Maharashtra

Beed

CC/13/9

Ganpati Mahadeo Shinde - Complainant(s)

Versus

Shri Mobiel Shopi - Opp.Party(s)

11 Feb 2014

ORDER

 
Complaint Case No. CC/13/9
 
1. Ganpati Mahadeo Shinde
R/o Borkheda Ta Dist Beed
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Mobiel Shopi
Sarda Sankul DP Road Beed
Beed
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'ABLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                     निकाल
                      दिनांक- 11.02.2014
                  (द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्‍यक्ष)
            तक्रारदार गणपती महादेव शिंदे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे म्‍हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
             तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात खालील प्रमाणे,तक्रारदार हे बीड येथील रहिवासी आहेत. सामनेवाले क्र.1 हे बीड येथील नोकिया कंपनीचे मोबाईलचे अधिकृत विक्रेते व दूकानदार आहेत. सामनेवाले क्र.1 यांचे श्री. मोबाईल शॉपी बीड या नांवाचे दुकान आहे.सामनेवाले क्र.2 हे नोकिया कंपनीचे अधिकृत दूरुस्‍त केंद्र चालवतात.सामनेवाले क्र.3 हे नोकिया कंपनीची निर्मीती करतात.
            तक्रारदार यांनी सामनेवाले क्र 1 कडून नोकिया कंपनीचा हँडसेट मॉडेल नंबर C1-01 ज्‍यांचा आयएमईआय नंबर 359276045352617 चा विकत घेतला.तक्रारदार यांनी सदरील मोबाईल रक्‍कम रु.2330/- ला दि.14.3.2012 रोजी खरेदी केला. सदरील मोबाईलवर एक वर्षाची गॅरंटी व वॉरंटी दिलेली आहे. तक्रारदार यांनी दिलेले बिल पावती नंबर 131 असा आहे. सामनेवाले क्र.1 यांनी सदरील मोबाईची एक वर्षाची तोंडी व बिलाद्वारे गँरटी व वॉरंटी दिलेली आहे.तक्रारदार यांनी सदरील मोबाईल विकत घेतल्‍यानंतर सहा महिन्‍याचे आंत मोबाईल हँडसेंटचा दर्शनी भागामध्‍ये अचानक बिघाड झाला. तक्रारदार यांनी दि.27.8.2012 रोजी सामनेवाले क्र.1 यांचे दूकानात मोबाईल दूरुस्‍तीसाठी नेला. सामनेवाले क्र.1 यांनी मोबाईल दूरुस्‍त करुन देण्‍यास नकार दिला.तक्रारदार यांना सांगण्‍यात आले की,मोबाईलची दूरुस्‍ती ही मोबाईल केअर सेंटर, जालना रोड, बीड येथे केली जाते.दि.28.8.2012 रोजी तक्रारदार हे सदरील मोबाईल घेऊन सामनेवाले क्र.2 यांचेकडे दूरुस्‍तीसाठी घेऊन गेले. सामनेवाले क्र.2 यांनी गॅरंटी व वॉरंटी बिलाची पावती देऊन मोबाईल दूरुस्‍त करुन देतो असे सांगितले.अर्ध्‍या तासानंतर सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांना सदरील मोबाईल दूरुस्‍त होऊ शकत नाही असे सांगितले व परत पाठविले. सामनेवाले क्र.2 यांनी मोबाईल दूरुस्‍त करुन देण्‍यास इन्‍कार केला. दि.09.10.2012 रोजी तक्रारदार हे सामनेवाले क्र.1 याचेकडे गेले व मोबाईल दूरुस्‍ती बाबत विचारणा केली. दि.11.10.2012 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांना कायदेशीर नोटीस पाठविली. सामनेवाले क्र.1 यांनी नोटीसची दखल घेतली नाही. सामनेवाले क्र.1 व 2 यांनी मोबाईल दूरुस्‍त करुन देण्‍यास टाळाटाळ केली व सेवेत त्रूटी ठेवली आहे. तक्रारदार हे सदरील मोबाईल परत करण्‍यास तयार आहेत.सबब, तक्रारदार यांनी मोबाईची किंमत रक्‍कम रु.2330/- तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.20,000/- नोटीसचा खर्च रु.500/- तसेच तक्रारीचा खर्च रु.5,000/- असे एकूण रु.27,830/- नुकसान भरपाई सामनेवाले क्र क्र.1 ते 3 यांचेकडून संयूक्‍तीक व वैयक्‍तीक मिळावी अशी मागणी केली आहे.
            सामनेवाले क्र.1 श्री मोबाईल शॉपी हे मंचासमोर हजर झाले. त्‍यांनी नि..9 अन्‍वये लेखी कैफियत सादर केली.तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांचे दूकानातून तक्रारीत नमूद केलेला मोबाईल विकत घेतला ही बाब मान्‍य केली आहे. सामनेवाले क्र.1 याचे कथन की,तक्रारदार यांनी मोबाईल घेते वेळेस सामनेवाले क्र.1 यांनी कोणतीही लेखी वॉरंटी दिलेली नाही. सामनेवाले क्र. 1 हा केवळ मोबाईल विक्रेता आहे तसे स्‍पष्‍ट बिलामध्‍ये नमूद केलेले आहे.सदरील मोबाईलची गॅरंटी व वॉरंटी ही नोकिया केअर सेंटर यांचेकडून दिली जाते ती वॉरंटी सामनेवाले क्र.2 यांचेकडून दिलेली आहे.दूकानदाराकून मोबाईल फोनची वॉरंटी दिली जात नाही.मोबाईल मध्‍ये काही बिघाड झाल्‍यास ग्राहकाना तो मोबाईल सर्व्‍हीस सेंटरला जाऊन दूरुस्‍त करणे क्रमप्राप्‍त आहे.तक्रारदार हे सामनेवाले क्र.1 कडे सदर मोबाईल दूरुस्‍तीकामी कधीही आलेला नाही. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत कोणतीही त्रूटी ठेवली नाही. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना कोणतीही वॉरंटी अथवा गॅरंटी दिलेली नसल्‍यामुळे सदरील तक्रार सामनेवाले क्र.1 यांचे विरुध्‍द चालू शकत नाही. सबब, सामनेवाले क्र.1 यांनी सदरील तक्रार खर्चासह रदद करावी अशी मागणी केली आहे.
            सामनेवाले क्र.2 यांना नि.6 अन्‍वये रजिस्‍ट्रर पोस्‍टाने नोटीस पाठविली, सदरील नोटीस न बजावता परत आली. तदनंतर तक्रारदार यांनी नोटीस बजावणीकामी कोणतीही तजविज केली नाही. त्‍यामुळे सामनेवाले क्र.2 यांना नोटीस बजावणी करता आली नाही. सामनेवाले क्र.3 यांना नोटीस मिळूनही ते मंचासमोर हजर झाले नाही. त्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा हूकूम करण्‍यात आला.
            तक्रारदार यांनी स्‍वतःचे शपथपत्र दाखल केले आहे. नि.4 सोबत मोबाईल खरेदी केल्‍याची पावती, सामनेवाले क्र.1 यांना दिलेली नोटीस, हजर केली आहे.
 
            तक्रारदार यांचे वकील श्री.लाखे यांचा यूक्‍तीवाद ऐकला.सामनेवाले क्र.1 यांचे वकील श्री. सागळे यांचा युक्‍तीवाद ऐकला. न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
            मुददे                                            उत्‍तर
1.     सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी
      ठेवली आहे ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय       नाही.
2.    काय आदेश                                  अंतिम आदेशाप्रमाणे.
                        कारणमिंमासा
मुददा क्र.1 ः-
            तक्रारदार यांचे वकील श्री. लाखे यांनी असा यूक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांचे दुकानातून तक्रारीत नमूद केलेला मोबाईल विकत घेतला. सदरील मोबाईलचा वापर सूरु केल्‍यानंतर स‍हा महिन्‍याचे आंत मोबाईलचा दर्शनी भागामध्‍ये (Display) बिघाड झाला. सदरील बिघाड हा मोबाईल सदोष असल्‍यामुळे झाला. तक्रारदार यांनी सदरील मोबाईल दूरुस्‍तीकामी सामनेवाले क्र.1 यांचेकडे घेऊन गेले. सामनेवाले क्र .1 यांनी तो दूरुस्‍त करुन देण्‍यास नकार दिला व सांगितले की, तो नोकिया केअर सेंटर येथून दूरुस्‍त करुन घ्‍यावा. सदरील मोबाईलची वॉरंटी ही सामनेवाले क्र.2 यांनी दिलेली आहे. तक्रारदार हे सेदरील मोबाईल सामनेवाले क्र.2 यांचेकडे घेऊन गेले असता त्‍यांनी मोबाईल दूरुस्‍त करुन देण्‍यास नकार दिला व तक्रारदार यांना सांगितले की, सदरील मोबाईल दूरुस्‍त होऊ शकत नाही. जर दूरुस्‍त करायचा असेल तर त्‍यांना पैसे दयावे लागतील. सदरील मोबाईल हा वॉरंटी कालावधीत नादूरुस्‍त झाल्‍यामुळे सामनेवाले क्र.1 व 2 यांनी सेवा देणे क्रमप्राप्‍त होते. त्‍यांनी सेवेत कसूर ठेवलेला आहे. म्‍हणून तक्रारदार हे तक्रारीत नमूद केलेली नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहेत. तक्रारदार यांचे वकिलांनी तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍त म्‍हणजे मोबाईल खरेदीची पावती व सामनेवाले क्र.1 यांना दिलेली नोटीस यावर मंचाचे लक्ष वेधले. वॉरंटी कालावधीमध्‍ये सदरील मोबाईल दूरुस्‍त न केल्‍यामुळे  तक्रारदार यांना शारीरिक व मानसिक त्रास झालेला आहे. त्‍याबददलही नुकसान भरपाई देण्‍यात यावी.
            तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व दस्‍ताचे अवलोकन केले. तक्रारदार म्‍हणतात त्‍याप्रमाणे सदरील मोबाईल मध्‍ये उत्‍पादकीय दोष होता हे तक्रारदार यांनी शाबीत केले आहे काय हे पाहणे गरजेचे आहे.तक्रारदार यांचे मते मोबाईलचा डिसप्‍ले मध्‍ये अचानक बिघाड झाला. सदरील मोबाईल हा तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांचे दूकानातून खरेदी केला आहे. त्‍या बाबत पावती हजर केली आहे. त्‍या पावतीचे बारकाईने अवलोकन केले असता पावतीमध्‍ये नियम व अटी नमूद केलेल्‍या आहेत. त्‍या नियम व अटीप्रमाणे सदरील मोबाईलची वॉरंटी व गँरटी केअर सेंटर कडून मिळाली आहे. मोबाईल फोनची वॉरंटी कंपनीकडून दिली जाते. दूकानदाराकडून मोबाईलची वॉरंटी दिली जात नाही. मोबाईल मध्‍ये काही बिघाड झाल्‍यास ग्राहकांनी स्‍वतः सर्व्‍हीस सेंटरला मोबाईल घेऊन जाणे ही बाब नमूद केलेली आहे.तक्रारदार यांनी सदरील पावतीवर सही केलेली आहे.म्‍हणजेच   सामनेवाले क्र.1 हे मोबाईल विक्रेते आहेत. सदरील मोबाईल विक्री करते वेळेस वॉरंटी व गँरटी ही केअर सेंटर कडून व कंपनीकडून दिली जाते. ही बाब बिलात स्‍पष्‍ट नमूद केलेली आहे.तक्रारदार हे सदरील मोबाईल दूरुस्‍त करणेकामी सामनेवाले क्र.2 यांचेकडे घेऊन गेल्‍याचे निदर्शनास येते. पावतीचे पाठीमागे इंग्रजी Tempat Handset Display soldring Handset not cover in warranty. असे लिहीलेले आहे. म्‍हणजेच Display soldring यांचेमध्‍ये बिघाड झाला ते वॉरंटीमध्‍ये अंतर्भूत होत नाही असे लिहीलेले आहे. तक्रारदार यांनी सदरील मोबाईल यामध्‍ये उत्‍पादकीय दोष आहे हे सिध्‍द करण्‍यासाठी सदरील मोबाईल या मंचासमोर हजर केला नाही. सदरील मोबाईल मध्‍ये खरच दोष आहे किंवा काय हे पाहण्‍यासाठी त्‍यांस सक्षम प्रयोगशाळेत नेऊन त्‍यांची तपासणी होणे गरजेचे होते. तक्रारदार यांनी सदरील मोबाईल हा वैशाली मोबाईल आणि हँडसेट दूकानातून दूरुस्‍त करुन घेतल्‍या बाबत पावती नि.13 वर दाखल केली आहे. सदरील पावतीचे निरीक्षण करता सदरील दूरुस्‍त करणार यांनी मोबाईल मध्‍ये उत्‍पादकीय दोष होता ही बाब नमूद केलेली नाही.मोबाईल फोनचा दर्शनी भाग ब-याच कारणामुळे नादूरुस्‍त होऊ शकतो. जसे की मोबाईल जमिनीवर पडल्‍यास किंवा मोबाईलला पाणी लागल्‍यास त्‍यांचे Display soldring मध्‍ये बिघाड होऊ शकतो. सदरील मोबाईल योग्‍य त्‍या प्रयोगशाळेमधून तपासून घेणे गरजेचे होते. सदर पुरावा या मंचापूढे तक्रारदार यांनी उपलब्‍ध केला नसल्‍यामुळे सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे ही बाब गृहीत धरता येणार नाही.सामनेवाले क्र.2 नोकिया केअर सेंटर यांना तक्रारदार यांचे निष्‍काळजीपणामुळे नोटीस बजावणी झाली नाही. तक्रारदार यांनी त्‍यांचे विरुध्‍द नोटीस बजावणे कामी तजविज केली नसल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द तक्रार चालू शकत नाही. सामनेवाले क्र.3 हे जरी मंचासमोर हजर झाले नाही तरी तक्रारीत नमूद केलेली बाब शाबीत करण्‍याची जबाबदारी तक्रारदार यांची आहे. तक्रारदार यांनी सदरील मोबाईलचा डिसप्‍ले चा बिघाड हा उत्‍पादकीय बिघाड होता ही बाब शाबीत केलेली नाही. सबब, या मंचाचे मत की, तक्रारदार हे नुकसान भरपारई मिळण्‍यास पात्र नाहीत.
            मुददा क्र.1 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.
            सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
                     आदेश
1.     तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात येते.
2.    खर्चाबददल आदेश नाही.
      3.    ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
                       (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
 
 
 
                       श्रीमती मंजुषा चितलांगे             श्री.विनायक लोंढे                                      
                                सदस्‍य                    अध्‍यक्ष     
                                                        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.
 
 
 
 
जयंत पारवेकर
लघुलेखक
 
 
[HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.