Maharashtra

Satara

CC/15/84

shri surykant shirang kadam - Complainant(s)

Versus

shri lXimi sah patsastha - Opp.Party(s)

inamdar

07 Dec 2015

ORDER

Consumer Disputes Redressal
Forum, Satara
 
Complaint Case No. CC/15/84
 
1. shri surykant shirang kadam
khed
satara
maha
...........Complainant(s)
Versus
1. shri lXimi sah patsastha
sagamnagr satara
satara
mahs
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SAVITA BHOSALE PRESIDENT
 HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR MEMBER
  HON'BLE MRS.SUREKHA HAJARE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

             तक्रार क्र. 84/2015.

                      तक्रार दाखल दि.06-05-2015.

                            तक्रार निकाली दि.07-12-2015. 

 

 

1. श्री. सुर्यकांत श्रीरंग कदम,

रा. महात्‍मा पुले चौक, न्‍यू हायवे खेड,

सातारा, ता.जि.सातारा.                             ....  तक्रारदार

  

         विरुध्‍द

 

1. श्री. लक्ष्‍मी सहकारी पतसंस्‍था मर्यादित,

   संगमनगर (खेड),सातारा, ता.जि.सातारा तर्फे

   व्‍यवस्‍थापक श्री. तानाजी काशिनाथ जाधव

2. श्री. दिपक रोशनलाल अग्रवाल, चेअरमन,

3. श्री.जयसिंग फत्‍तेसिंग राजेमहाडिक, व्‍हा.चेअरमन,

   नं.1 ते 3 रा.श्रीलक्ष्‍मी सहकारी पतसंस्‍था लि.,

   30/34, गुरुवार पेठ, सातारा, जि.सातारा

   फलटण, ता.फलटण,जि.सातारा                         ....  जाबदार

 

 

                  तक्रारदारातर्फे अँड.पी.आर.इनामदार.

                  जाबदार क्र.1 ते 3 तर्फे अँड.आर.एन.गलांडे.

                  

 

                        न्‍यायनिर्णय  

 

सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला

 

1.   तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात कथन खालीलप्रमाणे-

       तक्रारदार हे महात्‍मा फुले चौक, न्‍यू हायवे, खेड, सातारा ता.जि.सातारा येथील कायमस्‍वरुपी रहिवासी आहेत. जाबदार क्र.1 ही सहकार कायद्याप्रमाणे स्‍थापन झालेली सहकारी पतसंस्‍था असून ग्राहकांकडून ठेवी स्‍वरुपात रक्‍कम स्विकारुन मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी  ग्राहकांनी रक्‍कम मागीतल्‍यास सदर रक्‍कम परत देणे अशा उद्देशाने स्‍थापन झाली आहे. तक्रारदाराने जाबदार पतसंस्‍थेत खालील कोष्‍टकात नमूद केलेप्रमाणे दामदुप्‍पट ठेव योजनेत रक्‍कम गुंतवली होती व आहे.

अ.क्र.

ठेवपावती क्र.

ठेव रक्‍कम

ठेव ठेवली तारीख

मुदत संपते तारीख

मुदतीनंतर देय

रक्‍कम

1

577

   25,000/-

20/04/2005

20/04/2012

  50,000/-

2

578

   25,000/-

20/04/2005

20/04/2012

  50,000/-

3

1954

   25,000/-

20/04/2005

20/04/2012

  50,000/-

4

1955

   25,000/-

20/04/2005

20/04/2012

  50,000/-

5

1570

   25,000/-

07/06/2005

07/06/2012

  50,000/-

6

1571

   25,000/-

07/06/2005

07/06/2012

  50,000/-

7

1572

   25,000/-

07/06/2005

07/06/2012

  50,000/-

8

1573

   25,000/-

07/06/2005

07/06/2012

  50,000/-

9

1965

   25,000/-

07/06/2005

07/06/2012

  50,000/-

10

1967

   25,000/-

07/06/2005

07/06/2012

  50,000/-

11

1968

   25,000/-

07/06/2005

07/06/2012

  50,000/-

 

एकूण

 2,75,000/-

 

 

5,50,000/-

 

 

     वर नमूद तपशिलाप्रमाणे जाबदार यांचेकडून तक्रारदार यांना दामदुप्‍पठ ठेवपावतीची एकूण दामदुप्‍पट रक्‍कम रु. 5,50,000/- (रुपये पाच लाख पन्‍नास हजार मात्र) व त्‍यावरील आजअखेरचे व्‍याज जाबदार हे तक्रारदार यांना देणे लागत आहेत आणि प्रस्‍तुत ठेवीची रक्‍कम मुदत संपल्‍यानंतर व्‍याजासह जाबदाराने तक्रारदार यांना देणे बंधनकारक होते व आहे.  परंतू तक्रारदाराने प्रस्‍तुत ठेवींच्‍या मुदती संपलेनंतर ठेवीच्‍या रकमेची व्‍याजासह जाबदार यांचेकडे मागणी केली असता जाबदार यांनी रक्‍कम देणेस टाळाटाळ केली व आजअखेर तक्रारदार यांना ठेवीची रक्‍कम अदा केलेली नाही.  त्‍यामुळे जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे. म्‍हणून सदर ठेवीच्‍या सर्व रकमा व्‍याजासह जाबदारांकडून वैयक्‍तीक व संयुक्तिकरित्‍या वसूल होऊन मिळावी व त्‍याचा तक्रारदाराला मानसिक व शारिरीक त्रास झालेला असलेने जाबदार यांचेकडून नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा  म्‍हणून तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज मे मंचात दाखल केला आहे. 

2.   तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी जाबदार यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या दामदुप्‍पट ठेवपावतींची रक्‍कम रु.2,75,000/- (दोन लाख पंचाहत्‍तर हजार मात्र) ची दामदुप्‍पट देय रक्‍कम रु.5,50,000/- (रुपये पाच लाख पन्‍नास हजार मात्र) प्रस्‍तुत ठेवपावतीवरील नियमाप्रमाणे व्‍याजासह वसूल होवून मिळावी व प्रस्‍तुत रकमेवर रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 15 टक्‍के दराने व्‍याज मिळावे,  मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.1,00,000/-, तर तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रु.20,000/- जाबदार यांचेकडून मिळावा, अशी विनंती तक्रारदाराने या कामी केली आहे.

3.  तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी नि. 2 क‍डे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते 5/3 कडे  अनुक्रमे जाबदारांकडे ठेवलेलेल्‍या दामदुप्‍पट ठेवींच्‍या ठेवपावत्‍यांच्‍या व्‍हेरिफाईड प्रती, तक्रारदाराने जाबदारांना पाठवलेली नोटीसची स्‍थळप्रत, जाबदाराने तक्रारदाराला दिलेले नोटीसचे उत्‍तर, नि.15 कडे तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत दाखल केलेले शपथपत्र हेच पुराव्‍याचे शपथपत्र समजणेत यावे म्‍हणून पुरसीस, नि. 17 चे कागदयादीसोबत जाबदार पतसंस्‍थेच्‍या संचालक मंडळाची यादी (मुळ प्रत), नि. 18 कडे लेखी युक्‍तीवाद वगैरे कागदपत्रे मे मंचाकडे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.

4.  प्रस्‍तुत कामी जाबदार क्र. 1 ते 3  यांनी याकामी नि. 13 कडे म्‍हणणे, नि. 14 कडे म्‍हणण्‍याचे अँफीडेव्‍हीट, नि. 20 चे कागदयादीसोबत नि.20/1 कडे चेअरमन, व्‍हा.चेअरमन व सर्व संचालक मंडळाने राजीनाम्‍याच्‍या ठरावाची प्रत मे मंचात दाखल केली आहे.  जाबदाराने त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदारचे तक्रार अर्जातील सर्व कथन फेटाळलेले आहेत.  त्‍यांनी पुढीलप्रमाणे आक्षेप व नोंदवले आहेत.

i.  तक्रारदाराचा तक्रार अर्ज  व त्‍यातील मजकूर मान्‍य व कबूल नाही.

ii.  तक्रार अर्ज कलम 1 मधील मजकूर स्‍थूल मानाने बरोबर आहे.  परंतू जाबदार पतसंस्‍थेच्‍या संचालक मंडळामध्‍ये वारंवार बदल झाले आहेत. तसेच काही कालावधीकरीता प्रशासक कार्यरत होते.

iii. तक्रारदाराने कलम 2 मध्‍ये केलेले ठेवपावत्‍यांच्‍या वर्णनाप्रमाणे ठेवीची रक्‍कम जाबदार पतसंस्‍थेत गुंतविली होती ही बाब जाबदाराला मान्‍य आहे.  परंतू तक्रारदाराने जाबदारांकडे प्रस्‍तुत रकमेची कधीही मागणी केलेली नाही.  त्‍यामुळे तक्रारदाराला जाबदाराने कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही.

iv.  तक्रारदाराचे ठेवीची मुदत दि.20/4/2012 व दि. 7/6/2012 रोजी संपली आहे.  यामुळे तक्रारदाराने एप्रील,2012 व जून,2012 नंतर दोन वर्षाचे आत मुदतीत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल करणे आवश्‍यक होते.  परंतू तक्रारदाराने तक्रार अर्ज मुदतीत दाखल केलेला नाही त्‍यामुळे तक्रार अर्ज फेटाळणेत यावा.

v.   प्रस्‍तुत तक्रारदाराच्‍या ठेवी लक्ष्‍मी सहकारी बँकेत होत्‍या.  प्रस्‍तुत बँक अवसायनात निघालेने तसेच बंद पडल्‍याने सदर ठेवी मिळण्‍यास अडचण आली.  सन 2008 मध्‍ये जाबदार संस्‍थेवर अवसायानात निघालेने दि. 19/7/2009 ते दि.28/2/2012 या कालावधीमध्‍ये प्रशासक यांची नेमणूक झाली होती.  त्‍यामुळे  कर्जदार यांचेकडून वसूली करुन ठेवीदारांच्‍या ठेवीच्‍या रक्‍कमा टप्‍प्‍या टप्‍प्‍याने देण्‍याचे काम  सुरु आहे.  त्‍याप्रमाणे तक्रारदार यांच्‍या ठेवीही देण्‍यास जाबदार तयार आहेत.  तक्रारदाराने ज्‍या काळात ठेवी ठेवल्‍या त्‍यावेळी सध्‍याचे संचालक मंडळ अस्तित्‍वात नव्‍हते त्‍यामुळे या कारणास्‍तव तक्रार अर्ज फेटाळणेत यावा. अशा स्‍वरुपाचे म्‍हणणे जाबदारांनी दाखल केले आहे. 

5.    वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे.मंचाने प्रस्‍तुत कामी प्रस्‍तुत तक्रारीचे निराकरणार्थ खालील मुद्दयांचा विचार केला-

अ.क्र.            मुद्दा                                      उत्‍तर

1.  तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय?                    होय.

2.  जाबदार यांनी तक्रारदाराना सदोष सेवा पुरवली आहे काय?        होय.

3.  अंतिम आदेश काय?                                  खालील नमूद

                                                       केलेप्रमाणे.

विवेचन

मुद्दा क्र.1 व 2-

6.      वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत. कारण-

प्रस्‍तुत तक्रारदाराने जाबदार क्र1 पतसंस्‍थेत खालील परिशिष्‍टात नमूद केलेप्रमाणे केलेली रक्‍कम मुदतठेव योजनेत गुंतविली होती व आहे.

अ.क्र.

ठेवपावती क्र.

ठेव रक्‍कम

ठेव ठेवली तारीख

मुदत संपते तारीख

मुदतीनंतर देय

रक्‍कम

1

577

   25,000/-

20/04/2005

20/04/2012

  50,000/-

2

578

   25,000/-

20/04/2005

20/04/2012

  50,000/-

3

1954

   25,000/-

20/04/2005

20/04/2012

  50,000/-

4

1955

   25,000/-

20/04/2005

20/04/2012

  50,000/-

5

1570

   25,000/-

07/06/2005

07/06/2012

  50,000/-

6

1571

   25,000/-

07/06/2005

07/06/2012

  50,000/-

7

1572

   25,000/-

07/06/2005

07/06/2012

  50,000/-

8

1573

   25,000/-

07/06/2005

07/06/2012

  50,000/-

9

1965

   25,000/-

07/06/2005

07/06/2012

  50,000/-

10

1967

   25,000/-

07/06/2005

07/06/2012

  50,000/-

11

1968

   25,000/-

07/06/2005

07/06/2012

  50,000/-

 

एकूण

 2,75,000/-

 

 

5,50,000/-

 

     प्रस्‍तुत ठेवपावत्‍यांची व्‍हेरिफाईड प्रती याकामी तक्रारदाराने नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते नि.5/6 कडे दाखल केल्‍या आहेत.  म्‍हणजेच तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत व होते हे स्‍पष्‍ट होते. नि. 17 सोबत  तक्रारदाराने याकामी जाबदार क्र. 1 पतसंस्‍थेच्‍या संचालक मंडळाची यादी दाखल केलेली आहे. परंतु चेअरमन व व्‍हा.चेअरमन यांचे व्‍यतिरिक्‍त इतर संचालकांना पक्षकार केलेले नाही.  प्रस्‍तुत ठेवींची मुदत संपलेनंतर तक्रारदाराने जाबदार यांचेकडे रकमेची व्‍याजासह वारंवार तोंडी व लेखी मागणी केली असता जाबदाराने रक्‍कम देणेस टाळाटाळ केली व रक्‍कम तक्रारदाराला अदा केली नाही.  तसेच दि.25/2/2015 रोजी वकीलामार्फत नोटीस (नि.5/7) जाबदारांना पाठवून रकमेची मागणी केली असता, प्रस्‍तुत जाबदारांनी सदर नोटीसीला दि. 13/3/2015 रोजी उत्‍तर (नि.5/9) दिलेले आहे. या उत्‍तरी नोटीसमध्‍ये जाबदारांनी असे म्‍हटले आहे की, नियमानुसार होणारे ठेवीची रक्‍कम जशी वसूल होईल तशी मा. जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था यांचे सूचनेप्रमाणे समन्‍वय पध्‍दतीने देणार आहेत. त्‍याप्रमाणे जाबदारांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍येही तसे कथन केले आहे. वास्‍तविक पाहता, तक्रारदारानी दामदुप्‍पट ठेवीच्‍या रकमेची मुदत संपलेनंतर रकमेची मागणी केली असता सदरची रक्‍कम आजअखेर होणा-या व्‍याजासह देणे जाबदार यांचेवर बंधनकारक होते व आहे.  त्‍यामुळे तक्रारदाराने त्‍यांच्‍या वरील परिशिष्‍टात नमूद दामदुप्‍पट ठेवपावत्‍यांची ठेवीची व्‍याजासह रक्‍कम मुदतीनंतर तक्रारदाराने जाबदारांकडे वारंवार मागणी करुनही जाबदारांनी अदा केलेली नाही हे स्‍पष्‍ट सिध्‍द होत आहे.  त्‍यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे. सबब आम्‍ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी दिलेले आहे.

     जाबदार यांनी तक्रारदार यांना दामदुप्‍पट ठेवीची रक्‍कम व्‍याजासह अदा करणे बंधनकारक असूनही जाबदाराने प्रस्‍तुत ठेवीची रक्‍कम तक्रारदारास अदा केलेली नाही ही सेवेतील त्रुटीच आहे असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  सबब जाबदार क्र. 1 पतसंस्‍था व जाबदार क्र 2 ते 3 यांना वैयक्तिक व संयुक्‍तीकपणे तक्रारदाराला वरील परिशिष्‍टात नमूद दामदुप्‍पट ठेवपावत्‍यांची त्‍या ठेवपावतींवरील नमूद केले व्‍याजदराने होणा-या व्‍याजासह रक्‍कम तक्रारदारास अदा करणेसाठी Co-operative corporate veil  नुसार जबाबदार धरणेत येते.  सबब प्रस्‍तुत कामी आम्‍ही मा.उच्‍च न्‍यायालय मुंबई यांचे रिट पिटीशन क्र.117/2011- मंदाताई संभाजी पवार विरुध्‍द स्‍टेट बँक ऑफ महाराष्‍ट्र या न्‍यायनिवाडयाचा व त्‍यातील दंडकांचा आधार घेतला आहे. 

7.  सबब आम्‍ही प्रस्‍तुत कामी खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-

                           - आदेश

1.  तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

2. जाबदार क्र. 1 पतसंस्‍था व जाबदार क्र. 2 ते 3 यांना वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदाराची अनुक्रमे दामदुप्‍पट ठेवपावती क्र. 577, 578, 1954, 1955, 1570, 1571, 1572, 1573, 1965, 1967 व 1968  वरील संपूर्ण रक्‍कम प्रस्‍तुत ठेवपावतींवर नमूद केले व्‍याजदाराने होणा-या व्‍याजासह तक्रारदार यांना अदा करणेसाठी जबाबदार धरणेत येते.

3. जाबदार क्र. 1 पतसंस्‍था व जाबदार क्र. 2 ते 3 यांना तक्रारदाराची खाली परिशिष्‍टात नमूद दामदुप्‍पट ठेवपावती वरील संपूर्ण दामदुप्‍पट रक्‍कम प्रस्‍तुत ठेवपावतींवर नमूद केले व्‍याजदाराने होणा-या व्‍याजासह तक्रारदार यांना अदा करावी.

अ.क्र.

ठेवपावती क्र.

ठेव रक्‍कम

ठेव ठेवली तारीख

मुदत संपते तारीख

मुदतीनंतर देय

रक्‍कम

1

577

   25,000/-

20/04/2005

20/04/2012

  50,000/-

2

578

   25,000/-

20/04/2005

20/04/2012

  50,000/-

3

1954

   25,000/-

20/04/2005

20/04/2012

  50,000/-

4

1955

   25,000/-

20/04/2005

20/04/2012

  50,000/-

5

1570

   25,000/-

07/06/2005

07/06/2012

  50,000/-

6

1571

   25,000/-

07/06/2005

07/06/2012

  50,000/-

7

1572

   25,000/-

07/06/2005

07/06/2012

  50,000/-

8

1573

   25,000/-

07/06/2005

07/06/2012

  50,000/-

9

1965

   25,000/-

07/06/2005

07/06/2012

  50,000/-

10

1967

   25,000/-

07/06/2005

07/06/2012

  50,000/-

11

1968

   25,000/-

07/06/2005

07/06/2012

  50,000/-

 

एकूण

 2,75,000/-

 

 

5,50,000/-

 

4. वर परिशिष्‍टातील दामदुप्‍पट ठेवींची व्‍याजासह रकमेवर  अर्ज दाखल तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याजाने होणारी व्‍याजासह रक्‍कम जाबदार क्र. 1 पतसंस्‍था व जाबदार क्र. 2 ते 3 यांना वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदार यांना अदा करावी.    

5. तक्रारदाराला झाले मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.15,000/-(रुपये पंधरा हजार मात्र जाबदार क्र. 1 पतसंस्‍था व जाबदार क्र. 2 ते 3 यांना वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदारांना  अदा करावेत

6. अर्जाचा खर्च रक्‍कम रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) जाबदार क्र. 1 पतसंस्‍था व जाबदार क्र. 2 ते 3 यांना वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदारांना  अदा करावेत.

7. वरील सर्व आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात जाबदार क्र. 1 पतसंस्‍था व जाबदार क्र. 2 ते 3 यांना वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या करावे.

8.  आदेशाची पूर्तता विहीत मुदतीत जाबदारांनी  न केलेने तक्रारदाराला ग्राहक

    संरक्षण कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची

    मुभा राहील.

9.  सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

10. सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत   याव्‍यात.

ठिकाण- सातारा.

दि.07-12-2015.

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

 

 

 

 

 

 

 
 
[HON'BLE MRS. SAVITA BHOSALE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR]
MEMBER
 
[ HON'BLE MRS.SUREKHA HAJARE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.