Maharashtra

Satara

CC/10/175

Shri Dynandev Tukaram Salunke - Complainant(s)

Versus

Shri Naresh Kankariya Div Manager The Oriantal Insurance Co Ltd - Opp.Party(s)

Adv Swati Jadhav

29 Sep 2010

ORDER


ReportsDistrict Consumer disputes redressal Forum Satara Near Cooperative Court Sadara Bazar Satara-415001
CONSUMER CASE NO. 10 of 175
1. Shri Dynandev Tukaram SalunkeA/P morawale Tal Jawali SataraMaharashtra ...........Appellant(s)

Vs.
1. Shri Naresh Kankariya Div Manager The Oriantal Insurance Co LtdVibhagiya Karyalay No 1-15 K D Complex, 1 st Floor mount road Sadar NagpurNagpurMaharashtra ...........Respondent(s)


For the Appellant :Adv Swati Jadhav, Advocate for
For the Respondent :

Dated : 29 Sep 2010
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

                                                            नि.21
मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर
                                          तक्रार क्र. 175/2010
                                          नोंदणी तारीख – 26/7/2010
                                          निकाल तारीख – 29/9/2010
                                          निकाल कालावधी – 63 दिवस
श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्‍यक्ष
श्री सुनिल कापसे, सदस्‍य
 
 (श्री सुनिल कापसे, सदस्‍य यांनी न्‍यायनिर्णय पारीत केला)
------------------------------------------------------------------------------------
 
श्री ज्ञानदेव तुकाराम साळुंखे
रा.मु.पो. मोरावळे, ता.जावली                         ----- अर्जदार
                                            ( वकील स्‍वाती जाधव )
      विरुध्‍द
1. श्री नरेश कांकरिया, डीव्‍हीजनल मॅनेजर,
    दी ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कं.लि.
    विभागीय कार्यालय, 1-15, ए.डी.कॉम्‍प्‍लेक्‍स,
    पहिला मजला, माऊंट रोड, सदर,
    नागपूर – 01
2. श्री के.एस.गाडेकर, डीव्‍हीजनल मॅनेजर,
    दी ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कं.लि.
    एल.आय.सी. बिल्‍डींग,
    जिल्‍हाधिकारी ऑफिससमोर, सातारा
    ता.जि.सातारा  
3. सी.यजूलू राव
    मुख्‍य कार्यकारी अधिकारी,
    मे.जाईका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज प्रा.लि.
    दुसरा मजला, जाईका बिल्‍डींग कमर्शियल रोड,
    सिव्‍हील लाईन्‍स, नागपूर-440 001
4. डॉ एस.एस. कुचेवार
    मुख्‍य कार्यकारी अधिकारी,
    महाराष्‍ट्र लाईव्‍हस्‍टॉक बोर्ड, प्रतिष्‍ठाण बंगलो,
    डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ, कृषीनगर,
    अकोला – 444104                         ----- जाबदार क्र.1 व 2                                                   (वकील श्री कालीदास माने)
 
न्‍यायनिर्णय
 
    अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्‍यात खालीलप्रमाणे -
1.     अर्जदार ही मौजे मोरावळे ता.जावली येथील कायमचे रहिवासी आहे.   अर्जदार यांचा शेती हा व्‍यवसाय असून त्‍याला पूरक दुग्‍ध व्‍यवसाय आहे. अर्जदार यांनी त्‍यांचे मालकीच्‍या जर्सी गायीचा विमा जाबदार यांचेकडे उतरविला आहे. सदरचे पॉलिसीचे कालावधीत अर्जदार यांची संबंधीत गाय दि. 24/4/2008 रोजी आजारी पडली. तिचेवर औषधोपचार चालू असताना दि. 28/4/2008 रोजी ती मरण पावली. तदनंतर जाबदार यांचे सूचनेप्रमाणे मृत गायीचे शवविच्‍छेदन करण्‍यात आले. सदर गायीचे नुकसानीपोटी भरपाई मिळावी म्‍हणून अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे विमा दावा प्रस्‍ताव गायीचे कानातील बिल्‍ला व आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसोबत दाखल केला. परंतु जाबदार यांनी बिल्‍ला नवा असल्‍याचे तसेच कानाच्‍या तुकडयासह बिल्‍ला सादर न केल्‍याचे कारण दाखवून अर्जदार यांचा विमादावा नामंजूर केला. सबब गायीचे नुकसान भरपाईपोटी विमा दावा रक्‍कम रु.20,000/- व्‍याजासह मिळावेत, मानसिक, शारिरिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम मिळावी म्‍हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे.
2.    जाबदार क्र.1 व 2 यांनी नि.14 कडे म्‍हणणे देऊन तक्रार नाकारली आहे. जाबदार यांचे कथनानुसार महाराष्‍ट्र शासनाचे महाराष्‍ट्र लाईव्‍हस्‍टॉक डेव्‍हलपमेंट बोर्ड, अकोला यांनी व जाईका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज प्रा.लि. यांचेबरोबर जाबदार यांनी समझोता करार केला असून सदरचे करारानुसार 188 जनावरांसाठी जाबदार यांचेकडे विमा उतरविण्‍यात आला आहे. त्‍यामध्‍ये अर्जदार यांचे जनावराचा समावेश आहे. सदरचे पॉलिसीची मुलभूत अटीनुसार तसेच समझोता करारातील अट क्र.6 नुसार जर विमा उतरविलेल्‍या जनावराचा मृत्‍यू झाला तर त्‍याचे कानात बसविलेला टॅग हा intact स्‍वरुपात जाबदार यांचेकडे संबंधीत मालकाने सादर करणे आवश्‍यक आहे. सबब अर्जदारने त्‍यांचे संबंधीत जनावराचा मृत्‍यू झालेनंतर कानाच्‍या तुकडयासह टॅग जाबदार यांचेकडे सादर करणे आवश्‍यक होते. परंतु अर्जदार यांनी मृत गायीच्‍या कानातील टॅगच जाबदार यांना सादर केलेल्‍या असल्‍याने अर्जदारने पॉलिसीचे अटींचा भंग केलेला आहे. म्‍हणून जाबदार यांनी अर्जदारचा विमादावा नाकारलेला आहे. सबब जाबदार यांनी सेवा देण्‍यामध्‍ये कोणतीही त्रुटी ठेवलेली नसल्‍याने तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे.
 
3.    जाबदार क्र.3 व 4 यांना याकामी प्रस्‍तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत, तसेच त्‍यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब जाबदार क्र.3 व 4 यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आला.
4.    अर्जदारतर्फे अभियोक्‍ता श्रीमती स्‍वाती जाधव व जाबदारतर्फे वकील श्री माने यांचा युक्तिवाद ऐकला. 
 
5.    अर्जदारतर्फे दाखल करण्‍यात आलेले शपथपत्र नि. 2 ला पाहिले. अर्जदारतर्फे दाखल केलेली नि. 5 सोबतची 10 कागदपत्रे पाहिली. जाबदारतर्फे दाखल शपथपत्र नि. 15 ला पाहिले. तसेच जाबदारतर्फे दाखल नि. 16 सोबतची 5 कागदपत्रे पाहिली.
 
6.  प्रस्‍तुतचे कामी प्रामुख्‍याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्‍यांना दिलेली उत्‍तरे खालीलप्रमाणे आहेत.
           मुद्दे                                   उत्‍तरे
अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्‍यान ग्राहक व
     सेवा देणारे असे नाते आहे काय ?              होय.
ब)   जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये
     कमतरता केली आहे काय ?                          होय.
क)   अंतिम आदेश -                                 खाली दिलेल्‍या कारणास्‍तव
                                             अर्जदार यांचा तक्रारअर्ज
               अंशतः मंजूर करणेत येत
               आहे.
कारणे
7.    जाबदार यांनी त्‍यांचे कैफियतीमध्‍ये असे कथन केले आहे की, महाराष्‍ट्र शासनाचे महाराष्‍ट्र लाईव्‍हस्‍टॉक डेव्‍हलपमेंट बोर्ड, अकोला यांनी व जाईका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज प्रा.लि. यांचेबरोबर जाबदार यांनी केलेल्‍या समझोता करारातील अट क्र.6 नुसार जर विमा उतरविलेल्‍या जनावराचा मृत्‍यू झाला तर संबंधीत विमाधारकाने जाबदार यांचेकडे त्‍यांचे संबंधीत जनावराच्‍या कानाच्‍या तुकडयासह टॅग सादर करणे आवश्‍यक आहे, परंतु अर्जदार यांनी संबंधीत गायीचे कानातील टॅग हा कानाच्‍या तुकडयासह जाबदार यांना सादर केलेला नसल्‍याने अर्जदारने पॉलिसीचे अटींचा व समझोता करारातील अटीचा भंग केलेला आहे व या कारणामुळे जाबदार यांनी अर्जदारचा विमादावा नाकारलेला आहे.   परंतु अर्जदार यांनी त्‍यांचे तक्रारअर्जामध्‍ये असे कथन केले आहे की, त्‍यांनी जाबदार यांना कानाच्‍या तुकडयासह गायीचे कानातील टॅग सादर केला आहे. जाबदार क्र. 1 व 2 यांनी नि.16 सोबत अर्जदारने सादर केलेला गायीचे कानातील टॅग व जाबदार यांचे क्‍लेम नाकारलेबाबतचे पत्र नि.16/5 ला दाखल केले आहे. सदरचे पत्रामध्‍ये मृत गायीचे कानातील टॅग हा नवीन आहे, तसेच तो गायीच्‍या कानाच्‍या तुकडयासह नाही, गायीचे उपचाराबाबतचे प्रमाणपत्र व वैद्यकीय बिले अर्जदारने सादर केलेली नाहीत या कारणास्‍तव क्‍लेम नामंजूर केला आहे असे जाबदार यांनी अर्जदार यांना कळविले आहे. परंतु अर्जदारने त्‍याचे विमा उतरविलेल्‍या गायीचे मृत्‍यूनंतर तिचेच कानातील टॅग जाबदार यांना सादर केला असेल तर तो टॅग नवीन आहे किंवा जुना आहे हा मुद्दा गौण ठरतो. अर्जदार यांनी सादर केलेला टॅग हा अर्जदारचे गायीचे कानात बसविलेला टॅग नाही असे जाबदार यांचे कोठेही कथन नाही किंवा अर्जदारने सादर केलेला संबंधीत टॅग हा खोटा आहे, त्‍यावरील नंबर चुकीचा आहे असेही जाबदार यांचे कथन नाही. वरील सर्व कारणांचा विचार करता अर्जदारची विमा उतरविलेली जी गाय मरण पावली, त्‍याच गायीचे कानातील टॅग अर्जदार यांनी जाबदार यांना सादर केला आहे ही बाब स्‍पष्‍ट दिसून येते. असे असतानाही जाबदार यांनी अर्जदारचा विमा दावा नाकारलेला आहे.   सबब अर्जदार यांचा विमा दावा नाकारण्‍याची जाबदार यांची कृती ही अयोग्‍य आहे असे या मंचाचे मत आहे. 
 
8.    जाबदार यांनी त्‍यांचे नि.16/5 चे पत्रामध्‍ये असे नमूद केले आहे की, अर्जदारने ट्रीटमेंट सर्टिफिकेट व मेडिकल बिल दाखल केलेले नाही. परंतु जाबदार यांनीच नि.16/3अ ला अर्जदार यांनी त्‍यांना सादर केलेले ट्रीटमेंट सर्टिफिकेट दाखल केलेले आहे. त्‍यामुळे ट्रीटमेंट सर्टिफिकेट दाखल केले नसल्‍याचे कारण हे विश्‍वासार्ह मानता येणार नाही. तसेच अर्जदारने नि.20 सोबत मेडीकल बिले दाखल केली आहेत. तसेच गायीचे ट्रीटमेंट सर्टिफिकेट, पंचनामा, गायीचे मृत्‍यूचे प्रमाणपत्र, व कानातील टॅग इ. महत्‍वाची कागदपत्रेही सादर केलेली आहेत. त्‍यामुळे केवळ मेडीकल बिल जाबदार यांचेकडे सादर केले नाही हे कारण क्‍लेम नाकारणेसाठी योग्‍य व संयुक्तिक ठरत नाही. वरील बाबींचा विचार करता जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये त्रुटी केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
9.    जाबदार यांनी त्‍यांचे कैफियतीत असे कथन केले आहे की, पॉलिसीचे अट क्र.12अ नुसार तक्रारदार यांनी मुदतीत म्‍हणजे 12 महिन्‍यांचे आत जाबदार यांचे विरुध्‍द दाद मागितलेली नाही, सबब तक्रारअर्ज मुदतीत नाही. परंतु ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीप्रमाणे तक्रारीस कारण घडल्‍यापासून दोन वर्षाचे आत ग्राहकास या मंचाकडे दाद मागता येते. प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज अर्जदार यांनी तक्रारीस कारण घडल्‍यापासून दोन वर्षाचे आत दाखल केलेला आहे. सबब प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज मुदतीत आहे असे या मंचाचे मत आहे. जाबदार यांनी त्‍यांचे कथनाचे समर्थनार्थ वरिष्‍ठ न्‍यायालयाचा जे निवाडे याकामी दाखल केले आहेत, त्‍यातील घटनाक्रम व प्रस्‍तुत तक्रारअर्जातील घटनाक्रम हा भिन्‍न असल्‍याने सदरचे निवाडे हे प्रस्‍तुत तक्रारअर्जाचे कामी लागू होत नाहीत असेही या मंचाचे मत आहे.
 
10.   या सर्व कारणास्‍तव व वर नमूद मुद्दयांच्‍या दिलेल्‍या उत्‍तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे.
 
आदेश
 
1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज जाबदार क्र.1 व 2 यांचेविरुध्‍द अंशतः मंजूर करणेत येत
    आहे.
2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्‍या व
    संयुक्‍तरित्‍या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्‍यात.
    अ. गायीचे विमादाव्‍यापोटी रु.20,000/- द्यावेत व सदरचे रकमेवर दि.
        28/3/2009 पासून संपूर्ण रक्‍कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍केंप्रमाणे
 
        व्‍याज द्यावे.
    ब. मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 3,000/- द्यावेत.
    क. अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु. 2,000/- द्यावेत.
3. सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या न्‍यायमंचात जाहीर करणेत आला.
सातारा
दि. 29/9/2010
 
 
 
(सुनिल कापसे)                                 (विजयसिंह दि. देशमुख)
   सदस्‍य                                              अध्‍यक्ष
 
 
 

Smt. S. A. Malwade, MEMBERHONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT Mr. Sunil K Kapse, MEMBER