Maharashtra

Satara

CC/15/86

sou. vimal bajiram yadav - Complainant(s)

Versus

shri laxmi sah patsanstha sangmnagr - Opp.Party(s)

Inamadar

07 Dec 2015

ORDER

Consumer Disputes Redressal
Forum, Satara
 
Complaint Case No. CC/15/86
 
1. sou. vimal bajiram yadav
sagmnagr satara
satara
maha
...........Complainant(s)
Versus
1. shri laxmi sah patsanstha sangmnagr
sagmnagr satara
satarA
maha
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SAVITA BHOSALE PRESIDENT
 HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR MEMBER
  HON'BLE MRS.SUREKHA HAJARE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

तक्रार क्र. 86/2015.

                      तक्रार दाखल दि.06-05-2015.

                            तक्रार निकाली दि.07-12-2015. 

 

 

1. सौ. विमल बाजीराव यादव,

2. पंकज बाजीराव यादव,

3. शारदा शिवाजी यादव,

4. शिवाजी खाशाबा यादव,

5. बाजीराव खाशाबा यादव,

जा. नं.1 ते 5 रा. यादव कॉलनी,

प्रतापसिंहनगर, संगमनगर,

ता.जि.सातारा.                                     ....  तक्रारदार

  

         विरुध्‍द

 

1. श्री. लक्ष्‍मी सहकारी पतसंस्‍था मर्यादित,

   संगमनगर (खेड),सातारा, ता.जि.सातारा तर्फे

   व्‍यवस्‍थापक श्री. तानाजी काशिनाथ जाधव

2. श्री. दिपक रोशनलाल अग्रवाल, चेअरमन,

3. श्री.जयसिंग फत्‍तेसिंग राजेमहाडिक, व्‍हा.चेअरमन,

   नं.1 ते 3 रा.श्रीलक्ष्‍मी सहकारी पतसंस्‍था लि.,

   30/34, गुरुवार पेठ, सातारा, जि.सातारा

   फलटण, ता.फलटण,जि.सातारा                         ....  जाबदार

 

 

                  तक्रारदारातर्फे अँड.पी.आर.इनामदार.

                  जाबदार क्र.1 ते 3 तर्फे अँड.आर.एन.गलांडे.

                 

 

                        न्‍यायनिर्णय  

 

सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला

 

1.   तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात कथन खालीलप्रमाणे-

       तक्रारदार हे महात्‍मा फुले चौक, न्‍यू हायवे, खेड, सातारा ता.जि.सातारा येथील कायमस्‍वरुपी रहिवासी आहेत. जाबदार क्र.1 ही सहकार कायद्याप्रमाणे स्‍थापन झालेली सहकारी पतसंस्‍था असून ग्राहकांकडून ठेवी स्‍वरुपात रक्‍कम स्विकारुन मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी  ग्राहकांनी रक्‍कम मागीतल्‍यास सदर रक्‍कम परत देणे अशा उद्देशाने स्‍थापन झाली आहे. तक्रारदारांनी जाबदार पतसंस्‍थेत खालील कोष्‍टकात नमूद केलेप्रमाणे बचत खातेमध्‍ये रक्‍कम गुंतवली होती व आहे.

अ.क्र.

अर्जदाराचे नांव

सेव्‍हींग ठेव खाते क्रमांक

ठेवीची रक्‍कम

1

सौ.विमल बाजीराव यादव

   21/153

72,500/-

 

2

पंकज बाजीराव यादव

   21/154

72,500/-

3

शारदा शिवाजी यादव

   21/152

72,500/-

4

श्री.शिवाजी खाशाबा यादव

   21/151

72,500/-

5

श्री.बाजीराव खाशाबा यादव

   20/154

22,466/-

 

 

     वर नमूद तपशिलाप्रमाणे जाबदार यांचेकडून तक्रारदार यांना सेव्‍हींग ठेव खाते वरील रकमा जाबदार हे तक्रारदार यांना देणे लागत आहेत आणि प्रस्‍तुत बचत खात्‍यातील रक्‍कम मागणी केल्‍यानंतर व्‍याजासह जाबदाराने तक्रारदार यांना देणे बंधनकारक होते व आहे.  परंतू तक्रारदारांनी प्रस्‍तुत बचत ठेवीच्‍या रकमेची व्‍याजासह जाबदार यांचेकडे मागणी केली असता जाबदार यांनी रक्‍कम देणेस टाळाटाळ केली व आजअखेर तक्रारदार यांना बचत खात्‍यातील रक्‍कम अदा केलेली नाही. त्‍यामुळे जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे. म्‍हणून सदर बचत खात्‍यातील व्‍याजासह जाबदारांकडून वैयक्‍तीक व संयुक्तिकरित्‍या वसूल होऊन मिळावी व त्‍याचा तक्रारदारांना मानसिक व शारिरीक त्रास झालेला असलेने जाबदार यांचेकडून नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा  म्‍हणून तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज मे मंचात दाखल केला आहे. 

2.   तक्रारदार क्र. 1 ते 4 यांची प्रस्‍तुत कामी जाबदार यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या वर नमूद परिशिष्‍टाप्रमाणे नमूद बचत खात्‍यातील प्रत्‍येकी रक्‍कम रु.72,500/- (रुपये बाहत्‍तर हजार पाचशे मात्र) व तक्रारदार क्र. 5 ची रक्‍कम रु.22,466/- बचत खातेच्‍या व्‍याजदराने नियमाप्रमाणे व्‍याजासह वसूल होवून मिळावी.  प्रस्‍तुत रकमेवर तक्रारदारांना रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 15 टक्‍के दराने व्‍याज मिळावे,  मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.1,00,000/-, तर तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रु.20,000/- जाबदार यांचेकडून मिळावा, अशी विनंती तक्रारदारांनी या कामी केली आहे.

3.  तक्रारदारांनी प्रस्‍तुत कामी नि. 2 ते 6 क‍डे प्रतिज्ञापत्र, नि.9 चे कागदयादीसोबत नि.9/1 ते 9/5 कडे अनुक्रमे जाबदारांकडील बचत खाते पुस्‍तकांच्‍या व्‍हेरिफाईड प्रती, नि.9/6 कडे तक्रारदारांनी जाबदारांना पाठवलेली नोटीसची स्‍थळप्रत व पोहोच पावत्‍या, नि. 9/7 कडे जाबदाराने तक्रारदारांना दिलेले नोटीसींचे उत्‍तर, नि.19 कडे तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत दाखल केलेले शपथपत्र हेच पुराव्‍याचे शपथपत्र समजणेत यावे म्‍हणून पुरसीस, नि. 20 चे कागदयादीसोबत नि.20/1 कडे जाबदार पतसंस्‍थेच्‍या संचालक मंडळाची यादी (मुळ प्रत), नि. 22 कडे लेखी युक्‍तीवाद वगैरे कागदपत्रे मे. मंचाकडे तक्रारदारांनी याकामी दाखल केली आहेत.

4.  प्रस्‍तुत कामी जाबदार क्र. 1 ते 3  यांनी याकामी नि. 17 कडे म्‍हणणे, नि. 18 कडे म्‍हणण्‍याचे अँफीडेव्‍हीट मे मंचात दाखल केली आहे.  जाबदारांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदारांचे तक्रार अर्जातील सर्व कथन फेटाळलेले आहेत.  त्‍यांनी पुढीलप्रमाणे आक्षेप व नोंदवले आहेत.

i.  तक्रारदाराचा तक्रार अर्ज  व त्‍यातील मजकूर मान्‍य व कबूल नाही.

ii.  तक्रार अर्ज कलम 1 मधील मजकूर स्‍थूल मानाने बरोबर आहे.  परंतू जाबदार पतसंस्‍थेच्‍या संचालक मंडळामध्‍ये वारंवार बदल झाले आहेत. तसेच काही कालावधीकरीता प्रशासक कार्यरत होते.

iii. तक्रारदारानी कलम 2 मध्‍ये केलेले ठेवपावत्‍यांच्‍या वर्णनाप्रमाणे ठेवीची रक्‍कम जाबदार पतसंस्‍थेत गुंतविली होती ही बाब जाबदाराला मान्‍य आहे.  परंतू तक्रारदारानी जाबदारांकडे प्रस्‍तुत रकमेची कधीही मागणी केलेली नाही.  त्‍यामुळे तक्रारदाराला जाबदाराने कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही.

iv.  तक्रारदारांचे बचत खात्‍यातील मुदत दि. 1/03/13 रोजी संपली आहे.  त्‍यानंतर दोन वर्षाचे आत मुदतीत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल करणे आवश्‍यक होते.  परंतू तक्रारदारांनी तक्रार अर्ज मुदतीत दाखल केलेला नाही त्‍यामुळे तक्रार अर्ज फेटाळणेत यावा.

v.   प्रस्‍तुत तक्रारदारांच्‍या ठेवी लक्ष्‍मी सहकारी बँकेत होत्‍या.  प्रस्‍तुत बँक अवसायनात निघालेने तसेच बंद पडल्‍याने सदर ठेवी मिळण्‍यास अडचण आली.  सन 2008 मध्‍ये जाबदार संस्‍थेवर अवसायानात निघालेने दि.19/7/2009 ते दि.28/2/2012 या कालावधीमध्‍ये प्रशासक यांची नेमणूक झाली होती.  त्‍यामुळे  कर्जदार यांचेकडून वसूली करुन ठेवीदारांच्‍या ठेवीच्‍या रक्‍कमा टप्‍प्‍या टप्‍प्‍याने देण्‍याचे काम  सुरु आहे.  त्‍याप्रमाणे तक्रारदार यांच्‍या ठेवीही देण्‍यास जाबदार तयार आहेत.  तक्रारदाराने ज्‍या काळात ठेवी ठेवल्‍या त्‍यावेळी सध्‍याचे संचालक मंडळ अस्तित्‍वात नव्‍हते त्‍यामुळे या कारणास्‍तव तक्रार अर्ज फेटाळणेत यावा.  अशा स्‍वरुपाचे म्‍हणणे जाबदारांनी दाखल केले आहे. 

5.    वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे.मंचाने प्रस्‍तुत कामी प्रस्‍तुत तक्रारीचे निराकरणार्थ खालील मुद्दयांचा विचार केला-

अ.क्र.            मुद्दा                                      उत्‍तर

1.  तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय?                    होय.

2.  जाबदार यांनी तक्रारदाराना सदोष सेवा पुरवली आहे काय?        होय.

3.  अंतिम आदेश काय?                                  खालील नमूद

                                                       केलेप्रमाणे.

विवेचन

मुद्दा क्र.1 व 2-

6.      वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत. कारण-

प्रस्‍तुत तक्रारदारांनी जाबदार क्र1 पतसंस्‍थेत खालील परिशिष्‍टात नमूद केलेप्रमाणे केलेली रक्‍कम बचत खात्‍यांमध्‍ये गुंतविली होती व आहे.

अ.क्र.

अर्जदाराचे नांव

सेव्‍हींग ठेव खाते क्रमांक

ठेवीची रक्‍कम

1

सौ.विमल बाजीराव यादव

   21/153

72,500/-

 

2

पंकज बाजीराव यादव

   21/154

72,500/-

3

शारदा शिवाजी यादव

   21/152

72,500/-

4

श्री.शिवाजी खाशाबा यादव

   21/151

72,500/-

5

श्री.बाजीराव खाशाबा यादव

   20/154

22,466/-

 

     प्रस्‍तुत बचत खाते पुस्‍तकांच्‍या व्‍हेरिफाईड प्रती याकामी तक्रारदारांनी नि. 9 चे कागदयादीसोबत नि. 9/1 व नि.9/5 कडे दाखल केल्‍या आहेत.  म्‍हणजेच तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत व होते हे स्‍पष्‍ट होते. नि. 20 सोबत नि. 20/1 कडे  तक्रारदारांनी याकामी जाबदार क्र. 1 पतसंस्‍थेच्‍या संचालक मंडळाची यादी दाखल केलेली आहे. प्रस्‍तुत तक्रारदारांनी जाबदार यांचेकडे बचत खात्‍यातील  रकमांची व्‍याजासह वारंवार तोंडी व लेखी मागणी केली असता जाबदारांनी रकमा देणेस टाळाटाळ केली व रक्‍कम तक्रारदारांना अदा केली नाही.  तसेच दि.25/2/2015 रोजी वकीलामार्फत नोटीस (नि.9/6) जाबदारांना पाठवून रकमेची मागणी केली असता, प्रस्‍तुत जाबदारांनी सदर नोटीसीला दि. 13/3/2015 रोजी उत्‍तर (नि.9/8) दिलेले आहे. या उत्‍तरी नोटीसमध्‍ये जाबदारांनी असे म्‍हटले आहे की, नियमानुसार होणारे बचत खात्‍यातील ठेवीची रक्‍कम जशी वसूल होईल तशी मा. जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था यांचे सूचनेप्रमाणे समन्‍वय पध्‍दतीने देणार आहेत. वास्‍तविक पाहता, तक्रारदारांनी बचत खात्‍यातील रकमेची मागणी केली असता सदरची रक्‍कम आजअखेर होणा-या व्‍याजासह तात्‍काळ देणे जाबदार यांचेवर बंधनकारक होते व आहे.  त्‍यामुळे तक्रारदारांनी संस्‍थेकडे ठेवलेल्‍या त्‍यांच्‍या वरील परिशिष्‍टात नमूद बचत खात्‍यांमधील ठेवींची व्‍याजासह रक्‍कम तक्रारदारांनी जाबदारांकडे वारंवार मागणी करुनही जाबदारांनी अदा केलेली नाही हे स्‍पष्‍ट सिध्‍द होत आहे. त्‍यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांची बचत खात्‍यामधील रक्‍कम मागणी केल्‍यानंतर परत न देवून त्‍यांना सदोष सेवा पुरविली आहे असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे. सबब आम्‍ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी दिलेले आहे.

     जाबदार यांनी तक्रारदार यांना त्‍यांचे बचत खात्‍यामधील रक्‍कम व्‍याजासह अदा करणे बंधनकारक असूनही जाबदाराने प्रस्‍तुत बचत खात्‍यामधील रक्‍कम तक्रारदारांना अदा केलेली नाही ही सेवेतील त्रुटीच आहे असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  सबब जाबदार क्र. 1 पतसंस्‍था व जाबदार क्र 2 ते 3 यांना वैयक्तिक व संयुक्‍तीकपणे तक्रारदारांना वरील परिशिष्‍टात नमूद केलेप्रमाणे बचत खात्‍यामधील रक्‍कम बचत खात्‍याचे नियमाप्रमाणे व्‍याजदराने होणा-या व्‍याजासह रक्‍कम तक्रारदारांना अदा करणेसाठी Co-operative corporate veil  नुसार जबाबदार धरणेत येते.  सबब प्रस्‍तुत कामी आम्‍ही मा.उच्‍च न्‍यायालय मुंबई यांचे रिट पिटीशन क्र.117/2011- मंदाताई संभाजी पवार विरुध्‍द स्‍टेट बँक ऑफ महाराष्‍ट्र या न्‍यायनिवाडयाचा व त्‍यातील दंडकांचा आधार घेतला आहे. 

7.  सबब आम्‍ही प्रस्‍तुत कामी खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-

                           -ः आदेश ः-

1.  तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

2. जाबदार क्र. 1 पतसंस्‍था व जाबदार क्र. 2 ते 3 यांना वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदारांना अनुक्रमे सेव्‍हींग खाते क्र. 21/153, 21/154, 21/152, 21/151 व 20/154  वरील संपूर्ण रक्‍कम बचत खात्‍याचे नियमाप्रमाणे व्‍याजदराने  होणा-या व्‍याजासह रक्‍कम तक्रारदार यांना अदा करणेसाठी जबाबदार धरणेत येते.

3. जाबदार क्र. 1 पतसंस्‍था व जाबदार क्र. 2 ते 3 यांना तक्रारदारांची खाली परिशिष्‍टात नमूद बचत खात्‍यांमधील संपूर्ण रक्‍कम दि. 1/3/2013 पासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत बचत खात्‍याचे नियमाप्रमाणे व्‍याजदराने  होणा-या व्‍याजासह रक्‍कम तक्रारदार यांना अदा करावी.

अ.क्र.

अर्जदाराचे नांव

सेव्‍हींग ठेव खाते क्रमांक

ठेवीची रक्‍कम

1

सौ.विमल बाजीराव यादव

   21/153

72,500/-

 

2

पंकज बाजीराव यादव

   21/154

72,500/-

3

शारदा शिवाजी यादव

   21/152

72,500/-

4

श्री.शिवाजी खाशाबा यादव

   21/151

72,500/-

5

श्री.बाजीराव खाशाबा यादव

   20/154

22,466/-

 

4.  तक्रारदाराना झाले मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/-(रुपये दहा हजार मात्र) जाबदार क्र. 1 पतसंस्‍था व जाबदार क्र. 2 ते 3 यांना वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदारांना  अदा करावेत.

5. अर्जाचा खर्च रक्‍कम रु.10,000/- (रुपये दहा हजार मात्र) जाबदार क्र. 1 पतसंस्‍था व जाबदार क्र. 2 ते 3 यांना वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदारांना  अदा करावेत.

6. वरील सर्व आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात जाबदार क्र. 1 पतसंस्‍था व जाबदार क्र. 2 ते 3 यांना वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या करावे.

7.  आदेशाची पूर्तता विहीत मुदतीत जाबदारांनी  न केलेने तक्रारदाराला ग्राहक

संरक्षण कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची

मुभा राहील.

8.  सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

9. सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत   याव्‍यात.

ठिकाण- सातारा.

दि.07-12-2015.

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

 
 
[HON'BLE MRS. SAVITA BHOSALE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR]
MEMBER
 
[ HON'BLE MRS.SUREKHA HAJARE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.