जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 103/2012 तक्रार दाखल तारीख –14/05/2011
1. कोंडीराम बाजीराव कदम
2. बलभिम नामदेव मिसाळ
3. शिवाजी आनंद मिसाळ
4. परमेश्वर बन्सी नेमाने
5. भागवत पाराजी नेमाणे
6. सुरेश माणिक नेमाणे
7. राजाराम माणिक नेमाणे
8. बाजीराव कलाजी नेमाणे
9. पोपट आश्रु वराट
10. दादासाहेब भगवान वराट
सर्व राहणार साकत ता.पाटोदा जि.बीड. .तक्रारदार
रा.साठेवाडी ता.गेवराई जि.बीड
विरुध्द
1. श्री मनन पांडे
वय सज्ञान धंदा शेतकी अधिकारी. सामनेवाला
2. श्री अरुण श्रीनिवास
वय सज्ञान धंदा शेतकी अधिकारी
3. श्री.आर.जी.पाटील,
वय सज्ञान धंदा केन ऑफिसर
4. श्री.डी.बी.नाईकनवरे
वय सज्ञान धंदा केन ऑफिसर
सर्व राहणार जय महेश शुगर इंडस्ट्रीज लि.पवारवाडी
ता.माजलगांव जि.बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.आर.एम.बन
सामनेवाला क्र.1 ते 4 तर्फे ः-कोणीही हजर नाही.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांनी सामनेवाले विरुध्द दूस-या आणि तिस-या हप्त्याची बिलाची संपूर्ण रक्कम दिली नाही या कारणास्तव तक्रारदार क्र.1 ते 10 यांनी सदरची एकत्रित तक्रार दाखल केली आहे.
या संदर्भात तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.बन यांचा प्राथमिक मुददयावर यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी जय महेश शुगर इंडस्ट्रीज लि. पवारवाडी ता.माजलगांव या कारखान्यात ऊस विकला आहे व सदर ऊसाच्या पहिल्या हप्त्याच्या बिलाची रक्कम त्यांना मिळाली आहे. दुस-या व तिस-या हप्त्याची रक्कम त्यांना मिळाली नाही. त्या बाबतची सदरची तक्रार आहे. तक्रारदारांनी कारखान्याला ऊस विकला त्यामुळे ते ग्राहक संरक्षण कायदयातील ग्राहक या संज्ञेत येत नाहीत. त्यामुळे सदरची तक्रार न्याय मंचात चालू शकत नाही.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. सदरची तक्रार योग्य त्या न्यायालयात दाखल करण्याची परवानगी
देऊन निकाली करण्यात येत आहे.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड