View 3033 Cases Against Maruti
View 121 Cases Against Phaltan
Shri. Balntarao Dagdob Gaykawad filed a consumer case on 02 Jul 2015 against Shri Laxmi devi Nag. Sah. Patsanstha Ltd Phaltan Chaiman , Shri Maruti Sahebrao Barge in the Satara Consumer Court. The case no is CC/11/179 and the judgment uploaded on 31 Aug 2015.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 179/2011.
तक्रार दाखल दि.17-12-2012.
तक्रार निकाली दि. 2-7-2015.
1. श्री.बळवंतराव दगडोबा गायकवाड.
2. सौ.जयश्री बळवंतराव गायकवाड.
3. निलेश बळवंतराव गायकवाड.
4 कु.निलम बळवंतराव गायकवाड.
क्र.1 स्वतःसाठी व क्र.2 ते 4 करिता मुखत्यार-
सर्व रा.फलटण बारामती रोड, अलगुडेवाडी,
ता.फलटण, जि.सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
1. श्री.लक्ष्मीदेवी ना.सह.पतसंस्था मर्या.फलटण.
तर्फे चेअरमन- श्री.मारुती साहेबराव बर्गे.
रा.पाटणेवाडी, ता.फलटण, जि.सातारा.
2. श्री.संभाजी आबाजी गाडे, व्हाईस चेअरमन.
रा.रविवार पेठ,फलटण, ता.फलटण, जि.सातारा.
3. श्री.दिगंबर गणपत बाबर, संचालक.
रा.मंगळवार पेठ, फलटण, ता.फलटण, जि.सातारा.
4. श्री.रामदास बापुराव पवार, संचालक.
रा.विडणी, ता.फलटण, जि.सातारा.
5. श्री.सुभेदार रामचंद्र पवार, संचालक.
रा.विद्यानगर, फलटण, ता.फलटण, जि.सातारा.
6. श्री.शिवाजी तुकाराम डांगे, संचालक.
रा.जाधववाडी, ता.फलटण, जि.सातारा.
7. श्री.चंद्रकांत बापुराव नाळे, संचालक.
रा.मलठण, ता.फलटण, जि.सातारा.
8. अँड.श्रीमती निलिमा शरद जोशी,संचालिका.
रा.संजीवराजेनगर, फलटण, ता.फलटण, जि.सातारा.
9. श्री.सुभाष बबनराव जेबले, संचालक.
रा.कसबा पेठ, फलटण, ता.फलटण, जि.सातारा.
10. श्री.सचिन जयराम भालेराव, संचालक.
रा.राजाळे, ता.फलटण, जि.सातारा.
11. श्री.महिबुब अमीन शेख, संचालक.
रा.सरडे, ता.फलटण, जि.सातारा.
12. श्री.शंकरराव गणपतराव भोसले, संचालक.
रा.रविवार पेठ, फलटण, ता.फलटण, जि.सातारा.
13. डॉ.सुभाष बापुराव पवार, संचालक.
रा.पिंप्रद, ता.फलटण, जि.सातारा.
14. श्री.बाबासो.दादासो. शिंदे, संचालक.
रा.पिंप्रद, ता.फलटण, जि.सातारा.
15 श्री.दत्तात्रय उर्फ बाळासाहेब दिगंबर बाबर,
व्यवस्थापक. रा.मंगळवार पेठ,
फलटण, ता.फलटण, जि.सातारा. .... जाबदार
तक्रारदारातर्फे अँड.आर.सी.कोरडे.
जाबदार क्र.1,2,5 ते 7 व 11 ते 14 एकतर्फा आदेश.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.श्री.श्रीकांत कुंभार, सदस्य, यानी पारित केला
1. तक्रारदाराने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार यातील जाबदार क्र.1 ते 15 विरुध्द दाखल केलेली आहे.
2. प्रस्तुत तक्रारदार हे बारामती रोड, फलटण, अलगुडेवाडी, ता.फलटण, जि.सातारा येथील रहिवासी असून ते व्यवसायाने शेतकरी आहेत. त्यांनी त्यांच्या भविष्यकालीन अडचणीसाठी तरतूद या उद्देशाने जाबदार पतसंस्थेत खालीलप्रमाणे दामदुप्पट स्वरुपात ठेवी ठेवल्या होत्या-
अ.क्र. | ठेवपावती क्र. | ठेव रक्कम रु. | ठेव ठेवलेचा दिनांक | ठेवीची मुदत संपलेचा दि. | ठेवीनंतर मिळणारी रक्कम रु. | व्याजदर टक्के |
1 | 004763 | 25,000/- | 13-8-2004 | 13-8-2011 | 50,000/- | 11% |
2 | 004764 | 25,000/- | 13-8-2004 | 13-8-2011 | 50,000/- | 11% |
3 | 004765 | 25,000/- | 13-8-2004 | 13-8-2011 | 50,000/- | 11% |
4 | 004766 | 25,000/- | 13-8-2004 | 13-8-2011 | 50,000/- | 11% |
तक्रारदारांचे ठेवीची मुदत पूर्ण झालेवर मुदत पूर्ण झालेल्या ठेवीची व्याजासह रक्कम प्रस्तुत तक्रारदारानी जाबदाराकडे आजअखेर वारंवार मागितली परंतु प्रस्तुत जाबदारानी-व्यवस्थापकानी उडवाउडवीची उत्तरे दिली व तक्रारदारांची दामदुप्पट रक्कम ठेवलेली विसरुन जा, ती तुम्हांस मिळणार नाही असे सांगून ठेवीच्या दामदुप्पट रकमा देणेस नकार दिला, त्यामुळे प्रस्तुत तक्रारदाराने यातील जाबदारानी त्यांच्या ठेवीच्या रकमा मुदतीनंतर परत न करुन तक्रारदाराला सदोष सेवा दिली म्हणून त्यानी मंचात जाबदाराविरुध्द तक्रार दाखल करुन जाबदाराविरुध्द दाद मागितली आहे व प्रस्तुत जाबदाराकडून न्यायनिर्णय कलम 2 मधील तपशीलातील ठेवी सव्याज मुदतपूर्तीनंतर द.सा.द.शे.18% व्याजाने परत मिळाव्यात, शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.30,000/- पैशाअभावी झालेल्या नुकसानीपोटी रु.20000/- जाणे येणेचा खर्च रु.2,000/-व अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळणेबाबत विनंती केलेली आहे.
2. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारानी नि.1 कडे त्यांचा अर्ज, त्याचे पृष्टयर्थ नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 कडे नि.5/1 ते 5/4 कडे ठेवीच्या पावत्यांच्या नोटराईज्ड सत्यप्रती, नि.5/5 कडे तक्रारदारानी जाबदार क्र.1 ते 14 याना वकीलामार्फत पाठविलेल्या नोटीसची स्थळप्रत, नि.5/6 कडे मुखत्यारपत्र, नि.5/7 ते 5/19 कडे नोटीसा जाबदाराला पोहोचल्याच्या एकूण 13 पोहोचपावत्या दाखल आहेत. या नोटीसीतील जाबदार क्र.1 ते 14 यांचे वतीने तक्रारदारांचे नोटीसीला दिलेली उत्तरी नोटीस, जाबदार क्र.9 यांना जाहीर नोटीसीने दिलेली नोटीस काढली त्याचा दि.11-1-2011 रोजी दै.सकाळमध्ये प्रसिध्द केलल्या नोटीसीच्या दैनिकाचा अंक नि. 41कडे, नि. 47 कडे तक्रारदार क्र.1 यांचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि. 47 कडील पुराव्याचे प्रतिज्ञापत्र हाच युक्तीवाद समजणेत यावा असा अर्ज नि.52 कडे व नि.53 कडे पुरावा संपलेची पुरसीस इ.कागदपत्रे प्रकरणी दाखल केली आहेत.
3. यातील जाबदार क्र.1 ते 15 याना मंचातर्फे रजि.पोस्टाने नोटीसा पाठविण्यात आल्या. सदर नोटीसा जाबदाराना मिळाल्या, त्यापैकी जाबदार क्र.1,2,5 ते 7 व 10 ते 14 याना नोटीसा मिळूनही ते मंचात गैरहजर राहिल्यामुळे त्यांचेविरुध्द मे.मंचाने नि.1 वर एकतर्फा आदेश पारित केले आहेत. या जाबदाराना मंचाच्या नोटीसा मिळाल्याच्या पोस्टाच्या पावत्या नि.8 ते नि.16 कडे प्रकरणी असून नि.18 कडे जाबदाराने नोटीस घेणेस नकार दिल्याने परत आलला लखोटा आहे. जाबदार क्र.9 याना नि.41 कडील जाहीर नोटीसीने समन्स बजावणी झाली, पैकी जाबदार क्र.3,4,15 तर्फे नि.26 कडे म्हणणे व त्याचे पृष्टयर्थ नि.27 कडे प्रतिज्ञापत्र, नि.28 कडे पुराव्याचे कागदपत्रे, नि.32 कडे संचालकांची यादी दाखल केली असून जाबदार क्र.9 यानी नि.42 कडे म्हणणे व नि.43 कडे त्याच्या म्हणण्याचे पृष्टयर्थ प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. जाबदार क्र.15 यानी नि.51 कडे त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामुळे जाबदार क्र.1,2,5 ते 7 व 10 ते 14 यांचेविरुध्द एकतर्फा होऊन प्रकरण निकालासाठी घेतले व उर्वरित जाबदार क्र.3,4,9 व 15 यांचे त्यांच्या म्हणण्यातील आक्षेप विचारात घेता प्रस्तुत जाबदार हे तक्रारदारांचे ठेवीचे वेळी जाबदार क्र.1 चे संचालक नव्हते. त्यानी तक्रारदाराना ठेवी ठेवणेस प्रवृत्त केले नव्हते त्यामुळे सदर ठेवी देण्याची जबाबदारी प्रस्तुत जाबदारांची नाही त्यामुळे तक्रारदाराचे ठेवीचे पैसे परतीची जबाबदारी जाबदार क्र.1 ची आहे असे आक्षेप नोंदवलेले आहेत. प्रकरण निकालावर ठेवलेनंतर यातील जाबदार क्र.1,3,4,9,16 यांचेतर्फे अँड.सौ.जोशी यांनी नि.54 कडे अर्ज देऊन, म्हणणे दुरुस्तीचा अर्ज सी.पी.सी.ऑर्डर-6, रुल 17 प्रमाणे अर्ज दिला. मे.मंचाने त्यावर अँड.सौ.जोशी यानी दिलेल्या दुरुस्ती अर्जावर प्रस्तुत वकील हे जाबदार क्र.1,3,4 व 16 चे नेमस्त वकील नसल्याने वरील जाबदारांचे म्हणण्यामध्ये दुरुस्ती मागणेचा त्यांचा अधिकार नसल्याने मंचाने नि.54 चा अर्ज फेटाळला आहे.
4. प्रस्तुत तक्रारदारांची तक्रार व सदर प्रकरणी दाखल पुराव्याचे दस्तऐवज यांचा विचार करता व वरील जाबदारांचे म्हणणे, पुराव्याचे सर्व कागदपत्रे व त्यातील आशय यांचा विचार करता प्रस्तुत तक्रारीचे निराकरणार्थ आमचेसमोर खालील मुद्दे उपस्थित होतात-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. प्रस्तुत तक्रारदार हा जाबदाराचा ग्राहक आहे काय? होय.
2. जाबदारानी तक्रारदारांना त्यांच्या मुदतपूर्ण झालेल्या ठेवीच्या
रकमा देणेचे नाकारुन तक्रारदाराना सदोष सेवा दिली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? तक्रार अंशतः मंजूर.
5. कारणमीमांसा- मुद्दा क्र.1 ते 4-
प्रस्तुत जाबदार क्र.1 ही आर्थिक संस्था असून संस्थेसाठी भांडवलवृध्दीसाठी जनतेतून मुदतबंद ठेवी स्विकारणे व मुदतपूर्तीनंतर त्या सव्याज संबंधित ठेवीदारास दिलेल्या मुदतीत परत करणे हा जाबदार क्र.1 चा सेवाव्यवसाय असून त्यास अनुसरुन प्रस्तुत तक्रारदारानी जाबदार क्र.1 कडे न्यायनिर्णय कलम 2 च्या तपशीलाप्रमाणे दामदुप्पट स्वरुपात ठेवी ठेवल्या होत्या. या व्यवहारावरुन प्रस्तुत तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असल्याचे पूर्णतः शाबित होते व यातील जाबदार क्र.1,3 ते 10 व 14 हे जाबदार क्र.1 संस्थेचे धोरण ठरवणे, कारभारावर नियंत्रण ठेवणे, संस्थेच्या आर्थिक उलाढालीवर अंकुश ठेवून संस्थेचे व्यवहार कायदेशीर ठेवणे ही कायद्याने जाबदारांची जबाबदारी असते परंतु प्रस्तुत जाबदारानी तक्रारदारांच्या मुदतपूर्ण झालेल्या ठेवी तक्रारदारानी वारंवार मागणी करुनही त्याना सव्याज परत देणेचे नाकारुन तक्रारदाराना जाबदारानी सदोष सेवा दिल्याचे निर्विवादरित्या शाबित होते त्यामुळेच तक्रारदार हे त्यांची तक्रार अंशतः मंजूर होणेस पात्र आहेत व तक्रारदार हे यातील जाबदाराकडून त्यांच्या न्यायनिर्णय कलम 2 मधील तपशीलातील ठेवी त्यावर मुदत संपले तारखेपासून द.सा.द.शे.8% व्याजदराने होणा-या संपूर्ण व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम मिळणेस पात्र आहेत त्याचप्रमाणे तक्रारदार हे त्यांच्या ठेवी वेळेत परत न मिळाल्याने त्याना कोर्टकचेरी करावी लागली, खर्च करावा लागला, त्याना मानसिक, शारिरीक त्रासाबाबत रु.30,000/-(रु.दहा हजार मात्र) व अर्जाचा खर्च रु.5,000/- जाबदाराकडून मिळणेस पात्र आहेत. या सर्व रकमा तक्रारदाराना देणेस जाबदार क्र.1,3 ते 10 व 14 वैयक्तिक व संयुक्तीकरित्या जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हा मंच आला आहे. जाबदार क्र.15 हे जाबदार क्र.1 चे पगारी नोकर आहेत त्यामुळे त्याना या जबाबदारीतून मुक्त करणेत येते. परंतु जाबदार क्र.15 यानी तक्रारदारांचे ठेवीचे पैसे जाबदार क्र.1 संस्थेकडून देणेस त्याना जबाबदार धरणेत येते त्यामुळे मुद्दा क्र.1 ते 3 याची उत्तरे आम्ही होकारार्थी देतो तसेच तक्रारदारांच्या इतर मागण्या विचारात घेऊन ठेवीचे पैसे तक्रारदाराना वेळेत न मिळाल्याने त्याना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले व त्यामुळे आर्थिक नुकसानी झाली. त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे रक्कम रु.10,000/- ते मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत मंच येतो.
