Maharashtra

Ahmednagar

CC/17/261

Mukund Ramchandra Gurav - Complainant(s)

Versus

Shri Parshwanath Gramin Bigersheti Sahakari Patsanstha Ltd. - Opp.Party(s)

Adv.Pradnya Joshi

09 Aug 2018

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/17/261
( Date of Filing : 25 Sep 2017 )
 
1. Mukund Ramchandra Gurav
A/P Siddhatek, Tq. Karjat
Ahmednagar
Maharashtra
2. Anuradha Mukund Gurav
A/P Siddhatek, Tq. Karjat
Ahmednagar
Maharashtra
3. Atul Mukund Gurav
A/P Siddhatek, Tq. Karjat
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Parshwanath Gramin Bigersheti Sahakari Patsanstha Ltd.
A/P-Rashin, Tal-Karjat
Ahmednagar
Maharashtra
2. Manager, Shri Parshwanath Gramin Bigersheti Sahakari Patsanstha Ltd.
A/P-Rashin, Tal-Karjat
Ahmednagar
Maharashtra
3. President, Shri Parshwanath Gramin Bigersheti Sahakari Patsanstha Ltd. , Avinash Ramanlal Doshi
A/P-Bigavan Road, Rashin,Tal-Karjat
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Adv.Pradnya Joshi, Advocate
For the Opp. Party:
Dated : 09 Aug 2018
Final Order / Judgement

 (आदेश पारीत व्‍दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्‍या)

 

1.   तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाला यांनी द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे. म्‍हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केलेली आहे.

2.   तक्रारदार यांची तक्रार थोडक्‍यात येणे प्रमाणेः-

     तक्रारदार नं.1 ते 3 हे वर नमुद पत्‍त्‍यावर राहतात. तक्रारदार नं.1 व 2 हे पती पत्‍नी असून तक्रारदार नं.3 हा त्‍यांचा मुलगा आहे. तक्रारदार नं.2 व 3 यांनी तक्रारदार नं.1 यांना अधिकारपत्र करुन दिले आहे. त्‍यानुसार तक्रारदार नं.2 व 3 यांनी तक्रारदार नं.1 यांना सदर खाते पुस्‍तकावरील रक्‍कम स्विकारण्‍यास संमती दिलेली आहे. सामनेवाला नं.1 ही नोंदणीकृत सहकारी पतसंस्‍था असून सामनेवाला नं.2 व 3 हे त्‍याचा कारभार पाहातात. तक्रारदार  नं.1 व 2 यांच्‍या संयुक्‍त नावे सामनेवाला यांचेकडे बचत खाते क्र.1010 आहे. सदर खात्‍यामध्‍ये सामनेवाला यांनी तक्रारदार नं.1 व 2 यांच्‍या नावे असलेल्‍या मुदत ठेव पावत्‍या जमा करुन घेतल्‍या. तक्रारदार नं.1 व 2 यांनी सदर बचत ठेव खात्‍यामधील रकमेची वेळोवळी सामनेवाला यांचेकडे मागणी केली. परंतू त्‍यांनी अद्याप रक्‍कम दिली नाही. तक्रारदार नं.1 व 2 यांचे नावे असलेल्या बचत खात्‍यामध्‍ये दिनांक 20.02.2017 पावेतो 25,342/- रुपये जमा आहे. तसेच तक्रारदार नं.3 यांचे नांवे सामनेवाला यांचेकडे बचत ठेव खाते नं.1979 आहे.  त्‍या खात्‍यामध्‍ये दिनांक 19.04.2017 पावेतो रक्‍कम रु.1,25,634/- जमा आहे. तक्रारदार नं.1 ते 3 यांनी अनेकदा बचत खात्‍यामध्‍ये असलेल्या रक्‍कमेची मागणी सामनेवाला यांचेकडे केली. परंतू सामनेवाला यांनी रक्‍कम तक्रारदारांना  दिली नाही. त्‍यामुळे तक्रारदार नं.1 ते 3 यांनी मंचात तक्रार दाखल करुन परीच्‍छेद 10 प्रमाणे मागणी केली आहे.

3.   सामनेवाला नं.1 ते 3 यांना नोटीसची बजावणी होऊनही ते प्रकरणात हजर झाले नाहीत. त्‍यामुळे सामनेवाले  नं.1 ते 3 यांचे विरुध्‍द निशाणी 1 वर एकतर्फा चालवण्‍याचा आदेश दिनांक 19.06.2018 रोजी करण्‍यात आला.

4.   तक्रारकर्ताने  दाखल केलेली कागदपत्र, शपथपत्र व त्‍यांचे वकील श्रीमती हेंद्रे-जोशी यांनी केलेला युक्‍तीवाद ऐकला व न्‍याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.                                                       

 

    

             मुद्दे   

      उत्‍तर

1.

सामनेवाला नं.1 ते 3 यांनी त्‍यांचे सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?                                                         

 

... होय.

2.

तक्रारदार नं.1 ते 3 हे नुकसान भरपाई मिळणेस पात्र ठरतात काय. ?  

... होय.

3.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

 

का र ण मि मां सा

5.    मुद्दा क्र.1 ः- तक्रारदार नं.1 ते 3 हे एकाच कुटूंबातील व्‍यक्‍ती आहेत. तक्रारदार नं.1 व 2 हे पती पत्‍नी असून तक्रारदार नं.3 हा त्‍यांचा मुलगा आहे. तक्रारदार नं.1 व 2 यांचे सामनेवाला यांचेकडे संयुक्‍त बचत खाते नंबर 1010 आहे. तसेच तक्रारदार नं.3 यांचे नांवे सामनेवाला यांचेकडे बचत खाते नं.1979 असे आहे. सदर बचत खात्‍यामध्‍ये तक्रारदार नं.1 व 2 यांचे बचत खात्‍यात दिनांक 20.02.2017 पावेतो 25,342/- एवढी रक्‍कमम जमा आहे. त्‍याबाबत बचत खात्‍याची छायाकिंत प्रत तक्रारदाराने प्रकरणात दाखल केली आहे. सदरहू बचत खात्‍याचे अवलोकन केले असता रु.25,342/- एवढी रक्‍कम जमा असल्‍याची बाब स्‍पष्‍ट होते. तसेच तक्रारदार नं.3 याचे नांवे असलेल्या बचत खाते क्र.1979 मध्‍ये 1,25,634/- एवढी रक्कम जमा आहे, ही बाब निशाणी क्र.15 वर दाखल केलेल्‍या छायाकिंत प्रतिवरुन स्‍पष्‍ट होते. तक्रारदार  नं.1 ते 3 यांचे कथनानुसार त्‍यांनी सामनेवाला यांचेकडे त्‍यांचे बचत खात्‍यात जमा असलेल्या रकमेची मागणी केली. परंतू सामनेवाला यांनी त्‍यांना अद्याप रक्‍कम दिली नाही व त्‍यांना आश्‍वासन देत राहीले. अशा प्रकारे सामनेवाले नं.1 ते 3 यांनी त्‍यांचे सेवेत त्रुटी केली आहे ही सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविणेत येते.

6.   मुद्दा क्र. 2- तक्रारदार नं.1 ते 3 यांची रक्‍कम हे सामनेवाला नं.1 ते 3 यांचे पतसंस्‍थेमध्‍ये जमा आहे ही बाब तक्रारदाराने प्रकरणात कागदोपत्री पुराव्‍यानिशी सिध्‍द केली आहे. तसेच सामनेवाला यांना सदर तक्रारीचे नोटीसची बजावणी होऊनसुध्‍दा ते मंचात हजर होऊन त्‍यांनी तक्रारदाराचे म्‍हणणे खोडून काढण्‍याची संधी गमावली आहे. तक्रारकर्ताने दाखल केलेल्‍या कागदोपत्री पुरावा व त्‍यांचे तक्रारीतील कथन हा पुरावा म्‍हणून गृहीत धरुन तक्रारदार नं.1 ते 3 यांना नुकसान भरपाईची रक्‍कम मिळण्‍यास ते पात्र ठरतात. तक्रारदार यांना सामनेवाला यांनी त्‍यांची रक्‍कम मागणी केल्‍यानंतरही परत केली नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांना मंचात तक्रार दाखल करावी लागली व मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. सबब या नुकसानीपोटी काही रक्‍कम तक्रारदार नं 1 ते 3 यांना देणे न्‍यायोचीत ठरेल. सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

7.   मुद्दा क्र.3 ः- मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचानावरुन हे मंच खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे.

- अं ति म आ  दे  श -

1)   तक्रारदार नं.1 ते 3 यांची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येते.

2)   सामनेवाला नं.1 ते 3 यांनी एकत्रितरित्‍या व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदार नं.1 व 2 यांचे संयुक्‍त बचत खाते क्र.1010 यामध्‍ये दिनांक 20.02.2017 पर्यंत जमा असलेली रक्‍कम 25,342/- (रक्‍कम रु.पंचवीस हजार तीनशे बेचाळीस फक्‍त ) त्‍यावर नमुद नियमाप्रमाणे देय असलेल्या बचत खात्यामध्‍ये नमुद असलेल्या व्‍याजदराने तक्रारदार नं.1 व 2 यांना या आदेशाची प्रत मिळालेपासून 30 दिवसाचे आत द्यावी. सदरहू रक्‍कम मुदतीत न दिल्‍यास सदर रकमेवर  तक्रार दाखल तारखेपासून संपुर्ण रक्‍कम परत फेड होईपर्यंत 9 टक्‍के द.सा.द.शे. व्‍याज दराने तक्रारदार नं. 1 व 2 यांना अदा करावे.

3)   सामनेवाला नं.1 ते 3 यांनी एकत्रितरित्‍या व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदार नं.3 यांचे बचत खाते क्र.1979 यामध्‍ये दिनांक 19.04.2017 पर्यंत जमा असलेली रक्‍कम 1,25,634/- (रक्‍कम रु.एक लाख पंचवीस हजार सहाशे चौतीस फक्‍त) त्‍यावर नमुद नियमाप्रमाणे देय असलेल्या बचत खात्यामध्ये नमुद असलेल्या व्‍याजदराने तक्रारदार नं.3 यांना या आदेशाची प्रत मिळालेपासून 30 दिवसाचे आत द्यावी.  सदरहू रक्‍कम मुदतीत न दिल्‍यास सदर रकमेवर  तक्रार दाखल तारखेपासून संपुर्ण रक्‍कम परत फेड होईपर्यंत 9 टक्‍के द.सा.द.शे. व्‍याज दराने तक्रारदार नं.3 यांना अदा करावे.

4)   सामनेवाला नं.1 ते 3 यांनी एकत्रितरित्‍या व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदार नं.1 ते 3 यांना झालेल्या मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/-(रक्‍कम रु.पाच हजार फक्‍त ) व या तक्रारीचे  खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- (रक्‍कम रु.तीन हजार फक्‍त ) द्यावे.

5)   या आदेशाची प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

6)   या प्रकरणाची  “ ब ” व “ क ” फाईल तक्रारदार यांना द्यावी.       

 

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.