Maharashtra

Satara

CC/14/104

SHRI sandip baburao manrdhekar - Complainant(s)

Versus

shri maruti uarph dada rghunath jadhav - Opp.Party(s)

pawar

28 Oct 2015

ORDER

Consumer Disputes Redressal
Forum, Satara
 
Complaint Case No. CC/14/104
 
1. SHRI sandip baburao manrdhekar
chimanpura peth satara
SATARA
...........Complainant(s)
Versus
1. shri maruti uarph dada rghunath jadhav
rukimani plaza b45sektar 20aroli new muabai
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SAVITA BHOSALE PRESIDENT
 HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR MEMBER
  HON'BLE MRS.SUREKHA HAJARE MEMBER
 
For the Complainant:pawar, Advocate
For the Opp. Party:
ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

          मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य

           मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.            

             

                तक्रार अर्ज क्र. 104/2014.

                      तक्रार दाखल दि.09-07-2014.

                            तक्रार निकाली दि.28-10-2015. 

 

 

1. श्री. संदीप बाबुराव मर्ढेकर,

रा.रुक्मिणी गार्डन, फ्लॅट नं.जी-2/डी,

डी विंग, तळमजला, सि.स.नं. 81,

चिमणपुरा पेठ, सातारा शहर,

ता.जि.सातारा.

2. श्री. काका दिनकर कांबळे,

रा.रुक्मिणी गार्डन, फ्लॅट नं.जी-1/ई,

विंग, तळमजला, सि.स.नं. 81,

चिमणपुरा पेठ, सातारा शहर,

ता.जि.सातारा.

3. सौ. कमल विठोबा संकपाळ,

रा.रुक्मिणी गार्डन, फ्लॅट नं.एफ-2/डी,

डी विंग, पहिला मजला, सि.स.नं. 81,

चिमणपुरा पेठ, सातारा शहर,

ता.जि.सातारा.                                     ‍

4. सौ. फातीमा चॉंदसहाब शेख,

रा.रुक्मिणी गार्डन, फ्लॅट नं.एफ-4/सी,

विंग, पहिला मजला, सि.स.नं. 81,

चिमणपुरा पेठ, सातारा शहर,

ता.जि.सातारा.

5. श्री. अशोक रामचंद्र धुमाळ,

रा.रुक्मिणी गार्डन, फ्लॅट नं.एस-1/सी,

सी विंग, दुसरा मजला, सि.स.नं. 81,

चिमणपुरा पेठ, सातारा शहर,

ता.जि.सातारा.

6. श्री. वसंत यशवंत जाधव,

रा.रुक्मिणी गार्डन, फ्लॅट नं.एसटी-1/डी,

डी विंग, स्‍टील्‍ट फ्लोअर, सि.स.नं. 81,

चिमणपुरा पेठ, सातारा शहर,

ता.जि.सातारा.

7. श्री. तानाजी विष्‍णू भगत,

रा.रुक्मिणी गार्डन, फ्लॅट नं.एस-3/सी,

सी विंग, दुसरा मजला, सि.स.नं. 81,

चिमणपुरा पेठ, सातारा शहर,

ता.जि.सातारा.

8. श्री. रणजीत बळवंत जाधव,

रा.रुक्मिणी गार्डन, फ्लॅट नं.जी-2/सी,

सी विंग, तळमजला, सि.स.नं. 81,

चिमणपुरा पेठ, सातारा शहर,

ता.जि.सातारा.

9. सौ.उषा अनिल आरगडे,,

रा.रुक्मिणी गार्डन, फ्लॅट नं.एसटी-1/सी,

सी विंग, स्‍टील्‍ट मजला, सि.स.नं. 81,

चिमणपुरा पेठ, सातारा शहर,

ता.जि.सातारा                                        ...  तक्रारदार.

    

         विरुध्‍द

श्री. मारुती उर्फ दादा रघुनाथ जाधव,

मुळ रा. इंदोली, ता.कराड, जि.सातारा

सध्‍या रा. रुक्मिणी प्‍लाझा,

बी-45, सेक्‍टर- 20, एरोली,

नवी मुंबई- 400 708.                                 ....  जाबदार.

 

 

                            तक्रारदारातर्फे अँड.के.जे.पवार.

                            जाबदार तर्फे अँड.व्‍ही.डी.निकम.                  

 

न्‍यायनिर्णय

 

(सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला)

                                                                                     

1.  तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात मजकूर पुढीलप्रमाणे-

    तक्रारदार हे सातारा येथील ‘रुक्‍मीणी गार्डन’ अपार्टमेंट मध्‍ये कायमस्‍वरुपी रहिवाशी आहेत.  तर जाबदार हे बांधकाम व्‍यावसायिक असून तक्रारदारांनी जाबदार यांचे चिमणपूरा पेठ, सातारा येथील सि.स.नं.81 चे एकूण क्षेत्र 1449.00 चौ.मी. या मिळकतीवर जाबदाराने  ‘रुक्मिणी गार्डन’ हे निवासी संकूल ए.बी.सी. विंगमध्‍ये बांधणेचे ठरवून सदर इमारतीमध्‍ये तक्रारदारांचे बरोबर झाले करारनाम्‍यात नमूद केले सुविधाव्‍यतिरिक्‍त सार्वजनिक सुविधा म्‍हणून संपूर्ण इमारतीस सभोवताली वॉल व त्‍याचे आतमध्‍ये पार्कींगमध्‍ये पेव्‍हर ब्‍लॉक, पिण्‍याच्‍या पाण्‍याचे नळ कनेक्‍शन, वापराच्‍या पाण्‍यासाठी कुपनलिका, गार्डन, गार्डन लाईट, सार्वजनिक लाईट फिटींग तसेच इतर सर्व अधुनिक सुविधा करुन देणेचे अमिष जाबदाराने तक्रारदाराला दाखविले, म्‍हणून तक्रारदारांनी प्रस्‍तुत जाबदाराचे ‘रुक्मिणी गार्डन’ अपार्टमेंटमध्‍ये सदनिका घेणेचे ठरविले.  त्‍यानुसार तक्रारदारांनी जाबदार बरोबर वेगवेगळया तारखांना करारनामे केले.  सदर करारनाम्‍याप्रमाणे जाबदाराने सदर सदनिकेचा ताबा तक्रारदार यांना दोन महिन्‍यानंतर देणेचे ठरले होते.  त्‍यावेळी तक्रारदाराने वेळोवेळी मागणी करुनही जाबदाराने सदनिकांचा ताबा तक्रारदार यांना दिला नाही.  तक्रारदाराने जाबदार यांना करारामध्‍ये ठरलेली सर्व रक्‍कम तसेच लाईट व पाणी कनेक्‍शनची व इतर सर्व रक्‍कम अदा केली होती. व बँकेचा मासीक हप्‍ता प्रस्‍तुतचे तक्रारदार हे भरत होते तसेच भाडयाचे घरात रहात असलेने घरभाडे तक्रारदाराला भरावे लागत होते.  त्‍यामुळे जाबदार यांना विनवण्‍या करुन प्रस्‍तुत सदनिकांचा ताबा तक्रारदार यांनी घेतला.  जाबदाराने कराराप्रमाणे ज्‍या सुविधा देणेचे मान्‍य केले होते त्‍यापैकी ब-याच सुविधा तक्रारदारांचे सदनिकेमध्‍ये दिल्‍या नाहीत व ज्‍या सुविधा पुरविल्‍या आहेत त्‍यामध्‍ये निकृष्‍ठ दर्जाचे साहीत्‍य वापरलेले आहे.  इमारतीस अनेक ठिकाणी तडे गेले आहेत, लाईट फिटींग निकृष्‍ठ दर्जाचे केले आहे. त्‍यामळे तक्रारदारांचे घरातील  इलेक्‍ट्रॉनिक साहित्‍यांचे नुकसान झाले आहे.  तसेच या सुविधांबरोबरच जाबदाराने देऊ केलेल्‍या इतर सुविधा म्‍हणजे पिण्‍याचे पाणी, पार्कींगमधील पेव्‍हर ब्‍लॉक्‍स, सुरक्षा गेट, गार्डन, कंपांऊंड वॉल, प्‍लंबींग, वापराच्‍या पाण्‍याची सोय इ. सुविधा देण्‍याचे जाबदाराने कबूल केले होते.  परंतू त्‍यापैकी कोणतीही सुविधा पुरविली नाही.  तर फक्‍त बोअरवेलची सुविधा पुरविली आहे तीही लाईट मिटर जळालेने बंद पडली आहे.  पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय जाबदाराने केलेली नसलेने तक्रारदारांचे व कुटूंबीयांचे आरोग्‍य धोक्‍यात आले असून त्‍यासाठी मोठा खर्च होत आहे.  प्रस्‍तुत जाबदाराने वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदार यांचेबरोबर झाले करारातील अटी व शर्तींचा भंग केला आहे व तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे तसेच प्रस्‍तुत मिळकत ही नगरपालीका हद्दीत असलेने त्‍याचे डिड ऑफ डिक्‍लरेशन करुन देणे किंवा फ्लॅट धारकांची सह.गृहनिर्माण सोसायटी स्‍थापन करुन देणे आवश्‍यक असतानाही जाबदाराने डिड ऑफ डिक्‍लरेशन करुन दिले नाही तसेच फ्लॅटधारकांची सह. गृहनिर्माण सोसायटी स्‍थापन करुन दिलेली नाही.  प्रस्‍तुत बाबी पूर्ण करुन देणेचे करारामध्‍ये नमूद असतानाही त्‍याची पूर्तता जाबदाराने केलेली नाही.  तसेच त्‍यासाठी आवश्‍यक असणारा बांधकाम पूर्णत्‍वाचा दाखला, आर्कीटेक्‍टचा दाखला, जाबदाराने आजअखेर घेतलेले नाहीत.   त्‍यामुळे तक्रारदार यांना वीज व पाणी मिळणे अशक्‍य झाले आहे.  अशाप्रकारे तक्रारदार यांना जाबदाराने करारातील नमूद सेवा सुविधा देणेत त्रुटी केली असून त्‍या सेवा सुविधा जाबदार यांचेकडून पूर्ण करुन मिळणेसाठी प्रस्‍तुत तक्रार अर्ज मे. मंचात तक्रारदाराने दाखल केला आहे.

2.  तक्रारदारांनी प्रस्‍तुत कामी जाबदार यांनी तक्रारदार यांचे सदनिकेमध्‍ये पिण्‍याचे पाण्‍याची सोय करुन सर्व सदनिकांमध्‍ये तसेच इतर सर्व सार्वजनिक अर्धवट राहीलेली बांधकामे पूर्ण करुन देणेबाबत जाबदार यांना आदेश व्‍हावेत, सर्व तक्रारदार यांना जाबदार यांनी त्‍यांचे  सदनिकांचे खूषखरेदीपत्र करुन द्यावे, प्रस्‍तुत अर्जाचा खर्च रक्‍कम रु.10,000/- तक्रारदार यांना जाबदारकडून मिळावा अशी विनंती केली आहे. 

3.  प्रस्‍तुत कामी तक्रारदारांनी नि.2, नि.2अ, नि.3, नि.3अ, नि.4, नि.5, नि.5अ, नि.6 व नि. 6अ कडे प्रतिज्ञापत्रे, नि. 9 चे कागदयादीसोबत नि. 9/1 ते नि.9/7 कडे अनुक्रमे तक्रारदार व जाबदार यांचेत झालेली करारपत्रे (9), तक्रारदारांनी घरफाळा भरलेल्‍या पावत्‍या, तक्रारदारांनी जाबदार यांना वकीलांमार्फत पाठवलेली नोटीस, प्रस्‍तुत नोटीस जाबदाराला मिळालेच्‍या पोहोचपावत्‍या, मिळकतीचे फोटो (झेरॉक्‍स), बोअरवेलच्‍या पाण्‍याचा रिपोर्ट, जाबदाराने सदनिका विक्रीसाठी केलेली जाहीरात, नि. 24 ते 31 कडे पुराव्‍याची शपथपत्रे, नि.22 कडे जाबदाराने पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय करुन देणेसाठी अर्ज, नि. 37 सोबत नि. 37/1 कडे कागदपत्रे, नि. 34 कडे लेखी युक्‍तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदारांनी याकामी दाखल केली आहेत.

4.  जाबदाराने प्रस्‍तुत कामी नि. 17 कडे म्‍हणणे/कैफीयत,नि.18 कडे अँफीडेव्‍हीट, नि.32 कडे पुराव्‍याचे शपथपत्र, नि.35 कडे जाबदाराने दाखल केलेले पुराव्‍याचे शपथपत्र, म्‍हणणे, हाच जाबदारांचा लेखी युक्‍तीवाद समजावा म्‍हणून पुरसीस, नि. 37 चे कागदयादीसोबत नि. 37/1 ते नि.37/3 कडे अनुक्रमे नगरपालिकेने जाबदाराला दिलेले पत्र, जाबदार यांनी सातारा नगरपरिषद यांना भोगवटाप्रमाणपत्र मिळणेसाठी केले अर्जाची प्रत, प्रस्‍तुत अर्जावर जाबदाराला नगरपरिषद सातारा यांनी दिलेली पोहोच वगैरे कागदपत्रे जाबदाराने याकामी दाखल केली आहेत.

     जाबदाराने त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. त्‍यांनी प्रस्‍तुत तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदविले आहेत.

I    तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्‍यातील मजकूर मान्‍य व कबूल नाही.

ii दि.20/9/2007 रोजीचे मंजूर बांधकामपत्राप्रमाणे सदर मिळकतीमध्‍ये ‘रुक्मिणी गार्डन’ या इमारत बांधणीचे काम सुरु केले ही बाब जाबदाराला मान्‍य आहे.  परंतू प्रस्‍तुत तक्रारदारानी अर्ज कलम 1 मध्‍ये नमूद केलेल्‍या सर्व सामायीक सुविधांबाबतची केलेली तक्रार व जाबदार यांचे दरम्‍यान झालेल्‍या करारातील नमूद अटी व शर्तीव्‍यतिरिक्‍त इतर सामायीक सुविधा मागणेचा तक्रारदाराला हक्‍क व अधिकार नाही.

 iii  तक्रारदाराला जाबदाराने दोन महिन्‍यात सदनिकेचा ताबा देणेचे कबूल केले होते ही बाब करारपत्रात नमूद नाही असे कोणतेही आश्‍वासन तक्रारदाराला जाबदाराने दिले नव्‍हते.      

Iv  जाबदाराने करारपत्रातील परिशिष्‍ट ‘क’ मध्‍ये नमूद केलेली सर्व कामे तक्रारदाराला पूर्ण करुन दिली आहेत.  या सुविधांबाबत/दर्जाबाबत तक्रारदाराने ताबा घेतलेनंतर कधीही तक्रारी केलेल्‍या नाहीत.  सदर सदनिकांचा  ताबा जाबदाराने तक्रारदार यांना जानेवारी, 2012 पूर्वीच दिले आहेत व तक्रारदाराने प्रस्‍तुत सदनिकेतील सुविधा/बांधकामाबद्दल तसेच सामायीक सुविधांबाबत तक्रार ही जुलै,2014 मध्‍ये तक्रार अर्जात केली आहे.  त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रारीस मुदतीची बाधा येते.

V  जाबदाराने तक्रारदाराचे सदनिकेचे बांधकाम व दिलेल्‍या सुविधा योग्‍य व चांगल्‍या दर्जाचे केले होते.  प्रस्‍तुत तक्रार अर्जात तक्रारदाराने केलेल्‍या निकृष्‍ठ दर्जाच्‍या बांधकामाबाबत व निकृष्‍ठ सुविधा पुरविलेबाबत केले कथनाचे पृष्‍ठयर्थ तक्रारदाराने बांधकामातील तज्ञ व्‍यक्‍तीचा पुरावा याकामी सादर केलेला नाही.  जाबदाराने नगरपरिषद,सातारा यांचे मंजूर आराखडयाप्रमाणे तसेच संबंधीत आर.सी.सी. डिझाईनर, आर्कीटेक्‍चर यांचे सल्‍ल्‍याप्रमाणे प्रस्‍तुत सदनिकांचे बांधकाम पूर्ण केले आहे तसे दाखले सदर जाबदार यांना तज्ञ व्‍यक्‍तीनी दिले आहेत.  यावरुन जाबदाराने केलेले सदनिकांचे बांधकाम हे निकृष्‍ठ दर्जाचे होते  हे शाबीत होते.

Vi  वास्‍तविक जाबदाराला  सातारा नगरपरिषद यांनी प्रारंभ प्रमाणपत्र दिले होते.  त्‍याप्रमाणे जाबदाराने सि.स.नं.81 मध्‍ये नियोजीत ‘रुक्मिणी गार्डन’ या मंजूर आराखडयाप्रमाणे चांगल्‍या दर्जाचे केले आहे.  मात्र प्रस्‍तुत इमारतीचा पूर्णत्‍वाचा दाखला मिळताना सदर ग्रामपंचायतीने सि.स.नं. 81 चे मिळकतीस लागून असलेल्‍या दरे बुद्रुक ग्रामपंचायतीमधील लहान मुलांसाठी बगीचा करुन देणार होते व तशी बाब श्री. पेंडसे यांनी करुन दिली नाही अशी तक्रार संबंधित ग्रामपंचायतीने केली व त्‍यांचे एकूण नगरपरिषदेने जाबदाराला पूर्णत्‍वाचा दाखला देण्‍यास टाळाटाळ केली आहे.  त्‍यानंतर वेळोवेळी पूर्वत्‍वाचा दाखला मिळाणेसाठी सतारा नगरपरिषद यांचेकडे लेखी तक्रार अर्ज केले असता सातारा नगरपरिषदेने कोण‍तीही दखल घेतली नव्‍हती व नाही व पूर्णत्‍वाचा दाखला मिळल्‍याशिवाय खरेदीपत्र व पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय करुन देता येत नसलेने दिलेली नाही.  मात्र तक्रारदाराचे नुकसान होऊ नये म्‍हणून पूर्णत्‍वाचा दाखला न मिळताच तक्रारदाराला जानेवारी,2012 पूर्वीच सदनिकेचा ताबा वस्‍तुस्थितीची कल्‍पना देऊन दिलेला आहे.  तसेच जाबदाराने तक्रारदाराला माणूसकीच्‍या नात्‍याने पिण्‍याच्‍या पाण्‍याचे नळ      शेजा-यांकडून पाणी कनेक्‍शन दिले आहे.   त्‍याप्रमाणे तक्रारदार त्‍यांचे सदनिकेचा व पिण्‍याच्‍या पाण्‍याचा वापर करत आहेत.

Vii   लाईट फिटींगचे साहीत्‍य खराब वापरलेमुळे व त्‍यामुळे इलेक्‍ट्रॉनीक्‍स वस्‍तुंचे नुकसान झालेबाबत कोणताही पुरावा तक्रारदाराने याकामी दाखल केलेला नाही त्‍यामुळे तक्रार अर्ज फेटाळणेत यावा.

Viii  तक्रारदार यांना वापरणेसाठीच्‍या पाण्‍यासाठी बोअरवेलची सोय जाबदाराने करुन दिली आहे. त्‍याचा मेटनन्‍स चांगल्‍याप्रकारे ठेवण्‍याची जबाबदारी तक्रारदाराची होती व आहे.  त्‍यामुळे वापराच्‍या पाण्‍याबाबतची मागणी तक्रारदार करु शकत नाहीत, ती जाबदाराने पूर्ण केली आहे.  वास्‍तवीक तक्रारदार कथन करतात त्‍याप्रमाणे पार्कींगमध्‍ये पेवर ब्‍लॉक, सुरक्षा गेट, गार्डन व कंपाऊंड वॉल इ. सुविधा देण्‍याचे जाबदाराने कधीही कबूल केलेले नाही व नव्‍हते.  तसेच या बाबी करारामध्‍ये नमूद नसल्‍याने तक्रारदार यांना अनुषंगिक कोणतीही तक्रार करता येणार नाही.  सबब तक्रार अर्ज फेटाळणेत यावा.

Ix   प्रस्‍तुत ‘रुक्मिणी गार्डन’ अपार्टमेंटचा पूर्णत्‍वाचा दाखला हा नगरपालीकेकडून काही तांत्रिक अडचणींमुळे मिळालेले नसलेने प्रस्‍तुत सदनिकांचे खरेदीपत्र करुन देणे व सोसायटी स्‍थापन करणे अशक्‍य झालेने ते जाबदाराने करुन दिलेले नाही.  मात्र लवकरच इमारतीचा पूर्णत्‍वाचा दाखला मिळवून तक्रारदाराना खरेदीपत्रे करुन देणेस जाबदार तयार असून खरेदीपत्राचे वेळीच सोसायटी स्‍थापन करुन देणेस जाबदार तयार आहेत.

   त्‍यामुळे याकामी जाबदाराने तक्रारदाराला कोणतीही सेवात्रुटी दिलेली नाही.  सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्‍हणणे/कैफीयत जाबदाराने प्रस्‍तुत कामी दाखल केली आहे.

5.  वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्‍तुत तक्रार अर्जाच्‍या निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.

अ.क्र.               मुद्दा                         उत्‍तर

1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय?                   होय.

2. जाबदाराने तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे काय?       होय.

3. तक्रारदार हे जाबदारकडून त्‍यांचे सदनिकांचे खरेदीपत्र करुन

   मागणेस पात्र आहेत काय?                                होय.                  

4. अंतिम आदेश?                                   खालील आदेशात  

                                                  नमूद केलेप्रमाणे

विवेचन-

6.   वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदारांनी जाबदार यांचे ‘रुक्मिणी गार्डन’ सि.स.नं. 81, चिमणपुरा पेठ, सातारा, जि.सातारा या ए.बी.सी. विंगमधील निरनिराळया अपार्टमेंटमधील अनुक्रमे फ्लॅट नं.जी-2/डी, ’डी’ विंग, तळमजला, याचे क्षेत्र 602.99 चौ.फूट म्‍हणजेच 56.03 चौ.मी., जी-1/ई, ’ई’ विंग, तळमजला, याचे क्षेत्र 659.26 चौ.फूट, एफ-2/डी, ’डी’ विंग, पहिलामजला, याचे 598.92 चौ.फूट, म्‍हणजेच 55.66, एफ-4/सी, ’सी’ विंग, पहिला मजला, याचे क्षेत्र 608.24 चौ.फूट म्‍हणजेच 56.52 चौ.मी., एस-1/सी, ’सी’ विंग, दुसरा मजला, याचे क्षेत्र 414.71 चौ.फूट म्‍हणजेच 38.54 चौ.मी., एसटी-1/डी, ’डी’ विंग, स्‍टील्‍ट फ्लोअर, याचे क्षेत्र 590.30 चौ.फूट म्‍हणजेच 54.86 चौ.मी., एस-3/सी, ’सी’ विंग, दुसरा मजला, याचे क्षेत्र 574.19 चौ.फूट म्‍हणजेच 53.36 चौ.मी., जी-2/सी, ’सी’ विंग, तळमजला, याचे क्षेत्र 578.24 चौ.फूट म्‍हणजेच 53.74 चौ.मी., एसटी-1/सी, ’सी’ विंग, स्‍टील्‍ट मजला, याचे क्षेत्र 574.19 चौ.फूट म्‍हणजेच 53.36 चौ.मी. अशा सदनिका खरेदी करणेसाठीचे करारनामे जाबदारांबरोबर तक्रारदारांनी वेगवेगळया तारखांना केलेले आहेत.  त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रारदार यांनी करारातील नमूद रक्‍कम जाबदारांला अदा केली आहे.  सबब तक्रारदार व जाबदार यांचेदरम्‍यान ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते अस्तित्‍वात आहे हे निर्विवाद सत्‍य आहे.  कारण प्रस्‍तुत बाब  जाबदारानेही मान्‍य केली आहे. त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर होकारार्थी दिले आहे.

7.  वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.  कारण- तक्रारदारांनी जाबदाराचे ‘रुक्मिणी गार्डन’ सि.स.नं.81, चिमणपुरा पेठ, सातारा, जि.सातारा या ए.बी.सी. विंगमधील निरनिराळया अपार्टमेंटमधील अनुक्रमे फ्लॅट नं.जी-2/डी, ’डी’ विंग, तळमजला, याचे क्षेत्र 602.99 चौ.फूट म्‍हणजेच 56.03 चौ.मी., जी-1/ई, ’ई’ विंग, तळमजला, याचे क्षेत्र 659.26 चौ.फूट, एफ-2/डी, ’डी’ विंग, पहिलामजला, याचे 598.92 चौ.फूट, म्‍हणजेच 55.66, एफ-4/सी, ’सी’ विंग, पहिला मजला, याचे क्षेत्र 608.24 चौ.फूट म्‍हणजेच 56.52 चौ.मी., एस-1/सी, ’सी’ विंग, दुसरा मजला, याचे क्षेत्र 414.71 चौ.फूट म्‍हणजेच 38.54 चौ.मी., एसटी-1/डी, ’डी’ विंग, स्‍टील्‍ट फ्लोअर, याचे क्षेत्र 590.30 चौ.फूट म्‍हणजेच 54.86 चौ.मी., एस-3/सी, ’सी’ विंग, दुसरा मजला, याचे क्षेत्र 574.19 चौ.फूट म्‍हणजेच 53.36 चौ.मी., जी-2/सी, ’सी’ विंग, तळमजला, याचे क्षेत्र 578.24 चौ.फूट म्‍हणजेच 53.74 चौ.मी., एसटी-1/सी, ’सी’ विंग, स्‍टील्‍ट मजला, याचे क्षेत्र 574.19 चौ.फूट म्‍हणजेच 53.36 चौ.मी. अशा सदनिका खरेदी करणेसाठीचे करारनामे जाबदारांबरोबर तक्रारदारांनी वेगवेगळया तारखांना केले आहेत.  प्रस्‍तुत करारनाम्‍यात ठरलेली सर्व रक्‍कम तक्रारदारांनी जाबदार यांना अदा केली आहे.  “करारात ठरलेप्रमाणे जाबदाराने तक्रारदारांना ज्‍या सुविधा पुरविण्‍याचे मान्‍य व कबूल केले होते त्‍या पुरविल्‍या नाहीत व ज्‍या सुविधा पुरविल्‍या आहेत त्‍या करीता वापरलेले साहीत्‍य अतिशय निकृष्‍ठ दर्जाचे वापरले आहे. तसेच कामाचा दर्जा अत्‍यंत खालावलेला आहे, बांधकामास ठिकठिकाणी तडे गेले आहेत, सदर मिळकतीचे संपूर्ण लाईट फिटींग निकृष्‍ठ दर्जाच्‍या साहीत्‍यामळे सहा महीन्‍यातच खराब झाले त्‍यामुळे तक्रारदारारचे घरातील मौल्‍यवान इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तूंचे व साधनांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.”  या तक्रारी तक्रारदाराने तक्रार अर्जात मांडलेल्‍या आहेत.  परंतू, प्रस्‍तुत बाबी सिध्‍द करणेसाठी तक्रारदाराने कोणत्‍याही तज्ञ व्‍यक्‍तीचा अहवाल, अथवा कोणताहि पुरावा  प्रस्‍तुत बाबींच्‍या शाबीतींसाठी मे मंचात दाखल केलेला नाही.  तसेच वैयक्तिक सुविधांबरोबरच जाबदाराने तक्रारदाराला देऊ केलेल्‍या इतर सुविधा म्‍हणजेच पार्कींगमधील पेपरब्‍लॉक, सुरक्षा गेट, गार्डन, कंपाऊंड वॉल वगैरे सुविधा देणेचे जाबदाराने मान्‍य केलेचे करारपत्रावरुन शाबीत होत नाही याची नोंद करारपत्रात नमूद नाही.  तसेच प्रस्‍तुत सुविधा पुरविण्‍याचे जाबदाराने मान्‍य केले होते ही बाब तक्रारदाराने शाबीत केलेली नाही.  सबब प्रस्‍तुत सुविधा तक्रारदार जाबदार यांचेकडून पूर्ण करुन मागू शकत नाही.  तसेच वापराच्‍या पाण्‍यासाठी जाबदाराने तक्रारदाराला सदर अपार्टमेंटमध्‍ये बोअरवेल मारुन दिले असून प्रस्‍तुत बोअरवेलला पाणीही भरपूर असलेचे दाखल फोटोग्राफ्सवरुन स्‍पष्‍ट होते.  त्‍यामुळे वापराच्‍या पाण्‍याची सोय जाबदाराने पुरविली आहे हे स्‍पष्‍ट होते.  तसेच तक्रारदार यांचे सदनिकांमध्‍ये दिलेल्‍या सर्व सुविधांबाबत तक्रारदार यांनी जानेवारी, 2012 पूर्वी ताबा मिळूनसुध्‍दा जुलै,2014 अखेर कोणतीही तक्रार नव्‍हती व केलेली नाही.  जर प्रस्‍तुत पुरविण्‍यात आले सुविधंमध्‍ये दोष असता तर तक्रारदाराने ताबा घेतल्‍याबरोबर तक्रारी करणे आवश्‍यक व स्‍वाभाविक होते.  परंतू तसे झालेले नाही.  तसेच प्रस्‍तुत सुविधा सदोष असलेबाबत, निकृष्‍ठ दर्जा असलेबाबत तक्रारदाराने कोणत्‍याही तज्ञ व्‍यक्‍तीचा अहवाल, कोणताही लेखी तोंडी पुरावा मे. मंचात सादर केलेला नाही.  त्‍यामुळे या बाबी तक्रारदार सिध्‍द करु शकलेले नाहीत.  मात्र जाबदाराने तक्रारदाराचे सदनिकांमध्‍ये पिण्‍याच्‍या पाण्‍याचे नळकनेक्‍शन घेऊन देणे ही अत्‍यावश्‍यक बाब आहे.  ती जाबदाराने तक्रारदार यांचे सदनिकांमध्‍ये पुरविणे आवश्‍यक आहे.  तसेच तक्रारदाराचे सदनिकांचे खरेदीपत्र करुन देणे, डिड ऑफ डिक्‍लरेशन करुन देणे बांधकाम पूर्णत्‍वाचा दाखला मिळवणे व पिण्‍याच्‍या पाण्‍याची सुविधा नळ/कनेक्‍शन तक्रारदाराला उपलब्‍ध करुन देणे अशा सुविधा तक्रारदारांना जाबदाराने पुरविणे बंधनकारक होते व आहे.  मात्र जाबदाराने तक्रारदार यांना पिण्‍याचे पाण्‍याची सदनिकांमध्‍ये स्‍वतंत्र नळकनेक्‍शन दिले नाही.  त्‍याचप्रमाणे डिड ऑफ डिक्‍लरेशन तसेच सदनिकांचे खरेदीपत्र करुन दिलेले नाही. सवव प्रस्‍तुत जाबदाराने सदर तक्रारदार यांना या बाबतीत सदोष सेवा पुरविली आहे हे स्‍पष्‍ट होते. मध्‍ये  त्‍यामुळे मुद्दा क्र. 2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

8.    वर नमूद मुद्दा क्र.3 चे उत्‍तर नकारार्थी दिले आहे.  कारण-  तक्रारदार यांना जाबदाराने त्‍यांचे सदनिकाधारकांची सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्‍थापन करुन देणे, बांधकाम पूर्णत्‍वाचा दाखला मिळवून देणे, पिण्‍याच्‍या पाण्‍याचे कनेक्‍शन देणे, डिड ऑफ डिक्‍लरेशन करुन देणे व नोंदणीकृत खरेदीपत्र करुन देणे कायदेशीर होणार असून तक्रारदार या बाबी म्‍हणजेच डिड ऑफ डिक्‍लेरेशन, बांधकाम पूर्णत्‍वाचा दाखला, खरेदीपत्र व पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी नळ कनेक्‍शन या बाबी जाबदार यांचेकडून पूर्ण होऊन मिळावेत पात्र आहेत असे आमचे स्‍पष्‍ट मत आह.  सबब मुद्दा क्र. 3 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिलेले आहे.

    

       सबब वरील सर्व कागदपत्रे, तक्रारदार व जाबदारांची पुराव्‍याची शपथपत्रे, लेखी व तोंडी युक्‍तीवाद यांचा उहापोह करता प्रस्‍तुत कामी तक्रारदार हे ज्‍या बाबी/सुविधा जाबदाराने करारपत्रान्‍वये पुरविण्‍याचे मान्‍य व कबूल केले होते त्‍याच बाबी जाबदारांकडून पूर्ण करुन मागू शकतात.  तसेच तक्रारदाराने उल्‍लेख केलेल्‍या निकृष्‍ठ दर्जाच्‍या सुविधा पुरविलेबाबतचा कोणताही तज्ञांचा अहवाल अथवा लेखी तोंडी पुरावा तक्रारदाराने याकामी सादर केलेला नाही.  वापराच्‍या पाण्‍यासाठी जाबदाराने बोअरवेल मारुन दिलेचे सिध्‍द झाले आहे.  सबब प्रस्‍तुत कामी तक्रारदार जाबदार यांचेकडून फक्‍त पिण्‍याच्‍या पाण्‍याचे नळ कनेक्‍शन, बांधकाम पूर्णत्‍वाचा दाखला, डिड ऑफ डिक्‍लेरेशन, सदनिकाधारकांची गृहनिर्माण सहकारी सोसायटी स्‍थापन करणे, तसेच खरेदीपत्र करुन देणे एवढयाच बाबी पूर्ण करुन मिळणेस पात्र आहेत असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे. व प्रस्‍तुत बाबी जाबदार यांचेकडून तक्रारदाराला पूर्ण करुन मिळणे न्‍यायोचीत होणार आहे

9.   सबब प्रस्‍तुत कामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.   

आदेश

1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज खर्चासह अंशतः मंजूर करणेत येतो.

2. तक्रारदार यांचे सदनिकंमध्‍ये जाबदाराने पिण्‍याचे पाण्‍याचे कनेक्‍शन त्‍वरीत

   जोडून द्यावे.

3. जाबदाराने बांधकाम पूर्णत्‍वाचा दाखला घेवून/मिळवून डिड ऑफ डिक्‍लेरेशन

   करुन द्यावे, सदनिकाधारकांची गृहनिर्माण सोसायटी स्‍थापन करावी.

4.  जाबदार यांनी तक्रारदार यांचे सदनिकांचे खूषखरेदीपत्र करुन द्यावे.

5.  प्रस्‍तुत अर्जाचा खर्च म्‍हणून तक्रारदार यांना जाबदार यांनी प्रत्‍येकी रक्‍कम

    रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) अदा करावेत.

6. वरील सर्व आदेशांची पूर्तता जाबदाराने आदेश पारीत झाले तारखेपासून 45

   दिवसात करावी.

7. विहीत मुदतीत आदेशाचे पालन जाबदार यांनी न केलेस तक्रारदार

   यांना जाबदारांविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 प्रमाणे कारवाई

   करणेची मुभा राहील.

8. सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

9. सदर न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

 

ठिकाण- सातारा.

दि. 28-10-2015.

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

         सदस्‍या          सदस्‍य           अध्‍यक्षा

         जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

 

 

 

 

 
 
[HON'BLE MRS. SAVITA BHOSALE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR]
MEMBER
 
[ HON'BLE MRS.SUREKHA HAJARE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.