PRUTHVIRAJ MURLIDHAR NIMBALKAR filed a consumer case on 06 Jan 2015 against SHRI NISHNAIDEVI NAGRI SAHKARI PATHSANSTHA in the Satara Consumer Court. The case no is CC/14/70 and the judgment uploaded on 08 Sep 2015.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 70/2014.
तक्रार दाखल दि.2-06-2014.
तक्रार निकाली दि.6-1-2015.
श्री.पृथ्वीराजे मुरलीधर निंबाळकर,
रा.मु.पो.आदर्की खुर्द, ता.फलटण,
जि.सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
1. श्री.निष्णाईदेवी नागरी सह.पतसंस्था मर्या.
आदर्की खुर्द, ता.फलटण, जि.सातारा.
2. श्री.दिवाकर आप्पासो.निंबाळकर-
संस्थापक-चेअरमन.
3. श्री.दत्तात्रय सिताराम निंबाळकर, संचालक.
4. श्री.जितेंद्र हरिभाऊ निंबाळकर, संचालक.
5. श्री.सुनिल संपतराव निंबाळकर, संचालक.
6. कल्पना संपतराव निंबाळकर, संचालिका.
7. श्री.शिवाजी रामचंद्र शिंदे, संचालक.
8. श्री.नामदेव बळिबा बिचुकले, संचालक.
9. श्री.हिंदुराव नारायण जाधव,संचालक.
10. श्री.नवनाथ भानुदास निंबाळकर, संचालक.
11. श्री.गणेश संपतराव निंबाळकर, संचालक.
12. श्री.अनिल हरिभाऊ जाधव, संचालक.
13. शैला भिमराव काकडे, संचालिका.
14. श्री.हिंदुराव बापूराव चव्हाण, संचालक.
15. श्री.विष्णू विठ्ठल शिंदे, व्यवस्थापक,
सर्व रा. आदर्की खुर्द, ता.फलटण, जि.सातारा. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.के.सी.खराडे.
जाबदार क्र.1 ते 15– एकतर्फा.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला
1. तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे आदर्की खुर्द, ता.फलटण, जि.सातारा येथील रहिवासी आहेत. तक्रारदाराने जाबदार पतसंस्थेत खालील कोष्टकात नमूद केलेप्रमाणे मुदतठेव योजनेत रक्कम गुंतवली होती व आहे-
अ.क्र. | पावती क्र. | ठेव ठेवलेची तारीख. | ठेवीची रक्कम रु. | मुदत संपलेची तारीख |
1 | 2389 | 31-5-2012 | 5,00,000/- | 31-5-2019 |
2 | 2390 | 31-5-2012 | 5,00,000/- | 31-5-2019 |
वर नमूद ठेवपावत्यांची मुदत अदयाप संपलेली नाही परंतु तक्रारदाराचे वडिलांचे आजारपणासाठी व त्यांचे अन्य कौटुंबिक गरजांसाठीही प्रस्तुत ठेवीच्या रकमेची अत्यंत आवश्यकता होती व आहे. त्यामुळे तक्रारदारांनी वारंवार जाबदारांकडे जाऊन सदर रकमांची मागणी केली असता मुदत संपली नाही, आज देतो, उदया देतो अशी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत व रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी नि.28-2-2014 रोजी वकीलांमार्फत नोटीस देऊन सदरची रक्कम परत करणेबाबत कळविले असता जाबदार 2 ने जाणीवपूर्वक नोटीस स्विकारली नाही तर इतर जाबदारांनी नोटीस स्विकारुनही नोटीसीतील मागणीनुसार रक्कम तक्रारदाराना अदा केलेली नाही व नोटिसीला उत्तरही दिलेले नाही, त्यामुळे तक्रारदाराने रक्कम परत न दिल्याने तक्रारदाराला दिल्या जाणा-या सेवेत कमतरता केली आहे. सबब प्रस्तुत जाबदारांकडून प्रस्तुत ठेवीची रक्कम व्याजासह परत मिळणेसाठी तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदारांकडून ठेवपावत्यांची रक्कम रु.10,00,000/- (रु.दहा लाख मात्र) द.सा.द.शे.10 टक्के व्याजदराने वसूल होऊन मिळावेत, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- जाबदाराकडून मिळावेत तसेच अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.20,000/- जाबदाराकडून वसूल होऊन मिळावेत अशी विनंती केली आहे.
3. तक्रारदारांनी सदर कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते नि.5/3 कडे अनुक्रमे मूळ ठेवपावत्या, तक्रारदाराने जाबदारास पाठवलेली नोटीस, तक्रारदाराने जाबदार 1 याना पाठवलेल्या नोटीसीचा त्यांनी नोटीस नाकारलेमुळे परत आलेला लखोटा व इतर जाबदारांच्या नोटीसच्या पोहोचपावत्या, नि.9 चे कागदयादीसोबत जाबदार पतसंस्थेच्या संचालक मंडळाची यादी, नि.11 ते नि.23 कडे जाबदाराने तक्रारअर्जाची नोटीस स्विकारली नसल्यामुळे पोस्टाच्या शे-याने परत आलेले नोटीसीचे लखोटे, नि.24 व नि.25 कडे जाबदार क्र.6 व 7 यानी नोटीस स्विकारलेल्या पोहोचपावत्या, नि.26 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.26/अ कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि.27 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने सदर कामी दाखल केलेली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदारांना तक्रारअर्जाची नोटीस बजावणी होऊनही ते मंचात हजर राहिलेले नाहीत अगर तक्रारअर्जातील कथन खोडून काढणेसाठी कोणतेही म्हणणे दाखल केलेले नाही. सबब जाबदार क्र.1 ते 15 विरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारित करणेत आला आहे.
5. वर नमूद तक्रारदारानी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन सदर तक्रारीचे निराकरणार्थ मे.मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदारांनी तक्रारदाराना सदोष सेवा पुरवली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? शेवटी नमूद केलेप्रमाणे.
विवेचन मुद्दा क्र.1 व 2-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदारांनी परि.1 मध्ये नमूद कोष्टकाप्रमाणे मुदतठेव योजनेत जाबदार पतसंस्थेत रक्कम गुंतवली होती व आहे. ही बाब तक्रारदाराने नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 कडे दाखल केलेल्या मूळ ठेवपावत्यांवरुन सिध्द होते. तसेच तक्रारदाराने ठेवीची रक्म मागणी करणेसाठी जाबदाराना नोटीस पाठवलेचे नि.5/2 कडील नोटीसची स्थळप्रत व नि.5/3 ते 5/6 कडे दाखल नोटसीच्या पोहोचपावत्यांवरुन सिध्द होते. तक्रारदाराने मुदतपूर्व ठेवी त्यांच्या गरजेसाठी आवश्यक असल्यामुळे जाबदारांकडे परत मागितल्या होत्या, परंतु जाबदारांनी प्रस्तुत ठेवींची रक्कम तक्रारदाराना अदा करणेस टाळाटाळ केली व नकार दिला आहे, त्यामुळे तक्रारदाराना जाबदाराने सदोष सेवा दिली असल्याचे निर्विवाद सत्य आहे कारण जाबदाराने प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस मिळूनही त्यांनी मंचात हजर राहून तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब तक्रारदाराचे तक्रारीतील सर्व मजकूर जाबदाराना मान्य आहे असे आमचे स्पष्ट मत आहे.
सबब जाबदारानी तक्रारदाराना सदोष सेवा दिली असल्याचे आमचे मत आहे. वास्तविक जाबदारांनी तक्रारदारांना जरी त्यांचे ठेवपावत्यांची मुदत संपलेली नसली तरी मुदतपूर्व ठेव पावत्या मोडताना जे नियमाप्रमाणे व्याज दयावे लागते ते या संस्थेच्या नियमाप्रमाणे होणारे व्याजासह तक्रारदाराना रक्कम परत अदा करणे आवश्यक होते, परंतु जाबदारानी तसे केलेले नाही. सबब प्रस्तुत कामातील जाबदार क्र.1 ते 15 यांना सदर तक्रारदारांची ठेवपावत्यांची सर्व रक्कम मुदतपूर्व ठेवपावत्यांव्र संस्थेच्या नियमाप्रमाणे होणा-या व्याजासह अदा करणेसाठी Co-operative corporate veil प्रमाणे वैयक्तिक व संयुक्तीकरित्या जबाबदार धरणे न्यायोचित होणार आहे.
7. सबब आम्ही प्रस्तुत कामी खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-
आदेश
1. तक्रारदारांची खालील नमूद ठेवीची रक्कम तक्रारदाराना अदा करणेसाठी जाबदार क्र.1 ते 15 यांना वैयक्तिक व संयुक्तीकरित्या जबाबदार धरणेत येते.
अ.क्र. | पावती क्र. | ठेव ठेवलेची तारीख. | ठेवीची रक्कम रु. | मुदत संपलेची तारीख |
1 | 2389 | 31-5-2012 | 5,00,000/- | 31-5-2019 |
2 | 2390 | 31-5-2012 | 5,00,000/- | 31-5-2019 |
जाबदार क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या सदर ठेवीच्या रकमा मुदतपूर्व ठेवीवरील संस्थेच्या नियमाप्रमाणे होणारे व्याजासह तक्रारदारास अदा कराव्यात.
2. तक्रारदाराना जाबदार क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- अदा करावेत.
3. तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- तक्रारदाराना जाबदार क्र.1 ते 15 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अदा करावेत.
4. वरील आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाचे आत करावे.
5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
6. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि.6-1-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.