नि.10 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 46/2011 नोंदणी तारीख – 11/03/2011 निकाल तारीख – 08/07/2011 निकाल कालावधी – 119 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ 1. श्री सुधाकर जयराम कदम 2. कु.मिलिंद सुधाकर कदम 3. कु. मिथुन सुधाकर कदम नं.2 ते 3 तर्फे अ.पा.क. अर्जदार नं.1 सर्व रा. शिंगणापूर ता.माण जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता सौ एम.व्ही.कुलकर्णी) विरुध्द 1. श्री माणिकराव पवार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था सरडे ता.फलटण तर्फे चेअरमन सौ अलका शिरीष पवार 2. श्री माणिकराव पवार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था सरडे ता.फलटण तर्फे व्यवस्थापक/सचिव, श्री संतोष सिताराम पवार नं.1 व 2 रा. मुख्य कार्यालय, माणिक कॉम्प्लेक्स, रविवार पेठ, फलटण जि. सातारा ----- जाबदार न्यायनिर्णय 1. अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेत वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा दामदुप्पट मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. ठेवींची मुदत संपल्यानंतर अर्जदार यांनी ठेव रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम परत दिली नाही. सबब दामदुप्पट ठेव रक्कम व्याजासह मिळावी, तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र. 1 व 2 यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी झालेनंतर ते मे. मंचासमोर हजर झाले. परंतु नेमलेल्या तारखेस त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द म्हणणे दाखल नाही असा आदेश करण्यात आला. 3. अर्जदार यांनी नि.1 सोबत नि.2 कडे शपथपत्र दाखल केले असून नि. 5 सोबत नि.5/1 ते 5/3 कडे ठेव पावत्यांच्या मूळ प्रती दाखल केल्या आहेत. प्रस्तुत ठेव पावतींचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी जाबदार संस्थेत ठेव ठेवलेचे स्पष्ट होते. तसेच प्रस्तुत ठेवींची मुदत संपलेचेही स्पष्ट दिसत आहे. सबब, नि. 2 कडील अर्जदार यांचे शपथपत्र व ठेव रक्कम मागणीबाबतची अर्जदार यांनी जाबदार यांना पाठविलेली पत्रे पाहिली असता अर्जदार यांनी ठेव रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्पष्ट दिसते. सबब ठेवीची मुदत संपलेनंतर अर्जदारने वेळोवेळी ठेव रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी ठेव रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत आहे. सबब जाबदारने अर्जदारच्या प्रस्तुत तक्रारीतील फेरिस्त नि. 5 सोबतच्या नि.5/1 ते 5/3 कडील ठेवींच्या रकमा पावत्यांवरील नमूद व्याजासह द्यावी व ठेवीची मुदत संपलेनंतर संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने होणा-या व्याजासह द्याव्यात या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 4. एक गोष्ट नमूद करणे जरुरीचे आहे की, जाबदार क्र.2 श्री माणिकराव पवार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था सरडे ता.फलटण तर्फे चेअरमन आहेत. अशा या जबाबदारीच्या पदावर काम करणा-या व्यक्तीने प्रस्तुतचे कायदेशीर प्रकरणाची नोटीस/सुचना स्विकारणे व नेमलेल्या तारखांना या मंचासमोर हजर होणे, म्हणणे दाखल करणे हे जरुरीचे होते. तथापि, कसलेही संयुक्तिक कारण जाबदार क्र.1 यांचेतर्फे याकामी पुढे येत नाही की, जेणेकरुन जाबदार क्र. 1 हे याकामी गैरहजर राहीलेले आहेत. जाबदार यांनी अर्जदार यांचे अर्जातील कथनानुसार अर्जदार यांनी विनंती कलमामध्ये केलेली विनंती अंशतः मान्य करणे जरुरीचे आहे. 5. सर्व कारणांस्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करणेत येत आहेत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार क्र. 1 व 2 यांनी स्वतंत्र व संयुक्तरित्या अर्जदार यांना त्यांची ठेव पावती क्र. 1115, 1116 व 1117 कडील देय झालेली दामदुप्पट रक्कम ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावी. 3. जाबदार यांनी मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना रक्कम रु. 5,000/- द्यावी. 4. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि.08/07/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |