नि.20 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 150/2010 नोंदणी तारीख – 08/06/2010 निकाल तारीख – 23/11/2010 निकाल कालावधी – 165 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री सुहास गोरखनाथ यादव रा.नागठाणे, ता.जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री संदीप गायकवाड) विरुध्द 1. श्री लक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्या. नागठाणे ता.जि.सातारा तर्फे शाखा प्रमुख श्री अभय शंकर शिर्के रा.क्षेत्रमाहुली ता.जि.सातारा 2. चेअरमन श्री महेंद्र भागवतराव देसाई रा.28, विकास नगर, सातारा 3. व्हाईस चेअरमन, श्री लक्ष्मण नागेश जगताप मु.पो.खेड ता.जि. सातारा ----- जाबदार (एकतर्फा) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांचे जाबदार पतसंस्थेत रोज ठेव खाते होते. सदरचे खात्यामध्ये रक्कम रु.10,182/- शिल्लक आहेत. अर्जदार यांनी सदर रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी अर्जदार यांना रक्कम रु.10,182/- चा चेक दिला. सदरचा चेक अर्जदार यांनी त्यांचे खात्यामध्ये भरला असतो तो Unclaimed Return to Sender असा शेरा मारुन परत आला. त्यानंतर जाबदार यांचे सांगणेवरुन अर्जदार यांनी सदरचा चेक पुन्हा त्यांचे खात्यात भरला असता पुन्हा तो परत आला. अशा प्रकारे जाबदार हे सदरची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत. सबब सदरची रक्कम व्याजासह मिळावी, तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र. 2 व 3 यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होऊनही ते नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. जाबदार क्र.1 यांनी प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस स्वीकारली नाही. नोटीस न स्वीकारलेबाबतचा पोस्टाचा शेरा असलेला लखोटा प्रस्तुतकामी दाखल आहे. जाबदार क्र. 1 हेही नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, जाबदार क्र.1 ते 3 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. अर्जदारतर्फे दाखल नि.19 कडील पुरसिस पाहिली तसेच दाखल कागदपत्रे पाहणेत आली. 4. अर्जदारची तक्रार पाहता अर्जदारने जाबदार संस्थेमध्ये लक्ष्मी दैनंदिन ठेव खाते उघडले होते व त्याचा नंबर 374 हा होता. त्यामध्ये अर्जदार रोज रक्कम भरीत होते. सबब सदर खातेमध्ये रक्कम रु.10,182/- शिल्लक आहेत. अर्जदार रकमेची गरज असल्याने रक्कम काढणेसाठी गेले असता जाबदारने दि.12/10/2008 रोजी रक्कम रु.10,182/- चा श्री लक्ष्मी सहकारी बँक लि. सातारा बँकेचा चेक दिला. परंतु ज्या ज्या वेळेस चेके अर्जदारने बॅंकेत वटणेस दिला असता Unclaimed Return to Sender असा शेरा मारुन चेक अर्जदाराला परत दिला. सबब सदर रक्कम जाबदारकडून वसुल होवून मिळावी अशी अर्जदारची तक्रार दिसते. 5. अर्जदारने नि.5 सोबत बँकेचे मेमो दाखल केले आहेत. सदर मेमो पाहता Please present again on 5/1/09 Please present again on 20/1/09 Please present again on 20/4/09 Please present again on 2/04/09 असे शेरे दिसतात. अर्जदार कथन करतात त्याप्रमाणे Unclaimed Return to Sender असे शेरे दिसून येत नाहीत. मेमो वरील शे-यांनुसार जाबदारने रक्कम देण्यात नकार दिला असे दिसून येत नाही. सबब तक्रार करणेस कोणतेही कारण घडलेले नाही असे या मंचाचे मत आहे. अशा पध्दतीने अर्जदार जाबदारविरुध्द आपली तक्रार पुराव्यानिशी शाबीत करु शकलेले नाहीत या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 6. सबब आदेश. आदेश 1. अर्जदारचा तक्रारअर्ज निकाली काढणेत येत आहे. 2. खर्चाबाबत आदेश नाही. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 23/11/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |