नि.42
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल
मा.सदस्या - श्रीमती वर्षा शिंदे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 2215/2009
तक्रार नोंद तारीख : 04/11/2009
तक्रार दाखल तारीख : 06/1/2009
निकाल तारीख : 26/06/2013
----------------------------------------------
श्रीमती विद्या मोहन मठपती
रा.बसवेश्वर चौक, इसापुरे गल्ली,
मिरज, जि.सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
मिरज, मंगळवार पेठ, शनिमारुती देवळासमोर, मिरज
करिता संचालक
2. श्री निळकंठ पांडुरंग माळकर,
रा.कवलापूर, ता.मिरज
3. सौ माधुरी सुरेश चरणकर,
रा.अयोध्या अपार्टमेंट, शिवनेरी चौकाजवळ,
ब्राम्हणपुरी, मिरज
4. श्री श्रीपाल किसन भागवत,
रा.अंकलखोप, ता.मिरज जि.सांगली
5. श्री सुभाष गणपती कांबळे,
रा.मणेराजुरी, ता.तासगांव जि. सांगली
6. श्री महालिंग गुरुलिंग माईनकर
रा.कासार गल्ली, म्हसोबा देवालयजवळ,
तासगांव
7. श्री रविंद्र बापूसो कुपवाडे,
रा.द्वारा माजी चेअरमन, महालक्ष्मी पतसंस्था
आष्टा मु.पो.आष्टा
8. श्री बापूसो महादेव फल्ले,
रा.कामेरी, ता.मिरज जि. सांगली
9. श्री जगन्नाथ यशवंत देशमाने,
रा.अंबाबाई देवळाजवळ, मंगळवार पेठ, मिरज
10. श्री महालिंग शंकर फल्ले
रा.चिंचणी ता.तासगांव जि. सांगली
11. श्री रावसाहेब सातलिंग विभुते,
रा.अंकलखोप, ता.मिरज जि.सांगली
12. श्री यशवंत आण्णा सावंत,
रा.जलशुध्दीकरण केंद्र, मिरज ता.मिरज
13. श्री महादेव लक्ष्मण देशमाने,
रा.शिराळा, ता.शिराळा. जि.सांगली
14. श्री बापूसो दत्तोबा बनसवडे,
मु.पो.बेडग, ता.मिरज जि. सांगली ...... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड आर.एम.शिंदे
जाबदारक्र.1 ते 14 : एकतर्फा
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 खाली दाखल केलेली आहे.
2. थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार हा जाबदार क्र.1 संस्थेचा ठेवीदार असून तक्रारदाराने पावती क्र.26 अन्वये रक्कम रु.50,000/- दि.19/7/07 रोजी जाबदार क्र.1 संस्थेच्या मुदत ठेव योजनेमध्ये 1 वर्षे 1 महिने मुदतीने ठेवली होती. मुदतीनंतर रक्कम रु.55,146/- तक्रारदारास देय होती. व्याजाचा दर द.सा.द.शे. 9.5 टक्के होता. ठेव पावतीची मुदत संपल्यानंतर म्हणजे दि.19/8/08 रोजीनंतर तक्रारदाराने सदरची रक्कम जाबदारास मागितली तथापि त्यांनी ती देण्यास टाळाटाळ केली व चालढकल चालविली. अखेरीस दि.2/12/08 रोजी तक्रारदारांनी जाबदारांना नोटीस दिली. तथापि जाबदार रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे व ती रक्कम भागविलेली नाही. त्यामुळे सदरची तक्रार दाखल करण्यास जाबदारास दाव्याचे कारण घडले आहे. जाबदार क्र.2 हे संस्थेचे चेअरमन/अध्यक्ष असून जाबदार क्र.3 ते 14 हे संस्थेचे संचालक सदस्य आहेत. मागणीप्रमाणे रक्कम न दिल्याने जाबदारांनी त्यास दूषित सेवा दिली असे कथन करुन तक्रारदाराने जाबदारकडे असलेल्या ठेव रकमा व त्यासोबत बचत खात्यावर असणारी रक्कम व्याजासह जाबदारकडून वैयक्तिक व संयुक्तरित्या वसूल करुन मागितली आहे. त्यास आर्थिक, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.5,000/- ची मागणी तक्रारदारांनी जाबदारकडून केलेली आहे व अर्जाचा खर्च जाबदारकडून मागितला आहे.
3. तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्ठयर्थ नि.3 ला आपले शपथपत्र दाखल करुन नि.5 या फेरिस्तसोबत एकूण 5 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. प्रस्तुत प्रकरणात, जाबदार क्र.2 ते 14 यांना नोटीसांची बजावणी होवून देखील ते हजर न झाल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा कामकाज चालवावे असा आदेश पारीत करण्यात आला.
5. तक्रारदारतर्फे त्यास तोंडी पुरावा द्यावयाचा नाही याबद्दलची पुरसिस नि.40 ला दाखल करण्यात आली. त्याच दिवशी तक्रारदाराचे विद्वान वकीलांनी तोंडी युक्तिवाद करुन लेखी युक्तिवादाही नि.41 ला सादर केला आहे.
6. जाबदार क्र.2 ते 14 तर्फे तक्रारदाराच्या कोणत्याही कथनाला आक्षेप घेण्यात आलेला नाही. संपूर्ण तक्रारीस जाबदारतर्फे कोणताही उजर सादर करण्यात आलेला नाही. तक्रारीतील विधानांचा स्पष्टपणे इन्कार जाबदारांनी हजर राहून केलेला नाही. त्यामुळे तक्रारीतील संपूर्ण कथने जाबदारांनी मान्य केली असे गृहित धरावे लागेल. त्यामुळे तक्रारीतील संपूर्ण कथने तक्रारदाराने सिध्द केली आहे असा निष्कर्ष हे मंच काढीत आहे. तक्रारदाराने नि.5 चे फेरिस्तसोबत दि.19/7/07 ची रु.50,000/- ची ठेवपावती दाखल केली आहे. त्यानुसार सदर तारखेस तक्रारदाराने रक्कम रु.50,000/- एक वर्षे एक महिने मुदतीकरिता द.सा.द.शे.9.5 टक्के व्याजदराने जाबदार संस्थेत गुंतविली होती व मुदतीअंती त्यास रक्कम रु.55,146/- मिळणे प्राप्त होते ही बाब ठेवपावतीवरुन स्पष्ट होते. सदरची रक्कम मागणी करुन सुध्दा जाबदारांनी त्यास दिली नाही असे कथन तक्रारदारांनी आपल्या तक्रारअर्जात केली आहे. तसेच दि.2/12/2008 ची वकीलांमार्फत पाठविलेल्या नोटीसीनंतर देखील जाबदारांनी त्यास पैसे दिले नाही असेही कथन तक्रारदारांनी केलेले आहे. सदरची नोटीस कुरियरमार्फत जाबदारास मिळालेली दिसते. कुरियरच्या पावत्या तक्रारदाराने याकामी हजर केलेल्या आहेत. नोटीस मिळून देखील जाबदारांनी देय रक्कम तक्रारदारास दिलेली नाही असे स्पष्ट कथन तक्रारदाराने शपथेवर आपल्या शपथपत्रात केलेले आहे. मुदत उलटून गेल्यानंतर गुंतविलेली रक्कम ठेवण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार जाबदारास नाही. तक्रारदार हा जाबदारचा ग्राहक होतो ही बाब जाबदारांनी अमान्य केलेली नाही. त्याअर्थी मागणी करुन देखील आणि मुदत ठेव पावतीची मुदत उलटून गेल्यानंतर देखील जाबदारांनी तक्रारदारास पैसे न दिल्याने त्यास दूषित सेवा दिली ही बाब आपोआप सिध्द होते. त्यामुळे तक्रारदाराने आपली तक्रार शाबीत केली आहे असे या मंचाचे मत झाले आहे. सबब तक्रारदारास मागणीप्रमाणे रक्कम मिळण्यास तो पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
- आ दे श -
1. तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करणेत येत आहेत.
2. जाबदार क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिक वा संयुक्तरित्या तक्रारदारास तक्रारअर्जातील ठेव पावतीची मुदतीनंतर देय झालेली रक्कम त्यावरील व्याजासह तक्रारदारास द्यावी. सदरचे देय रकमेवर मुदतीनंतर तक्रार दाखल तारखेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे व तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्षपणे तक्रारदारास देईपावेतो द.सा.द.शे. 8.5 टक्के दराने व्याज द्यावे.
3. जाबदार क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिक वा संयुक्तरित्या तक्रारदारास आर्थिक, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.1,000/- द्यावा.
4. जाबदार क्र.1 ते 14 यांनी सदर संपूर्ण रकमा या आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसांत तक्रारदारास द्याव्यात अन्यथा तक्रारदारास ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 25 किंवा 27 खाली प्रकरण दाखल करता येईल.
सांगली
दि. 26/06/2013
( वर्षा शिंदे ) ( के.डी.कुबल ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या सदस्य अध्यक्ष