Maharashtra

Nagpur

CC/11/566

Sau. Sadhana Baburao Burade - Complainant(s)

Versus

Shri Prashant Parate, Shree Traders - Opp.Party(s)

Adv. J.C.Shukla

12 Oct 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/566
 
1. Sau. Sadhana Baburao Burade
Koshtipura, Opp. Chhoti Masjid, Main Road, Sitabuldi,
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Prashant Parate, Shree Traders
32, Venuvan Society, Narendra Nagar,
Nagpur 440015
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. ROHINI KUNDLE PRESIDENT
 HON'ABLE MRS. ALKA PATEL MEMBER
 HON'ABLE MS. GEETA BADWAIK MEMBER
 
PRESENT:Adv. J.C.Shukla, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

(मंचाचा निर्णय: श्रीमती अल्‍का पटेल - सदस्‍या यांचे आदेशांन्‍वये)
 
                          -// आ दे श //-
                 (पारित दिनांक : 12/10/2012)
 
 
1.          प्रस्‍तुत तक्रार तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत बांधकामासाठी खरेदी केलेले साहित्‍य न दिल्‍यामुळे विरुध्‍द पक्षांनी अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केलेला आहे. तसेच मान्‍य केलेले कार्य करुन न दिल्‍यामुळे सेवेत त्रुटी असल्‍याबद्दल तक्रार दाखल केली आहे.
2.          तक्रारकर्तीने स्‍वतःच्‍या राहण्‍यासाठी नरेंद्रनगर येथे घर बांधण्‍याचे काम सुरु केले. घर बांधणीसाठी लागणारे सामान जवळच असलेल्‍या विरुध्‍द पक्षाचे दुकानातून घेत होती, तक्रारकतीव्‍दारा रुपये जमा केल्‍यावर विरुध्‍द पक्षांनी बांधकामासाठी लागणारे सामान पोहचवायची हमी दिली होती.
3.          तक्रारकर्ती म्‍हणते की, विरुध्‍द पक्षांनी बांधकामाचे सामानासाठी अग्रिम रु.2,30,000/- वेळोवेळी घेतले व त्‍या बद्दल पावती पण दिली आहे. परंतु विरुध्‍द पक्षांनी रु.70,000/- चे सामान दिले बाकी रकमेचे साहीत्‍य देण्‍यांस नकार दिला व हिशोब सुध्‍दा करायला तयार नाही, सदर बाब विरुध्‍द पक्षाच्‍या सेतेत त्रुटी आहे.
      अ)    तक्रारकर्ती मागणी करते की, असे घोषीत करावे की, विरुध्‍द पक्षांनी अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला आहे, तसेच सेवा देण्‍यांस कसुर केला आहे.
      ब) तक्रारकर्तीने दिलेले रु.1,60,000/- तसेच शारीरिक मानसिक त्रासाकरीता रु.50,000/- व तक्रारीच्‍या खर्चासाठी रु.5,000/- या प्रमाणे एकूण रु.2,15,000/- 18 टक्‍के व्‍याजासह परत करावे.
4.          तक्रारकर्तीने आपल्‍या कथनाचय पृष्‍ठयर्थ दस्‍ताऐवजाच्‍या यादीप्रमाणे पृष्‍ठ 7 व 8 तसेच पृष्‍ठ क्र.19 वर दि.03.07.2011 व 07.06.2011 चे दोन बिल याप्रमाणे दस्‍तावेज दाखल केले आहे.
5.          विरुध्‍द पक्षाला नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्‍यांत आली आहे नोटीस मिळूनही विरुध्‍द पक्ष प्रकरणात हजर झाले नाही किंवा लेखी उत्‍तर दाखल केले, म्‍हणून त्‍यांच्‍या विरुध्‍द दि.20.12.2011 रोजी प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यांत आलेला आहे.
 
            - // नि री क्षणे व नि ष्‍क र्ष // -
 
6.          तक्रारकर्तीव्‍दारा दाखल केलेल्‍या दि.10.06.2012 च्‍या पावतीमधे रु.1,50,000/- बांधकामाचा सामानासाठी अग्रिम मिळाले असे नमुद आहे व दि.27.06.2011 रोजीच्‍या पावतीनुसार रु.40,000/- नगदी मिळाले अशी नोंद केल्‍याचे दिसते. तसेच भारतीय स्‍टेट बँक शाखा नांदेड येथून दि.21.06.2011 रोजी रु.25,000/- व दि.24.06.2011 रोजी र1.15,000/- खाते क्र.30020402078 मध्‍ये जमा केल्‍याचे दिसते परंतु सदर पावतीमधे नाव योगेन्‍द्र खेमरे आहे, तसेच तक्रारकर्त्‍यानी रेकॉर्डवर सादर केलेल्‍या दि.03.07.2011 च्‍या बिलामधे रु.1,23,014/- चे सामान विरुध्‍द पक्षातर्फे पाठविण्‍याचे दिसते. तसेच दि.07.06.2011 च्‍या बिलामधे बाकी देणे असा शेरा व विरुध्‍द पक्षाची सही आहे. तक्रारकर्तीला विरुध्‍द पक्षाव्‍दारा रु.70,000/- चे सामान देण्‍यांत आले असे, म्‍हणतात. परंतु तक्रारकर्तीच्‍या कथनानुसार त्‍यांनी कोणतेही पुरावे रेकॉर्डवर दाखल केले नाही म्‍हणून अश्‍या परिस्थितीत तक्रारकर्तीची कोणतीही मागणी मान्‍य करण्‍यामधे मंचाला तथ्‍य वाटत नाही, त्‍यामुळे सदर तक्रार खारिज होण्‍यांस पात्र आहे, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.        
 
            सबब आदेश.
 
                  -// अं ति म आ दे श //-
 

1.    तक्रारकर्तीची सदर तक्रार खारिज करण्‍यांत येते.

 

2.    खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाही.

 
 
 
[HON'ABLE MRS. ROHINI KUNDLE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. ALKA PATEL]
MEMBER
 
[HON'ABLE MS. GEETA BADWAIK]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.