Maharashtra

Kolhapur

CC/10/534

Dilip Banda Chougale - Complainant(s)

Versus

Shri Panchganga Nagari Sah pat Sanstha Maryadit, Shiye Through - Secretary, Kumar Baburao Ingawale - Opp.Party(s)

H.P.Randive.

24 Dec 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/534
1. Dilip Banda ChougaleA/p,Shiye,Tal-Karveer, Dist.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Shri Panchganga Nagari Sah pat Sanstha Maryadit, Shiye Through - Secretary, Kumar Baburao IngawaleA/p.Shiye, Tal.Karveer, Dist.Kolhapur.2. Shri.Panchganga Nagari Sah Pat Sanstha Branch-Shiroli.Shiroli. M.I.D.C,Tal-Hatkanangale.Kolhapur3. Tanaji Pilu Shinde.A/P-Shiye, Tal- karveer.Kolhapur, 4. Sopan Shripati parit.A/P-Shiye, Tal- karveer.Kolhapur, 5. Sarjerao Ganpati Patil.A/P-Shiye, Tal- karveer.Kolhapur, 6. Jaganath Mahadev Bugale.A/P-Shiye, Tal- karveer.Kolhapur, 7. Balkrishan Maruti Jadhav.A/P-Shiye, Tal- karveer.Kolhapur, 8. Bajirao Yeshwant Patil.A/P-Shiye, Tal- karveer.Kolhapur, 9. Kashinath Bhau Kambale.A/P-Shiye, Tal- karveer.Kolhapur, 10. Balaso Yeshwant Shinde.A/P-Shiye, Tal- karveer.Kolhapur, 11. Mangu Biru Shisal.A/P-Shiye, Tal- karveer.Kolhapur, 12. Shivaji Ramu Chougale.A/P-Shiye, Tal- karveer.Kolhapur, 13. Sou.Sushila Jaysing IngawleA/P-Shiye, Tal- karveer.Kolhapur, ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBER
PRESENT :Adv.H.P.Randive for the complainant

Dated : 24 Dec 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.24.12.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला गैरहजर आहेत.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           यातील तक्रारदारांनी स्‍वत:चे व आपले कुटुंबियांचे नांवे सामनेवाला पतसंस्‍थेकडे दामदुप्‍पट व दामतिप्‍पट ठेवीच्‍या स्‍वरुपात रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
मुदतपूर्ण रक्‍कम
1.
56
20000/-
12.06.2001
12.12.2008
60000/-
2.
77
20000/-
12.06.2001
02.12.2008
60000/-
3.
24
15000/-
16.08.2003
16.12.2008
30000/-
4.
25
15000/-
16.08.2003
16.12.2008
30000/-
5.
81
15000/-
16.08.2003
16.12.2008
30000/-
6.
82
15000/-
16.08.2003
16.12.2008
30000/-
7.
83
11000/-
09.03.2004
09.07.2009
22000/-

 
(3)        सदर ठेवींची मुदत संपल्‍यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे रक्‍कमांची वारंवार मागणी केली आहे. तक्रारदारानी सदर रक्‍कमां त्‍यांना भविष्‍यात लागणा-या गरजा पूर्ण करणेकरिता ठेवलेल्‍या होत्‍या व आहेत. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्‍कमा देण्‍यास टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रारदारांनी दि.30.08.2010 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्‍याजासह ठेवींच्‍या रक्‍कमांची मागणी केली. तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍याव वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(5)        सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍याठेव पावत्‍या मान्‍य केलेल्‍या आहे. तथापि तक्रारीतील उर्वरित कथने नाकारली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, सामनेवाला संस्‍था ही आर्थिक अडचणीत आलेने सहाय्यक निबंधक, सहकारी संस्‍था, ता.करवीर यांनी दि.08.06.2009 रोजी प्रस्‍तुतची संस्‍था विसर्जित केलेचे आदेश पारीत केले होते. सदर आदेशाने संस्‍था विसर्जित झाली असती तर ठेवीदारांच्‍या ठेवी कदापी मिळाल्‍या नसत्‍या अगर मिळणेस अडचणी निर्माण झाल्‍या असत्‍या. ते होवू नये म्‍हणून सध्‍याचे संचालक मंडळ यांनी ठेवीदारांच्‍या ठेवी परत मिळवून देणेचे एकमेव उद्देशाने उपनिबंधक यांना वारंवार विनंत्‍या करुन सदरचा आदेश रद्द करुन घेवून संस्‍थेचा कार्यभार स्विकारला आहे व ठेवीदारांना जसजशी वसूली होईल तसतशी रक्‍कम अदा करीत आहे. त्‍यामुळे प्रस्‍तुत सामनेवाला संस्‍थेच्‍या संचालकाना जबाबदार धरता येणार नाही. तसेच, प्रस्‍तुत संचालक मंडळ हे शासनाकडून ठेव पॅकेज मिळवून ठेवीदारांना त्‍यांच्‍या रक्‍कम अदा करता याव्‍यात याकरिता कसोशीने प्रयत्‍न करीत आहेत. सबब, सामनेवाला संस्‍थेच्‍या संचालकांना जबाबदारीतून मुक्‍त करणेत यावे व जसजशी रक्‍कम वसुल होईल तसतशी रक्‍कम अदा करणेस सामनेवाला संस्‍थेस सवलत मिळावी अशी विनंती केली आहे.  
 
(6)        प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्‍लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्‍थेमध्‍ये ठेव रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत; सदर ठेव पावत्‍यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्‍थेमध्‍ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्‍कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्‍कमांच्‍या मुदती संपून गेलेल्‍या आहेत व सदर रक्‍कमांची तक्रारदारांनी व्‍याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टीप्रित्‍यर्थ कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. तसेच, त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यातील कथनांचा तक्रारदारांच्‍या तक्रारींशी कोणताही दुरान्‍वयेदेखील संबंध नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  तक्रारदारांच्‍या व्‍याजासह ठेव रक्‍कमा सामनेवाला यांनी न देवून त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा देण्‍याची सामनेवाला क्र. 2 ते 13 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.1 हे संस्‍थेचे कर्मचारी असल्‍याने त्‍यांची केवळ संयुक्तिक‍ जबाबदारी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
 
(7)        तक्रारदारांच्‍या तक्रारींचे व उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदार-दिलीप बंडा चौगले यांचेव्‍यतिरिक्‍त त्‍यांचे कुटुंबातील अन्‍य सदस्‍यांच्‍या नांवेही ठेव पावत्‍या असल्‍याचे दिसून येते. तथापि, इतर ठेवीदार हे तक्रारदार म्‍हणून प्रस्‍तुत कामी सामिल नाहीत. प्रस्‍तुत तक्रारदारांना इतर ठेवीदारांच्‍या ठेव रक्‍कमा मागणीबाबत वैध स्थिती (Locus-standi)येत नाही.  त्‍यामुळे तक्रारदारांना इतर ठेवीदारांच्‍या ठेव रक्‍कमांची मागणी करता येणार नाही. सबब, तक्रारदार-दिलीप बंडा चौगले हे केवळ त्‍यांचे नांवे असलेल्‍याच ठेव पावत्‍यांच्‍या रक्‍कमा व्‍याजासह मिळणेस प्रस्‍तुतचे तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. 
 
(8)        तक्रारदार-दिलीप बंडा चौगले यांच्‍या नांवे असलेल्‍या ठेव पावत्‍यांचे अवलोकन केले असता ठेव पावती क्र.56 व 83 या अनुक्रमे दामतिप्‍पट व दामदुप्‍पट ठेवींच्‍या असून त्‍यांच्‍या मुदती संपलेल्‍या आहेत असे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे दाम‍तिप्‍पट व दामदुप्‍पट ठेव पावत्‍यांवरील मुदतपूर्ण रक्‍कमा मुदत संपलेल्‍या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(9)        तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
 
(1)   तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला क्र.2 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.1 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील दामतिप्‍पट व दामदुप्‍पट रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर कोष्‍टकात नमूद तारखांपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
देय मुदतपूर्ण रक्‍कम
व्‍याजदेय तारीख
1.
56
60000/-
12.12.2008
2.
83
22000/-
09.07.2009

 (3)   सामनेवाला क्र.2 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.1 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT