Ashok Ganapati Jamadar filed a consumer case on 24 Sep 2010 against Shri Parswanath Nagari Sah Pat Sanstha Maryadit, Ichalkaranji in the Kolhapur Consumer Court. The case no is CC/10/321 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
Maharashtra
Kolhapur
CC/10/321
Ashok Ganapati Jamadar - Complainant(s)
Versus
Shri Parswanath Nagari Sah Pat Sanstha Maryadit, Ichalkaranji - Opp.Party(s)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.2 ते 14 यांनी म्हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या व सामनेवाला क्र.2 ते 14 यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. उर्वरित सामनेवाले गैरहजर आहेत.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी,
यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे दामदुप्प्ट ठेवीच्या स्वरुपात व सेव्हींग्ज खात्यावर रक्कमा ठेवलेल्या आहेत, त्यांच्या तपशील खालीलप्रमाणे :-
अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्कम
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
मुदतपूर्ण रक्कम
1.
11880
9000/-
01.07.2005
01.04.2014
18000/-
2.
11884
9000/-
01.07.2005
01.04.2014
18000/-
3.
11882
7000/-
01.07.2005
01.04.2014
14000/-
4.
1210
11881/-
--
--
--
5.
1211
11881/-
--
--
6.
1212
9241/-
--
--
--
(3) सदर ठेवरक्कमांची तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेकडे रक्कमांची वारंवार तोंडी व लेखी मागणी केली आहे. तक्रारदारांनी सदर रक्कम शैक्षणिक, लग्नाकरिता व अडीअडचणीच्या वेळी उपयोगी पडाव्यात यासाठी ठेवलेल्या आहेत. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्कमा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदारांनी दि.25.04.2009 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्याजासह ठेवींच्या रक्कमांची मागणी केली. तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या ठेव रक्कमा अदा केल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदारांनी व्याजासह ठेव रक्कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
(4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्या, सेव्हिंग्ज खात्यांचे पासबुक, ठेव रक्कमा मिळणेकरिता केलेला पत्रव्यवहार व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्यादींच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
(5) सामनेवाला क्र.2 ते 14 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात,सामनेवाला संस्थेवर दि.04.10.2007 रोजी अवसायकांची नेमणुक झाली असल्याने तक्रारदारांनी त्यांची ठेव रक्कमेबाबतची मागणी अवसायक यांचेकडे करणे आवश्यक आहे. सामनेवाला संस्थेवर अवसायक यांची नेमणुक झाली असल्याने प्रस्तुतचा वाद या मंचासमोर चालणेस पात्र नाही. तसेच, तक्रारदार हे प्रस्तुत सामनेवाला क्र.1 चे ग्राहक होत नाहीत. जर संस्थेच्या संचालकांच्या चुकीमुळे संस्थेचे नुकसान झाले असेल तर संबंधित संचालकाविरुध्द महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम अन्वये स्वतंत्र फोरमची तरतुद आहे. त्यामुळे प्रस्तुत सामनेवाला यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी येत नाही. तक्रारदारांच्या ठेव पावत्यांच्या मुदती संपलेल्या नाहीत, मुदतपूर्ण तारखेपूर्वी तक्रारदार त्यांची ठेव रक्कमांची मागणी करु शकत नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे.
(6) तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे ठे़वी ठेवलेल्या आहेत. सामनेवाला पतसंस्था ही ठेवी स्विकारते. तसेच, सभासदांना कर्जे देते याबाबतची सेवा ही ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 2(1)(O) या तरतुदीखाली येते. त्यामुळे प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. यास पूर्वाधार म्हणून - थिरुमुरुगन 2004 (I) सी.पी.आर.35 - ए.आय.आर.2004 (सर्वोच्च न्यायालय), तसेच कलावती आणि इतर विरुध्द मेसर्स युनायटेड वैश्य को-ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड - 2002 सी.सी.जे.1106 - राष्ट्रीय आयोग - याचा आधार हे मंच घेत आहे.
(7) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्थेमध्ये ठेव रक्कमा ठेवलेल्या आहेत; सदर ठेव पावत्यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्थेमध्ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. दामदुप्पट ठेव रक्कमांच्या मुदती संपलेल्या नाहीत व सदर रक्कमांची तसचे बचत खात्यावरील रक्कमांची तक्रारदारांनी व्याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टीप्रित्यर्थ कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. तसेच, त्यांच्या म्हणण्यातील कथनांचा तक्रारदारांच्या तक्रारींशी कोणताही दुरान्वयेदेखील संबंध नसल्याचे स्पष्ट होते. सबब, तक्रारदारांच्या व्याजासह ठेव रक्कमा सामनेवाला यांनी न देवून त्यांच्या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्या ठेव रक्कमा देण्याची सामनेवाला क्र. 1 ते 13 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.14 व 15 हे अनुक्रमे संस्थेचे कर्मचारी व शासकिय अधिकारी असल्याने त्यांची केवळ संयुक्तिक जबाबदारी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
(8) तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या ठेव पावती क्र.11880, 11884 व 11882 यांचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्या या दामदुप्पट ठेवींच्या असून त्यांच्या मुदती अ़द्याप पूर्ण झालेल्या नाहीत असे दिसून येते. म्हणजेच तक्रारदारांनी सदर ठेव रक्कमांची मुदतपूर्व मागणी केलेचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार हे सदर ठेव पावत्यांच्या रक्कमा या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सदर ठेव पावत्यांची तक्रार दाखल दि.26.05.2010 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्या मुदतीकरिता देय असणा-या व्याजदरातून द.सा.द.शे.1 टक्का वजाजाता होणा-या व्याजासह मिळणेस पात्र आहेत.
(9) तसेच, तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे सेव्हींग्ज खात्याच्या स्वरुपातदेखील रक्कमा ठेवल्याचे दिसून येते. सदर सेव्हिंग्ज खाते क्र. 1210, 1211 व 1212 वर दि.25.01.2010 रोजीअखेर अनुक्रमे रुपये 11,881/-, रुपये 11,881/- व रुपये 9,241/- जमा असल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे सदर सेव्हिंग्ज खात्यावरील रक्कम द.सा.द.शे.3.5 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
(10) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
(1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
(2) सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.14 व 15 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालील कोष्टकातील दामदुप्पट ठेव पावत्यांच्या रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ठेव तारखेपासून सदर ठेव पावत्यांची तक्रार दाखल दि. 26.05.2010 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्या मुदतीकरिता देय असणा-या व्याजदरातून द.सा.द.शे.1 टक्का व्याज वजाजाता होणारे व्याज द्यावे व दि.27.05.2010 रोजीपासून सदर रक्कमांवर तक्रारदारांना संपूर्ण रक्कमा मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के व्याज द्यावे.
अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्कम
1.
11880
9000/-
2.
11884
9000/-
3.
11882
7000/-
(3) सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.14 व 15 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालील कोष्टकात नमूद सेव्हिंग्ज खात्यावरील रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर दि.25.01.2010 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.3.5 टक्के व्याज द्यावे.
अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्कम
1.
1210
11881/-
2.
1211
11881/-
3.
1212
9241/-
(4) सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.14 व 15 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER
Consumer Court Lawyer
Best Law Firm for all your Consumer Court related cases.