Maharashtra

Chandrapur

CC/18/34

Shivshankar Pundlik Banpurkar At Bagalmendha - Complainant(s)

Versus

Shri Pradip Patil Sanchalak Yashoda Haighbreed Seeds Pvt Ltd - Opp.Party(s)

Adv. Kshirsagar

29 Oct 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/18/34
( Date of Filing : 26 Feb 2018 )
 
1. Shivshankar Pundlik Banpurkar At Bagalmendha
At Baglmendha Post Mindala Tah Nagbhid
chandrapur
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Shri Pradip Patil Sanchalak Yashoda Haighbreed Seeds Pvt Ltd
At Pawade Building Laxmi Tokies Hignghat Tah Higanghat
Wardha
Maharashtra
2. Shri Sanjay Kothbale
Mangaer Yashoda Highbreed Seeds Pvt Ltd At Pawade Building Laxmi tokies Higanghat
wardha
maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/18/35
( Date of Filing : 20 Feb 2018 )
 
1. Shri Shrawan Dajiba Pakamode At Rajoli
AT Rajoli Tah Mul
chandrapur
maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Pradip Patil Sanchalak Yashoda Haighbreed Seeds Pvt Ltd
Sanchalak Yashoda highbreed seeds Pvt ltd At Pawade Building Laxmi tokies Higanghat
Wardha
Maharashtra
2. Shri Sanjay Kothbale
Managaer Yashoda Highbreed Seeds Pvt Ltd At Pawade Building Laxmi Tokies Higanghat
wardha
maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 29 Oct 2021
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

 

             (आयोगाचे निर्णयान्वये, श्री अतुल डी. आळशी, मा. अध्‍यक्ष)                  

                    (पारीत दिनांक २९/१०/२०२१)

 

                       

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे  कलम १२ अन्‍वये  दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ता हा व्‍यवसायाने शेतकरी आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ हे यशोदा कंपनीचे संचालक असून विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हे व्‍यवस्‍थापक आहे. विरुध्‍द  पक्ष कंपनीचा बिजाई उत्‍पादक शेतक-यांना विविध उपक्रमाव्‍दारे बिज उत्‍पादनाची प्रेरणा देवून बिज उत्‍पादनाच्‍या खरेदीची हमी देवून त्‍याबाबतचा करार करणे, असा व्‍यवसाय आहे.
  3. विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍यास दिनांक ६/४/२०१० व दिनांक १७/०६/२०१० रोजी बिज उत्‍पादन नोंदणीची पावती देवून त्‍यांना बिज उत्‍पादक म्‍हणून मान्‍यता दिली. याशिवाय सदर व्‍यवहारासंबंधी दिनांक १७/०६/२०१० रोजी करार केला. तक्रारकर्त्‍याने अटी व शर्ती नुसार शेतात पेरणी केली. तक्रारकर्ता यांनी त्‍यांच्‍या १२ एकर शेतामध्‍ये ‘जय श्रीराम’ धानाचे बिज व ३ एकर शेतात ‘क्रांती’ धानाचे बिज उत्‍पादन केले. विरुध्‍द पक्ष यांनी बिज उत्‍पादन प्रक्रियेची पाहणी केली व अहवाल सुध्‍दा तयार करण्‍यात आला. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांना सदर धान विकत घेण्‍याची विनंती केली असता त्‍यांनी प्रतिसाद दिला नाही आणि सदर बिज विकत घेण्‍यास टाळाटाळ केली. म्‍हणून तक्रारकर्ता यांनी दिनांक २८/१२/२०१० रोजी आमदार श्रीमती शोभाताई फडणविस यांचेसोबत मुल तालुक्‍यातील इतर बिजोत्‍पादक व्‍यथीत शेतक-यांची बैठक घेतली. त्‍यावेळी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २, कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे अधिकारी, त‍हसिलदार, श्री दत्‍ताजी चिंतावार, वकील श्री संतोषवार यांनी कबुलीनामा लिहला. कबुलीनाम्‍याप्रमाणे विरुध्‍दपक्षांनी तक्रारकर्त्‍याकडून दिनांक २८/०२/२०११ पर्यंत बियानाची खरेदी केलेल्‍या  मालाच्‍या ७० टक्‍के रक्‍कम आधी व नंतर ३० टक्‍के रक्‍कम एप्रिल ते जुन २०११ चे दरम्‍यान देण्‍याचे कबूल केले. त्‍यावर त्‍यांनी सह्या केल्‍या परंतु मार्च महिणा संपल्‍यानंतरही विरुध्‍दपक्षांनी प्रतिसाद न दिल्‍याने दिनांक २८/०२/२०११ रोजी पोलीस स्‍टेशन मुल येथे लेखी तक्रार केली याशिवाय अधिवक्‍ता श्री आमटे यांचेमार्फत दिनांक २४/०३/२०११ रोजी रजिस्‍टर्ड पोच पावती सह विरुध्‍द पक्षांना नोटीस पाठविला. परंतु विरुध्‍द पक्षांनी त्‍यांचे उत्‍तर दिले नाही. विरुध्‍दपक्षांनी  उत्‍पादित धानाच्‍या खरेदीसाठी आश्‍वासन दिले परंतु लेखी कराराप्रमाणे पुर्तता करण्‍याचे टाळाटाळ केले. तक्रारकर्त्‍याचे बिज उत्‍पादन धानाचे बाजारभाव किंमत प्रति क्विंटल रुपये २,०००/- असतांनाही तक्रारकर्त्‍यास प्रति क्विंटल १,३००/- रुपये धान विकणे भाग पाडले. सदर तफावत ही प्रति क्विंटल रुपये ७००/- आहे. सदर बाबी विचारात घेता ही सेवेतील न्‍युनता असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षांविरुध्‍द सदर तक्रार या आयोगासमोर दाखल केली आहे.
  4. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षांविरुध्‍द अशी मागणी केली आहे की, नुकसान भरपाईची तफावत किंमत प्रति क्विंटल प्रमाणे (७००X२२५ = १,५७,५००/-) रुपये, जाण्‍या-येण्‍याचा खर्च रुपये ५,०००/-, मानसिक ञासापोटी रुपये १५,०००/- आणि तक्रारीचा खर्च रुपये १२,५००/- असे एकूण रुपये २,००,०००/- देण्‍याचे आदेश व्‍हावेत.

 

  1. सदर प्रकरण हे मा. राज्‍य आयोग यांचे कडून दिनांक २१/०६/२०१६ चे आदेशान्‍वये Remand Back झाले. त्‍यानंतर विरुध्‍दपक्षांना नोटीस काढण्‍यात आली.

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार स्‍वीकृत करुन विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना नोटीस काढण्‍यात आले. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना नोटीस प्राप्‍त होवून सुध्‍दा ते प्रकरणात हजर झाले नाही. करिता दिनांक २४/०१०/२०१८ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ विरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला. 

 

  1. तक्रारकर्त्‍याने प्रकरणात पुरसिस दाखल करुन तक्रार अर्ज, दस्‍तावेज, शपथपञ हे तक्रारकर्त्‍याचे युक्तिवाद समजण्‍यात यावे असे पुरसिस मध्‍ये नमूद केले.

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार, दस्‍तावेज, शपथपञ तसेच तोंडी युक्तिवादावरुन तक्रार निकालीकामी खालिल कारणमीमांसा नमूद केले.

 

  •  

 

  1. प्रस्‍तुत तक्रारीत तक्रारकर्ता यांनी उत्‍पादीत केलेले धान विरुध्‍दपक्षांनी विकत न घेतल्‍याने त्‍यांना कमी दराने विकावे लागले त्‍यामुळे त्‍यांचे नुकसान झाले याबाबत वाद आहे आणि त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने झालेल्‍या नुकसानबाबत विरुध्‍द  पक्षांकडून नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षांनी घेतलेल्‍या बिजोत्‍पादन कार्यक्रमामध्‍ये सहभाग घेतल्‍यानंतर तक्रारकर्त्‍यास दिनांक ६/४/२०१० बुकींग पावती व दिनांक १७/०६/२०१० रोजी बिजोत्‍पादन नोंदणी पावती देवून तक्रारकर्त्‍यास बिजोत्‍पादन करण्‍याची मान्‍यता दिली. तक्रारकर्ता यांनी बिजाई उत्‍पादन कार्यक्रमामध्‍ये सहभाग घेतला तेंव्‍हा विरुधपक्षांनी बिजाई उत्‍पादन घेत असतांना तक्रारकर्त्‍यास घ्‍यावयाची काळजी व अटी बाबतचा दस्‍तावेज क्रमांक ३ वर दाखल आहे. तक्रारकर्ता शिवशंकर यांनी आपल्‍या १२ एकर शेतात ‘जय श्रीराम’ धानाचे बिज व ३ एकर शेतात ‘क्रांती’ धानाचे बिज उत्‍पादन केले. तक्रारकर्ता यांनी विरुध्‍दपक्षांना बिज उत्‍पादन केलेले धान विकत घेण्‍याची विनंती केली परंतु त्‍यांनी विकत घेतले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दिनांक २८/१२/२०१० रोजी आमदार श्रीमती शोभाताई फडणवीस आणि इतर बिजोत्‍पादक व्‍यथीत शेतक-यांची बैठक घेतली. या संदर्भात तक्रारकर्त्‍याने कबुलीनाम्‍याची नक्‍कल प्रत प्रकरणात दाखल केली. परंतु तक्रारकर्त्‍याने सदर कबुलीनामा साक्षीदारांचे शपथपञ/पुरावा दाखल करुन सिध्‍द केले नाही आणि सदर कबुलीनामा व त्‍यातील बाबी सिध्‍द केल्‍या नसल्‍यामुळे पुरावा म्‍हणून ग्राह्य धरणे योग्‍य नाही. विरुध्‍दपक्षांनी तक्रारकर्त्‍यास उत्‍पादीत धान खरेदी करण्‍याचे आश्‍वासन देवूनही विकत न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास कमी दराने धान विक्री करावे लागले व त्‍यामुळे त्‍यांचे नुकसान झाले ही बाब सिध्‍द करण्‍याची संपूर्ण जबाबदारी तक्रारकर्त्‍याची होती. परंतु तक्रारकर्त्‍याने सदर बाब योग्‍य पुराव्‍यानिशी सिध्‍द केली नाही, त्‍यामुळे ग्राह्रय धरणे योग्‍य नाही, या निष्‍कर्षाप्रत आयोग आल्‍याने खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे. 

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार क्र. ३४/२०१८ खारीज करण्‍यात येते.
  2. उभयपक्षांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.
  3. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.

 

    

 

     (किर्ती वैद्य (गाडगीळ))     (कल्‍पना जांगडे (कुटे))       (अतुल डी. आळशी)

            सदस्‍या                सदस्‍या                  अध्‍यक्ष

 

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, चंद्रपूर

 

 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.