Maharashtra

Nagpur

CC/10/758

Milap Chatur Shahu - Complainant(s)

Versus

Shri Lalendra Sitaramji Meherkure - Opp.Party(s)

Adv. V.M. Gajbhiye

24 Nov 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/758
 
1. Milap Chatur Shahu
Plot No. 72, Nimje Layout, Old Kamptee Road, Panch Zopada, Nagpur
Nagpur
Maharashra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Lalendra Sitaramji Meherkure
189, Gadge Nagar, NIT Ground, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Administrative, Nagmitra Nagrik Sahkari Pat Sanstha Maryadit, Nagpur
Maharaja Towers, 387, Krida Chowk, Hanuman Nagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
3. Namitra Nagrik Sah. Pat Sanstha Maryadit, Nagpur
Maharaja Towers, 387, Krida Chowk, Hanuman Nagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

श्री.विजयसिंह राणे, मा. अध्‍यक्ष यांचे कथनांन्‍वये. 
 
 
 
 
- आदेश -
(पारित दिनांक – 24/11/2011)
 
 
1.                 तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरुध्‍द दाखल केलेली असून त्‍यांच्‍या तक्रारीचा आशय असा आहे की, गैरअर्जदार क्र. 1 व 2 अनुक्रमे अध्‍यक्ष व प्रशासक आहेत व गैरअर्जदार क्र. 3 मुख्‍य व्‍यवस्‍थापक आहेत.
                  तक्रारकर्ते संस्‍थेचे भागीदार होते, त्‍यांनी प्रथम रु.700/-, नंतर रु.7,500/- व परत रु.7,500/- चे शेयर्स खरेदी केले होते. गैरअर्जदारांनी शेयर्स खरेदी व इतर सेवा शुल्‍क असे एकंदरीत रु.26,440/- तक्रारकर्त्‍याकडून घेतले. तक्रारकर्ता हा सामान्‍य व्‍यक्‍ती असल्‍याने त्‍याला मुलीच्‍या उच्‍च शिक्षणाकरीता पैश्‍याची गरज होती, म्‍हणून त्‍यांनी गैरअर्जदारांकडे रकमेची मागणी केली, परंतू मागितलेली रक्‍कम दिली नाही. त्‍याबाबत 22 ऑक्‍टोबर 2010 रोजी गैरअर्जदारांना नोटीस दिली व शेयर्सची रक्‍कम मागितली, मात्र नोटीसला उत्‍तर दिले नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार दाखल केली व मागणी केली शेयर्सची रक्‍कम आकारलेल्‍या इतर सेवा शुल्‍कासह व व्‍याजासह परत मिळावी, मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल रु.10,000/- व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.5,000/- मिळावे अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत. तक्रारीसोबत एकूण 8 दस्‍तऐवज दाखल केलेले आहेत.
 
2.                सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविण्‍यात आली असता गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल केले. गैरअर्जदार 2 व 3 ने नोटीस प्राप्‍त होऊनही तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल केले नाही किंवा मंचासमोर उपस्थित झाले नाही, म्‍हणून मंचाने दि.24.02.2011 रोजी त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फी कारवाई चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
3.                गैरअर्जदार क्र. 1 यांनी लेखी उत्‍तर दाखल करुन विपरीत विधाने नाकबूल केले आणि ते संस्‍थेचे होते, मात्र जेव्‍हा शेयर्सची मागणी करण्‍यात आली, त्‍यावेळेस ते अध्‍यक्ष राहिले नाही आणि आता त्‍याठिकाणी गैरअर्जदार क्र. 2 व 3 काम पाहतात. त्‍यामुळे त्‍यांना या प्रकरणात जबाबदार धरल्‍या जाऊ शकत नाही. या प्रकरणास चालविण्‍याचा न्‍यायमंचास अधिकार नाही. तक्रारकर्त्‍याने बँकेचे कर्ज घेतले होते. तक्रारकर्त्‍याची तक्रार चुकीची व गैरकायदेशीर आहे, म्‍हणून ती खारीज व्‍हावी असे उत्‍तर दाखल केले.
4.                सदर प्रकरण युक्‍तीवादाकरीता आले असता तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र. 1 चा युक्‍तीवाद त्‍यांचे वकिलांमार्फत ऐकण्‍यात आला. गैरअर्जदार क्र. 2 व 3 अनुपस्थित. मंचाने सदर प्रकरणात दाखल शपथपत्रे व दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
 
-निष्‍कर्ष-
5.                यातील गैरअर्जदारांचा आक्षेप असा आहे की, या प्रकरणात मंचास अधिकार क्षेत्र नाही हे चुकीचे आहे, कारण यातील शेयर्स हे दोनवेळा घेतलेल्‍या रु.75,000/- चे कर्ज देतांना रक्‍कम जमा करुन घेतलेले आहेत, त्‍यामुळे या प्रकरणात तक्रारकर्त्‍याचा खातेधारक कर्जदार म्‍हणून संबंध आला आणि त्‍यातून त्‍यांनी रक्‍कम वसुल करण्‍यात आलेली आहे हे उघड आहे.  तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजाप्रमाणे रु.700/- रु.7,500/- आणि रु.7,500/- अशी रक्‍कम शेयर्सपोटी गैरअर्जदाराने घेतलेली आहे हे स्‍पष्‍ट होते. थोडक्‍यात तक्रारकर्त्‍याकडून रु.15,700/- एवढी रक्‍कम शेयर्सपोटी गैरअर्जदाराने घेतलेले आहे ही बाब स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याने कर्जाची परतफेड केलेली आहे, त्‍यासंबंधीचे दस्‍तऐवज दाखल केले आहे. गैरअर्जदाराचे त्‍यासंबंधी काहीही म्‍हणणे नाही. तक्रारकर्त्‍याने मागणी करुन त्‍याला शेयर्सची रक्‍कम दिली नाही व त्‍यांच्‍या नोटीसला उत्‍तर गैरअर्जदाराने उत्‍तर दिले नाही. ही गैरअर्जदाराच्‍या सेवेतील त्रुटी आहे. यास्‍तव खालीलप्रमाणे आदेश.
 
-आदेश-
 
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍याजवळून घेतलेली शेयर्सची रक्‍कम रु.15,700/-     ही गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने तक्रारकर्त्‍यास नियमाप्रमाणे परत करावी. शेयर्सचे      सद्याचे मुल्‍य जे असेल त्‍याप्रमाणे व तक्रारकर्ता डिव्‍हीडंट इत्‍यादि मिळण्‍यास पात्र    असतील त्‍याप्रमाणे, योग्‍य ती अदाएगी गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने करावी. सदर रकमेवर तक्रारकर्त्‍याने नोटीस दिल्‍याचे तारीख 01.11.2010 पासून प्रत्‍यक्ष       अदाएगीपावेतो द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्याज द्यावे.
3)    गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍यास मानसिक त्रासाच्‍या भरपाईबाबत रु.5,000/- व     तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे.
4)    उपरोक्‍त आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 ते 3 ने आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसाचे आत करावे.
 
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.