Maharashtra

Satara

CC/14/162

shri vikrant vivek gaykwad - Complainant(s)

Versus

shri madan jagtap - Opp.Party(s)

gaykwad

30 Sep 2015

ORDER

Consumer Disputes Redressal
Forum, Satara
 
Complaint Case No. CC/14/162
 
1. shri vikrant vivek gaykwad
nalasopara
palghar
maha
...........Complainant(s)
Versus
1. shri madan jagtap
market yard satara
stara
maha
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SAVITA BHOSALE PRESIDENT
 HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR MEMBER
 HON'BLE MRS. Mrs.Surekha Hazare MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

           मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

            मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

             

                 तक्रार अर्ज क्र. 162/2014

                      तक्रार दाखल दि.09-10-2014.

                            तक्रार निकाली दि.30-09-2015. 

 

 

श्री.विक्रांत विवेक गायकवाड,

रा.ए/03,शिवगंगा कॉम्‍प्‍लेक्‍स, राधानगर,

तुळींज रोड, नालासोपारा (पूर्व), जि.पालघर.             ....  तक्रारदार.

  

         विरुध्‍द

 

1. श्री.मदन जगताप,

   अध्‍यक्ष-गौरी शंकर एज्‍युकेशन अँण्‍ड चॅरीटेबल ट्रस्‍ट,

   ग्राहक संघ, मार्केट यार्ड, सातारा.

 

2.  प्राचार्य,

   गौरीशंकर एज्‍युकेशन अँण्‍ड चॅरीटेबल ट्रस्‍टचे

   सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँण्‍ड मॅनेजमेंट,

   लिंब, ता.जि.सातारा.                                  ....  जाबदार.

 

                         

                            तक्रारदारांतर्फेअँड.एन.एस.गायकवाड.

                            जाबदार क्र.1 व 2 तर्फे अँड.राजगोपाल द्रवीड.

                                                 अँड.निलेश तपासे.

 

 

न्‍यायनिर्णय

 

(सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला)

                                                                                     

 

1.  तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात मजकूर पुढीलप्रमाणे-

    तक्रारदार हे नालासोपार (पूर्व), जि.पालघर येथील रहिवासी आहेत.  तर जाबदार क्र. 1 हे गौरीशंकर एज्‍युकेशन अँन्‍ड चॅरिटेबल ट्रस्‍टचे अध्‍यक्ष/चेअरमन असून जाबदार क्र. 2 हे गौरीशंकर एज्‍युकेशन अँन्‍ड चॅरिटेबल ट्रस्‍टतर्फे चालविणेत येणा-या कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँन्‍ड मॅनेजमेंटचे प्राचार्य आहेत.  तक्रारदाराने सन 2012-2013 मध्‍ये इयत्‍ता 12 वी ची परिक्षा दिली होती.  सदर परिक्षेत तक्रारदाराला 52 टक्‍के मार्क्‍स मिळाले.  तक्रारदार व त्‍याचे आईवडिलांचे इच्‍छेप्रमाणे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे अँडमिशनसाठी तक्रारदाराने कॅप ऑफनुसार ऑनलाईन फॉर्म भरला व सदर फॉर्ममध्‍ये पहिल्‍या 1 ते 7 नंबरला मुंबई येथील पसंतीच्‍या वेगवेगळया इंजिनिअरींग कॉलेजला प्रवेश मिळावा म्‍हणून संबंधीत कॉलेजचे कोडनंबर सुध्‍दा टाकले होते. तक्रारदाराने भरलेल्‍या ऑनलाईन फॉर्मनुसार तक्रारदाराला 12 वी च्‍या परिक्षेत 52 टक्‍के मार्क्‍स असलेने त्‍याला सुरुवातीलाच मुंबई येथील इंजिनिअरींग कॉलेजमध्‍ये अँडमिशन मिळण्‍याची शक्‍यता नसल्‍यामुळे ऑनलाईनव्‍दारे भरलेल्‍या कॅप ऑफ फॉर्ममध्‍ये तक्रारदाराने जाबदार यांचे कॉलेजचा कोडनंबर सुध्‍दा टाकला होता.  तक्रारदाराने ऑनलाईन भरले फॉर्मनुसार तक्रारदाराला जाबदार यांचे सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँन्‍ड मॅनेजमेंट या कॉलेजला मेकॅनिकल इंजिनिअरींगसाठी पहिल्‍या वर्षासाठी अँडमिशन मिळाल्‍याचे समजले.  त्‍यावेळी तक्रारदार यांने ऑनलाईनव्‍दारे भरलेल्‍या मुंबई येथील पसंतीच्‍या कॉलेजमध्‍ये प्रवेश मिळेपर्यंत वर्ष वाया जाऊ नये म्‍हणून तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात जाबदार यांचे कॉलेजमध्‍ये दि. 10/7/2013 रोजी रजिस्‍ट्रेशन फी रक्‍कम रु.3,000/- भरुन अँडमिशन घेतले.  अँडमिशन घेताना तक्रारदाराने जाबदाराला तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात अँडमिशन घेत असलेचे सांगीतले होते.  त्‍यावेळी जाबदार यांनी तक्रारदार यांचेकडे 12 वी चे मूळ मार्कशीट व लिव्‍हींग सर्टीफिकेट जाणीवपूर्वक मागून घेतले व अँडमिशन ज्‍यावेळी रद्द कराल त्‍यावेळी ते परत करु असे सांगीतले.  त्‍यानंतर दि.20/7/2013 रोजी तक्रारदाराला विरार जिल्‍हा पालघर येथील विष्‍णू वामन इन्‍स्‍टीटयूट ऑफ टेक्‍नॉलॉजी येथे मेकॅनिकल इंजिनिअरींगच्‍या डिग्रीच्‍या पहिल्‍या वर्षासाठी प्रवेश मिळाल्‍याने तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात घेतलेले अँडमिशन रद्द करुन जाबदाराने तक्रारदाराचे अँडमिशनवेळी घेतलेले मूळ मार्कशीट व लिव्‍हींग सर्टीफिकेट घेणेसाठी दि. 22/7/2013 रोजी तक्रारदार हे जाबदार नं. 2 यांचेकडे कॉलेजमध्‍ये गेले असता, जाबदार क्र. 2 ने सांगीतले की अँडमिशन रद्द करावयाचे असले तरीही तुम्‍हाला एक वर्षाची टयुशन फी रक्‍कम रु.62,000/- भरावीच लागेल तरच मूळ कागदपत्रे परत मिळतील व जर तेथून पुढे एखाद्या विद्यार्थ्‍याने अँडमिशन घेतल्‍यास व तुमचे अँडमिशन रद्द झाल्‍याचे बोर्डाने आम्‍हास कळविल्‍यासच आम्‍ही तुमच्‍याकडून घेतलेली टयुशन फी रक्‍कम रु.62,000/- तुम्‍हास परत करु, त्‍यामुळे तक्रारदाराचे पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची  असतानाही त्‍यांनी तक्रारदाराचे भविष्‍याचा विचार करुन जाबदाराचे सांगण्‍याप्रमाणे नाईलाजास्‍तव सोन्‍याचे दागिने गहाण ठेवून रक्‍कम रु.62,000/- दि.23/7/2013 रोजी रिसीट नं. 10312 ने जाबदाराकडे जमा केली. त्‍यावेळी जाबदाराने तक्रारदाराचे मूळ मार्कशीट व लिव्‍हींग सर्टीफिकेट परत दिले.  त्‍यानंतर तक्रारदार व त्‍याचे पालकांनी जाबदारांकडे दुस-या विद्यार्थ्‍यांचे अँडमिशन झाले आहे का? अशी केली असता जाबदाराने उडवाउडवीची उत्‍तरे देवन रक्‍कम परत देणेस नकार दिला.  त्‍यावेळी तक्रारदाराचे पालकांनी त्रयस्‍थ इसमांमार्फत जाबदार यांचेकडे दि. 23/7/2013 नंतर म्‍हणजेच तक्रारदाराने अँडमिशन रद्द केलेनंतर मेकॅनिकल इंजिनिअरींगच्‍या डिग्रीच्‍या प्रथम वर्षाला दुस-या विद्यार्थ्‍यांनी अँडमिशन घेतले किंवा नाही याबाबत चौकशी केली असता तक्रारदार याने जाबदाराचे कॉलेजमधील प्रवेश रद्द केलेनंतर प्रमोद दामू बहिर, रविंद्र बाबासो पाटील व इतर 6 ते 7 विद्यार्थ्‍यांनी अँडमिशन घेतल्‍याचे तक्रारदाराला समजले. त्‍यानंतर तक्रारदाराने जाबदार यांना भेटून रक्‍कम रु.62,000/- परत देणेची विनंती केली त्‍यावेळी  बोर्डाकडून अद्याप आम्‍हास कोणतीही माहिती मिळाली नाही  असे म्‍हणून तक्रारदराची रक्‍कम परत करणेस जाणीवपूर्वक टाळाटाळ केली व तक्रारदाराला सेवा पुरविणेत निष्‍काळजीपणा केला.  म्‍हणून तक्रारदाराने जाबदारांना वकीलांमार्फत दि. 20/6/2014 रोजी नोटीस पाठवली व रक्‍कम परत देणेबाबत कळविले परंतू जाबदार यांनी नोटीस मिळूनसुध्‍दा काहीही उत्‍तर दिलेले नाही.  त्‍यामुळे तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज  तक्रारदार यांनी जाबदाराकडे भरलेली टयुशन फी परत मिळणेसाठी सदरचा तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे.

2.  तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी जाबदार यांचेकडून रक्‍कम रु.62,000/- परत करणेबाबत जाबदार यांना आदेश व्‍हावेत, तसेच सदरची रक्‍कम पदरी पडेपर्यंत त्‍यावर 15 टक्‍के प्रमाणे व्‍याज देणेबाबत हुकूम व्‍हावेत, मानसिक व शारीरिक त्रासासाठी जाबदार यांचेकडून रक्‍कम रु.50,000/- मिळावेत अशी विनंती याकामी तक्रारदाराने केली आहे.

3.   तक्रारदार यांनी प्रस्‍तुत कामी नि.2 कडे अँफीडेव्‍हीट, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते नि.5/9 कडे अनुक्रमे जाबदार कॉलेजकडून तक्रारदाराने प्रॉस्‍पेक्‍ट घेतलेची रिसीट, जाबदारकडे रजिस्‍ट्रेशन फी रक्‍कम रु.3,000/- भरलेची पावती, जाबदारांकडे टयूशन फी रक्‍कम रु.62,000/- भरलेची पावती, जाबदार यांना वकीलामार्फत पाठविले नोटीसची स्‍थळप्रत, नोटीसच्‍या पोहोचपावत्‍या, इन्स्टिटयूट ऑफ टेक्‍नॉलॉजी विरार, ठाणे येथील तक्रारदाराचे ओळखपत्र, जाबदाराने तक्रारदारकडून मूळ कागदपत्रे घेतलेची पावती, नि.16 कडे तक्रारदाराचे पुराव्‍याचे शपथपत्र, नि. 17 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि.22 कडे लेखी युक्‍तीवाद, नि. 8 सोबत जाबदारांचे माहितीपत्रक, नि.27 चे कागदयादीसोबत पुढीलप्रमाणे मे. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे दाखल केले आहेत.

     i   2006 (2) CPR 97

               Guru Govindsing Indraprastha University V/s. Ashok Kumar Jain 

         ii    2007 (1) CPR  399

               Jaipur Institute for Integrated Learning in Management V/s. Miss  Anchal 

              Agrawal and Anrs,

         iii   2009 (1) CPR  340

               R. Prassanna Venkatesh V/s M/s. STO Technologies Rep.by its Manager 

         iv  2010 (1) CPR  154

              Ku. Namrata Shukla  V/s. Raipur Institute of technology

4.   जाबदार क्र. 1 व 2 यांनी नि.12 कडे कैफियत/म्‍हणणे दाखल केले आहे.   प्रस्‍तुत जाबदार यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत.  त्‍यांनी तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदलेले आहेत.

     i  तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्‍यातील कथन मान्‍य व कबूल नाही.

      ii  तक्रार अर्जात स्‍वतंत्र वैधानिक अस्‍तीत्‍व असणा-या शिक्षण संस्‍थेला पक्षकार केलेले नाही.

     iii  प्रस्‍तुत तक्रार ही कथितरित्‍या एका शिक्षण संस्‍थेविरुध्‍द असल्‍याने आणि तशी शैक्षणिक संस्‍था ही सोसायटीज रजिस्‍ट्रेशन अँक्‍ट व बॉम्‍बे पब्‍लीक ट्रस्‍ट अँक्‍ट अन्‍वये पंजीकृत असल्‍याने म्‍हणजेच या संस्‍थेला स्‍वतंत्र सार्वभौम व्‍यक्‍तीमत्‍व असल्‍याने आणि विधीव्‍दारा स्‍थापित विधीव्‍यक्‍ती/लिगल एंटीटी असलेने प्रस्‍तुत तक्रार ही संस्‍थेविरुध्‍द आहे की, कोणा पदाधिका-यांविरुध्‍द आहे याचा बोध होत नाही, संस्‍थेचे पदाधिकारी प्रस्‍तुत तक्रारीत जाबदार होवू शकत नाहीत.

    Iv  जाबदार शिक्षण संस्‍था ही मानांकित प्रथतयश व सर्व निकष तथा मापदंडांचे पालन करणारी शिक्षण संस्‍था आहे.  तसेच अव्‍वल मान्‍यांकन प्राप्‍त शिक्षण संस्‍था आहे. शिक्षणक्षेत्रातील आदर्श मापदंडांचा उपयोग करुन शैक्षणिक क्षेत्रात एक आदर्शवत उदाहरण जाबदार शिक्षण संस्‍थेने निर्माण केले आहे. 

    v    ए.आय.सी.टी.ई/तंत्रशिक्षण संचलनालय अन्‍वये विहीत केलेला प्रवेश तथा शिक्षण शुल्‍क व परतावा प्रक्रीया प्रस्‍तुत शिक्षणसंस्‍था अवलंबत असते आणि याकामी तंत्रशिक्षण संचलनालय,महाराष्‍ट्र राज्‍य,मुंबई यांनी शैक्षणीक वर्ष सन 2013-2014 साली इन्‍फरमेशन ब्राऊचर निर्माण केलेले असते ते प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांवर बंधनकारक असते.  ही पुस्‍तीका प्रत्‍येक विद्यार्थ्‍याने घेतलेली असते.  यात पान नं.26,27 व 37,38 यावर माहीती दिलेली आहे.  या नियमाप्रमाणे जाबदार शिक्षण संस्‍था शिक्षण शुल्‍काचा परतावा देण्‍यास पात्र नाही  अथवा प्रस्‍तुत तक्रारदार हा शिक्षणशुल्‍क परत मिळणेस पात्र नाही.  यास्‍तव तक्रार अर्ज फेटाळणेस पात्र आहे.  जाबदाराने म्‍हणण्‍यातील पॅरा क्र. 4 मध्‍ये श्‍येडयूल अँक्‍टीव्‍हीटीज फॉर इंजिनिअरींग टेक्‍नॉलॉजी कॅपराऊंड नमूद केले आहे.  प्रस्‍तुत तक्‍ता हा माहितीपत्रकाच्‍या (इन्‍फरमेशन ब्राऊचरच्‍या) पृष्‍ठ क्र.26 वरील तळटिपेत दिलेल्‍या सेकंड राऊंड ऑफ कॅप अँडमिशन या प्रकारात बसतो.  म्‍हणजे मुद्दा क्र. 15 अन्‍वये तक्रारदाराने प्रवेश निश्चित केल्‍यावर मुद्दा क्र.16 प्रमाणे व्‍हेकन्‍सीजचा  डिस्‍प्‍ले होवू शकलेला नाही आणि साहजिकच कॅपराऊंड III ला व्‍हेकन्‍सी दिसली नसलेने ती जागा दिसत राहीली. या म्‍हणण्‍यासोबत जाबदाराने माहीतीपत्रकातील आवश्‍यक ते कागद (पृष्‍ठे) दाखल केली आहेत.

   1. AICTE Guidelines No.- AICTE/Legal/04(01)/2007, April,2007 & Circular No. 698 Dated 24th August,2007 issued by Pravesh Niyantran Samiti, Mumbai

       2. Minutes of the Meeting, item No.5(e) Shikshan Shulka Samiti & H & T, Dated 9th January,2015

      यामधील रेफरन्‍सनुसार तक्रारदाराने त्‍याचा प्रवेश रद्द केला परंतू जाबदार शिक्षण संस्‍थेला त्‍याच्‍या जागी अन्‍य कोणताही विद्यार्थी न मिळाल्‍याने जाबदार शिक्षण संस्‍थेवर शुल्‍क परतावा करण्‍याचे कोणतेही बंधन नाही.

iv   शुल्‍क परताव्‍याबाबतच्‍या विहीत नियमांचे काटेकोर पालनः- डीटीई/तंत्रशिक्षण संचालनालयाच्‍या नियमानुसार शुल्‍क परतावा करता येण्‍यासाठी ज्‍याने प्रवेश रद्द केला आहे त्‍याचे जागी अन्‍य विद्यार्थ्‍याने प्रवेश घेणे ही महत्‍वपूर्ण अट आहे ही अट तंत्रशिक्षण संचलनालयाने बनवली असून ती  प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांवर बंधनकारक आहे. कारण कित्‍येक विद्यार्थी, अनेक संस्‍थांमध्‍ये प्रवेश बुक करतात आणि सोयीच्‍या ठिकाणी शिक्षणक्रमास रुजू होतात त्‍यामुळे तंत्रशिक्षण संचलनालयाला उपरोक्‍त नियम करणे भाग पडले आहे.

   शैक्षणिक वर्ष सन 2013-14 मध्‍ये मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाच्‍या जागा रिक्‍त दिसत आहेत.  त्‍याचा तक्‍ता जोडला आहे.  तक्रारदाराचे जागेवर कोणीही प्रवेश घेतलेला नाही त्‍यामुळे शिक्षण शुल्‍क तंत्रशिक्षण संचलनालयाच्‍या नियमाप्रमाणे तक्रारदाराला परत देता येत नाही म्‍हणून ते दिलेले नाही.  त्‍यामुळे जाबदाराने कोणतेही सेवात्रुटी दिलेली नाही.  सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा अशा स्‍वरुपाचे म्‍हणणे/कैफीयत जाबदाराने याकामी दाखल केली आहे.                                                                                          

5.  वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्‍तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.

अ.नं.                       मुद्दा                                       निष्‍कर्ष

1. तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत काय ?                    होय.

2.  जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा

     पुरविली आहे काय ?                                                                नाही.

3. तक्रारदार प्रवेश शुल्‍क परतावा मिळणेस

   पात्र आहेत काय ?                                     नाही.

 

4. अंतिम आदेश काय ?                                                   खाली नमूद                    

                                                                                                               आदेशाप्रमाणे

विवेचन-

6.  वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराने जाबदार क्र. 1 संस्‍थेच्‍या जाबदार क्र. 2 महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरींगचे पहिल्‍या वर्षासाठी अँडमिशनसाठी कॅप ऑफनुसार ऑनलाईन फॉर्म भरला त्‍यानुसार तक्रारदाराला जाबदाराचे सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँन्‍ड मॅनेजमेंट लिंब, ता.जि.सातारा या कॉलेजमध्‍ये अँडमिशन मिळाल्‍याचे समजलेवर तक्रारदाराने दि. 10/7/2013 रोजी रजिस्‍ट्रेशन फी रक्‍कम रु.3,000/- भरुन जाबदाराचे प्रस्‍तुत कॉलेजमध्‍ये अँडमिशन घेतले आहे.  त्‍यामुळे तक्रारदार व जाबदार हे नात्‍याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत हे निर्वीवाद सिध्‍द होते.  जाबदारानेही प्रस्‍तुत बाब मान्‍य केली आहे. त्‍यामुळे तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत  हे स्‍पष्‍ट होते म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर होकारार्थी दिले आहे.

7.  प्रस्‍तुत कामी मुद्दा क्र. 2 चे उत्‍तर आम्‍ही नकारार्थी देत आहोत.  कारण- जाबदाराने याकामी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करता असे स्‍पष्‍ट होते की, तक्रारदाराने दि.10/7/2013 रोजी जाबदार क्र. 1 शिक्षण संस्‍थेच्‍या जाबदार क्र. 2 या कॉलेजमध्‍ये कॅप ऑफ नुसार ऑनलाईन फॉर्म भरुन त्‍यानुसार रक्‍कम रु.3,000/- रजिस्‍ट्रेशन फी जाबदार क्र. 2 कॉलेजमध्‍ये जमा करुन मेकॅनिकल इंजिनिअरींगचे पहिल्‍या वर्षासाठी अँडमिशन घेतले.  प्रस्‍तुत महाविद्यालयात DTE-(Directorate Technical Education Maharashtra State, Mumbai) यांचेमार्फत ऑनलाईन   CAP Rounds (Centralized Admission Process) पध्‍दतीने प्रवेश प्रक्रीया शैक्षणिक वर्ष सन 2013-2014 साठी राबविणेत आली होती.

      तक्रारदाराला कॅपराऊंड II मध्‍ये अँडमिशन मिळाले.  दि.10/7/2013 रोजी त्‍याने अँडमिशन घेतले.  कॅपराऊंड II चे प्रवेशपश्‍चात  कॅपराऊंड III साठी तक्रारदाराची सीट रिक्‍त दिसली नाही.  त्‍यामुळे ती जागा रिक्‍त राहीली.  जाबदाराने डीटीई चा तक्‍ता दाखल केला आहे.  त्‍यामध्‍ये स्‍पष्‍ट केले आहे की, ज्‍याचा कॅपराऊंडलाच प्रवेश घेतला पाहीजे अन्‍यथा कॅपराऊंड III ला ज्‍याला कॅपराऊंड I व कॅपराऊंड II ला आधी संधी मिळाली असेल त्‍याला प्रवेश मिळू शकत नाही.  त्‍यामुळे तक्रारदाराचे अँडमिशन हे दि.10/7/2013 रोजी कन्‍फर्म झाले आहे व त्‍याने दि.12/7/2013 रोजीपर्यंत रद्द केले नसलेमुळे कॅपराऊंड III मध्‍ये व्‍हेकन्‍सी दिसली नाही.  त्‍यामुळे त्‍याचे जागेवर दुस-या विद्यार्थ्‍याचे अँडमिशन झाले नाही.  जाबदार कॉलेजच्‍या शैक्षणिक वर्षाची सुरुवात दि. 22/7/2013 रोजी होणार होती.  कट ऑफ डेट दि.10/8/2013 ही होती.  तक्रारदाराने जाबदाराला अँडमिशन रद्द करणेबाबत दि. 22/7/2013 रोजी सांगितले. दि. 25/7/2013 रोजी तक्रारदाराचे अँडमिशन रद्द केले तत्‍पूर्वी तक्रारदाराने दि.23/7/2013 रोजी जाबदाराकडे जमा केलेली टयुशन फी रक्‍कम रु.62,000/- (रुपये बासष्‍ट हजार फक्‍त) तक्रारदाराला परत देणेस जाबदाराने नकार दिला. कारण ए.आय.सी.टी.ई./तंत्रशिक्षण संचालनालय अन्‍वये विहीत केलेली प्रवेश तथा शिक्षण शुल्‍क परतावा प्रक्रीया  प्रस्‍तुत शिक्षण संस्‍था अवलंबत असते आणि याकामी तंत्रशिक्षण संचलनालय, महाराष्‍ट्र राज्‍य, मुंबई यांनी शैक्षणिक वर्ष सन 2013-14 साठी इन्‍फरमेशन ब्राऊचर निर्माण केलेले असते आणि त्‍यातील सर्व नियम प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांवर बंधनकारक असतात.  प्रस्‍तुत इन्‍फरमेशन ब्राऊचरमधील पृष्‍ठ क्र. 26,27,37 व 38 या पृष्‍ठांवर संदर्भीय नियमांची माहिती असून ते कागद याकामी जाबदाराने नि. 15 चे कागदयादीसोबत नि. 15/2 कडे दाखल केले आहेत.  त्‍यामधील नियम क्र. 8.9 चे उपकलम (2) नुसार प्रस्‍तुत तक्रारदाराचे शिक्षण शुल्‍क परत देता येत नाही.

    नियम 8.9 उपकलम (2) मध्‍ये म्‍हटले आहे की, Request received before cut off date but ‘a seat’ could not be filled before the cut off date – No Refund (except the security deposit)  असे सदर नियमात म्‍हटले आहे.  सदर Information Broachers  हे इंटरनेटवर सुध्‍दा प्रसिध्‍द केलेले आहे.  तक्रारदाराने प्रवेश रद्द करणेचे जाबदाराला कळविलेवर जाबदाराने डी.टी.ई चे नियमानुसार नमूना फॉर्म नं. ‘O’ भरुन शुल्‍क परताव्‍याची मागणी व मुळ कागदपत्रांची मागणी जाबदाराने डी.टी.ई कडे केली असता डी.टी.ई यांनी नियम क्र. 8.9 चे उपकलम (2) नुसार महाविद्यालयातील एखाद्या विद्यर्थ्‍याने अँडमिशन रद्द केलेनंतर त्‍याचे जागेवर दुस-या विद्यार्थ्‍याने प्रवेश घेतला नसेल, रिक्‍त जागा रहात असेल तर DTE चे नियमानुसार कोणतेही शुल्‍क परत देता येत नाही.  त्‍यामुळे डी.टी.ई ने दिले ऑनलाईन पावतीवर परतावा रक्‍कम रु. 0/- (रुपये शून्‍य) असे नमूद आहे.  प्रस्‍तुत पावती नि. 15 चे कागदयादीसोबत नि. 15/4 कडे दाखल आहे.  तक्रारदाराने त्‍याचा प्रवेश रद्द केला त्‍याची मूळ कागदपत्रे जाबदाराने तक्रारदाराला परत केली.  मात्र तक्रारदाराच्‍या प्रवेश रद्द करण्‍याने रिक्‍त झाले जागेवर दुस-या विद्यार्थ्‍याचे अँडमिशन झाले नाही.  त्‍यामुळे शिक्षण शुल्‍क परत करणे जाबदार यांचेवर नियमाप्रमाणे बंधनकारक नाही हे स्‍पष्‍ट होते.  प्रस्‍तुत कामी जाबदाराने नि. 15 चे कागदयादीसोबत नि. 15/3 कडे डि.टी.ई. यांचेकडील रिक्‍त जागांची यादी दाखल केली आहे.  यावरुन जाबदार महाविद्यालयात 120 जागांपैकी 40 जागा रिक्‍त राहिलेचे सदर यादीवरुन स्‍पष्‍ट होते.  त्‍यामुळे डि.टी.ई. या शासकिय संस्‍थेच्‍या नियम क्र. 8.9 चे उपकलम (2) नुसार तक्रारदार हे प्रवेश शुल्‍क (टयूशन फी) रक्‍कम रु.62,000/- परत मिळणेस पात्र नाहीत व सदरची टयूशन फी परत दिली नाही म्‍हणून सदोष सेवा होत नाही असे आमचे मत आहे.

     नियम 8.9 उपकलम (2) – Request received before cut off date but a seat could not be filled before the cut off date- No Refund (except the security deposit).

      डि.टी.ई. च्‍या वेळापत्रकानुसार Cut of date of all type of admission for the academic year 2013-14- 10/08/2013 ही होती व अँडमिशन रद्द झालेनंतरही प्रस्‍तुत जाबदाराचे महाविद्यालयात 120 पैकी 40 जागा रिक्‍त राहील्‍या आहेत.  प्रस्‍तुत तक्रारदाराचे अँडमिशन रद्द केलेनंतर त्‍याचे जागेवर नवीन विद्यार्थ्‍याचे अँडमिशन झालेले नाही ही बाब जाबदाराने सिध्‍द केली आहे.  त्‍यामुळे तक्रारदार टयुशन फी परत मिळणेस पात्र नाहीत असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.  प्रस्‍तुत कामी आम्‍ही मा. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे खालील नमूद न्‍यानिवाडा व त्‍यातील दंडकाचा आधार घेतला आहे.  मा. उच्‍च न्‍यायालय, मुंबई यांचेकडील सिव्‍हील रिटपिटीशन क्र.2933/2011 अमीन सदाशिव वैद्य वि. प्रिन्सिपल के.सी.कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कोपरी

Head Note-  In present case as a result of the withdrawal by the petitioner from the seat allotted, the seat would remain vacant for a period of four years.  Hence no case for interference is made out petition dismissed.

    सबब सदरचे तक्रारदार हे टयुशन फीची रक्‍कम मिळणेस पात्र नाहीत असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

8.   सबब प्रस्‍तुत कामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.  

आदेश

1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्‍यात येतो.

2. सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

3. सदर न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

 

ठिकाण- सातारा.

दि. 30-09-2015.

 

(सौ.सुरेखा हजारे)    (श्री.श्रीकांत कुंभार)    (सौ.सविता भोसले)

सदस्‍या             सदस्‍य             अध्‍यक्षा

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

 

 

 
 
[HON'BLE MRS. SAVITA BHOSALE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Mrs.Surekha Hazare]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.