नि.48 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र.10/2010 नोंदणी तारीख – 15/1/2010 निकाल तारीख – 30/4/2010 निकाल कालावधी – 105 दिवस श्रीमती सुचेता मलवाडे, प्रभारी अध्यक्ष श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ 1. कु. दीप परेश ठक्कर 2. कु.दिया परेश ठक्कर तर्फे अ.पा.क.वडील 3. परेश गोविंद ठक्कर, रा.484ब/2, सदर बझार, जुन्या आर.टी.ओ.ऑफिसशेजारी, सातारा ----- अर्जदार (वकील श्री.प्रकाश जोशी) विरुध्द 1. श्री लक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्या. (समन्स घेणार) संस्थापक/चेअरमन, महेंद्र भागवतराव देसाई रा. संगमनगर (खेड), ता.जि.सातारा 2. संस्थापक/चेअरमन, महेंद्र भागवतराव देसाई श्री लक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्या. संगमनगर (खेड), ता.जि.सातारा रा. संगमनगर, ता.जि.सातारा 3. श्री लक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्या. तर्फे व्हा.चेअरमन, श्री लक्ष्मण नागेश जगताप रा.मु.पो. खेड ता.जि.सातारा 4. श्री लक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्या. व्यवस्थापक, सौ भारती जगताप रा. संगमनगर (खेड) सातारा ता.जि.सातारा 5. संचालक श्री शामराव शंकर महाजन रा. प्रतापसिंहनगर, ता.जि.सातारा 6. संचालक, श्री लाला बाबू शेख मु.पो. पिरवाडी, ता.जि.सातारा 7. संचालक, श्री चंद्रकांत हरिभाऊ भोसले रा. संगममाहुली, ता.जि.सातारा 8. संचालक, श्री हंबीरराव श्रीरंग काटकर रा. श्रीनाथनगर, पो. त्रिपुटी, ता. कोरेगाव जि. सातारा 9. संचालक श्री संजीव संभाजीराव मोहिते रा. मु श्रीनगर हौ.सोसायटी, पो. कृष्णानगर, ता.जि.सातारा 10. संचालक, श्री भिमराव सुदाम चव्हाण रा. मु.पो. चाहूर, पो. कृष्णानगर, ता.जि.सातारा 11. संचालक श्री श्रीकांत शिवाजीराव तोडकर रा. कोकोळ, संगमनगर, ता.जि.सातारा 12. संचालक, श्री कल्याण ज्ञानदेव गायकवाड रा. कल्याणपार्क, गोडोली, सातारा 13. संचालक श्री श्रीकांत निळकंठ उपासनी रा. सत्यमनगर, ता.जि.सातारा 14. संचालक श्री सोमनाथ पांडुरंग सुतार रा. मु.पो. नागठाणे, ता.जि.सातारा 15. संचालक श्री रत्नाकर आनंदराव खराडे रा.158, शुक्रवार पेठ, सातारा 16. संचालिका सौ मनाली महेंद्र ठक्कर रा. संगमनगर, ता.जि.सातारा 17. संचालिका, श्रीमती आशाताई जयप्रकाश भोसले रा. राजयोग, जुन्या आरटीओसमोर, सातारा 18. शाखाधिकारी, श्री लक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्या. संगनगर (खेड) शाखा सातारा शहर ----- जाबदार (एकतर्फा ) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी जाबदार संस्थेमध्ये वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत रक्कम ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. सदरच्या ठेवींची मुदत संपलेली नाही. परंतु अर्जदार यांना आर्थिक अडचण असल्याने देय होणा-या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली. तथापि जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीवर व्याजसहित देय झालेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्यात यावयाची रक्कम न दिल्यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक आहेत. त्यामुळे जाबदार संस्थेकडून मुदत ठेव पावतीची एकूण देय रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्ये अर्जदार यांनी ठेवींची एकूण रक्कम तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.10,000/- ची मागणी केलेली आहे. 2. प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी जाबदार क्र. 1 ते 3 व 18 यांना झालेली आहे. नोटीस मिळालेची पोचपावती नि. 18 ते 20 व 26 ला दाखल आहे. परंतु जाबदार क्र.1 ते 3 व 18 हे या प्रकरणात हजर झालेले नाहीत वा त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत व शपथपत्र दाखल केलेले नाही. सबब याबाबतचा योग्य असा आदेश दि. 22/2/2010 रोजी नि.1 वर पारीत केला आहे. 3. जाबदार क्र. 9, 13, 14, 16 व 17 यांचेविरुध्द प्रस्तुत प्रकरणी अर्जदार यांनी योग्य ती पूर्तता न केलेने त्यांचेविरुध्द प्रस्तुतचा तक्रारअर्ज रद्द करणेत येत आहे. 4. जाबदार क्र. 4 ते 7, जाबदार क्र.10, 11 व 15 यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि. 30 ला दाखल केले आहे. तसेच जाबदार क्र.8 यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.32 ला व जाबदार क्र.12 यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.46 ला दाखल करुन अर्जदारचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. अर्जदार हा जाबदार संस्थेचा भागधारक असल्याने प्रस्तुतची तक्रार चालू शकत नाही. अर्जदार यांनी जाबदार क्र.17 यांचेकडे ठेवी ठेवलेल्या आहेत. जाबदार क्र.17 यांनी सदरच्या ठेवी कर्जरुपाने अन्य सभासदांना वाटप केलेल्या आहेत. सदरचे कर्जदार यांनी वेळेत कर्जाची फेड न केल्याने संस्थेचे कामकाज ठप्प झालेले आहे. अ.पा.क. म्हणून अर्जदार यांनी योग्य त्या कोर्टातून नेमणूक करुन घेतलेली नाही. जाबदार संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करुन त्यावर प्रशासकांची नेमणूक केलेली आहे. त्यामुळे जाबदार हे ठेवरक्कम परत करण्यास जबाबदार नाहीत. ठेवपावत्यांवर प्रस्तुतचे जाबदार यांच्या सहया नाहीत. संस्थेचा दैनंदिन कारभार हे जाबदार क्र. 1 ते 3 हेच पहात होते. जाबदार यांचा त्यामध्ये सहभाग नव्हता सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 5. अर्जदार यांनी या अर्जाचे कथनातील सिध्दतेसाठी नि. 2 ला शपथपत्र दिलेले आहे. ते शपथपत्र पाहिले. अर्जदार यांनी नि. 5 सोबत दाखल केलेल्या मूळ ठेवपावत्या पाहिल्या. 6. जाबदार यांचे कथनानुसार अर्जदार हे भागधारक सभासद असल्याने त्यांची तक्रार चालू शकत नाही. परंतु अर्जदार हे जरी भागधारक सभासद असले तरी त्यांनी ठेवीदार ग्राहक या नात्याने जाबदार संस्थेमध्ये ठेवी ठेवलेल्या आहेत. अर्जदार व जाबदार यांचेमधील वाद हा सभासद व सहकारी संस्था यांचेदरम्यानचा वाद नसून तो ठेवीदार ग्राहक व पतसंस्था यांचेदरम्यानचा वाद आहे. सदरची बाब विचारात घेता अर्जदार यांचा तक्रारअर्ज या मंचासमोर चालणेस पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. 7. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये अर्जदार यांनी जाबदार क्र.17 यांचेकडे ठेवी ठेवल्या होत्या सबब अन्य जाबदार यांना ठेव रक्कम परत करण्यात जबाबदार धरता येणार नाही असे कथन केले आहे. परंतु संस्थेच्या एकूण आर्थिक व्यवहारांना संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ हे जबाबदार असते, त्यामुळे ठेवपरतीची जबाबदारी त्यांना टाळता येणार नाही. तसेच जरी संस्थेवर प्रशासकांची नेमणूक केलेली असली तरी जाबदार यांच्या कार्यकाळात घडलेल्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी जाबदार यांना टाळता येणार नाही. प्रशासकांची नेमणूक केलेनंतर प्रस्तुतचे जाबदार यांना ठेव परतीच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे असे दर्शविणारा कोणताही कागदोपत्री पुरावा जाबदार यांनी दाखल केलेला नाही. सबब जाबदार यांना ठेवरक्कम परतीची जबाबदारी झटकता येणार नाही असे या मंचाचे मत आहे. 8. कर्जदार कर्जाची परतफेड करीत नाहीत त्यामुळे संस्थेचे कामकाज ठप्प झाले आहे इ. कारणे ही ठेवरक्कम परत न करण्यास कायदेशीर कारणे ठरु शकत नाहीत. तसेच ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार अ.पा.क. म्हणून या मंचाकडे दाद मागताना त्यासाठी अ.पा.क. नेमणूकीबाबत इतर न्यायालयाच्या आदेशाची आवश्यकता नाही. वरील सर्व बाबी विचारात घेता जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये नमूद केलेली कथने योग्य, संयुक्तिक व कायदेशीर नाहीत, सबब अर्जदार हे जाबदार यांचेकडून ठेव रक्कम परत मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. 9. अर्जदार यांनी दाखल केलेल्या वर नमूद मूळ ठेवपावत्या पाहिल्या असता असे स्पष्ट दिसून येते की, अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेमध्ये वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेल्या होत्या व आहेत. जरी सदरच्या ठेवींची मुदत पूर्ण झालेली नसली तरी अर्जदार यांना ठेवरक्कम परत मागण्याचा कायद्यानेच अधिकार आहे. मुदत पूर्ण झाली नाही म्हणून अर्जदारच्या इच्छेविरुध्द जाबदार अर्जदारच्या ठेव रकमा अडवून ठेवू शकत नाही. तथापि, अर्जदार यांचे शपथपत्र व अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे तसेच जाबदार यांची कैफियत पाहता असे दिसून येते की, जाबदार यांनी अर्जदार यांना देय असलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केलेली आहे. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्या सेवेत कमतरता केलेली आहे. सबब या प्रकरणी मंचाचे असे स्पष्ट मत झाले आहे की, अर्जदार यांना जाबदार यांनी कबूल केलेली सेवा म्हणजे ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेवर व्याजासहित देय झालेली रक्कम अर्जदार यांनी मागणी करुनही दिलेली नाही. अशा प्रकारे अर्जदार हे जाबदार यांचेकडून रक्कम मिळणेस पात्र आहेत असे दिसून येत आहे. 10. एक गोष्ट नमूद करणे जरुरीचे आहे की, जाबदार क्र. 2 जे लक्ष्मी सहकारी पतसंस्था या संस्थेचे संस्थापक/चेअरमन आहेत, अशा या जबाबदारीच्या पदावर काम करणा-या व्यक्तीने प्रस्तुतचे कायदेशीर प्रकरणाची नोटीस/सूचना स्वीकारणे व नेमलेल्या तारखांना या मंचासमोर हजर होणे जरुरीचे होते. तथापि, कसलेही संयुक्तिक कारण जाबदार क्र. 2 यांचेतर्फे याकामी पुढे येत नाही की, जेणेकरुन जाबदार क्र. 2 हे याकामी गैरहजर राहिलेले आहेत. सबब, अर्जदार यांचे या अर्जातील कथनानुसार अर्जदार यांनी विनंती कलमामध्ये केलेली विनंती अंशतः मान्य करणे जरुरीचे आहे. 11. या सर्व कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 1 ते 8, जाबदार क्र.10 ते 12 व जाबदार क्र. 15 व 18 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. 1. ठेवपावती क्र. 771, 751, 752, 753, 754, 755, 756, 757, 758, 759, व 760 वरील मूळ रकमा मुदतपूर्व ठेवपावतीवर नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्याव्यात. 2. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- द्यावेत. 3. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 30/4/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) सदस्य प्रभारी अध्यक्ष |