सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ. सविता भोसले, अध्यक्षा
मा. श्री.श्रीकांत कुंभार, सदस्य.
मा. सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 62/2015
तक्रार दाखल दि.04-04-2015.
तक्रार निकाली दि.20-07-2015.
1. श्री. मुस्लीमभाई जंगूभाई आतार,
2. सौ. रशिदा मुस्लीमभाई आतार,
दोघे रा. वाठार स्टेशन, ता.कोरेगांव, जि.सातारा .... तक्रारदार.
विरुध्द
1. श्री. निष्णाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.लि.,आदर्की खुर्द
तर्फे चेअरमन, दिवाकर आप्पासाहेब निंबाळकर,
2. चेअरमन, दिवाकर आप्पासाहेब निंबाळकर,
3. संचालक, श्री.जितेंद्र हरिभाऊ निंबाळकर,
4. संचालक, श्री. दत्तात्रय सिताराम निंबाळकर,
सर्व रा. आदर्की खुर्द, ता.फलटण, जि.सातारा. ... जाबदार.
....तक्रारदारतर्फे (अँड.ए.आर.कदम)
....जाबदार क्र.1 ते 4 तर्फे (एकतर्फा)
-ः न्यायनिर्णय ः-
(मा.सौ.सविता भोसले, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारित केला.)
1. तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारदारांचे तक्रार अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे वाठार स्टेशन, ता. कोरेगांव येथील कायमस्वरुपी रहिवाशी असून त्यांनी जाबदार पतसंस्थेत खाली कोष्टकात नमूद केलेप्रमाणे मुदत ठेव स्वरुपात रक्कम गुंतविली होती व आहे.
अनं | ठेवपावती क्रमांक | ठेव रक्कम | ठेव ठेवलेची तारीख | ठेवीची मुदत संपलेची तारीख |
1. | 2154 | 50,000/- | 06/01/2011 | 06/01/2013 |
2 | 2222 | 50,000/- | 06/07/2011 | 06/10/2013 |
3 | 2402 | 50,000/- | 12/12/2012 | 23/12/2013 |
4 | 2492 | 90,000/- | 11/05/2013 | 11/05/2014 |
| एकूण रु. | 2,40,000/- | | |
वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदार यांनी जाबदार पतसंस्थेत एकूण रक्कम रु.2,40,000/- मुदत ठेवीच्या स्वरुपात रक्कम गुंतविली होती व आहे. प्रस्तुत सर्व ठेवपावत्यांची मुदत संपलेनंतर तक्रारदार यांनी प्रस्तुत ठेवीच्या रकमेची व्याजासह जाबदार यांचेकडे वारंवार मागणी केली असता जाबदार यांनी तक्रारदार यांची रक्कम परत देणेस टाळाटाळ केली व ठेवीची रक्कम तक्रारदाराला परत अदा केली नाही. त्यामुळे तक्रारदाराने जाबदार यांचेकडून सदर नमूद ठेवींची व्याजासह रक्कम वसूल होवून मिळणेसाठी सदरचा तक्रार अर्ज मे मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुत कामी तक्रारदाराने जाबदार यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार यांना एकूण ठेवीची रक्कम रु.2,40,000/- व्याजासह एक महिनेच्या आत परत मिळावेत, प्रस्तुत रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 15 टक्के व्याजदराने होणारी रक्कम जाबदाराने तक्रारदार यांना अदा करावी, मानसिक,शाररिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- जाबदाराने तक्रारदार यांना द्यावेत, तसेच तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.20,000/- जाबदाराकडून मिळावा अशी विनंती केली आहे.
3. तक्रारदार यांनी प्रस्तुत कामी नि. 4 सोबत, नि.4/1 कडे (4) ठेवपावत्यांच्या तक्रारदाराचे वकीलांनी व्हेरीफाय केलेल्या ठेवपावत्या, नि.4/2 कडे तक्रारदारांनी पोलीस स्टेशनकडे दिले अर्जाची स्थळप्रत, तक्रारदार यांनी सहा.निबंधक यांना दिले अर्जाची सत्यप्रत, तक्रारदारांनी तहशिलदार फलटण यांना दिले अर्जाची सत्यप्रत, तक्रारदार यांनी जिल्हा उपनिबंधक, सातारा यांना दिले अर्जाची सत्यप्रत, तक्रारदारांनी जिल्हाधिकारी सातारा यांना दिले अर्जाची सत्यप्रत, नि.10 कडे सदर तक्रार अर्ज, त्यातील कथने व सोबतचे अँफीडेव्हीट, व त्यामधील मजकूर हाच सदर तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तीवाद समजणेत यावा म्हणून पुरसीस दाखल केली आहे. याव्यतिरिक्त तक्रारदारास कोणताही जादा पुरावा देणेचा नाही असे पुरसिसमध्ये कथन आहे.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 ते 4 यांना नोटीस लागूनही ते मे. मंचात गैरहजर राहीले त्यांचे त्यांनी तक्रारअर्जास म्हणणेही दाखल केलेले नाही सबब जाबदार क्र.1 ते 4 यांचेविरुध्द नि. 1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेले आहेत. सबब तक्रारदाराने तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही.
5. वर नमूद तक्रारदाराने दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ खालील मुद्दयांचा विचार केला.
अ.नं. मुद्दा उत्तर
1- तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत का?- होय.
2- जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा
पुरविली आहे काय?- होय.