6. प्रस्तुत कामी यातील जाबदारानी नि.3 सोबत जाबदार क्र.1 संस्थेची वैध संचालक यादी दाखल केली आहे, त्याप्रमाणे जाबदार क्र.1,3 ते 10 व 14 हे वैध संचालक असून जाबदार क्र.2,11,12,13 हे संचालक नाहीत. त्यामुळे प्रस्तुत तक्रारीच्या जबाबदारीतून जाबदार क्र.1,2,11,12,13 याना वगळणेत येते.
7. वरील सर्व कारणमीमांसा व विवेचन याना अधीन राहून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-
आदेश
1. तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. तक्रारदार क्र.1,3 ते 10 व 14 यानी प्रस्तुत तक्रारदाराना त्यांच्या मुदत पूर्ण झालेल्या ठेवींची रक्कम मुदतपूर्ततेनंतर त्यानी वारंवार मागणी करुनही परत न देऊन तक्रारदाराना सदोष सेवा दिल्याचे घोषित करणेत येते.
3. यातील जाबदार क्र.1,3 ते 10 व 14 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदाराना त्यांची ठेवपावती क्र.4763ची ठेव रक्कम रु.25,000/-(रु.पंचवीस हजार मात्र) त्याची दामदुप्पट रक्कम रु.50,000/-(रु.पन्नास हजार मात्र)त्यावर दि.14-8-2011 पासून द.सा.द.शे.8% दराने होणा-या संपूर्ण व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम सदर आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत अदा करावी.
4. यातील जाबदार क्र.1,3 ते 10 व 14 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदाराना त्यांची ठेवपावती क्र.4764 ची ठेव रक्कम रु.25,000/-(रु.पंचवीस हजार मात्र) त्याची दामदुप्पट रक्कम रु.50,000/-(रु.पन्नास हजार मात्र)त्यावर दि.14-8-2011 पासून द.सा.द.शे.8% दराने होणा-या संपूर्ण व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम सदर आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत अदा करावी.
5. यातील जाबदार क्र.1,3 ते 10 व 14 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदाराना त्यांची ठेवपावती क्र.4765ची ठेव रक्कम रु.25,000/-(रु.पंचवीस हजार मात्र) त्याची दामदुप्पट रक्कम रु.50,000/-(रु.पन्नास हजार मात्र)त्यावर दि.14-8-2011 पासून द.सा.द.शे.8% दराने होणा-या संपूर्ण व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम सदर आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत अदा करावी.
6. यातील जाबदार क्र.1,3 ते 10 व 14 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदाराना त्यांची ठेवपावती क्र.4766ची ठेव रक्कम रु.25,000/-(रु.पंचवीस हजार मात्र) त्याची दामदुप्पट रक्कम रु.50,000/-(रु.पन्नास हजार मात्र)त्यावर दि.14-8-2011 पासून द.सा.द.शे.8% दराने होणा-या संपूर्ण व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम सदर आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत अदा करावी.
7. प्रस्तुत जाबदार क्र.1,3 ते 10 व 14 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदाराना शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.30,000/-(रु.तीस हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- (रु.पाच हजार मात्र) व ठेवीची रक्कम वेळेत न मिळाल्याने झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी रु.10,000/- (रु.दहा हजार मात्र) सदर आदेश प्राप्त झालेपासून 4 आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावेत.
8. सदर तक्रारीतून जाबदार क्र.2,11,12,13 व 15 याना वगळणेत येते परंतु तक्रारदारांच्या रकमा जाबदार क्र.1 संस्थेचे व्यवस्थापक या नात्याने संस्थेतून प्राधान्याने परत करणेची जबाबदारी जाबदार क्र.15 यांची आहे.
9. यातील जाबदारानी वरील न्यायनिर्णयाची अंमलबजावणी मुदतीत न केलेस प्रस्तुत तक्रारदार हे जाबदाराविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये दाद मागू शकतील.
10. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
11. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 2-7-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.