Maharashtra

Gadchiroli

CC/08/14

Smt. Vasuda Vashantrao Somankar - Complainant(s)

Versus

Shri mahesh Giradkar - Opp.Party(s)

26 Jun 2009

ORDER

 
Complaint Case No. CC/08/14
 
1. Smt. Vasuda Vashantrao Somankar
Kotgal road MIDC ,near rest house Navegaon Gadchiroli
Gadchiroli
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Shri mahesh Giradkar
C/ O Mahakali services Behind Chandak medical Jatpuragate Chandrapur.
Chandrapur.
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE Shri. A. N. Kamble PRESIDENT
 HONORABLE Shri. R. L. Bombidwar Member
 HONORABLE Smt. M. J. Bhilkar Member
 
PRESENT:
 
ORDER

 (मंचाचे निर्णयान्‍वये, अनिल एन. कांबळे, अध्‍यक्ष,प्रभारी)

(पारीत दिनांक : 26 जुन 2009)

                                      

1.        अर्जदाराने, सदरची तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे तरतुदी अंतर्गत गैरअर्जदाराचे विरुध्‍द दाखल केलेली आहे.  अर्जदाराचे तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणेप्रमाणे.

 

2.       अर्जदाराने, गैरअर्जदारांकडून, 17 फरवरी 2007 ला जी पी-30 आर सी   झेरॉक्‍स मशीन रुपये 53,000/- मध्‍ये विकत घेतली, त्‍या रकमेपैकी अर्जदाराने, गैरअर्जदारास रुपये 44,000/- दिले.  अर्जदारास मशीनची डिलीव्‍हरी दिल्‍यानंतर मशीन सुरु झाली नाही.  त्‍यामुळे, अर्जदाराने, गैरअर्जदारास कळविले, गैरअर्जदार यांनी मशीन सुरु करुन दिली नाही.  अर्जदाराकडे मशीन बंद अवस्‍थेत ठेवली असतांना, त्‍यातील

                           ... 2 ...                       ग्रा.त.क्र. 14/2008.

 

वायरींग उंदरानी कुरतडली असे गैरअर्जदारास सांगीतले असता, चंद्रपूरला मशीन आणून द्या असे सांगीतले.  त्‍याप्रमाणे, ऑक्‍टोंबर-2007 मध्‍ये किरायाची गाडी करुन झेरॉक्‍स मशीन गैरअर्जदाराकडे चंद्रपूरला पोहचवून दिली.  गैरअर्जदाराने, तेंव्‍हपासून अजुनपर्यंत मशीन दिली नाही.  अर्जदाराने, गैरअर्जदाराशी वारंवार भ्रमनध्‍वनीवरुन संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला असता गैरअर्जदाराने फोन घेतला नाही.  गैरअर्जदाराने, अर्जदाराकडून रुपये 44,000/- घेतले, परंतु त्‍यापैकी, रुपये 6,000/- ची पावती दिली नाही.

 

3.          अर्जदाराने, गैरअर्जदारास दिनांक 18/2/2008, 22/4/2008 आणि 20/5/2008 रजिस्‍ट्रर पञ व्‍यवहार केला.  परंतु, गैरअर्जदाराने त्‍याची मुळीच दखल घेतली नाही.  अर्जदारास झेरॉक्‍स मशीनच्‍या खरेदीवेळी ग्‍लोबल इनकार्पोरेशन या नावाने बिल दिला असून, त्‍याचे दुकान सरकारी दवाखान्‍याचे जवळ आहे. 

 

4.          अर्जदाराने, कुंटूंबाचे उदरनिर्वाहाकरीता मदत व्‍हावी, या कारणा करीता झेरॉक्‍स मशीन खरेदी केली.  परंतु, गैरअर्जदारामुळे अर्जदाराचे आर्थिक नुकसान झाले आहे.  अर्जदाराने, आपले तक्रारीत गैरअर्जदारास दिलेली मुद्दल रुपये 44,000/- व त्‍यावर प्रचलीत दरानुसार व्‍याज देण्‍यात यावा.  तसेच, नुकसानभरपाई म्‍हणून रुपये 15,000/- देण्‍यात यावे, अशी मागणी केलेली आहे.

 

5.          अर्जदाराने, आपले तक्रारीसोबत निशाणी 2 नुसार एकुण 6 झेरॉक्‍स दस्‍ताऐवज दाखल केले आहे.  अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारास नोटीस काढण्‍यात आले.  गैरअर्जदार यांनी न्‍यायमंचातून काढलेले नोटीस घेण्‍यास टाळाटाळ केल्‍यामुळे गैरअर्जदारास नोटीस तामील झाला नाही, त्‍याचा रिपोर्ट रेकॉर्डवर जोडलेले आहे.  गैरअर्जदार यांचे विरुध्‍द जाहीर नोटीस वर्तमान पञात प्रकाशीत करण्‍यात आला तेंव्‍हा,  गैरअर्जदार हजर होऊन लेखी बयाण म्‍हणून वकीलाचे सहीने दाखल केला आहे.

 

6.          गैरअर्जदाराने, अर्जदारास तक्रार ही खारीज करण्‍यात यावी, या आशयाचा आपला लेखी बयाण दाखल केला आहे, ते निशाणी 23 वर दाखल आहे.

 

7.          गैरअर्जदाराने, आपले लेखी बयाणात अर्जदाराने 17 फरवरी 2007 ला GP-30 RC झेरॉक्‍स मशीन रुपये 53,000/- मध्‍ये घेतली, त्‍यापैकी रुपये 44,000/- अदा करण्‍यात आले.  गैरअर्जदाराने, खोटे असल्‍यामुळे अमान्‍य केले आहे की, नविन मशीन डिलीवरी करुन दिल्‍यानंतर मशीन सुरु झाली नाही.  मशीन बंद अवस्‍थेत असल्‍यामुळे उंदरानी कुरतळली याची माहिती गैरअर्जदारास दिली.  गैरअर्जदाराने, हे ही म्‍हणणे खोटे असल्‍यामुळे अमान्‍य केले आहे की, मशीन चंद्रपूर येथे आणून मागीतली, त्‍यानुसार ऑक्‍टोंबर-2007 मध्‍ये किरायाची गाडी करुन मशीन चंद्रपूर येथे पोहचवून दिली.  गैरअर्जदाराने, अर्जदाराचे हे ही म्‍हणणे खोटे असल्‍यामुळे अमान्‍य केले आहे की, भ्रमनध्‍वनी वरुन फोन केला असता फोन घेतला नाही.  गैरअर्जदाराने, आपले लेखी

                              ... 3 ...               ग्रा.त.क्र. 14/2008.

 

बयाणात पुढे असेही अमान्‍य केले आहे की, दिनांक 18/2/2008, 22/4/2008, 20/5/2008 ला रजिस्‍ट्रर पञाव्‍दारे पञ व्‍यवहार केला, पण गैरअर्जदाराने स्विकारले नाही.  गैरअर्जदाराने हे ही नाकारले आहे की, मशीन खरेदीचे वेळी ग्‍लोबल इनकार्पोरेशन या नावाने बिल दिले असून, त्‍याचे दूकान सरकारी दवाखान्‍याजवळ होते.  गैरअर्जदाराने हे ही नाकारले आहे की, दूकानाचे ठिकाण बदलवून सध्‍या चांडक मेडीकलच्‍या मागे जटपूरा गेट येथे महाकाली सर्वीसेस या नावाने आहे.  गैरअर्जदाराने आपले लेखी बयाणातील विशेष कथनात असे म्‍हटले आहे की, अर्जदाराशी प्रत्‍यक्षरित्‍या गैरअर्जदारासोबत आजपर्यंत कोणताही व्‍यवहार झालेला नाही.  अर्जदाराने मशीनचा व्‍यवहार ग्‍लोबल इनकार्पोरेशन या व्‍यवस्‍थापनासोबत केला.  गैरअर्जदार या व्‍यवस्‍थापना सोबत फक्‍त कार्यकर्ता म्‍हणून संलग्‍न होता.  याशिवाय गैरअर्जदाराचा सदर व्‍यवस्‍थापनासोबत कोणताही संबंध नाही.  सदर व्‍यवस्‍थापनाला तक्रारीत जोडलेले नसल्‍यामुळे अर्ज खारीज होण्‍यास पाञ आहे.  अर्जदाराने पूर्णतः खोटा, बनावटी अर्ज दाखल करुन स्‍वतःचा खोटेपणा अर्जात मान्‍य केला आहे.  ग्‍लोबल इनकार्पोरेशन यांचे मार्फत व्‍यवस्थित व चालु असलेली मशीन देण्‍यात आली होती व त्‍या मशीनचे अर्जदाराने योग्‍य वेळी रक्‍कम अदा केली होती.  अर्जदाराची मशीन व्‍यवस्थित सुरु असल्‍यामुळे त्‍याची कोणतीही तक्रार नव्‍हती, परंतु अर्जदाराचे, निष्‍काळजीपणामुळे मशीनची उंदरामुळे व इतर कारणांमुळे नासधूस झाली असे अर्जदाराचे म्‍हणण्‍यावरुन निदर्शनास येते.  गैरअर्जदाराने हे ही नाकारले आहे की, त्‍याचे सांगण्‍यावरुन ऑक्‍टोंबर-2007 ला मशीन परत आणण्‍यात आली.  अर्जदाराने मशीन परत केल्‍याची बाब खोटे असल्‍याचे दिसून येते, कारण त्‍याबद्दलचा दस्‍त व पोचपावती दाखल केलेली नाही.  अर्जदाराने, ग्‍लोबल इनकार्पोरेशन सोबत केलेल्‍या पैशाच्‍या व्‍यवहाराचा खोटा हिशोब मंचा समोर दाखल केला आहे.  अर्जदाराने, गैरअर्जदाराशी कोणताही पञ व्‍यवहार केलेला नाही.  अर्जदाराने कोणत्‍यातरी गैरसमजुतीतून, गैरअर्जदाराचे विरुध्‍द खोटी तक्रार दाखल केली आहे व कोणतेही कारण व अधिकार नसतांना बेकायदेशिररित्‍या मामल्‍यात गोवले आहे. 

 

8.          अर्जदारास अर्ज दाखल करण्‍यापूर्वी स्‍पष्‍ट समज दिली होती की, ग्‍लोबल इन कार्पोरेशन सोबत गैरअर्जदाराचा कोणताही संबंध नाही.  ही बाब, लक्षात ठेवूनच, गैरअर्जदाराविरुध्‍द कोणतीही कार्यवाही न करण्‍याचे कबूल केले होते.  सदर फर्मचे मालक पसार होऊन, फर्म बंद झाल्‍यामुळे, अर्जदाराने कोणतेही कारण नसतांना गोवले आहे.  अर्जदारास कोणताही कायदेशिर अधिकार नसतांना जाणीवपूर्वक बेकायदेशिर कृत्‍य केल्‍यामुळे सदर अर्ज खारीज होण्‍यास पाञ आहे.  अर्जाचा खर्च रुपये 3,000/- गैरअर्जदारास मिळणे न्‍यायाचे दृष्‍टीने आवश्‍यक आहे.

 

9.          अर्जदाराने, आपले तक्रारीसोबत दाखल केलेले दस्‍ताऐवज व तक्रारीच्‍या कथना पृष्‍ठयर्थ शपथपञ म्‍हणून, शपथेवर दाखल केलेले तक्रार अर्ज शपथपञ

                              ... 4 ...               ग्रा.त.क्र. 14/2008.

 

समजण्‍यात यावे, या आशयाची पुरसीस निशाणी 27 दाखल केली आहे.  गैरअर्जदाराने निशाणी  26 वर शपथपञ दाखल केले आहे.  अर्जदाराचे वकीलाने निशाणी 28 नुसार आपला लेखी युक्‍तीवाद दाखल केला.  गैरअर्जदारास युक्‍तीवाद करण्‍यास बरीच संधी देऊनही युक्‍तीवाद केला नाही व तसेच, गैरअर्जदार व त्‍याचे वकीलही हजर झाले नाही.  त्‍यामुळे, उपलब्‍ध रेकॉर्डवरुन तक्रार ही गुणदोषावर निकाली काढण्‍यात यावे, असा आदेश पारीत करुन, तक्रार अंतिम निकालाकरीता ठेवण्‍यात आले.  अर्जदार हिने दाखल केलेल्‍या दस्‍ताऐवजावरुन व उपलब्‍ध रेकॉर्डवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

                  मुद्दे                   :  उत्‍तर

 

(1)   गैरअर्जदार यांनी सेवा देण्‍यात ञुटी करुन अनुचीत     :    होकारार्थी.

व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला आहे काय ?

(2)  अर्जदाराची तक्रार मंजुर करण्‍यास पाञ आहे काय ? :  होकारार्थी.

(3)  या तक्रारीचा अंतिम निकाल काय ?              : अंतिम आदेशाप्रमाणे.

 

    // कारण मिमांसा //

 

मुद्दा क्रमांक 1 व 2 :-

 

10.         अर्जदाराने, गैरअर्जदाराकडून GP-30 झेरॉक्‍स मशीन दि. 17/2/2007 ला

रुपये 53,000/- मध्‍ये विकत घेऊन, त्‍याचदिवशी गैरअर्जदारास नगदी रुपये 28,000/- दिले, त्‍याची पावती गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिली, निशाणी 2 वरील यादीनुसार पावती क्र. 606 प्रमाणे दाखल आहे.  सदर पावतीचे अवलोकन केले असता, ग्‍लोबल इन कार्पोरेशन च्‍या नावाची असून GP-30 फोटो कॉपी मशीन बाबत रुपये 28,000/- मिळाल्‍याची नोंद आहे आणि रुपये 25,000/- बाकी असल्‍याचे नमुद आहे.  सदर पावतीवर गैरअर्जदार यांची सही आहे, तसेच गैरअर्जदाराने दिनांक 27/2/2007 ला रुपये 5,000/-, 23/3/2007 ला रुपये 5,000/- घेतल्‍याच्‍या पावत्‍या क्र. 610 व 613 नुसार दिल्‍या, त्‍या रेकॉर्डवर दाखल आहे.  सदर पावत्‍यावर असलेली सही आहे ही गैरअर्जदाराचीच असल्‍याचे या न्‍यायमंचाचे ठाम मत आहे.  अर्जदाराने दाखल केलेल्‍या पावत्‍यावरील सही व गैरअर्जदाराने निशाणी 26 नुसार दाखल केलेल्‍या शपथपञावरील सही, ही समान आहे.  परंतु, गैरअर्जदार आपली जबाबदारी टाळण्‍याकरीता अनुचीत व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब करण्‍याच्‍या हेतुनेच ग्‍लोबल इन कार्पोरेशन यांचेकडून घेतली असून गैरअर्जदार एक कार्यकर्ता म्‍हणून काम करीत होता, असे म्‍हणणे संयुक्‍तीक वाटत नाही.  गैरअर्जदाराच्‍या सह्या हे वकीलपञ, रजिस्‍टर पत्‍ता, शपथपञ आणि अर्जदाराने दाखल केलेल्‍या पावत्‍यावरील सह्या यामध्‍ये तुलना केली असता, समान असल्‍याचे सिध्‍द होत असल्‍यामुळे, गैरअर्जदार यांनीच अर्जदारास झेरॉक्‍स मशीन विकत दिली असून,

 

                              ... 5 ...              ग्रा.त.क्र. 14/2008.

 

त्‍याबाबतची काही रक्‍कम स्विकारली व उर्वरीत रक्‍कम स्विकारण्‍याचे वचन देऊन सुध्‍दा, चांगल्‍या स्थितीतील मशीन अर्जदारास पुरविली नाही, ही गैरअर्जदाराची सेवेतील न्‍युनता असून, अनुचीत व्‍यापार पध्‍दती आहे, या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आले आहे.  याच आशयाचे मत, आदरणीय राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्‍ली यांनी ‘खालीद याकुब दामत –विरुध्‍द – अब्‍दूल हमीद बारमारे व इतर’, III-2008-सी.पी.जे.-60 (एन.सी.), याप्रकरणात दिले आहे, ते मत तंतोतंत या प्रकरणाला लागु पडतो, त्‍यातील महत्‍वाचा भाग खालीलप्रमाणे.

 

(i)   Consumer Protection Act, 1986 – Section 19 – Housing – Agreement – Purchase of 7 flats agreed – Consideration paid – Possession of only one flat delivered – Complaint allowed by State Commission – Hence appeal – Contention, agreement produced on record false, fabricated – State Commission without reference to handwriting expert concluded that agreement was genuine – Contention not acceptable – Burden to prove lays upon party alleging fraud,  forgery – Burden not discharged by appellant satisfactorily – Comparison of signature on agreement with signature in pleadings and Vakalatnama, not illegal – Contention, agreement for sale of one flat manipulated to sale of seven flats, not acceptable – No agreement either in original or Xerox copy produced on record – Best evidence in his possession not produced – Appellant cannot take advantage merely because he alleged that document produced by complainants as forged – Evidence on affidavit produced by complainant not effectively rebutted by  appellant – Order of State Commission upheld.

 

Khalid Yakub Damad

-V/s.-

Abdul Hamid Barmare & Anr.

III(2008) CPJ 60 (NC)

 

            ******                        ******                        ******                        ******

 

 

11.          गैरअर्जदाराने, निशाणी 23 नुसार लेखी बयाण दाखल केला, परंतु लेखी बयाणावर गैरअर्जदाराची सही नाही.  त्‍यामुळे, लेखी बयाणात कथन केलेले म्‍हणणे शपथपञावर नसल्‍यामुळे ग्राह्य धरण्‍यास पाञ नाही.  गैरअर्जदाराने, निशाणी 26 नुसार शपथपञ दाखल करुन निशाणी 23 मध्‍ये वकीलाच्‍या सहीने दाखल केलेला मजकूर मला मान्‍य आहे, ते उत्‍तर म्‍हणून स्विकारण्‍यात यावे, असे आपले शपथपञात नमुद केले आहे.  कायद्याचे दृष्‍टीने उचीत नसले तरी, तक्रार गुणदोषावर (Merit) निकाली काढण्‍याचे दृष्‍टीने, सदर उत्‍तर निकालाचे वेळी विचारात घेतले तरी, गैरअर्जदार यांनी अर्जदारास सेवा देण्‍यात ञुटी केली व अर्जदाराकडून पावतीनुसार रुपये 38,000/- आणि बिना पावतीचे रुपये 6,000/- प्राप्‍त करुनही, सुयोग्‍य स्थितीतील झेरॉक्‍स मशीन लावून दिली नाही किंवा रक्‍कमही परत केली नाही. 

 

 

                              ... 6 ...               ग्रा.त.क्र. 14/2008.

 

12.         गैरअर्जदाराने, आपले लेखी बयाणात व शपथपञानुसार असा मुद्दा उपस्थित केला की, गैरअर्जदार हा ग्‍लोबल इन कार्पोरेशन कडे एक कार्यकर्ता म्‍हणून काम करीत होता, ही कंपनी बंद पडून मालक पसार झाला. त्‍याला पक्ष केले नाही.  परंतु, गैरअर्जदार यांनी ग्‍लोबल इन कार्पोरेशनचा मालक कोण होता, त्‍याचा कुठलाही पत्‍ता आपले लेखी बयाणात व शपथपञात दिलेला नाही.  यावरुन गैरअर्जदाराने स्‍वतःचे बचावाकरीता, खोटा मुद्दा उपस्थित केला असे या न्‍यायमंचाचे मत आहे.   गैरअर्जदाराने, स्‍वतःच्‍या सहीने अर्जदारास दिलेल्‍या पावत्‍यावर सुध्‍दा ग्‍लोबल इन कार्पोरेशनचा मालक कोण आहे, याबाबतचा कुठलाही उल्‍लेख केलेला नाही.  गैरअर्जदाराचे वर्तणूकीवरुनच असे दिसून येते की, गैरअर्जदाराने अर्जदाराची फसवणूक करण्‍याचे हेतूने पैसे घेतल्‍याचे दाखल दस्‍ताऐवजावरुन सिध्‍द होते.  गैरअर्जदारास न्‍यायमंचा मार्फत नोटीस पाठविला असता, सदर व्‍यक्‍ती दिलेल्‍या पत्‍यावर राहात नाही, असा पोष्टाचा शेरा मारुन नोटीस परत आलेले आहेत.  अर्जदाराने, गैरअर्जदारास दिलेल्‍या नवीन पत्‍यावर न्‍यायमंचा मार्फत नोटीस काढण्‍यात आला.  त्‍यावरही, दिलेल्‍या पत्‍यावर राहात नाही, सबब सेंडरला परत असा शेरा मारुन पोष्‍टामार्फत लिफापा न्‍यायमंचास परत आला.  त्‍यामुळे, अर्जदाराने, गैरअर्जदाराचे विरुध्‍द जाहीर नोटीस युवाराष्‍ट्र या वर्तमान पञातून प्रसिध्‍द करण्‍यात आले.  सदर जाहीर नोटीस प्रसिध्‍द केल्‍यानंतर, गैरअर्जदार दिनांक 29/1/2009 ला हजर झाला.  हजर होऊन वकीलपञ, रजिष्‍ट्रर पत्‍ता दाखल केला, सदर रजिस्‍ट्रर पत्‍यानुसार नोटीस पाठविलेल्‍या पत्‍यावरच राहात असल्‍याचे सिध्‍द होते.  परंतु, नोटीस घेण्‍यास टाळाटाळ केल्‍याची वर्तणूक सदर बाबीवरुन स्‍पष्ट होते.  यावरुन सुध्‍दा गैरअर्जदार हा व्‍देषबुध्‍दीने व्‍यवहार करुन, अर्जदाराशी अनुचीत व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला असल्‍याने, अर्जदाराची तक्रार मंजुर करण्‍यास पाञ आहे, या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले आहे.

 

13.         अर्जदाराने, आपले तक्रारीत गैरअर्जदार यास रुपये 44,000/- दिले असल्‍याचे म्‍हटले आहे.  परंतु, दाखल दस्‍ताऐवजानुसार रुपये 38,000/- प्राप्‍त झाले.  परंतु, गैरअर्जदाराने रुपये 6,000/- ची पावती दिली नाही, असे आपल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे.  गैरअर्जदाराने, याबाबत आपले शपथपञात काहीच म्‍हणणे दिले नाही, फक्‍त अर्जदाराने जाणीवपूर्वक खोटी तक्रार दाखल केली असे म्‍हणून अर्जदाराचे म्‍हणणे नाकारले आहे.  अर्जदारास रुपये 6,000/- ची पावती दिली नाही असे म्‍हणणे ग्राह्य धरण्‍यास पाञ आहे.  अर्जदाराने आपले तक्रारीसोबत गैरअर्जदार यास रजिस्‍ट्रर पोष्‍टाने नोटीस पाठवून आपली मागणी केलेली आहे, त्‍या रजिस्‍ट्रर पोष्‍टाने पाठविलेले अर्ज व नोटीसाच्‍या पावत्‍या रेकॉर्डवर दाखल केल्‍या आहे.  सदर अर्जावर अर्जदाराने वेळोवेळी गैरअर्जदारास रुपये 44,000/- परत करण्‍याची किंवा झेरॉक्‍स मशीन चालु स्थितीत देण्‍याची मागणी केलेली आहे.  परंतु, गैरअर्जदाराने त्‍याबद्दल कुठलीही दखल घेतली नाही, ही सुध्‍दा सेवेतील न्‍युनता असल्‍याची बाब सिध्‍द होतो.  अर्जदाराने, तक्रार अर्जात रुपये 9,000/- देणे असल्‍याचे मान्‍य केले.  गैरअर्जदार हा उर्वरीत रक्‍कम घेऊन, चालु

                              ... 7 ...              ग्रा.त.क्र. 14/2008.

 

स्थितीतील झेरॉक्‍स मशीन लावून देण्‍यास जबाबदार आहे आणि मशीन देणे शक्‍य नसल्‍यास जमा असलेले रुपये 44,000/- व्‍याजासह देण्‍यास पाञ आहे, या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले आहे.

 

14.         अर्जदाराने, गैरअर्जदारास वेळोवेळी रजिस्‍ट्रर पोष्‍टाने पञ पाठवून व फोनव्‍दारे मागणी करुन झेरॉक्‍स मशीन चालु स्थितीत लावून दिले नाही.  अर्जदाराने, सदर झेरॉक्‍स मशीन ही आपले स्‍वयंरोजगाराकरीता घेतली असून, कुंटूंबाचे उदरनिर्वाहकरीता घेतली असल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे.  परंतु, त्‍यापासून अर्जदारास काही उत्‍पन्‍न मिळाले नाही, उलट अर्जदाराचे रुपये 44,000/- गैरअर्जदाराकडे पडून राहीले.  त्‍यामुळे, अर्जदाराचे आर्थिक नुकसान होऊन, मानसिक, शारीरीक ञास झाला.  यावरुनही, गैरअर्जदार, अर्जदारास नुकसानभरपाई दिनांक 17/2/2007 पासून देण्‍यास पाञ आहे.  अर्जदार सरासरी रुपये 500-600 प्रती माह खर्च वजाजाता झेरॉक्‍स कामापासून मिळविले असते.  तरी, वार्षीक रुपये 6,000/- ते 7,000/- कमविले असते.  परंतु, गैरअर्जदाराचे ञुटी युक्‍त सेवेमुळे अर्जदार उत्‍पन्‍नापासून वंचीत झालेला असल्‍यामुळे, प्रतीमाह रुपये 500/- प्रमाणे झेरॉक्‍स मशीन देईपर्यंत किंवा त्‍याची रक्‍कम व्‍याजासह मिळेपर्यंत गैरअर्जदार देण्‍यास जबाबदार आहे, असे या न्‍यायमंचाचे ठाम मत आहे.  तसेच, अर्जदारास झालेल्‍या मानसिक, शारीरीक ञासापोटी नुकसानभरपाई देण्‍यास जबाबदार आहे, या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले आहे.  अर्जदाराची तक्रार मंजुर करण्‍यास पाञ आहे, असे या न्‍यायमंचाचे ठाम मत असल्‍यामुळे, मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे. 

 

मुद्दा क्रमांक 3 :-

 

15.         वरील मुद्दा क्रमांक 1 व 2 चे विवेचनावरुन अर्जदाराची तक्रार मंजुर करुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

                  //  अंतिम आदेश  // 

 

(1)  अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर.

(2)  गैरअर्जदाराने, अर्जदारास GP-30 फोटो कॉपी मशीन आदेशाची प्रत प्राप्‍त

      झाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत चालु स्थितीत द्यावी.

(3)   गैरअर्जदाराने, अर्जदाराकडे झेरॉक्‍स मशीन चालु स्थितीत लावून दिल्‍यानंतर

      अर्जदाराने 9,000/- रुपये, 15 दिवसांचे आंत गैरअर्जदारास द्यावे.

(4)   गैरअर्जदारास  चालु स्थितीत झेरॉक्‍स मशीन देणे शक्‍य नसल्‍यास रुपये

44,000/- शेवटची रक्‍कम प्राप्‍त केल्‍याचा दिनांक 23/3/2007 पासून, 9 %

टक्‍के व्‍याजाने आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.

 

                              ... 8 ...             ग्रा.त.क्र. 14/2008.

 

(5)  अर्जदारास नुकसानभरपाईपोटी प्रतीमाह रुपये 500/- प्रमाणे झेरॉक्‍स मशीन

      लावून देईपर्यंत किंवा पैसे परत करेपर्यंत, दिनांक 17/2/2007 पासून द्यावे.  

(6)  अर्जदारास झालेल्‍या मानसिक, शारीरीक ञासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा

      खर्च रुपये 2,500/- आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.

(7)  उभयतांना आदेशाची प्रत देण्‍यात यावी.

 

गडचिरोली.

दिनांक :26/06/2009.

 
 
[HONORABLE Shri. A. N. Kamble]
PRESIDENT
 
[HONORABLE Shri. R. L. Bombidwar]
Member
 
[HONORABLE Smt. M. J. Bhilkar]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.