ग्राहक तक्रार अर्ज क्र.254/2011 ग्राहक तक्रार अर्ज दाखल दि.24/11/2011 अंतीम आदेश दि.31/01/2012 नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नाशिक 1. श्री.संदिप सुभाष भावसार, तक्रारदार 2. सौ.योगिता संदिप भावसार, (अँड.व्ही.एम.लोणारी) दोघ रा.रो हाऊस क्र.3, दिपलक्ष्मी रो हाऊसेस, सिमन्स कॉलनी समोर, इंदिरा नगर, नाशिक. विरुध्द 1. श्री.मंगलचंद दगडुराम साखला, सामनेवाला 2. श्री.नंदकिशोर मंगलचंद साखला, (एकतर्फा) 3. श्री.प्रकाश बन्सीलाल भटेवरा. 4. श्री.सुभाष बन्सीलाल भटेवरा, 5. श्री.सुरेश बन्सीलाल भटेवरा, 6. श्री.प्रशांत कुमार प्रकाश भटेवरा, 7. श्री.पंकजकुमार प्रकाश भटेवरा, 8. मे.धर्मनाथ डेव्हलपर्स, तर्फे भागीदार श्री.महेश नानकराम चावला, 9. सौ.हंसाबेन रघुभाई गांगडीया, रा.फ्लॅट नं.7, मयुरी अपार्टमेंट, उत्तमनगर, अंबड-लिंक रोड, नाशिक. नं.1 ते 8 यांची नोटीस नं.9 (नं.1 ते 8 यांचे मुखत्यार) यांचेवर बजविण्यात यावी. (मा.अध्यक्ष, श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र अर्जदार यांना दिपलक्ष्मी रो हाऊस नं.3 यांचे डिड ऑफ अपार्टमेंट/खरेदी सामनेवाला क्र.9 ने लिहून व नोंदवून द्यावा, सदर रो हाऊसचे पाणी कनेक्शन व घरपट्टी नावावर करुन घेण्याकरीता अर्जदार यांना करावा लागलेला खर्च व त्याकामी लागलेला दंडापोटी रक्कम रु.5000/- मिळावेत, सामनेवाला क्र.9 यांचेकडून सोसावे तक्रार क्र.254/2011 लागलेले मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- मिळावेत व इतर न्यायाचे हुकूम व्हावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. सामनेवाला क्र.9 हे सामनेवाला क्र.1 ते 8 यांचे मुखत्यार आहेत. त्यांनी मंचाची नोटीस स्विकारली नाही म्हणून त्यांचेविरुध्द दि.04/01/2012 रोजी एकतर्फा आदेश करण्यात आले. अर्जदार यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार करुन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतले आहेत. मुद्देः 1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय 2) अर्जदार यांचा तक्रार अर्ज मुदतीत दाखल आहे काय?- होय. 3) अर्जदार हे सामनेवाला क्र.9 यांचेकडून रो हाऊस नं.3 बाबत डिड ऑफ अपार्टमेंट/खरेदी लिहून व नोंदवून मिळणेस पात्र आहेत काय?-होय 4) अर्जदार हे सामनेवाला क्र.9 यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?-होय 5) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.9 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे व अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1 ते 8 यांचेविरुध्द नामंजूर करण्यात येत आहे. विवेचन या कामी अर्जदार यांचे वतीने युक्तीवाद करण्यात आलेला नाही. अर्जदार यांनी पान क्र.7 लगत 5 फेब्रुवारी 2008 रोजीचे अँग्रीमेंट ऑफ सेल ची झेरॉक्स प्रत, पान क्र.17 व पान क्र.18 लगत रक्कम भरल्याची पावतींची झेरॉक्स प्रत हजर केलेली आहे. पान क्र.7, पान क्र.17 व पान क्र.18 लगतचे कागदपत्रे सामनेवाला यांनी नाकारलेली नाहीत. पान क्र.7 लगतचे अँग्रीमेंट ऑफ सेल व पान क्र.17 व पान क्र.18 लगतच्या रक्कम भरल्याच्या पावत्या यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.9 यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी प्रस्तुतचा तक्रार अर्ज या मंचासमोर दि.16/11/2011 रोजी दाखल केलेला आहे. अर्जदार व सामनेवाला यांचेमधील करारपत्र दि.05/02/2008 रोजी झालेले आहे. तेथून पुढे दोन वर्षाचे आत म्हणजे दि.04/02/2010 रोजी किंवा त्यापुर्वी अर्जदार यांनी तक्रार अर्ज दाखल करणे गरजेचे होते. परंतु या कामी अर्जदार यांनी पान क्र.1 लगत विलंब माफी अर्ज, पान क्र.2 लगत प्रतिज्ञापत्र दाखल तक्रार क्र.254/2011 केलेले आहे. पान क्र.1 चे विलंब माफी अर्जातील कारणे व पान क्र.2 चे प्रतिज्ञापत्राचा विचार होवुन अर्जदार यांचा विलंब माफी अर्ज दि.24/11/2011 रोजी मंजूर करण्यात आलेला आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार यांचा तक्रार अर्ज मुदतीत दाखल आहे असे या मंचाचे मत आहे. याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्राचा आधार घेतलेला आहे. मा.राज्य आयोग मुंबई यांचे समोरील प्रथम अपील क्र.544/10 निकाल ता.28/06/2011 सुर्यभान वामन गायकवाड नाशिक विरुध्द माणिक केदा मगर नाशिक. पान क्र.7 चे अँग्रीमेंट ऑफ सेल याचा विचार होता अर्जदार व सामनेवाला यांचेमध्ये रो हाऊस क्र.3 खरेदी विक्री करण्याबाबत व्यवहार ठरलेला आहे व त्याप्रमाणे अर्जदार यांनी सामनेवाला यांना पान क्र.17 चे पावतीनुसार दि.05/02/2008 रोजी रु.10,000/- व पान क्र.18 चे पावतीनुसार रु.1,35,000/- अशी रक्कम दिलेली आहे हे स्पष्ट होत आहे. अर्जदार यांचेकडून अद्याप कोणतीही रक्कम येणे आहे याबाबत सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे मांडलेले नाही. तसेच सामनेवाला यांनी अर्जदार यांना रो हाऊस नं.3 चे अंतीम खरेदीपत्र किंवा डिड ऑफ अपार्टमेंटही लिहून दिलेले नाही असे दिसून येत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला क्र.9 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी तक्रार अर्ज विनंती कलम 13 मध्ये सामनेवाला क्र.9 यांचेकडूनच संपुर्ण मागणी केलेली आहे. सामनेवाला क्र.9 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे तसेच सामनेवाला क्र.9 यांनी अर्जदार यांना अंतीम खरेदीपत्र किंवा डिड ऑफ अपार्टमेंटही लिहून दिलेले नाही. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.9 यांचेकडून रो हाऊस क्र.3 या मिळकतीचे अंतीम खरेदीपत्र किंवा डीड ऑफ अपार्टमेंट लिहून व नोंदवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला क्र.9 यांचेकडून रो हाऊस क्र.3 चे डिड ऑफ अपार्टमेंट लिहून व नोंदवून मिळावे या मागणीसाठी अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचासमोर दाद मागावी लागली आहे. वरील सर्व कारणामुळे निश्चीतपणे अर्जदार यांना तक्रार क्र.254/2011 मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.9 यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.1000/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे व वरील सर्व विवेचन याचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत. आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.9 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2) आजपासून 30 दिवसांचे आत सामनेवाला क्र.9 यांचेकडून अर्जदार यांना रो हाऊस क्र.3 चे अंतीम खरेदीपत्र किंवा डिड ऑफ अपार्टमेंट लिहून व नोंदवून द्यावे. 3) आजपासून 30 दिवसांचे आत सामनेवाला क्र.9 यांनी अर्जदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- द्यावेत. 4) आजपासून 30 दिवसांचे आत सामनेवाला क्र.9 यांनी अर्जदार यांना अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.1000/- द्यावेत. (आर.एस. पैलवान) (अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी) अध्यक्ष सदस्या ठिकाणः- नाशिक. दिनांकः-31/01/2012 |