द्वारा घोषित श्रीमती ज्योती एच पत्की , सदस्य ---- या तक्रारीची हकीकत थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून शिवनगर, गट नंबर 21, सर्वे नंबर 44, गेवराई गाव ता, जि. औरंगाबाद येथील प्लॉट नंबर 47 (क्षेत्रफळ 2000 चौ फुट ) 60,000/- रुपयामध्ये खरेदी करण्याचा करार दिनांक 6/10/2000 रोजी केला. त्यानुसार त्याच दिवशी गैरअर्जदारास रक्कम रु 5,000/- रोख दिले आणि दिनांक 12/5/2000 ते 17/6/2006 या कालावधीत दरमहा रुपये 1,000/- प्रमाणे एकूण रु 56,000/- दिले. गैरअर्जदाराने तक्रारदारास एन.ए.ले आऊट मंजूर झाल्यानंतर त्वरीत प्लॉटची रजिस्ट्री करुन देऊ असे आश्वासन दिले. तक्रारदाराने दिनांक 4 जून 2009 रोजी गैरअर्जदारास पत्र पाठवून प्लॉटची रजिस्ट्री करुन द्यावी अथवा पैसे परत करावेत असे कळविले परंतू गैरअर्जदाराने पत्राचे उत्तर दिले नाही. म्हणून तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून प्लॉट खरेदी करण्यासाठी दिलेली रक्कम रु 60,000/- , व्याज व नुकसान भरपाईसह मिळावी अशी मागणी केली आहे. गैरअर्जदारास अनेक वेळा संधी देऊनाही त्याने लेखी निवेदन दाखल केले नाही म्हणून त्यांचे विरुध्द नो से चा आदेश दिनांक 29/12/2009 रोजी पारित करण्यात आला. तक्रारदाराने दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्राची मंचाने पाहणी केली. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकण्यात आला. तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून शिवनगर गट नंबर 21 सर्वे नंबर 44 गेवराई गांव ता.जि. औरंगाबाद येथील प्लॉट क्रमांक 47 रु 60,000/- मध्ये खरेदी करण्याचा करार दिनांक 6/12/2000 रोजी केला होता हे करारानाम्यावरुन दिसून येते कारण सदर कराराम्यावर तक्रारदार आणि गैरअर्जदार या दोघांच्याही सहया आहेत. तक्रारदाराने दिनांक 6/10/2000 रोजी गेरअर्जदारास रक्कम रु 5,000/- रोख दिले या संबंधीचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. परंत तक्रारदाराने गैरअर्जदारास दिनांक 12/5/2000 ते 7/6/2006 या कालावधीत रक्कम रु 56,000/- प्रतिमाह रु 1,000/- प्रमाणे दिल्याचे रकमांच्या तपशिलावरुन स्पष्ट दिसून येते. तक्रारदाराने गैरअर्जदारास प्लॉट खरेदी करण्यासाठी रक्कम रु 56,000/- दिलेले असतानाही गैरअर्जदाराने तक्रारदारास प्लॉटची रजिस्ट्री अद्याप न करुन देणे अथवा प्लॉटसाठी घेतेलेली रक्कम परत न करणे ही गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदार सेवा निवृत्त तसेच जेष्ठ नागरीक आहेत . अशा परिस्थितीत गैरअर्जदाराने तक्रारदारास प्लॉटची रजिस्ट्री न करुन देऊन अथवा पलॉटसाठी घेतलेली रक्कम न देऊन तक्रारदाराची एक प्रकारे फसवणूक केली आहे तसेच मानसिक त्रास दिला आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते. 2. गैरअर्जदाराने तक्रारदारास रक्कम रु 56,000/- दिनांक 7/6/2000 पासून 9 टक्के व्याज दराने पूर्ण रक्कम देईपर्यंत या आदेशाच्या प्राप्तीपासून 6 आठवडयाच्या आत द्यावेत. 3. गैरअर्जदाराने उपरोक्त आदेश मुदतीत तक्रारदारास मानसिक त्रास व तक्रारीच्या खर्चापोटी रु 3,000/- द्यावेत.
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |