Maharashtra

Ahmednagar

CC/14/126

Dr.Bharat M.Virkar - Complainant(s)

Versus

Shri Pandurang D.Panchal,Vyankatesh Furniture & Glass House - Opp.Party(s)

Mundada

20 Dec 2018

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/14/126
( Date of Filing : 04 Apr 2014 )
 
1. Dr.Bharat M.Virkar
Nishigandh Clinic & Hospital,Opp.M.S.E.B.Sub Station,Khandoba Nagar,Near Akhegaon Road,Shevgaon,Tal Shevgaon,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Pandurang D.Panchal,Vyankatesh Furniture & Glass House
Miri Road,Shevgaon,Tal Shevgaon,
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Mundada, Advocate
For the Opp. Party: R.D.Jondhale, Advocate
Dated : 20 Dec 2018
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी-मा.अध्‍यक्ष)

1.   तक्रारकर्ता यांनी सदरील तक्रार कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्‍वये दाखल केली आहे.

2.   तक्रारकर्ताने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ताने वैद्यकिय व्‍यवसायाकरीता दवाखाना बांधलेला आहे. सदर दवाखान्‍याचे बांधकाम पुर्ण झाल्‍यानंतर तक्रारकर्तास स्‍लायडींगचे खिडक्‍यांचे काम करावयाचे असल्‍याने तक्रारकर्ताने सामनेवालाला संपर्क केला. सामनेवालाने सदर स्‍लायडींगचे खिडक्‍यांचे काम करुन देण्‍यास सहमती दर्शविली. सदरील कामकाजाचे मटेरियल व फिटींगसह एकुण 1,24,772/-  चे काम ठरले होते. सामनेवालाने सदर काम चालू केल्‍यानंतर तक्रारकर्ताचे लक्षात आले की, सदर काम सामनेवाला हा स्‍वतः हजर न राहता अप्रशिक्षित व अकुशल कामगाराकडून कामकरुन राहिले आहेत. तक्रारकर्ताने सदर विचारणा केली असताना चांगले काम होईल, काळजी करु नका, काम पसंत न पडल्‍यास परत बदलुन देईल अशी खात्री दिली. परंतू सदरचे काम समाधानकारक नसल्‍याने सामनेवाला यांच्‍याकडे तक्रार करुनही सामनेवाला यांनी त्‍याची कोणतीही दखल घेतली नाही. शेवटी काम पुर्ण झाल्‍यानंतर तक्रारकर्ताने स्‍वतः सामनेवालाला बोलावून दाखविले. सदरचे काम व्‍यवस्थित झालेले नव्‍हते. स्‍लायडींगचे खिडक्‍यांचे काचा एकमेंकाना घासतात व त्‍यामुळे व्‍यवस्थित लागत नाही. तसेच खिडकीबाहेरुन बसवलेली जाळी निकृष्‍ठ दर्जाची वापरलेली आहे. जाळया बसविलेल्‍या खिडक्‍या तिरक्‍या बसल्‍यामुळे व्‍यवस्थित लागत नाही. असे असूनही सामनेवाला यांनी खिडक्‍या नव्‍या असल्‍याचे सांगुन सहा महिन्‍यात रुळल्‍यानंतर व्‍यवस्थित बसतील असा भरवसा देऊन दिनांक 24.10.2011 रोजी पुर्ण रक्‍कम देऊ केली. त्‍यांनतरही तक्रारकर्ताने 6 महिने वाट पाहिली. परंतु सदर खिडक्‍यांच्‍या काचा घासण्‍यामध्‍ये कोणताही बदल झाला नाही. त्‍यामुळे वेळोवेळी तक्रारकर्ताने सामनेवालांना फोन करुन सुचना देऊनही दखल घेतली नाही. त्‍यानंतर पावसाळयामध्‍ये झेड सेक्‍शनचे काम व्‍यवस्थित न झाल्‍यामुळे पावसाचे पाणी आत येत होते त्‍याचीही कल्‍पना देऊनही सामनेवाला यांनी त्‍याची दखल घेतली नाही. शेवटी तक्रारकर्ताने ऑगस्‍ट 2012 मध्‍ये सामनेवालाला नोटीस पाठविली, सदर नोटीस प्राप्‍त झाल्‍यावर सामनेवालाने त्‍यांचे वकीलामार्फत खोटया-नाटया स्‍वरुपाचे आणि चुकीच्‍या कथनाचे नोटीस उत्‍तर पाठविले.  सामनेवाला यांनी स्‍लायडींगचे खिडक्‍यांचे काम बरोबर केले नाही व त्‍याची रक्‍कम स्विकारली होती. म्‍हणून सेवेत त्रुटी दिली असल्‍याने तक्रारकर्ताने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.

3. तक्रारकर्ताने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवाला यांनी तक्रारकर्ताचे स्‍लायडींगचे खिडक्‍यांचे व झेड सेक्‍शनचे केलेले काम निकृष्‍ठ दर्जाचे असल्‍यामुळे पुन्‍हा चांगल्‍या प्रतिचे काम करुन द्यावे. काम करणे शक्‍य नसल्‍यास तक्रारकर्ताकडून घेतलेली रक्‍कम व तक्रारकर्तास झालेल्‍या नुकसान भरपाई तसेच तक्रारीचा खर्च, शारीरीक व मानसिक त्रासापोटी सामनेवालाने तक्रारकर्ताला व्‍याजासह रक्‍कम द्यावी अशी विनंती केली आहे.

4. तक्रारकर्ताची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीस काढण्‍यात आली. सदरहू नोटीस प्राप्‍त झाल्‍यावर सामनेवाला प्रकरणात हजर झाले. व निशाणी क्र.11 वर लेखी उत्‍तर दाखल केले. सामनेवाला यांनी लेखी उत्‍तरात असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ताने तक्रारीत सामनेवाला यांचेविरुध्‍द लावलेले आरोप खोटे असून ते सामनेवालास नाकबूल आहेत. सामनेवालाने पुढे असे कथन केलेले आहे की, सदर तक्रार मुदतीत दाखल करण्‍यात आलेली नाही. तसेच तक्रारकर्ता हा ग्राहक या व्‍याख्‍येत मोडत नाही व सदर तक्रार चालविण्‍यास या मंचाला अधिकार नाही. सामनेवालाने तक्रारकर्ताचे स्‍लायडींगचे खिडक्‍यांचे काम केल्‍याबाबत मान्‍य केलेले आहे. तसेच सामनेवालाने पुढे असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ताने स्‍वतः राल्‍को, जिंदाल, पनास, सुपरफाईन इत्‍यादी कंपनीचे मटेरीयल दाखवले. तक्रारकर्ताने सुपरफाईन या कंपनीचे मटेरीयल व प्‍लेन ग्‍लास पसंत केली. सुपरफाईनचा दर कमी असल्‍यामूळे तक्रारकर्ताने सुपरफाईन कंपनीचे मटेरीयल पसंत केले. व ते योग्‍य पध्‍दतीने व्‍यवस्थित लावण्‍यात आले होते. तक्रारकर्ताने काम झाल्‍यानंतर 1 वर्षानंतर नोटीस देऊन कायदेशीर कारवाईची धमकी देऊन ब्‍लॅकमेल करण्‍याचा प्रयत्‍न सामनेवालास केलेला आहे. सामनेवाला यांनी तक्रारकर्ताला कशाचीही हमी (गॅरंटी) दिलेली नव्‍हती. दवाखान्‍यातील  रुग्ण व रुगणांचे नातेवाईकांकडून खिडक्‍याची उघडझाप करतांना होणारी आदळआपट यामुळे 1 वर्षाचे वापरानंतर व खिडक्‍यांच्‍या बेअरींग्‍ज खराब झाल्‍या असल्‍यास खिडक्‍यांचा काचा किंचीत एकमेकांना घासू शकतात, त्‍याची जबाबदारी सामनेवालावर नाही. तक्रारकर्ताने सामनेवालाकडून खिडक्‍या बदलून देण्‍याची कोणतेही कारण नसतांना सदर तक्रार चुकीची दाखल केली असल्‍याने खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी विनंती करण्‍यात आली आहे.

5. तक्रारकर्ता यांनी दाखल केलेली तक्रार, दस्‍तावेज, सामनेवाला यांचा जबाब आणि उभय पक्षांचे युक्‍तीवादावरुन मंचासमक्ष खालील मुद्दे विचारार्थ येतात.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारकर्ताची तक्रार मुदतीत दाखल करण्‍यात आली आहे काय.?                    

 

... होय.

2.

तक्रारकर्ता हे सामनेवालाचे “ग्राहक”  आहेत काय.?

 

... होय.

3.

सामनेवालाने तक्रारकर्ताप्रति न्‍युनत्‍तम सेवा दिली आहे काय. ?

 

... नाही.

4.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

 

का र ण मि मां सा

6.   मुद्दा क्र.1  – तक्रारकर्ताने तक्रारीत सदर तक्रार दाखल करण्‍याचे कारण सामनेवाला यांनी दिनांक 20.09.2011 रोजी तक्रारकर्ताचे स्‍लायडींगचे खिडक्‍यांचे काम करुन दिले त्‍या वेळी प्रथम घडले. व सामनेवालाने तक्रारकर्ताचे नोटीसला उत्‍तर दिनांक 29.10.2012 ला दिले. सदर तक्रार दिनांक 04.04.2014 रोजी मंचासमक्ष दाखल करण्‍यात आली आहे. म्‍हणून सदर तक्रारीस कारण घडण्‍यास दोन वर्षाचे आत घडले असून सदर तक्रार मुदतीत आहे असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

7.   मुद्दा क्र.2 – तक्रारकर्ताने सामनेवालाकडून त्‍यांचे दवाखान्‍याचे स्‍लायडींगचे खिडक्‍यांचे काम करुन घेतले. व त्‍याकरता तक्रारकर्ताने सामनेवालास मोबदला दिला ही बाब सामनेवालास मान्‍य असून तक्रारकर्ता हे सामनेवालाचे “ग्राहक” आहेत असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

8.   मुद्दा क्र.3 –सदर तक्रारीत तक्रारकर्ताचे सामनेवालाविरुध्‍द असे आरोप आहेत की, सामनेवालाने स्‍लायडींगचे खिडक्‍यांचे काम करतेवेळी निकृष्‍ठ दर्जाचे मालाचा वापर केला व योग्‍यपणे खिडक्‍याचे काम केले नसल्‍याने खिडक्‍या व्‍यवस्थित लागत नव्‍हत्‍या. सदर बाब सिध्‍द करण्‍याकरीता तक्रारकर्ताने कोणतेही  दस्‍तावेज व साक्षीपुरावा प्रकरणात दाखल केलेला नाही. तसेच तक्रारकर्ताने तज्ञ विशेषज्ञाचा अहवाल मागितलेला नाही. या उलट सामनेवालाने कैफियतीत अशी बाजू मांडली आहे की, तक्रारकर्ताचे खिडक्‍या 1 वर्षाचे आंत बसविल्‍यानंतर एक वर्षानंतर त्‍या खिडक्‍यामध्‍ये गैरवापर झालेला असल्‍यामुळे त्‍याचे बेरींग मधून आवाज निघू शकतो अशी शक्‍यता नाकारता येत नाही. तक्रारकर्ताने तक्रारीत सामनेवाला यांचे विरुध्‍द मटेरियल निकृष्‍ठ दर्जाचे वापरले किंवा खिडक्‍या बरोबर बसवण्‍यात आलेल्‍या नाही या संदर्भात पुरावा व तज्ञ अहवालाअभावी, असे सिध्‍द करुन शकत नाही. म्‍हणून तक्रारकर्ताला सामनेवालाने न्‍युनत्‍तम सेवा दिली नाही असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.3 चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.

9.   मुद्दा क्र.4 - मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारकर्ताची तक्रार खारीज करण्‍यात येते.

2.   या तक्रारीचा खर्च उभय पक्षकार यांनी स्‍वतः सहन करावा.

3.   या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.  

4.   तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.