नि.22 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 191/2010 नोंदणी तारीख – 11/08/2010 निकाल तारीख – 29/10/2010 निकाल कालावधी – 78 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ सौ उषा नामदेव शिंदे रा.मु.पो. खेड, ता.जि. सातारा सध्या रा.मु.पो. पाली ता.कराड जि. सातारा तर्फे मुखत्यार सौ वैशाली नारायण क्षीरसागर रा. 25, अक्षयकृपा सोसायटी, कृष्णानगर, सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री आनंद कदम) विरुध्द 1. श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गोरखपूर (पिरवाडी), ता.जि.सातारा तर्फे चेअरमन दत्तात्रय केशव उत्तेकर 2. माजी चेअरमन, दत्तात्रय केशव उत्तेकर श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गोरखपूर (पिरवाडी), ता.जि.सातारा 3. माजी व्हा.चेअरमन सुरेश संपत पवार श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गोरखपूर (पिरवाडी), ता.जि.सातारा 4. चेअरमन, राजेंद्रकुमार विष्णू काकडे श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गोरखपूर (पिरवाडी), ता.जि.सातारा 5. व्हा.चेअरमन, सुभाष रघुनाथ देसाई श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गोरखपूर (पिरवाडी), ता.जि.सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री अजित चॉंद पठाण) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेत रक्कम रु.5,000/- मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेली होती. सदरच्या ठेवीची मुदत संपलेनंतर जाबदार यांनी सदर ठेवपावतीची मुदत दि.2/12/2007 पर्यंत वाढवून दिली होती. तसेच अर्जदार यांचे जाबदार संस्थेतील बचत खात्यामध्ये काही रक्कम शिल्लक आहे. ठेवीची मुदत संपल्यानंतर अर्जदार यांनी ठेव रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम परत दिली नाही. सबब ठेव रक्कम व्याजासह मिळावी, बचत खात्यातील रक्कम मिळावी तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र.1, 4 व 5 यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होऊनही ते नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. जाबदार क्र.2 व 3 यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.18 कडे दाखल करुन अर्जदारची तक्रार नाकारली आहे. जाबदारचे कथनानुसार संस्थेच्या नावाचे समन्सची बजावणी जाबदार क्र.2 यांचे नावावर चेअरमन या नात्याने केली आहे. परंतु जाबदार क्र.2 म्हणून त्यांचेच नाव माजी चेअरमन म्हणून नमूद केले आहे. हा विरोधाभास आहे. तसेच जाबदार क्र.3 यांना माजी चेअरमन म्हणून सामील केले आहे. जाबदार क्र.4 व 5 हे चेअरमन व व्हा.चेअरमन म्हणून काम करीत असताना प्रस्तुत जाबदार यांना का सामील केले आहे हे अनाकलनीय आहे. अर्जदार यांनी जाबदार क्र.2 व 3 यांचेकडे वैयक्तिक ठेव ठेवलेली नाही. अर्जदार यांनी ठेव ठेवली त्यावेळी सदरचे जाबदार हे चेअरमन व व्हा.चेअरमन नव्हते व आजही ते नाहीत. त्यामुळे त्यांना वगळणेत यावे असे जाबदार यांनी कथन केले आहे. 4. अर्जदारतर्फे नि.21 कडील पुरसिस पाहिली तसेच जाबदार क्र.2 व 3 यांचे विधित्याचा युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदार व जाबदार यांची दाखल कागदपत्रे पाहणेत आली. 5. जाबदार क्र.2 व 3 यांनी नि.18 कडे म्हणणे दाखल केले आहे व अर्जदारची तक्रार नाकारली आहे. जाबदार यांनी अनेक मुद्यांसोबत अर्जदार यांनी जाबदारचे समन्स जाबदार क्र.2 वरती बजावले आहे व पुढे जाबदार नं.2 वरती जाबदार क्र.2 यांना माजी चेअरमन म्हणून सामील केले आहे हे चुकीचे आहे असा मुद्दा उपस्थित केला आहे. सबब नि.1 पाहता जाबदार क्र.1 श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या.गोरखपूर (पीरवाडी) ता.जि.सातारा (सदर संस्थेचे समन्स चेअरमन दत्तात्रय केशव उत्तेकर यांचेवर बजावणेत यावे) असे आहे व जाबदार क्र.2 माजी चेअरमन दत्तात्रय केशव उत्तेकर श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. असे आहे. 6. नियमानुसार संस्थेच्या समन्सची बजावणी कायद्यानुसर योग्य प्रकारेच होणे आवश्यक आहे. संस्थेच्या समन्सची बजावणी अर्जदारने दत्तात्रय केशव उत्तेकर यांचेवरती केली आहे व अर्जदारच दत्तात्रय केशव उत्तेकर हे माजी चेअरमन आहेत असे कथन करतात. सबब माजी चेअरमन यांचेवरती संस्थेच्या समन्सची झालेली बजावणी कायद्यानुसार योग्य नाही. सबब संस्थेवरती समन्सची बजावणी योग्य प्रकारे झाली नाही. तक्रारीचे निष्कर्षापर्यंत येणेसाठी सर्व सामील जाबदार यांना कायद्यानुसार व नियमानुसार समन्सची बजावणी योग्य प्रकारे होणे आवश्यक आहे व त्यानंतरच मे. मंचाने पुढील निष्कर्षापर्यंत येणे न्याय होणार आहे. सबब अशा परिस्थितीत सदर तक्रार निकाली काढणेत यावी या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 7. सबब आदेश. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज निकाली काढणेत येत आहे. 2. खर्चाबाबत आदेश नाही. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 29/10/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |