Maharashtra

Satara

cc/14/194

parjkta shankar surve - Complainant(s)

Versus

shri mlaidevi na. sha patsnstha - Opp.Party(s)

02 Sep 2015

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

 

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

            मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                                                                          मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

 

                              तक्रार क्र. 194/2014.

                                                                                                           तक्रार दाखल दि.29-11-2014.

                                                                                                            तक्रार निकाली दि. 2-9-2015. 

 

कु.प्राजक्‍ता शंकर सुर्वे,

रा.468 अ, शनिवार पेठ, कराड,

ता.कराड, जि.सातारा.                            ....  तक्रारदार   

 

         विरुध्‍द

 

1. श्री.मळाईदेवी नागरी सह.पतसंस्‍था मर्या.

   जाखीणवाडी.

2. चेअरमन- गणपतराव किसनराव थोरात.

   रा.थोरातमळा, मलकापूर, ता.कराड,जि.सातारा.

3. व्‍हा.चेअरमन- सौ.अरुणादेवी विठ्ठल गायकवाड,

   रा.विद्यानगर, सैदापूर, ता.कराड, जि.सातारा.

4. संचालक- शामराव बाबूराव पवार.

   रा.कटबान, कापील, ता.कराड, जि.सातारा.

5. संचालक- शामराव सखाराम पवार.

   रा.वडोली-निळेश्‍वर, ता.कराड, जि.सातारा.

6. संचालक- शिवाजीराव महादेव जाधव.

   रा.विद्यानगर, सैदापूर, ता.कराड, जि.सातारा.

7. संचालक- प्रकाश रघुनाथ यादव.

   रा.जिल्‍हापरिषद कॉलनी, आगाशिवनगर,

   ता.कराड, जि.सातारा.

8. संचालक- अरुण हणमंत पवार.

   रा.पवारमळा. इमर्सन कंपनीसमोर,

   आगाशिवनगर, ता.कराड, जि.सातारा.

9. संचालक- नंदकुमार गरपती सन्‍मुख.

   रा.मु.पो.वाठार, ता.कराड, जि.सातारा.

10. संचालक- संपतराव शामराव पाटील.

    रा.जाखीणवाडी, ता.कराड, जि.सातारा.

11. संचालक- चंद्रजित पांडुरंग पाटील.

   रा.सोमवार पेठ, पाण्‍याच्‍या टाकीजवळ,

   ता.कराड, जि.सातारा.

12. संचालक- अनिल कृष्‍णत शिर्के.

    रा.नांदलापूर, ता.कराड, जि.सातारा.

13. संचालक- विठ्ठल दादू येडगे.

    रा.जाखीणवाडी, ता.कराड, जि.सातारा.

14. संचालक- संभाजी शंकर वाघमारे.

    रा.आगाशिवनगर, ता.कराड, जि.सातारा.

15. शाखा व्‍यवस्‍थापक- विश्‍वनाथ राजाराम यादव.

    रा.मु.पो.नारायणवाडी, ता.कराड, जि.सातारा.         ....  जाबदार

 

                 तक्रारदारातर्फे अँड.ए.आर.कदम. 

              जाबदार 1 ते 15 तर्फे- अँड.यु.एल.पाटील.

                        न्‍यायनिर्णय 

सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या यानी पारित केला    

                  

1.         तक्रारदारांनी प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986च्‍या कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात कथन खालीलप्रमाणे-

       तक्रारदार ही वर नमूद केलेल्‍या पत्‍त्‍यावर तिचे कुटुंबियासमवेत रहाते.  तक्रारदार सध्‍या पुणे येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग या कॉलेजमध्‍ये इंजिनियरिंगचे शिक्षण घेत आहे.    जाबदार श्री.मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्‍था जाखीणवाडी ही सहकार कायद्याप्रमाणे स्‍थापन झालेली सहकारी संस्‍था असून ग्राहकाकडून ठेवी स्‍वरुपात रक्‍कम स्विकारुन मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी ग्राहकानी रक्‍कम मागितलेस सदर रक्‍कम त्‍यांना परत देणेचे उद्देशाने स्‍थापन झालेली आहे.  तक्रारदारांनी जाबदार पतसंस्‍थेच्‍या कराड शाखेमध्‍ये दैनंदिन बचत ठेव योजनेनुसार खाते क्र.190 मध्‍ये दि.10-3-2009 पासून दि.16-12-2009 पर्यंत रक्‍कम रु.3,700/-, खाते क्र.294 मध्‍ये दि.1-8-2009 पासून दि.18-12-2009 अखेर रु.4,500/- इतकी रक्‍कम गुंतवलेली आहे.  खाते क्र.190 व खाते क्र.294 या दोन्‍ही खात्‍यावरील एकूण मिळून रक्‍कम रु.8,200/- जाबदारांकडून तक्रारदारांना येणे बाकी आहे, तथापि तक्रारदाराना शैक्षणिक खर्चासाठी सदर रकमेची नितांत गरज असल्‍याने तक्रारदारानी सन 2009 पासून अनेकदा जाबदारांना प्रत्‍यक्ष भेटून पासबुकावरील शिल्‍लक रक्‍कम परत मागितली असता जाबदारानी वेळोवेळी तक्रारदाराना खोटी आश्‍वासने देऊन व थातुरमातुर कारणे सांगून आजअखेर वेळ मारुन नेली.   वस्‍तुतः जाबदारांनी सदर खात्‍यावरील रक्‍कम तक्रारदारानी परत मागितल्‍यावर त्‍यांना सव्‍याज देणे बंधनकारक होते.  तथापि वेळोवेळी तक्रारदारानी मागणी करुनही जाबदारानी तक्रारदाराना रक्‍कम अदा केली नाही.  शेवटी तक्रारदाराना जाबदारांनी तुझ्या वडिलांचे आमचेकडे कर्ज आहे, ते आधी भरायला सांग मग आमचेकडे पैसे मागायला ये असे म्‍हणून तक्रारदाराना तेथून हाकलून लावले.    तक्रारदारानी त्‍यांच्‍या शैक्षणिक खर्चासाठीची तरतूद म्‍हणून जाबदार पतसंस्‍थेत सदरची रक्‍कम गुंतवलेली होती व आहे.  तक्रारदारांची सदरची रक्‍कम परत मिळत नसल्‍याने तक्रारदाराना  आर्थिक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे.  तक्रारदारानी वेळोवेळी रकमा मागूनही जाबदारानी तक्रारदाराना बचत खात्‍यावरील रक्‍कम दिली नाही व खोटी आश्‍वासने देऊन मुदती मागून घेतल्‍या व शेवटी तक्रारदारांबरोबर भांडणे काढून रक्‍कम देणेस स्‍पष्‍ट नकार दिला त्‍यामुळे तक्रारदाराना सदरील तक्रार मंचात दाखल करणे भाग पडले आहे.  याशिवाय अन्‍य कोणत्‍याही कोर्टात तक्रार दाखल केलेली नाही.  सध्‍या तक्रारदाराना रकमेची नितांत गरज आहे.   त्‍यामुळे तक्रारदाराना मानसिक त्रास सोसावा लागलेला आहे, त्‍यामुळे तक्रारदाराना मानसिक व शारिरीक त्रासापोटी नुकसानभरपाई मागणेचा हक्‍क प्राप्‍त झालेला आहे.  तक्रारीस कारण दि.15-11-2014 रोजी तक्रारदार हे जाबदारांकडे रक्‍कम मागणेस गेल्‍या असता जाबदारानी नकार दिला त्‍यावेळी व त्‍यासुमारासच मे.मंचाचे अधिकार स्‍थळसीमेत घडलेले आहे.  तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असून जाबदारांनी सेवेत त्रुटी व कमतरता केली असल्‍यानेच सदर तक्रारीची दखल घेणेचा मे.मंचास अधिकार आहे.   तक्रारदारानी मे.मंचाला खालीलप्रमाणे विनंती केली आहे-  जाबदारानी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदाराना बचत खात्‍यावरील रक्‍कम रु.8,200/- एक महिन्‍याचे आत सव्‍याज अदा करावी असे आदेश करणेत यावेत, अर्ज दाखल तारखेपासून रक्‍कम रु.8,200/- वर प्रत्‍यक्ष रक्‍कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे.18% दराने व्‍याज जाबदारानी तक्रारदाराना देणेचे आदेश करणेत यावेत.  मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- तक्रारदाराना जाबदारानी देणेचे आदेश करणेत यावेत.   येणेप्रमाणे तक्रारअर्ज दाखल केला आहे. 

 

2.     नि.11 कडे जा‍बदार क्र.1 ते 15 चे म्‍हणणे दाखल आहे.  ते खालीलप्रमाणे-

       प्रस्‍तुत तक्रारदार हिने जाबदार पतसंस्‍थेकडे तिचे दैनंदिन बचत ठेव योजनेनुसार खाते क्र.190 व खाते क्र.294 वर रकमा ठेवल्‍या असून सदर खात्‍यामध्‍ये रक्‍कम रु.8,200/-  नसून रक्‍कम रु.8,300/- इतकी बाकी आहे.  सदर रक्‍कम तक्रारदार हिने कधीही जाबदार पतसंस्‍थेकडे मागणी केलेली नव्‍हती व नाही.   तक्रारदार हिने दाखल केलेला सदरचा अर्ज व त्‍यातील संपूर्ण तक्रारी खोटया व लबाडीच्‍या असून त्‍या जाबदारास मुळीच मान्‍य व कबूल  नाहीत.   तक्रारदार हिचे वडिलांनी जाबदार पतसंस्‍थेकडून रक्‍कम रु.22,35,353/-चे कर्ज घेतले असून सदर कर्जाची परतफेड तक्रारदार हिचे वडिलांनी केलेली नसून त्‍याने संस्‍थेविरुध्‍द सहकार न्‍यायालयात सहकार दावा क्र.844/2009 दाखल केला असून त्‍या दाव्‍याचे कामी संस्‍थेने तक्रारदार हिचे वडिलांचे मागणीनुसार तडजोड करावी असा तगादा तक्रारदार हिचे वडिलांनी जाबदार पतसंस्‍थेविरुध्‍द लावला आहे.  त्‍यास संस्‍था दाद देत नसल्‍याने आकसापोटी सदर अर्ज तक्रारदार हिने दाखल केला आहे.   तक्रारदार हिने या अर्जाचे कामी जाबदार क्र.1 ते 15 यांना विनाकारण  या कामी सामील केले आहे त्‍यामुळे सदर अर्जास मिसजॉईंडर पार्टीज तत्‍वाची बाधा येत आहे.    तक्रारदार हिने कलम 1 मध्‍ये ती पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे या कॉलेजमध्‍ये शिक्षण घेत असलेची केलेली तक्रार खोटी, लबाडीची आहे. 

        येणेप्रमाणे जाबदार क्र.1 ते 15 तर्फे म्‍हणणे दाखल आहे. 

 

3.       नि.3 कडे तक्रारदाराचा अँड.कदम याना तक्रारअर्ज चालवणेस परवानगी मागणी अर्ज, नि.1 कडे तक्रारअर्ज, नि.2 कडे तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र, नि.4 कडे अँड.कदम यांचे वकीलपत्र, नि.5 कडे कागदयादीने कागद दाखल, नि.6 कडे तक्रारदाराचा पत्‍तामेमो, नि.7 कडे मंचाने जाबदाराना पाठविलेली नोटीस, नि.8 कडे जाबदार क्र.7 यांचे घर बंद असलेने नोटीस परत, नि.7/ए, 7/बी, 7/सी, 7/डी, 7/इ, 7/एफ, 7/जी 7/एच, 7/आय, 7/जे, 7/के, 7/एल, 7/एम कडे अनुक्रमे जाबदार क्र.6, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 1 व 2, 3, 4, 5 यांच्‍या नोटीसच्‍या पोहोचपावत्‍या, नि.7/एन कडे जाबदार क्र.7 यांचे घर बंद असलेने परत आलेली नोटीस, नि.9 कडे अँड.यु,एल.पाटील यांचे जाबदार क्र.1 ते 15तर्फे वकीलपत्र दाखल, नि.10 कडे पत्‍तामेमो, नि.11 कडे जाबदार क्र.1 ते 15 चे म्‍हणणे, नि.14 कडे संस्‍थेचे हिशोबानुसार व्‍याजासह एकूण रक्‍कम रु.10485/- होत असून सदर रक्‍कम कोर्टात भरणेस परवानगी मागणारा दि.3-3-15 चा जाबदारातर्फे अर्ज, अर्ज मंजूर. अर्जावर रक्‍कम स्विकारलेबाबतची तक्रारदाराची सही, नि.15 कडे तक्रारदारातर्फे पुरसीस की, तक्रार व त्‍यासोबतचे प्रतिज्ञापत्र हेच पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र समजणेत यावे, नि.16 कडे तक्रारदाराची पुरावा संपलेची पुरसीस, नि.17 कडे तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र, नि.18 कडे तक्रारदाराची पुरावा संपलेची पुरसीस, नि.19 कडे जाबदाराचा पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्रासाठी मुदतीचा अर्ज, अर्ज मंजूर. नि.20 कडे जाबदाराचा पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्रासाठी मुदतीचा अर्ज, शेवटची संधी देऊन अर्ज मंजूर. नि.21 कडे पिग्‍मी एजंट सुजाता शिंदे, चंदाराणी शिंदे व शाखाप्रमुखांचे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र दाखल करणेस अर्ज, अर्ज मंजूर.  तसेच बचतठेव खात्‍यातील रक्‍कम काढणेचे अर्जाचा फॉर्म दाखल.  नि.22 कडे कागदयादी, नि.23 कडे सुजाता शिंदे, नि.24 कडे चंदाराणी शिंदे व नि.25 कडे शाखाप्रमुख शिवाजी भोसले यांचे प्रतिज्ञापत्र व नि.26 कडे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र दाखल, इ.कागदपत्रे दाखल केलेली आहेत. 

 

4.       तक्रारदारांची तक्रार, त्‍यासोबतचे प्रतिज्ञापत्र, पुरावे, पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र, पुरसीस, जाबदारांचे म्‍हणणे, प्रतिज्ञापत्र, पुरसीस यांचे अवलोकन करुन सदर तक्रारीचे निराकरणार्थ मे. मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-

अ.क्र.           मुद्दा                                          निष्‍कर्ष

 

 1.  तक्रारदार व जाबदार यांचेत ग्राहक व सेवापुरवठादार

     असे नाते आहे काय?                                        होय.

 2.  जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय?      होय.

 3.  जाबदार हे तक्रारदारांच्‍या रकमा देणे लागतात काय?                होय.

 4.  अंतिम आदेश काय?                                तक्रार अंशतः मंजूर.

विवेचन-  मुद्दा क्र.1 ते 3

5.        मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.  तक्रारदार हे सेवानिवृत्‍त शिक्षक आहेत.  जाबदार पतसंस्‍था ही सहकार कायद्याप्रमाणे स्‍थापन झालेली असून ग्राहकांकडून ठेवी स्‍वरुपात रक्‍कम स्विकारुन मुदतीनंतर किंवा मुदतपूर्वही ग्राहकाना रक्‍कम हवी असलेस त्‍यांच्‍या रकमा व्‍याजासह त्‍याना परत देणे अशा स्‍वरुपाच्‍या हेतूने जाबदार पतसंस्‍था स्‍थापन झालेली आहे.  तक्रारदारानी जाबदारांकडे रक्‍कम रु.10,000/- व रक्‍कम रु.39,000/- अशा दोन मुदतठेवीच्‍या पावत्‍या ठेवल्‍या. या पावत्‍यांच्‍या मुदती संपल्‍याने तक्रारदारानी जाबदारांकडे रकमा मागितल्‍या असता त्‍यानी प्रथम टाळाटाळ करुन वेळ मारुन नेली व वारंवार आश्‍वासने देत राहिले.  वस्‍तुतः जाबदारानी तक्रारदारांच्‍या ठेवपावत्‍यांवरील मुदती संपल्‍यावर त्‍यांच्‍या रकमा त्‍यांना सव्‍याज परत करणे बंधनकारक होते.  तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक ठरतात.  त्‍यांना त्‍यांचे पैसे वेळेत सव्‍याज परत करणे ही जाबदारांची जबाबदारी होती व तक्रारदाराना (ग्राहकांस) द्यावयाची सेवाही होती.  जाबदार हे आजपावेतो पैसे परत देऊ शकले नाहीत ही जाबदारांच्‍या सेवेतील त्रुटी आहे.    जाबदारांच्‍या पैसे न देणेचे कृतीमुळे तक्रारदाराना खूप शारिरीक व मानसिक त्रास झाला आहे.  सदर कामी जाबदाराकडून तक्रारदारास द्यावयाच्‍या सेवेत झालेली त्रुटी, तक्रारदारास झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रास या सर्वाना जाबदारच जबाबदार आहेत असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  जाबदारानी तक्रारदारांच्‍या रकमा मुदती संपून गेल्‍या तरी परत केल्‍या नसल्‍यामुळेच त्‍यांचेकडून त्‍यांच्‍या-(जाबदारांच्‍या) कर्तव्‍यात कसूर झाली आहे व ग्राहकाला त्‍यांचेकडून दयावयाच्‍या सेवेत त्रुटी निर्माण झालेली आहे.  आजपावेतो जाबदारांनी तक्रारदारांची रक्‍कम सव्‍याज परत केलेली नाही, ती त्‍यांनी त्‍यांना सव्‍याज परत केली पाहिजे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत.

          प्रस्‍तुत कामी नि.14 कडे जाबदारानी दि.3-3-2015 रोजी रक्‍कम रु.10,485/- तक्रारदार हिस देणेसाठी मे.मंचात भरीत आहोत असा अर्ज मे.मंचात दाखल केला असून तक्रारदार हिने रक्‍कम स्विकालेली आहे असे तक्रारदाराच्‍या सहीवरुन दिसून येत आहे.  त्‍यामुळे जाबदाराकडून येणे असलेली दोन्‍ही बचत खात्‍यावरील व्‍याजासहीत रक्‍कम मिळालेने वादविषय संपुष्‍टात आलेला आहे.  त्‍यामुळे फक्‍त तक्रारदारानी मागितलेली मानसिक व शारिरीक त्रास आणि तक्रारअर्जाचा खर्च इतकीच मागणी मे.मंचाने विचारात घेतली आहे. 

 

6.       जाबदारांचे अशा वर्तनाने तक्रारदाराचे मनस्‍वास्‍थ बिघडले आहे.  ग्राहकाना योग्‍य ती सेवा पुरवणेची जबाबदारी जाबदार क्र.1 ते 15 यांची होती ती ते पुरवू शकले नाहीत.  म्‍हणून आम्‍ही येथे  Co-operate corporate veil चा आधार घेऊन या सर्व गोष्‍टींना जाबदार क्र.1 पतसंस्‍था व जाबदार क्र.2 ते 14 यांना वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या जबाबदार धरीत आहोत.  जाबदार क्र.15 हे शाखाप्रमुख म्‍हणजेच पगारी नोकर असलेने त्‍यांना फक्‍त संयुक्‍तीकरित्‍या जबाबदार धरीत आहोत.   येथे आम्‍ही मे. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या रिट पिटीशन नंबर 117/2011 मंदाताई संभाजी पवार वि. स्‍टेट ऑफ महाराष्‍ट्र या न्‍यायनिवाडयाचा व त्‍यातील दंडकांचा आधार घेतला आहे.

 

7.          सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-

                          -ः आदेश ः-

1.    तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.

2.   तक्रारदाराना जाबदार क्र.1 पतसंस्‍था व जाबदार क्र.2 ते 14 यानी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या व जाबदार क्र.15 यानी संयुक्‍तीकरित्‍या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.3,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.2,000/- अदा करावेत.

3.      वरील आदेशाचे पालन जाबदार क्र.1 पतसंस्‍था व जाबदार क्र.2 ते 14 यानी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या व जाबदार क्र.15 यानी संयुक्‍तीकरित्‍या आदेश पारित तारखेपासून 45 दिवसांचे आत करावयाचे आहे तसे न केलेस आदेश पारित तारखेपासून तक्रारदाराचे हाती रक्‍कम पडेपर्यंत होणा-या एकूण रकमेवर द.सा.द.शे.6% ने व्‍याज अदा करावे लागेल.

4.   जाबदारानी विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केलेस तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्‍वये दाद मागू शकतील. 

5.  सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला. 

6.  सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

 

ठिकाण- सातारा.

दि. 2 –9-2015.

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.