला.  नंतर त्‍या संबंधी बदल होऊ शकतात. तक्रारदार व त्‍यांच्‍या आर्कीटेक्‍टने काम सुरू झाल्‍यानंतर बदल वेळोवेळी केले. तक्रारदाराने याबाबी मे.मंचापासुन लपविलेल्‍या आहेत. तक्रारीसोबत तक्रारदाराने सदरील बांधकामाचा नकाशा दाखल केलेला नाही. कोणत्‍याही सामनेवालेने स्‍टील डिझाईन व आर्कीटेक्‍ट यांना दिलेले सर्व नकाशे सामनेवालेने या खुलाश्‍यासोबत दाखल केलेले आहेत. सदरील नकाशे प्रत्‍यक्षात झालेले बांधकाम आणि क्षेत्रफळानुसार तक्रारदाराने कबुल केले आहे की, बांधकामाची किंमत रूपये ७०,८८,५७१/- असुन तक्रारदाराने केवळ रक्‍कम रूपये ७०,०७,८२२/- इतकी रक्‍कम सामनेवालेला अदा केलेली आहे. तक्रारदाराकडे रक्‍कम रूपये ८१,५७०/- या सामनेवालेची घेणे निघते, असे नमुद केलेले दिसते. या संदर्भात तक्रारदाराकडुन वसुलीसाठी प्रती दावा देखील दाखल करण्‍यात आलेला आहे. तक्रारदाराच्‍या तक्रारीतील परिच्‍छेद क्रमांक ३ हे योग्‍यरीतीने नमुद केलेले नसल्‍याने नाकारलेला आहे. हे म्‍हणणे खोटे आहे की, प्रत्‍यक्ष निरीक्षणाच्‍या दिवशी उपस्थित नव्‍हते. हे म्‍हणणे खरे नाही की, तक्रारदाराने सामनेवालेला जास्‍तीचे काम करण्‍याबाबत रक्‍कम अदा केलेली आहे.  हे म्‍हणणे खोटे आहे की, सामनेवालेने आर्कीटेक्‍ट तसेच स्‍ट्रक्‍चरल डिझायनरची एन.ओ.सी. घेतलेली नाही.  खरे तर प्रत्‍येक टप्‍पयात आणि कामकाजानंतर आणि छज्‍जा व इतर कामकाजामध्‍ये प्रत्‍यक्ष माहिती तक्रारदाराला देत होते आणि वेळोवेळी पाहणी केली जात होती. या सामनेवालेने केलेल्‍या कामाबद्दल तक्रारीत कोणतीही तक्रार नमुद नाही. सदरील बांधकामाच्‍या सप्‍लायर्स व कामगारांची देणी ही वेळोवेळी अदा करण्‍यात आली होती आणि बांधकामाची तपासणी करण्‍यासाठी नाशिकहुन शेवगाव येथे आर्कीटेक्‍ट आणत होते. केवळ त्‍यांची तपासणी व पडताळणी केल्‍यानंतर सामनेवालेंना बांधकामाबाबत निर्देश देण्‍यात येत असे. सामनेवाले हा वेळोवेळी बांधकाम सुरू असलेल्‍या ठिकाणी भेट देत होते.  त्‍यामुळे तक्रारदाराचे हे म्‍हणणे खोटे आहे की, बांधकाम करणेबाबत सामनेवालेला तक्रारदाराने वेळोवेळी माहित केले.  तक्रारदार व सामनेवाले यांच्‍यात झालेला करारानामा झाला असुन सामनेवाले यांनी तक्रारदाराला उत्‍तर देण्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केलेले खरेदी खत असुन त्‍यावर दिनांक खोटी आहे. सदरील खरेदी खत हे फेरफार करून बनविलेले आहे. तसेच तक्रारदाराने सामनेवालेला दिलेले बांधकाम अपुर्ण अवस्‍थेत केले म्‍हणुन तक्रारदाराने स्‍ट्रक्‍चरल इंजिनीअर डी.के. ठोंबरे यांच्‍याकडुन बांधकामाच्‍या अपुर्णतेचा दाखला घेतला आहे. तक्रारदाराने सामनेवालेकडुन केलेल्‍या बांधकामाचे उर्वरीत देयके देणे टाळण्‍यासाठी डावपेच म्‍हणुन ही तक्रार केली आहे. म्‍हणुन ही तक्रार नुकसान भरपाई खर्चासह खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे. सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या खुलाश्‍यामध्‍ये  नमुद केले आहे की, बांधकामामध्‍ये कंम्‍पाऊंड वॉल, प्‍लॅस्‍टर, सेफ्टी टॅंक, आर.सी.सी. पार्डी, सिंगल कोट प्‍लास्‍टर, डबल कोट प्‍लॅस्‍टर, ब्रिक वर्क, सोलींग, पी.सी.सी. या कामांचा समावेश नव्‍हता. इमारतीचे बांधकाम पुर्ण होत असतांना तक्रारदाराने सप्‍टेंबर २०१२ मध्‍ये उपरोक्‍त वर्णन केलेले काम करण्‍यास सांगितले आणि बांधकामाचा अतिरीक्‍त खर्च याच काळात झाला, यावर तक्रारदाराची स्‍वाक्षरी आहे. या खुलाश्‍यासोबत त्‍याची प्रत दाखल केलेली आहे आणि तक्रारदार व सामनेवाले यांच्‍यामध्‍ये ठरलेल्‍या व्‍यवहारानुसार ८५ टक्‍के काम या सामनेवालेने पुर्ण करून दिलेले आहे आणि मंचात सामनेवाले यांनी ही बिले दाखल केलेली आहे. या उर्वरीत राहिलेल्‍या कामाचे बिल रूपये ५,६१,११५/- हे तक्रारदाराकडुन घेणे बाकी आहे. त्‍यानंतर काम स्‍लॅबचे व इतर कामाचे  डिझाईन आर्कीटेक्‍टकडुन मिळाल्‍यानंतर सहा महिन्‍यानंतर काम सुरू करण्‍यात आले. यासर्व बाबींमुळे कागदपत्रांस विलंब झाला. या बाबीस सामनेवाले जबाबदार नाही. यासाठी सामनेवाले हे तक्रारदाराकडुन १० टक्‍के प्रमाणे येणारी रक्‍कम रूपये ७,००,०००/- तक्रारदाराकडुन घेण्‍यास पात्र आहे. सदर बांधकामाकरीता सामनेवालेने बिल्‍डींग मटेरीयल जसे सिमेंट, वाळु, खडी खरेदी केली त्‍याची किंमत रूपये १,५०,०००/- इतकी आहे.  बांधकामासाठी १५० स्‍टील प्‍लेटस रक्‍कम रूपये ८०,०००/- चे खरेदी करण्‍यात आल्‍या असुन त्‍या साईटवर पडुन आहेत. सदरील प्‍लेटा ह्या सामनेवालेच्‍या मालकीच्‍या आहेत.  तक्रारदाराने या प्‍लेटा व मटेरीयल घेण्‍यास नकार दिला म्‍हणुन सामनेवालेने त्‍याची रक्‍कम वरील रकमेमध्‍ये अधिक केलेली आहे. सामनेवालेने वरील मटेरीयलपैकी ३०० वुडन बल्‍लीचे व प्‍लॅयवुडची रक्‍कम रूपये १,००,०००/- प्रतिदाव्‍याद्वारे मिळावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे. म्‍हणुन सामनेवाले यांनी अशी विनंती केली आहे की, तक्रारदाराची तक्रार ही खर्चासह रद्द व्‍हावी, रक्‍कम रूपये ७,००,०००/-, पेनॅल्‍टी रूपये ५,६१,०००/-, तसेच रूपये १,५०,०००/-, बांधकामाच्‍या ठिकाणी पडुन असलेले मटेरीअल रूपये १,००,०००/-, लोखंडी प्‍लेट रूपये ८१,५७०/-, जुन्‍या  बिलांची थकीत रक्‍कम रूपये ८१,५७०/- अशी एकुण रक्‍कम रूपये १४,९२,५७०/- तक्रारदाराकडुन मिळण्‍याचा हुकुम व्‍हावा व त्‍यावर १८ टक्‍के व्‍याज द.सा.द.शे. मिळावे, तसेच तक्रारीचा खर्च, काउंटर क्‍लेम रूपये ३०,०००/- तक्रारदाराकडुन मिळावा, असे नमुद केले आहे.

६.   सामनेवालेने त्‍याच्‍या खुलाश्‍यासोबत बांधकामाचे विविध प्‍लॅन त्‍याच प्रमाणे कंम्‍पाउंड वॉलचे बिल आणि मेझरमेंट आणि बिले आणि उर्वरीत कामाची बिले यांच्‍या छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या आहेत. सामनेवालेने दिनांक      ०९-०४-२०१९ रोजी लेखी युक्तिवाद दाखल करण्‍याविषयी अर्ज दिला.  त्‍यावर रूपये १,०००/- कॉस्‍ट आकारून युक्तिवाद दाखल करून घेण्‍याबाबत म्‍हणणे दाखल केले आहे.  त्‍यानुसार सामनेवालेचा   लेखी  युक्तिवाद  हा  दिनांक      २०-०६-२०१९ रोजी दाखल करून घेण्‍यात आला.  त्‍यात असे म्‍हटले आहे की, संपुर्ण बांधकाम सामनेवालेने पुर्ण केले होते. परंतु त्‍यामध्‍ये वेळोवेळी बदल करण्‍यात आल्‍यामुळे ते वेळेत पुर्ण होऊ शकले नाही. सदरील बांधकाम हे कराराप्रमाणे अटी व शर्तीनुसार बरेचसे पुर्ण केलेले आहेत. परंत तक्रारदाराने बांधकामात अडथळा आणल्‍यामुळे काही बांधकाम पुर्ण करता आले नाही.    त्‍यात सामनेवालेने तक्रारदाराने तक्रारीसोबत बांधमकाम मटेरीयल सप्‍लायविषयी बिले दाखल केलेली नाही.  त्‍याचप्रमाणे तक्रारदाराने उर्वरीत बांधकाम हे केव्‍हा  पुर्ण केले याविषयी कुठलेही कथन केलेले नाही किंवा त्‍याबाद्दल शपथपत्रही दाखल केले नाही. तसेच मटेरीयल सप्‍लायर चे शपथपत्र सोबत जोडलेले नाही.  तक्रारदाराने त्‍याच्‍या म्‍हणणे व मागणी याबद्दल कुठलाही पुरावा तसेच पुरेसा पुरावा दिलेला नाही. 

७.    तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, त्‍यात दाखल केलेले दस्‍तऐवज, तक्रारदारातर्फे केलेला तोंडी युक्तिवाद, तसेच सामनेवालेने दाखल केलेला खुलासा, सामनेवालेने दाखल केलेले कागदपत्र, त्‍यांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले असता वाद विषयाच्‍या निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

अ.नं.   

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

सामनेवाले यांनी तक्रारदारास द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी ठेवली हे तक्रारदाराने सिध्‍द केले आहे काय ?

 

 नाही

(२)

आदेश काय

अंतिम आदेशा प्रमाणे

कारणमिमांसा

८.  मुद्दा क्र. (१) :    सामनेवालेने अर्धवट बांधकाम करून सोडुन दिले, असे तक्रारदाराचे म्‍हणणे आहे व उर्वरीत बांधकाम हे दुस-या बांधकाम कॉन्‍ट्रॅक्‍टरकडुन पुर्ण केले असे तक्रारदाराचे म्‍हणणे आहे.  परंतु त्‍यासंबंधी पुरावा तक्रारदाराने दिलेला नाही. सामनेवालेने अपुर्ण बांधकाम करून सोडुन दिले त्‍याचे फोटोग्राफचे झेरॉक्‍स प्रती दाखल केलेल्‍या आहेत. ओरीजनल प्रति दाखल केलेल्‍या नाहीत. तसेच फोटोग्राफर व नमुद कामाचे परिक्षण करणारे नंदन मालानी यांचे शपथपत्र दाखल केलेले नाही.  तसेच ज्‍या सिव्‍हील इंजीनीअरने काम पुर्ण केले, असे तक्रारदाराने म्‍हटले आहे त्‍याचेसुध्‍दा शपथपत्र दाखल नाही. या सर्व विवेचनावरुन सामनेवालेने तक्रारदारास द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी ठेवली आहे हे तक्रारदाराने संपुर्ण पुराव्‍यानिशी सिध्‍द केलेले नाही, असे मंचाचे मत आहे. म्‍हणुन मुद्दा क्र.१ चे उत्‍तर आम्‍ही नकारार्थी देण्‍यात येत आहे.

 मुद्दा क्र. (२) : मुद्दा क्रमांक १ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.   

आदेश

 

      १.  तक्रारकर्ताची तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

      २.  उभय पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

      ३.  या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

      ४.  तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 

 
 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.