Sou. Kantabai Vitthal Kadam filed a consumer case on 05 Jun 2015 against Shri Laxmi Sah. pathsanstha. Sangamnagar (Khed) in the Satara Consumer Court. The case no is CC/11/123 and the judgment uploaded on 06 Aug 2015.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 123/2011.
तक्रार दाखल दि.4-10-2011.
तक्रार निकाली दि.5-6-2015.
सौ.कांताबाई विठ्ठल कदम,
रा.खेड, जि. सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
1. श्री.लक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्या.
संगमनगर, खेड, ता.जि.सातारा.
2. श्री.महेंद्र भागवतराव देसाई, चेअरमन.
रा. 116/6, मंगळाईचा पायथा,
शाहूनगर, गोडोली, सातारा 415 001.
3. श्री.लक्ष्मण नागेश जगताप, व्हा.चेअरमन.
रा.संगमनगर, खेड, ता.जि.सातारा.
4. शाखाधिकारी, श्री.लक्ष्मी सह.पतसंस्था मर्या. (वगळणेत आले)
रा.संगमनगर, खेड, जा.जि.सातारा.
5. श्री.जे.पी.गावडे, प्रशासक.
6. श्री.व्यंकटराव भागोजी पन्हाळकर, चेअरमन.
7. श्री.जयसिंग फत्तेसिंग राजेमहाडीक, व्हा.चेअरमन.
8. श्री.योगेश चंद्रकांत सुर्यवंशी, संचालक.
9. श्री.गणपत तुकाराम चव्हाण, संचालक.
10. श्री.उत्तरम बबन काट, संचालक.
11. श्री.दिपक रोशनलाल अग्रवाल, संचालक.
12. श्री.सिकंदर हमजा मुल्ला, संचालक.
13. श्री.सदाशिव दगडू शिंदे, संचालक.
क्र.5 ते 13 रा. श्री.लक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्या.
संगमनगर,खेड, ता.जि.सातारा. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.व्ही.ए.गायकवाड.
जाबदार 1 तर्फे- व्यवस्थापक.
जाबदार क्र.4- वगळणेत आले.
जाबदार 2 ते 13 तर्फे– अँड.एस.डी.शिंदे.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य यानी पारित केला
1. तक्रारदार हिने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.
तक्रारदारांचे तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे –
तक्रारदार या खेड, ता.जि.सातारा येथील कायमस्वरुपी रहिवासी आहेत. त्यानी जाबदारांचे पतसंस्थेत जाबदारांचे आकर्षक व्याजदर लक्षात घेऊन व जाबदारांचे विनंतीवरुन खालीलप्रमाणे रकमा त्यांचे वृध्दापकाळाची तरतूद व बचत म्हणून ठेव स्वरुपात रकमा ठेवलेल्या होत्या, त्याचा तपशील खालीलप्रमाणे-
अ.क्र. | ठेवपावती क्र. | ठेव रक्कम रु. | ठेव ठेवलेचा दिनांक | ठेव मुदत संपलेचा दिनांक | ठेवीवरील व्याजदर |
1. | 8209 दामदीडपट ठेव | 25,000/- | 7-1-2005 | 7-1-2009 | 10.5% |
2 | 8478 मुदतठेव | 25,000/- | 5-9-2007 | 5-10-2008 | 12% |
3 | 8491 मुदतठेव | 25,000/- | 4-10-2007 | 4-11-2008 | 12% |
4 | 8510 मुदतठेव | 25,000/- | 7-11-2007 | 7-12-2008 | 12% |
5 | 9797 ज्ये.नाग.ठेव | 25,000/- | 17-12-2007 | 17-1-2009 | 12% |
6 | 8533 मुदतठेव | 25,000/- | 14-1-2008 | 14-2-2009 | 12% |
सदरचे ठेवीच्या रकमा तक्रारदारांनी जाबदारांकडे मुदतबंद ठेवीमध्ये ठेवलेल्या होत्या. मुदतपूर्तीनंतर संपूर्ण ठेवी सव्याज तक्रारदाराना मिळाव्यात अशी वारंवार मागणी करुनही जाबदारांनी तक्रारदारांच्या ठेवीच्या रकमा सव्याज दिलेल्या नाहीत. तक्रारदारांच्या ठेवीच्या रकमा सव्याज ठरलेल्या मुदतीत जाबदारानी तक्रारदाराना दिलेल्या वचनाप्रमाणे न देऊन तक्रारदाराना सदोष सेवा दिली आहे, त्यामुळे तक्रारदारानी या जाबदाराविरुध्द मे.मंचात तक्रार दाखल करुन वर नमूद ठेवीच्या संपूर्ण रकमा सव्याज मिळाव्यात, शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.10000/- मिळावेत व अर्जाचे खर्चापोटी रु.10,000/- मिळणेबाबत मंचाला विनंती केली आहे.
2. सदर तक्रारीच्या नोटीसा जाबदाराना पाठवणेत आल्या व त्याप्रमाणे जाबदार क्र.1 व्यवस्थापक यानी नि.18 कडे म्हणणे दिले आहे. जाबदार क्र.2 ते 13 तर्फे अँड.एस.डी.शिंदे हजर झाले. त्यांनी त्यांची कैफियत नि.40 कडे व संचालकांचे प्रतिज्ञापत्र नि.39, नि.41 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.46 कडे लेखी युक्तीवाद, नि.44 कडे निबंधकाकडील पुराव्याचे कागदपत्र इ.कागदपत्रे दाखल केली असून जाबदारानी त्यांचे आक्षेपात असे कथन केले आहे की, तक्रारदाराचा अर्ज मान्य नाही. सदरचे संचालक तक्रारदारांच्या रकमा देणेस कायदयाने जबाबदार नाहीत. तक्रारदार हा संस्थेचा सभासद असलेने तो मालक आहे, त्यामुळे तो ग्राहक होऊ शकत नाही. त्यामुळे तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदारांच्या लेखी युक्तीवादाचा आशय व त्यांची कैफियत लक्षात घेता असे दिसते की, तक्रारदार हे जाबदारांचे सभासद आहेत त्यामुळे ते संस्थेचे मालक होतात त्यामुळे सदरची तक्रार तक्रारदाराना या मंचात दाखल करता येणार नाही. तक्रारदाराची ठेव देणेस जाबदार क्र.1 हे जबाबदार आहेत. त्यामुळे प्रस्तुत जाबदार हे तक्रारदारांचे काहीही देणे लागत नाहीत, त्यामुळे जाबदार 2 ते 13 हे संस्थेचे संचालक असलेमुळे मा.ना.हायकोर्ट, नागपूर खंडपीठाकडील रीट पिटीशन अर्ज क्र.5223/09 ते 5222/09 मधील निकालास अनुसरुन वरील संचालक तक्रारदारांच्या तक्रारीस जबाबदार नाहीत असा निकाल दिला आहे, त्यामुळे तकारदारांची जाबदाराविरुध्दची तक्रार खारीज करणेत यावी असा जाबदारांचा आक्षेप आहे.
3. तक्रारदारांनी नि.1 कडे दाखल केलेली तक्रार, त्याचेपृष्टयर्थ नि.2 कडील प्रतिज्ञापत्र, नि.6 कडील मूळ ठेवपावत्या व पुराव्याचे एकूण 4 कागद, जाबदार क्र.4 याना वगळणेचा नि.20 कडील तक्रारदारांचा अर्ज, नि.28 कडील दावा दुरुस्तीचा अर्ज व त्यासोबतचे नि.29 कडील प्रतिज्ञापत्र, नि.31/1 कडील तक्रारदारानी दाखल केलेली वैध संचालकांची यादी, नि.32 कडील दावा दुरुस्तीची प्रत व नि.42 कडील लेखी युक्तीवाद यांचा विचार करता सदर तक्रारीचे निराकरणार्थ मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. प्रस्तुत जाबदारानी तक्रारदाराना त्यांच्या मुदतबंद ठेवी
मुदत संपलेनंतर सव्याज परत न करुन तक्रारदाराना
सदोष सेवा दिली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? तक्रारअर्ज अंशतः मंजूर.
विवेचन- मुद्दा क्र.1 ते 3-
4. तक्रारदारांची तक्रार, नि.6/4 ते 6/6 कडील ठेवपावत्याचे अवलोकन केले असता प्रस्तुत ठेवपावती हा जाबदार संस्था व तक्रारदारांमधील ठेवीचा करार असून त्याद्वारे तक्रारदारानी जाबदाराकडे ठेवलेली मुदतबंद ठेव मुदतपूर्तीनंतर तक्रारदाराना सव्याज परत करणेचे वचन तक्रारदारानी दिलेले असते. हा संस्थेचा व्यवसाय आहे. अशा कराराद्वारे ते ठेवीदाराकडून ठेवस्वरुपात संस्थेच्या भागभांडवलासाठी मिळवीत असतात. या व्यवहारावरुन तक्रारदार ह जाबदारांचे ग्राहक असल्याचे निर्विवादरित्या शाबित होते, त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो. विषयांकित ठेवींच्या मुदती पूर्ण झालेनंतर तक्रारदारांनी जाबदाराकडे ठेव रकमांची वारंवार मागणी करुनही त्यानी ती तक्रारदाराना दिलेले मुदतीत परत केली नाही व त्यांना ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करणेस भाग पाडले त्यामुळे जाबदारानी तक्रारदाराना सदोष सेवा दिल्याचे निर्विवादरित्या शाबित होते त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो, त्यामुळेच तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत मंच आला आहे.
4.1- प्रस्तुत जाबदारांचे आक्षेप पहाता प्रस्तुत तक्रारदार जाबदार क.1 चा सभासद असल्यचे दाखवाणारा कोणताही कागदोपत्री पुरावा मंचात दाखल केलेला नाही व तो सभासद असलेचे शाबित केलेले नाही, त्यामुळे संस्थेचा सभासद हा मालक असणेचा प्रश्नच येथे येत नाही. ठेवीदारांच्या ठेवी देणे हा पूर्णतः वेगळा विषय आहे. जाबदारांनी त्यांचे कोणतेच आक्षेप पुराव्यानिशी शाबीत केलेले नाहीत.
4.2- तक्रारदारानी नि.20 कडे दिलेल्या अर्जाप्रमाणे जाबदार क्र.4 याना वगळणेचा अर्ज दिला. मंचाने तो मंजूर केला, त्यामुळे जाबदार क्र.4 यांना या प्रकरणाचे जबाबदारीतून वगळणेत येते.
5. वरील सर्व कारणमीमांसा व विवेचनास अधीन राहून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-
आदेश
1. तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. प्रस्तुत जाबदारानी तक्रारदाराना त्यांच्या मुदतबंद ठेवी मुदत पूर्ण झालेनंतर व्याजासह तक्रारदारानी वारंवार मागणी करुनही, हेलपाटे घालूनही त्याना ठेवीच्या रकमा सव्याज परत न देऊन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी केलेचे घोषित करणेत येते.
3. जाबदार क्र.1 ते 13 यांनी ठेवपावती क्र.8510 ची रक्कम रु.25,000/- त्यावर दि.7-11-2007 पासून द.सा.द.शे.12 टक्के दराने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंतचे होणा-या व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम सदर आदेश प्राप्त झालेपासून 4 आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
4. जाबदार क्र.1 ते 13 यांनी ठेवपावती क्र.8491 ची रक्कम रु.25,000/- त्यावर दि.4-10-2007 पासून द.सा.द.शे.12 टक्के दराने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंतचे होणा-या व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम सदर आदेश प्राप्त झालेपासून 4 आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
5. जाबदार क्र.1 ते 13 यांनी ठेवपावती क्र.9797 ची रक्कम रु.25,000/- त्यावर दि.17-12-2007 पासून द.सा.द.शे.12 टक्के दराने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंतचे होणा-या व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम सदर आदेश प्राप्त झालेपासून 4 आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
6. जाबदार क्र.1 ते 13 यांनी ठेवपावती क्र.8533 ची रक्कम रु.25,000/- त्यावर दि.14-1-2008 पासून द.सा.द.शे.12 टक्के दराने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंतचे होणा-या व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम सदर आदेश प्राप्त झालेपासून 4 आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
7. जाबदार क्र.1 ते 13 यांनी ठेवपावती क्र.8478 ची रक्कम रु.25,000/- त्यावर दि.5-9-2007 पासून द.सा.द.शे.12 टक्के दराने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंतचे होणा-या व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम सदर आदेश प्राप्त झालेपासून 4 आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
8. जाबदार क्र.1 ते 13 यांनी ठेवपावती क्र.8209 ची रक्कम रु.25,000/- मुदतपूर्ततेनंतर मिळणारी रक्कम रु.37,500/- त्यावर दि.7-1-2009 पासून द.सा.द.शे.10 टक्के दराने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंतचे होणा-या व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम सदर आदेश प्राप्त झालेपासून 4 आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
9. जाबदार क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदाराना मानसिक, शारिरीक त्रासापोटी रु.7,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- आदेश प्राप्त झालेपासून 4 आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
5. जाबदार क्र.4 यांना प्रकरणातील नि.20 कडील मंचाचे आदेशाने वगळणेत आले त्यामुळे त्यांचेविरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
6. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य देणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि.5-6-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.