जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर. अंमलबजावणी अर्ज क्र.EA/10/84 डॉ. प्रगती राठोड + 4 वि. प्रमोद खेताल + 1 आदेश (पारित दिनांक – 04 फेब्रुवारी 2011) दोन्ही पक्ष हजर. त्यांनी पुरसिस दाखल केले. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यांना लिफ्टच्या दोन इमरजेंसी चाव्या व लिफ्ट रुमची एक चावी, तसेच त्याबाबत दस्तऐवज हस्तांतरीत केले. संयुक्त पुरसिसमध्ये असे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याची संपूर्ण मागणी पूर्ण केलेली आहे. त्यावर तक्रारकर्त्यांनी स्वाक्ष-या केलेल्या आहेत. मात्र तक्रारकर्त्यांच्या वकिलांनी त्यास विरोध दर्शविला आहे. सदर प्रकरणामध्ये मूळ आदेशाप्रमाणे गैरअर्जदाराने 60 दिवसाच्या आत लिफ्ट बसवून द्यावे, बांधकामाचे त्रुटीबद्दल रु.2,000/- द्यावे, तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.5,000/- द्यावे असे नमूद होते. आदेशाप्रमाणे सर्व रक्कम मिळाल्याची बाब तक्रारकर्त्यांनी मान्य केली. सदर ठिकाणी लिफ्ट गैरअर्जदारांनी बसवून दिल्याची बाबही मान्य केली. अशाप्रकारे गैरअर्जदारांनी आदेशाची पूर्तता केलेली आहे. याठीकाणी मंच असे नमूद करते की, ग्रा.सं.का.चे कलम 27 खालील अर्ज व त्याखालील तरतूद ही संबंधितांनी मंचाचे आदेशाचे पालन करावे या मुख्य हेतूने करण्यात आलेली आहे. आदेशाचे पालन झाल्यानंतर त्यात संबंधितांना शिक्षा करावी अशी कायद्यात तरतूद नव्हती व नाही. मंचासमोर ही बाब स्पष्ट झालेली आहे की, गैरअर्जदाराने आदेशाची पूर्तता पूर्णतः केलेली आहे. यास्तव सदर प्रकरण निकाली काढण्यात येते. (मिलिंद केदार) (विजयसिंह राणे) सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |