अर्जदारा तर्फे वकील - श्री.अनुप प्रशांत कुर्तडीकर
निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा.सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्यक्ष)
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
1. अर्जदार हा लक्ष्मीरमणा सेल्स घामोडीया फॅक्टरी एरिया, नांदेड येथील फॅर्मचे पार्टनर आहेत. सदर फर्म ही होलसेल औषधी विक्रीचे दुकान आहे. गैरअर्जदार हे काही औषधी कंपनीचे डिस्ट्रीब्युटर्स आहेत. अर्जदार व गैरअर्जदार यांचेमध्ये दिनांक 18.11.2011 रोजी झालेल्या करारानुसार अर्जदार गैरअर्जदार यांचेकडून औषधी खरेदी करीत असे. अर्जदाराने गैरअर्जदार यांना सेक्युरीटी डिपॉझिट चेक म्हणुन 580426 हा कोरा चेक दि.नांदेड मर्चंट को-ऑप.बँक शाखा वजिराबाद नांदेडचा चेक दिला होता. गैरअर्जदार यांनी अर्जदारास करारानुसार होलसेलच्या दरात औषधे देण्यास बंद केले. तसेच काही औषधांची मुदत संपत आली होती ती औषधे गैरअर्जदार यांना परत केली, परंतु गैरअर्जदार यांनी परत केलेल्या मालाची रक्कम व धनादेश परत केलेला नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदारासोबतचा व्यवहार बंद केल्याने अर्जदारास व्यवसायात खुप मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे अर्जदारास मानसिक व शारिरिक त्रास झालेला आहे. अर्जदार यांनी दिनांक 27.01.2015 रोजी गैरअर्जदार यांना कायदेशीर नोटीस पाठविली. परंतु गैरअर्जदार यांनी रक्कम देण्यास इन्कार केला. त्यामुळे अर्जदार यांनी सदरील तक्रार दाखल केलेली आहे.
2. अर्जदाराचा प्राथमिक युक्तीवाद ऐकला. अर्जदार हा ग्राहक संरक्षण कायदयानुसार ग्राहक या व्याख्येत अंतर्भूत होतो का असा प्राथमिक मुद्या उपस्थित होतो.
3. अर्जदार यांनी दाखल केलेल्या यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे व तक्रारीतील कथनाचे अवलोकन केले असता अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून खरेदी केलेली औषधे पुनर्विक्रीसाठी व व्यावसायीक कारणासाठी घेतलेले होते ही बाब स्पष्ट होते. ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(d) (i) खालील प्रमाणेः-
Sec.2(d)(i) Consumer means any person who—
(i) buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose;
वरील तरतूदीचे अवलोकन केले असता अर्जदाराने खरेदी केलेली औषधी ही पुनर्विक्रीसाठी व व्यावसायीक कारणासाठी खरेदी केलेली असल्याने अर्जदार हा ग्राहक या व्याख्येमध्ये अंतर्भूत होत नाही असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.