Maharashtra

Satara

CC/11/124

Sou. Kantabai Vittal Kadam - Complainant(s)

Versus

Shri Laxmi Sahakari Patsanstha Sangamnagar Khed Manager - Opp.Party(s)

Gaykawad

05 Jun 2015

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

 

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

            मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                               मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

 

                             तक्रार क्र. 124/2011.

                            तक्रार दाखल दि.4-10-2011.

                                    तक्रार निकाली दि.5-6-2015. 

 

सौ.कांताबाई विठ्ठल कदम,

रा.खेड, जि. सातारा.                        ....  तक्रारदार

  

         विरुध्‍द

1. श्री.लक्ष्‍मी सहकारी पतसंस्‍था मर्या.

   संगमनगर, खेड, ता.जि.सातारा.

2. श्री.महेंद्र भागवतराव देसाई, चेअरमन.

   रा. 116/6, मंगळाईचा पायथा,

   शाहूनगर, गोडोली, सातारा 415 001.

3. श्री.लक्ष्‍मण नागेश जगताप, व्‍हा.चेअरमन.

   रा.संगमनगर, खेड, ता.जि.सातारा.

4. शाखाधिकारी, श्री.लक्ष्‍मी सह.पतसंस्‍था मर्या.

   रा.संगमनगर, खेड, जा.जि.सातारा.

5. श्री.जे.पी.गावडे, प्रशासक.

6. श्री.व्‍यंकटराव भागोजी पन्‍हाळकर, चेअरमन.

7. श्री.जयसिंग फत्‍तेसिंग राजेमहाडीक, व्‍हा.चेअरमन.

8. श्री.योगेश चंद्रकांत सुर्यवंशी, संचालक.

9. श्री.गणपत तुकाराम चव्‍हाण, संचालक.

10. श्री.उत्‍तरम बबन काट, संचालक.

11. श्री.दिपक रोशनलाल अग्रवाल, संचालक.

12. श्री.सिकंदर हमजा मुल्‍ला, संचालक.

13. श्री.सदाशिव दगडू शिंदे, संचालक.

    क्र.5 ते 13 रा. श्री.लक्ष्‍मी सहकारी पतसंस्‍था मर्या.

    संगमनगर,खेड, ता.जि.सातारा.                ....  जाबदार

 

                  तक्रारदारातर्फे अँड.व्‍ही.ए.गायकवाड.   

               जाबदार 1 ते 13 तर्फे अँड.एस.डी.शिंदे.      

                                          

                        न्‍यायनिर्णय  

 

सदर न्‍यायनिर्णय मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य यानी पारित केला

                                                    

1.       तक्रारदार हिने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.

        तक्रारदारांचे तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालीलप्रमाणे –

        तक्रारदार या खेड, ता.जि.सातारा येथील कायमस्‍वरुपी रहिवासी आहेत.  त्‍यानी जाबदारांचे पतसंस्‍थेत जाबदारांचे आकर्षक व्‍याजदर लक्षात घेऊन व जाबदारांचे विनंतीवरुन खालीलप्रमाणे रकमा त्‍यांचे वृध्‍दापकाळाची तरतूद व बचत म्‍हणून ठेव स्‍वरुपात रकमा ठेवलेल्‍या होत्‍या, त्‍याचा तपशील खालीलप्रमाणे-

अ.क्र.

ठेवपावती क्र.

ठेव रक्‍कम रु.

ठेव ठेवलेचा दिनांक

ठेव मुदत संपलेचा दिनांक

ठेवीवरील व्‍याजदर

1.

9787

25,000/-

8-12-2007

8-12-2009

12 %

       सदरची रक्‍कम तक्रारदारांनी जाबदारांकडे वारंवार मागणी करुनही दिलेली नाही.  तक्रारदारानी वारंवार अथक प्रयत्‍न करुनही, संपर्काचा ससेमिरा कायम ठेवलेनंतरही यातील जाबदार क्र.2 ते 6 यांनी तक्रारदाराला दि.20-7-2011 रोजी रक्‍कम रु.25,000/-चा चेक क्र.21547 दिला.  त्‍याप्रमाणे रु.25,000/-ची रक्‍कम तक्रारदाराना मिळाली.  त्‍याचवेळी तक्रारदारानी त्‍यांची पावती जाबदारांकडे जमा केली.  तक्रारदाराचा चेक बँकेमध्‍ये वटवणेसठी तक्रारदार गेले असता बँकेच्‍या लोकांनी सदर रकमेवर जाबदारांचे नियमानुसार व्‍याज दिले नसल्‍याचे निदर्शनास आणले. त्‍यामुळे तक्रारदारानी दि.8-12-2007 पासून वरील ठेवरकमेवर द.सा.द.शे.12 टक्‍क्‍याने आजपर्यंत होणारे व्‍याज मिळणेसाठी मंचाकडे मागणी केली आहे, त्‍याप्रमाणे जाबदारानी तक्रारदारांच्‍या ठेवीवरील व्‍याज तिच्‍या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन त्‍याना दिल्‍याने व जाबदारानी त्‍यांचे व्‍यवसायात अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदाराची रक्‍कम न देऊन व्‍याजाबाबत फसवणूक केल्‍यामुळे शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.10,000/- मिळणेबाबत मंचाला विनंती केली आहे. 

2.    सदर तक्रारीच्‍या नोटीसा जाबदाराना पाठवणेत आल्‍या व त्‍याप्रमाणे जाबदार क्र.1 व 6 यांचेतर्फे अँड.एस.डी.शिंदे यांनी हजर होऊन नि.13 कडे वकीलपत्र दाखल केले.  त्‍यांनी त्‍यांचे म्‍हणणे नि.18 कडे दाखल केले असून त्‍याचे पृष्‍टयर्थ नि.19 कडे जाबदारांचे-व्‍यवस्‍थापकांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.  नि.29/1 कडे तक्रारदारानी जाबदारांच्‍या वैध संचालक मंडळाची यादी दाखल केली आहे.  या सर्व संचालकांना यातील तक्रारदारानी मंचाच्‍या आदेशानुसार दि.8-1-2014 रोजी इतर संचालकांना या कामी सामील पक्षकार केलेले आहे.  या सर्व सामील पक्षकाराना व या पूर्वीच्‍या संचालकांना मंचातर्फ काढलेल्‍या  नोटीसा प्रकरणी नि.8 ते 11, 24 कडे दाखल आहेत.  जाबदारानी त्‍यांचे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र नि.33 कडे दिले आहे.  जाबदार क्र.1 व 6 ते 13 तर्फे नि.38 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला आहे.  जाबदारांच्‍या लेखी युक्‍तीवादाचा आशय व त्‍यांची कैफियत लक्षात घेता असे दिसते की, तक्रारदार हे जाबदारांचे सभासद आहेत त्‍यामुळे ते संस्‍थेचे मालक होतात त्‍यामुळे अशा   ची तक्रार तक्रारदाराना या मंचात दाखल करता येणार नाही.  तक्रारदाराची ठेव देणेस जाबदार क्र.2 ते 4 हे जबाबदार आहेत.  सदर जाबदारानी तक्रारदारांच्‍या ठेवीवरील व्‍याज संपूर्ण दिले आहे.  त्‍यामुळे जाबदार हे तक्रारदारांचे काहीही देणे लागत नाहीत, त्‍यामुळे जाबदार 6 ते 13 हे संस्‍थेचे संचालक असलेमुळे मा.ना.हायकोर्ट, नागपूर खंडपीठाकडील रीट पिटीशन अर्ज क्र.5223/09 ते 5222/09 मधील निकालास अनुसरुन वरील संचालक तक्रारदारांच्‍या तक्रारीस जबाबदार नाहीत असा निकाल दिला आहे, त्‍यामुळे तकारदारांची तक्रार खारीज करणेत यावी असा जाबदारांचा आक्षेप आहे. 

3.       तक्रारदारांनी नि.1 कडे दाखल केलेली तक्रार, नि.2 कडील प्रतिज्ञापत्र, नि.5/4 कडील दाखल ठेवपावत्‍या व त्‍या पावतीसोबत नि.5/5 कडे जाबदारानी तक्रारदाराना दिलेला रु.25,000/-चा नि.33 कडील चेक, नि.34 कडील तक्रारदाराचा लेखी युक्‍तीवाद, नि.32 कडील दावा दुरुस्‍त प्रत, जाबदारांचे आक्षेप लक्षात घेता सदर तक्रारीचे निराकरणार्थ मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-

अ.क्र.              मुद्दा                                    निष्‍कर्ष    

1.  तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय?                    होय.

2. जाबदारानी तक्रारदाराना त्‍यांच्‍या मुदतबंद ठेवीवरील व्‍याज

   न देऊन तक्रारदारांची फसवणूक करुन त्‍यांचा सदोष सेवा दिली

   आहे काय?                                               होय.

3. अंतिम आदेश काय?                               तक्रारअर्ज अंशतः मंजूर.

                         विवेचन- मुद्दा क्र.1 ते 3-

4.    तक्रारदारांची तक्रार, नि.5/4 कडील ठेवपावत्‍या व नि.5/5 कडील जाबदारानी तक्रारदाराना रु.25,000/-चा दिलेला चेक याचे अवलोकन केले असता तक्रारदारानी जाबदारांकडे दि.8-12-2007 रोजी रु.25,000/-चा एक वर्ष एक महिना मुदतीसाठी द.सा.द.शे. 12% व्‍याजाने मुदतबंद ठेवीत ठेवलेले होते हे निर्विवादरित्‍या सिध्‍द होते.  मुदतपूर्तीनंतर जाबदारानी तक्रारदाराना त्‍यांच्‍या ठेवीची रक्‍कम सव्‍याज पर‍त करणे आवश्‍यक होते परंतु जाबदारानी तक्रारदाराना वारंवार मुदत पूर्ण झालेल्‍या ठेवीच्‍या रकमेची मागणी केल्‍यानंतर तब्‍बल चार वर्षानी म्‍हणजे दि.20-2-2011 रोजी रु.25,000/-चा चेक क्र.21547 ने परत केला परंतु तक्रारदाराच्‍या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्‍यानी व्‍याज दिले  नाही व हीच जाबदारानी त्‍यांच्‍या व्‍यवसायात अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदाराची फसवणूक करुन ठेवी सव्‍याज परत करणे आवश्‍यक असूनही त्‍या सव्‍याज परत न करुन सदोष सेवा दिल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  ठेवीचे वरील स्‍वरुपावरुन तक्रारदार जाबदारांची ग्राहक असल्‍याचे निर्विवादरित्‍या सिध्‍द होते.  त्‍याप्रमाणे तक्रारदाराना जाबदारानी सदोष सेवा दिल्‍याचे सिध्‍द होते त्‍यामुळे मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देतो.  वरील कारणमीमांसेला अधीन राहून तक्रारदार ही रु.25,000/- वरील व्‍याज मिळणेस पात्र आहे.  या व्‍याजासाठी त्‍याना मंचात तक्रार दाखल करावी लागली, 4 वर्षे हेलपाटे मारावे लागले यासाठी झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रु.4,000/- तक्रारदार जाबदाराकडून मिळणेस पात्र आहे त्‍यामुळे सदर अर्जाचे खर्चापोटी रु.2,000/- तक्रारदार मिळणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत मंच येत आहे. 

4.1-    प्रस्‍तुत जाबदारांचे आक्षेप पहाता प्रस्‍तुत तक्रारदार जाबदार क्र.1 चा सभासद असल्‍याचे दाखवणारा कोणताही कागदोपत्री पुरावा मंचात दाखल केलेला नाही व तो सभासद असलेचे शाबित केलेले  नाही त्‍यामुळे संस्‍थेचा सभासद हा मालक असणेचा प्रश्‍नच येथे येत नाही.  ठेवीदारांच्‍या ठेवी देणे हा पूर्णतः वेगळा विषय आहे.  जाबदारांनी त्‍यांचे कोणतेच आक्षेप पुराव्‍यानिशी शाबीत केलेले नाहीत.

5.      वरील सर्व कारणमीमांसा व विवेचनास अधीन राहून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-

 

                           आदेश

1.  तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

2.  प्रस्‍तुत जाबदारानी तक्रारदाराना त्‍यांच्‍या मुदतबंद ठेवीवरील मुद्दल रकमेवरील थांबलेले व्‍याज तक्रारदारानी वारंवार मागणी करुनही न देऊन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी केलेचे घोषित करणेत येते.  

3.   जाबदार क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या जाबदारांच्‍या ठेव रकमेवरील रु.25,000/- त्‍यावरील दि.8-12-2007 पासून दि.20-7-2011 पर्यंतचे कालावधीचे द.सा.द.शे.12 टक्‍के दराने होणारे संपूर्ण व्‍याज आदेश प्राप्‍त झालेपासून 4 आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावे.

4.     जाबदार क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदाराना त्‍यांच्‍या मूळ ठेवरक्‍कम परत करताना ती सव्‍याज परत न केलेने तक्रारदाराना मंचात तक्रार दाखल करुन वारंवार मागणी करावी लागली त्‍याच्‍या मानसिक, शारिरीक त्रासापोटी रु.3,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- आदेश प्राप्‍त झालेपासून 4 आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.

5.      जाबदार क्र.4 यांना नि.30 कडील मंचाचे आदेशाने वगळणेत आले त्‍यामुळे त्‍यांचेविरुध्‍द कोणतेही आदेश नाहीत.

6.       सदर न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

7.       सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य देणेत याव्‍यात.

 

ठिकाण- सातारा.

दि.5-6-2015.

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

 

                 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.