3- अंतिम आदेश? खालील आदेशात
नमूद केलेप्रमाणे.
विवेचन -
1. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- प्रस्तुत तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 पतसंस्थेत खालील कोष्टकात नमूद केलेप्रमाणे मुदत ठेव योजनेत रक्कम गुंतविली होती व आहे.
अनं | ठेवपावती क्रमांक | ठेव रक्कम | ठेव ठेवलेची तारीख | ठेवीची मुदत संपलेची तारीख |
1. | 2154 | 50,000/- | 06/01/2011 | 06/01/2013 |
2 | 2222 | 50,000/- | 06/07/2011 | 06/10/2013 |
3 | 2402 | 50,000/- | 12/12/2012 | 23/12/2013 |
4 | 2492 | 90,000/- | 11/05/2013 | 11/05/2014 |
| एकूण रु. | 2,40,000/- | | |
प्रस्तुत कोष्टकात नमूद ठेवपावत्यांच्या तक्रारदाराने वकीलांनी व्हेरिफाय केलेल्या चार ठेवपावत्या नि. 4/1 कडे दाखल केल्या आहेत. म्हणजेच तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत हे निर्विवाद सत्य आहे. तसेच जाबदार क्र. 1 ते 4 यांना नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर राहिलेले नाहीत तसेच म्हणणे दाखल केलेले नाही. त्यामुळे जाबदार क्र. 1 ते 4 यांनी तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही म्हणजे जाबदार कं. 2 ते 4 हे जाबदार क्र. 1 पतसंस्थेचे अनुक्रमे चेअरमन व संचालक आहेत हे गृहीत धरणे न्यायोचीत होणार आहे. त्यामुळे सदर जाबदार क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदाराचे ठेवीची मुदत संपलेनंतर तक्रारदाराने ठेवीच्या रकमेची व्याजासह मागणी सदर जाबदार यांचेकडे केली असता प्रस्तुत जाबदार क्र. 1 ते 4 यांनी ठेवीची रक्कम तक्रारदाराला अदा करणेस टाळाटाळ केली व रक्कम अदा केली नाही ही सेवेतील त्रुटीच आहे. सबब जाबदाराने तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
वर नमूद कागदपत्रे पाहता तक्रारदार यांचे नमूद सर्व ठेवींची व्याजासह रक्कम देणेसाठी जाबदार क्र.1 ते 4 यांना वैयक्तिक व संयुक्तिकरित्या Co-operative Corporate Veil नुसार जबाबदार धरणे न्यायोचीत होणार आहे. प्रस्तुत बाबतीत आम्ही मे. मुंबई उच्च न्यायालयाच्या रिटपिटीशन नं. 117/2011 मंदाताई संभाजी पवार वि स्टेट ऑफ महाराष्ट्र या न्यायनिवाडयाचा व त्यातील दंडकाचा आधार घेतला आहे. सबब प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 ते 4 यांनी वैयक्तीक व संयुक्तिकपणे वर नमूद कोष्टकातील मुदत ठेवपावतींवरील ठेवीची एकूण रक्कम रु.2,40,000/- (रुपये दोन लाख चाळीस हजार फक्त) मुदतठेवींची व्याजासह रक्कम अदा करणेसाठी जबाबदार धरणेत येते.
सबब प्रस्तुत कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश करणेत येतो.
-ः आदेश ः-
1. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2. तक्रारदार यांना जाबदार क्र. 1 ते 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या खालील कोष्टकात नमूद ठेवींची रक्कम त्या-त्या ठेवपावतींवरील नमूद व्याजदाराने व्याजासह अदा करणेसाठी जबाबदार धरणेत येते.
अनं | ठेवपावती क्रमांक | ठेव रक्कम | ठेव ठेवलेची तारीख | ठेवीची मुदत संपलेची तारीख |
1. | 2154 | 50,000/- | 06/01/2011 | 06/01/2013 |
2 | 2222 | 50,000/- | 06/07/2011 | 06/10/2013 |
3 | 2402 | 50,000/- | 12/12/2012 | 23/12/2013 |
4 | 2492 | 90,000/- | 11/05/2013 | 11/05/2014 |
| एकूण रु. | 2,40,000/- | | |
3. जाबदार क्र. 1 ते 4 यांनी वैयक्तीकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदाराचे वर नमूद कोष्टकातील ठेवींची सर्व रक्कम त्या ठेवपावतीवरील नमूद व्याजादराने होणा-या व्याजासह अदा करावी.
4. प्रस्तुत ठेवपावतींच्या व्याजासह सर्व रकमेवर ठेवपावत्यांची मुदत संपले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत सदर रकमेवर द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने होणारे व्याज जाबदार क्र. 1 ते 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना अदा करावी.
5. तक्रारदार यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम व तक्रार अर्जाचा खर्च
म्हणून रक्कम रु.10,000/-(रुपये दहा हजार फक्त) जाबदार क्र. 1 ते 4
यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना अदा करावी.
6. वरील सर्व आदेशाचे पालन जाबदार क्र. 1 ते 4 यांनी आदेश पारीत
तारखेपासून 45 दिवसांचे आत करावे.
7. आदेशाची पूर्तता विहीत मुदतीत न केलेने तक्रारदाराला ग्राहक संरक्षण
कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची मुभा
राहील.
8. पस्तुत आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य द्याव्यात.
9. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि.20-07-2015
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.