निकालपत्र :- (दि.20/12/2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.2 यांनी स्वतंत्ररित्या तर सामनेवाला क्र.3 ते 15 यांनी एकत्रितरित्या म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी व सामनेवाला क्र.15 यांनी स्वत: युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे मुदत बंद व दामदुप्पट ठेवीच्या स्वरुपात ठेवलेल्या आहेत, त्यांच्या तपशील खालीलप्रमाणे :- अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | ठेव तारीख | मुदतपूर्ण तारीख | मुदतपूर्ण रक्कम | 1. | 9608 | 5500/- | 23.08.2002 | 23.02.2008 | 11000/- | 2. | 9609 | 5500/- | 23.08.2002 | 23.02.2008 | 11000/- | 3. | 14770 | 5500/- | 23.08.2002 | 23.01.2011 | 11% | 4. | 14771 | 5500/- | 23.08.2002 | 23.01.2011 | 11% | 5. | 14768 | 9999/- | 23.08.2002 | 23.08.2020 | 9% |
(3) सदर ठेवींची मुदत संपल्यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेकडे रक्कमांची वारंवार मागणी केली आहे. तक्रारदाराना सदर रक्कमांची तक्रारदारांच्या मुलाच्या शिक्षणासाठी आवश्यकता आहे. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्कमा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे सामनेवाला यांच्या सेवेत त्रुटी झाली आहे. तसेच, अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. सामनेवाला हे तक्रारदारांच्या रककमा सहजसहजी देणार नाहीत अशी तक्रारदारांची खात्री पटलेली आहे. त्यामुळे उपरोक्त नमूद रककमा होणा-या व्याजासह सामनेवाला यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या वसुल होवून मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. (4) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, तक्रारदारांनी या मंचात तक्रार अर्ज क्र.24/2010 वरील ठेव पावत्यांच्या रक्कमा मिळणेबाबत दाखल केलेला होता. परंतु, सदर कामामध्ये तक्रारदारांचे वकिलांनी तजवीज केली नाही म्हणून तक्रार दि.23.08.2010 रोजी डिसमिस केली. प्रत्यक्षात त्यादिवशी तक्रारदारांनी नि.क्र.1 व 3 च्या नकला मा.कोर्टात पाठविलेल्या होत्या व त्या नकलेपैकी सामनेवाला क्र.2 यांनी नक्कल स्विकारुन दि.23.08.2010 रोजी सहीदेखील केली आहे व दुपारी 12.30 वाजता तक्रारदारांना कळाले की तक्रार अर्ज डिसमिस झालेला आहे. त्यानंतर तक्रारदारांनी मा.कोर्टात हजर होवून अर्ज पुन्हा फैलावर घेणेसाठी विनंती केली असता ती नाकारणेत आली. सबब, मुळ तक्रार ही गुणदोषावर न चाललेने सदरची तक्रार त्याच कारणाखाली कायम केलेली आहे. त्यामुळे तक्रारदारांनी व्याजासह ठेव रक्कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. (5) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्यांच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (6) सामनेवाला क्र.2-अवसायक यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला संस्था ही दि. 04.10.2007 रोजी अवसायनात गेली आहे. प्रस्तुत सामनेवाला यांना महाराष्ट्र सरकार यांनी अवसायक म्हणून नेमणुक केली असल्याने त्यांची कोणतीही वैयक्तिक जबाबदारी येत नाही. रक्कमेची वसुली होईल त्याप्रमाणात ठेवीच्या रक्कमा देण्यास सामनेवाला तयार आहेत. सबब, तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे. (7) सामनेवाला क्र.3 ते 15 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला संस्था ही दि.05.10.2007 रोजीच्या आदेशान्वये उपनिबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले यांनी अवसायानात काढलेली आहे. त्यामुळे सामनेवाला संस्थेविरुध्द कामकाज दाखल करणेकरिता सक्षम अधिका-याची परवानगी घेतलेशिवाय काम दाखल करता येणार नाही. तसेच, तक्रारदार हे सभासद असल्याने ते ग्राहक संरक्षण कायद्यातील ग्राहक या संज्ञेत येत नाहीत. (8) सामनेवाला क्र. 3 ते 15 हे त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी यापूर्वी या मंचापुढे प्रस्तुत तक्रारीतील ठेव पावत्यांच्या रक्कमा मिळणेकरिता तक्रार क्र. 24/10 दाखल केली होती. सदर तक्रारीत सामनेवाला हे हजर झाले होते. तक्रारदार हे सलग 7 ते 8 तारखांना गैरहजर असल्याने त्यांचा तक्रार अर्ज काढून टाकणेत आला होता. त्यामुळे तक्रारदारांना त्याच कारणाकरिता प्रस्तुतची तक्रार पुन्हा दाखल करता येणार नाही. सबब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज फेटाळणेत यावा अशी विनंती केली आहे. (9) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यात प्रस्तुत तक्रारीतील ठेव पावत्यांच्या रक्कमा मिळणेकरिता तक्रार क्र. 24/10 दाखल केली होती. तक्रारदार हे सलग 7 ते 8 तारखांना गैरहजर असल्याने त्यांचा तक्रार अर्ज काढून टाकणेत आला होता. त्यामुळे तक्रारदारांना त्याच कारणाकरिता प्रस्तुतची तक्रार पुन्हा दाखल करता येणार नाही असे कथन केले आहे. ग्राहक तक्रार केस नं.24/10 ही तक्रार या मंचाने दि.23.08.2010 रोजी सदर प्रकरणी तक्रारदार हे सातत्याने गैरहजर राहिल्याने काढून टाकणेत आली. सदरची तक्रार ही गुणदोषावर चालून निकाली काढणेत आलेली नव्हती. त्यामुळे तक्रारदारांनी सदर तक्रारीतील ठेव पावत्यांच्या रक्कमा मिळणेकरिता दाखल केलेली प्रस्तुतची तक्रार चालविणेचा अधिकार या मंचास येतो. (10) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्थेमध्ये ठेव रक्कमा ठेवलेल्या आहेत; सदर ठेव पावत्यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्थेमध्ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव पावत्यांपैकी काहींच्या मुदती संपून गेलेल्या आहेत तर काहींच्या अद्याप संपणेच्या आहेत. सदर रक्कमांची तक्रारदारांनी व्याजासह मागणी केली आहे. तक्रारदारांच्या व्याजासह ठेव रक्कमा सामनेवाला यांनी न देवून त्यांच्या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्या ठेव रक्कमा देण्याची सामनेवाला क्र. 3 ते 14 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.1 हे संस्थेचे कर्मचारी, सामनेवाला क्र.2-अवसायक हे शासकिय अधिकारी व सामनेवाला क्र.15-सेक्रेटरी हे संस्थेचे कर्मचारी असल्याने त्यांची केवळ संयुक्तिक जबाबदारी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (11) तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या ठेव पावत्यांचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्यांपैकी ठेव पावती क्र. 9608 व 9609 या दामदुप्पट ठेवींच्या असून त्यांच्या मुदती संपलेल्या आहेत असे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे दामदुप्पट ठेव पावत्यांवरील मुदतपूर्ण रक्कमा मुदत संपलेल्या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (12) तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या ठेव पावत्यांचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्यांपैकी ठेव पावती क्र.14770, 14771 व 14768 या दामतिप्पट व लखपती ठेवींच्या असून त्यांच्या मुदती अ़द्याप पूर्ण झालेल्या नाहीत असे दिसून येते. म्हणजेच तक्रारदारांनी सदर ठेव रक्कमांची मुदतपूर्व मागणी केलेचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार हे सदर ठेव पावत्यांच्या रक्कमा या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सदर ठेव पावत्यांची तक्रार दाखल दि.06.09.2010 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्या मुदतीकरिता देय असणा-या व्याजदरातून द.सा.द.शे.1 टक्का वजाजाता होणा-या व्याजासह मिळणेस पात्र आहेत. (13) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला क्र.3 ते 14 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.1, 2 व 15 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालील कोष्टकातील दामदुप्पट रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर दि.24.02.2008 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज द्यावे. अ.क्र. | ठेव पावती क्र. | देय मुदतपूर्ण रक्कम | व्याजदेय तारीख | 1. | 9608 | 11000/- | 23.02.2008 | 2. | 9609 | 11000/- | 23.02.2008 |
(3) सामनेवाला क्र.3 ते 14 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.1, 2 व 15 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालील कोष्टकातील दामदुप्पट ठेव पावत्यांच्या रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ठेव तारखेपासून सदर ठेव पावत्यांची तक्रार दाखल दि. 10.03.2007 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्या मुदतीकरिता देय असणा-या व्याजदरातून द.सा.द.शे.1 टक्का व्याज वजाजाता होणारे व्याज द्यावे व दि.11.03.2007 रोजीपासून सदर रक्कमांवर तक्रारदारांना संपूर्ण रक्कमा मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के व्याज द्यावे. अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | 1. | 14770 | 5500/- | 2. | 14771 | 5500/- | 3. | 14768 | 9999/- |
(4) सामनेवाला क्र.3 ते 14 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.1, 2 व 15 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |