shri devidas ankush gadhve filed a consumer case on 12 Feb 2015 against shri pandit aotomotivh p. l. in the Satara Consumer Court. The case no is CC/14/55 and the judgment uploaded on 05 Sep 2015.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 55/2014.
तक्रार दाखल दि.15-04-2014.
तक्रार निकाली दि.12-2-2015.
श्री.देवीदास अंकुश गाढवे,
रा.काळज, ता.फलटण, जि.सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
श्री.पंडित ऑटोमोटिव्ह प्रा.लि.
कृष्णानगर,
ता.जि.सातारा 415 003. . .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.एन.व्ही.भोसले/अँड.एम.ए.गाडवे.
जाबदार - एकतर्फा आदेश.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा यानी पारित केला
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986च्या कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे काळज, ता.फलटण, जि.सातारा. येथील कायमस्वरुपी रहिवासी आहेत तर जादार हे टाटा कंपनीच्या सर्व प्रकारच्या गाडयांचे विक्रेते असून जाबदारांचे शोरुम कृष्णानगर, सातारा या ठिकाणी कार्यरत आहे. तक्रारदारानी जाबदारांकडे टाटा एस झीप हे माल वाहतूक वाहन नवीन खरेदी करणेचे ठरवले त्याप्रमाणे तक्रारदाराने जाबदाराशी प्रत्यक्ष संपर्क साधला असता जाबदाराने प्रस्तुत एस झेप या वाहनाबाबत माहिती तक्रारदारास दिली. सदर माहितीनुसार वाहनाची मूळ शोरुम किंमत रु.2,05,089/- (रु.दोन लाख पाच हजार एकोणनव्वद मात्र) अशी होती, तसेच वाहनाचे रजिस्ट्रेशन आर.टी.ओ.कडील सर्व पूर्तता शोरुमतर्फे होणार असल्याने त्यासाठी रक्कम रु.16,150/- आणि वाहनाचा विमा रक्कम रु.16,167/- तसेच टाटा रॉयल्टी रक्कम रु.600/- असे एकूण रु.2,38,006/- (रु.दोन लाख अडतीस हजार सहा मात्र) असा खर्च व वाहनाची किंमत होईल असे जाबदाराने तक्रारदारास सांगितले. त्याचदिवशी जाबदार कंपनीकडून तक्रारदाराने वाहनाचे कोटेशनही घेतले. तक्रारदाराकडे वाहन खरेदीसाठी संपूर्ण रक्कम उपलब्ध नसलेने तक्रारदाराने कर्जप्रकरणाबाबत जाबदाराकडे विचारणा केली असता जाबदार शोरुमतर्फे सांगणेत आले की, टाटा फायनान्सचे कर्ज उपलब्ध असून वाहनाच्या किंमतीच्या एकूण रकमेपैकी फायनान्सचे रु.1,84,590/- चे कर्ज उपलब्ध होऊ शकते. उर्वरित वाहनाची किंमत रक्कम रु.20,499/- आणि आर.टी.ओ.रजिस्ट्रेशन रक्कम रु.16,150/- आणि वाहनाचा विमा रक्कम रु.16,167/- तसेच टाटा रॉयल्टी रक्कम रु.600/- व पी.पी.रक्कम रु.5000/- अशी एकूण रक्कम रु.58,416/- म्हणजे जवळजवळ ¼ रक्कम शोरुमला दयावी लागेल असे जाबदारांचे शोरुममार्फत तक्रारदाराना सांगणेत आले. त्यानंतर तक्रारदाराने प्रस्तुत जाबदाराकडून सदर वाहन खरेदी करणेची तयारी करुन दुसरे दिवशी दि.31-7-2012 रोजी सदरचे वाहन खरेदी करणेसाठी जाबदाराचे शोरुममध्ये गेले, त्याप्रमाणे जाबदाराने दिलेल्या ऑफरप्रमाणे तक्रारदारानी जाबदारांचे शोरुममध्ये रक्कम रु.60,000/- (रु.साठ हजार मात्र) सदर वाहनाची ¼ किंमत म्हणून रोख स्वरुपात जाबदाराला अदा केले. सदर रक्कम जाबदारांचे शोरुममार्फत स्विकारली असून जाबदार शोरुममार्फत ऑर्डर बुकींग फॉर्म देऊन रक्कम रु.60,000/- मिळालेची पोहोच तक्रारदारास देणेत आली असून उर्वरित रकमेचे टाटा फायनान्सचे कर्जप्रकरण केले आहे. जाबदाराने ठरलेप्रमाणे सर्व पूर्तता झालेवर दि.31-7-2012 रोजी टाटा एस झीप पांढ-या रंगाचे वाहन आर.टी.ओ.रजिस्ट्रेशन कागदपत्रे व विमादेखील उपलब्ध आहे. तक्रारदार हे टाटा फायनान्सचे कर्जाचे हप्ते वेळेवर भरत आहेत. असे असताना वाहनाचे रजिस्ट्रेशन झालेनंतर त्याचा आर.टी.ओ.वाहन रजिस्टर क्र.एम.एच-11-ए.जी-9434 असा मिळाला असून वाहनाची आर.टी.ओ.कडील आर.सी.बुक, स्मार्ट बुक, इन्शुरन्स, पी.यु.सी.वगैरे सर्व मूळ कागदपत्रे ही जाबदारांचे शोरुममध्ये जमा झालेली आहेत. सदरची मूळ कागदपत्रे तक्रारदाराने जाबदाराकडे वारंवार मागणी करुनही तक्रारदाराला ती देणेस जाबदार टाळाटाळ करीत आहेत, त्यामुळे तक्रारदारास अडचणीना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जाबदाराने कागदपत्रे तक्रारदाराला न देऊन सेवेत त्रुटी केली आहे म्हणून तक्रारदारानी सदरचा तक्रारअर्ज मे.मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने सदर कामी जाबदारांकडून तक्रारदाराचे मालकीचे वाहन टाटा एस झीप एम.एच-11/ए.जी.9434 या वाहनाची आर.सी.बुक, स्मार्ट बुक, इन्शुरन्स, पी.यु.सी.वगैरे सर्व मूळ कागदपत्रे जाबदारांचे शोरुमला जमा झालेली आहेत ती तक्रारदाराना देणेबाबतचे आदेश जाबदाराला करणत यावेत, तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- जाबदाराकडून मिळावेत व अर्जाचा संपूर्ण खर्च जाबदाराकडून मिळणेबाबत विनंती केली आहे.
3. तक्रारदाराने सदर कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते 5/3 कडे अनुक्रमे जाबदाराने तक्रारदारास दिलेले वाहनाचे कोटेशन, जाबदारानी तक्रारदाराकडून वाहनाचे पैसे स्विकारलेची पावती, तक्रारदाराने जाबदाराला पाठवलेल्या नोटीसची स्थळप्रत, नि.11 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.12 कडे तक्रारदारांचा लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदारानी सदर कामी मे.मंचात दाखल केली आहेत.
4. सदर कामी जाबदार हे मंचात हजर झाले नाहीत तसेच त्यांनी त्यांचे म्हणणे/कैफियत मंचात दाखल केली नाही, सबब जाबदारांविरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर पारित करणेत आला आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदारांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन सदर तक्रारअर्जाचे निराकरणार्थ मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय? होय.
2. जाबदाराने तक्रारदाराना सदोष सेवा पुरवली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? शेवटी आदेशात नमूद केलेप्रमाणे.
विवेचन
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदारांनी जाबदार कंपनीकडून दि.31-7-2012 रोजी टाटा एस झीप वाहन त्याची ¼ किंमत म्हणून रक्कम रु.60,000/- जाबदाराकडे रोख जमा करुन पांढ-या रंगाचे टाटा एस झीप हे वाहन खरेदी केले. उर्वरित रकमेचे कर्ज टाटा फायनान्सकडे केले असून हप्ते नियमितपणे तक्रारदार भरत आहे. तक्रारदाराने जाबदार कंपनीकडून वाहन खरेदी केलेचे तक्रारदारानी नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 कडील गाडीचे कोटेशन व नि.5/2 कडे दाखल तक्रारदाराने जाबदाराकडे ¼ किंमतीपोटी रक्कम रु.60,000/- जमा केलेची पावती, वगैरे कागदपत्रावरुन सिध्द होते म्हणजेच तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार असल्याचे निर्विवाद सत्य आहे म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण मुद्दा क्र.1 मध्ये वर्णन केलेप्रमाणे तक्रारदाराने जाबदार कंपनीकडे टाटा एस.झीप वाहन खरेदी करणेसाठी रक्कम रु.60,000/- जमा केले तसेच उर्वरित रकमेचे कर्ज टाटा फायनान्सकडून घेतले. प्रस्तुत वाहनाचे रजिस्ट्रेशन आर.टी.ओ.मार्फत झाले असून रजि.नं.एम.एच-11-ए.जी.9434 असा असून आर.टी.ओ.कडील आर.सी.बुक, स्मार्ट बुक, इन्शुरन्स, पी.यु.सी.वगैरे सर्व कागदपत्रे तक्रारदाराने जाबदाराकडे वारंवार मागणी केली असता जाबदाराने प्रस्तुत कागदपत्रे तक्रारदाराना दिली नाहीत म्हणून तक्रारदारानी जाबदार कंपनीस वकीलांतर्फे दि.26-12-2013 रोजी नोटीस पाठवली आहे. प्रस्तुत नोटीस नि.5/3 कडे दाखल आहे, परंतु तरीही तक्रारदाराना जाबदाराने गाडीची सर्व कागदपत्रे अदा केली नाहीत म्हणजेच तक्रारदारास जाबदाराने सदोष सेवा पुरवली असल्याचे निर्विवाद सिध्द होते. प्रस्तुत कामी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणताही मजकूर जाबदाराने म्हणणे/कैफियत दाखल करुन खोडून काढलेला नाही. तर जाबदार हे मे.मंचात नोटीस मिळूनही हजर राहिलेले नाहीत व म्हणणे दाखल केलेले नाही, सबब सदर जाबदाराविरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर पारित झालेला आहे. सबब तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांचा विचार करुन जाबदाराने तक्रारदाराना सदोष सेवा दिली असल्याच्या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे, त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिलेले आहे.
8. वर नमूद सर्व कागदपत्रांचा विचार करुन तसेच तक्रारदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, लेखी युक्तीवाद यांचा विचार करुन तक्रारदार हे जाबदार कंपनीकडून तक्रारअर्जात मागणी केलेप्रमाणे कागदपत्रे मिळणेस पात्र आहेत, तसेच मानसिक त्रासापोटीचा व तक्रारअर्जाचा खर्चही मिळणेस पात्र आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे.
9. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येतो
आदेश
1. तक्रारदारांचा तक्रारअर्ज मंजूर करणेत येतो.
2. तक्रारदारांना जाबदार कंपनीने टाटा एस.झीप नं.एम.एच.11/ए.जी.9434 या वाहनाची आर.टी.ओ.कडील आर.सी.बुक, स्मार्ट बुक, इन्शुरन्स, पी.यु.सी.वगैरे सर्व मूळ कागदपत्रे अदा करावीत.
3. तक्रारदाराना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी जाबदारानी तक्रारदाराना रक्कम रु.10,000/- अदा करावेत.
4. वरील आदेशाचे पालन जाबदारानी आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात करावे.
5. जाबदारानी विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केलेस तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये दाद मागू शकतील.
3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
4. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि.12-2-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.