सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 170/2014.
तक्रार दाखल दि.8-10-2014.
तक्रार निकाली दि.24-9-2015.
सौ.माधुरी विजय कोकाटे,
रा.गोळेश्वर रोड, कार्वे नाका
कराड, ता.कराड, जि.सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
श्रीकृष्णामाई ग्रा.बिगरशेती सह.पतसंस्थातर्फे-
1. श्री.अधिकराव शिवाजी सोमदे, चेअरमन.
श्रीकृष्णामाई ग्रा.बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.
जुळेवाडी, ता.कराड, जि.सातारा.
2. श्री.धनंजय बाबुराव कणसे, संचालक.
3. श्री.निवास चंद्रकांत काशिद, संचालक.
4. श्री.शाहीद हुसेन जामदार, संचालक.
5. श्री.दिपक प्रकाश काशिद, संचालक. (मयत-वगळणेत आले)
6. श्री.दिपक बापू शिंदे, संचालक.
7. श्री.तानाजी शिवाजी एटांबे, संचालक.
8. श्री.इलाही फरिदे मुजावर, संचालक.
9. श्री.मल्हारराव महादेव गडाळे, संचालक.
10. श्री.संजय रंगराव खोत, संचालक.
11. शैलजा हणमंत बाकले, संचालक.
12. श्री.राजेंद्र पांडुरंग पवार, सचिव.
श्रीकृष्णामाई ग्रा.बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.
जुळेवाडी, ता.कराड, जि.सातारा.
सर्व रा. जुळेवाडी, ता.कराड, जि.सातारा. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.राजीव गांधी.
जाबदार क्र.1 ते 4,6 ते 9 ते 12– एकतर्फा आदेश.
जाबदार क्र.5- मयत.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सुरेखा हजारे,सदस्या यानी पारित केला
1. तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986, कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.
1. तक्रारदार हे सध्या वर नमूद पत्त्यावर कायमस्वरुपी रहात आहेत. श्रीकृष्णामाई ग्रा.बि.शेती सह.पतसंस्था मर्या. जुळेवाडी ता.कराड, जि.सातारा ही पतसंस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अन्वये नोंदणीकृत पतसंस्था असून सदर पतसंस्थेचे जाबदार क्र.1 हे चेअरमन, जाबदार क्र.2 ते 10 हे संचालक व जाबदार क्र.11 हया संचालिका व जाबदार क्र.12 हे सचिव आहेत. सदरील सहकारी पतसंस्था प्रचलित नियमास अधीन राहून लोकांकडून ठेवी स्विकारणे, ठेवीवर नियमाप्रमाणे व ठरलेल्या व्याजदरानुसार व्याज देणे, कर्जपुरवठा करणे इ.चा व्यवसाय करते. संस्थेचा सदरील व्यवसाय संस्थेच्या मुख्य कार्यालयामधून चालतो. सदर संस्थेने केलेल्या प्रत्येक व्यवहारास जाबदार क्र.1 ते 12 हे वैयक्तिक व संयुक्तीकरित्या जबाबदार आहेत. तक्रारदारानी श्रीकृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्थेत खालीलप्रमाणे ठेव दामदुप्पट ठेव म्हणून ठेवलेली आहे.
अ.क्र. ठेवीचा प्रकार पावती क्रमांक ठेवदिनांक ठेवपरतीचा दिनांक रक्कम रु.
1. दामदुप्पट ठेव 37 28-2-2005 18-8-2011 25,000/-
सदरील व्यवहारामुळे तक्रारदार हे जाबदारांच्या पतसंस्थेचे ग्राहक ठरतात. सदर ठेवीची देय रक्कम तक्रारदाराना परत करणेची कायदेशीर व संपूर्ण जबाबदारी जाबदारांवर आहे. तक्रारदारांनी त्यांचे दामदुप्पट ठेवीची रक्कम मुदतपूर्तीनंतर जाबदारांकडे मागूनही त्यांनी ती दिली नाही त्यामुळे जाबदारानी तक्रारदारांना पुरवलेल्या सेवेमध्ये उणीवा व त्रुटी आहेत व त्यास जाबदारच जबाबदार आहेत. जाबदार हे तक्रारदारांची रक्कम देणेचे हेतूपुरस्सर टाळत असल्याचे तक्रारदारांचे निदर्शनास आल्याने तक्रारदारानी वकीलांतर्फे जाबदाराना दि.16-12-2013 रोजी नोटीस पाठवून जाबदारांच्या पतसंस्थेत दामदुप्पट ठेव म्हणून गुंतवलेल्या ठेवीची एकूण रक्कम रु.25,000/- यांची मुदतपूर्तीनंतर मिळणारी दुप्पट रक्कम म्हणजेच रु.50,000/- व सदर दामदुप्पट ठेवीची मुदत संपलेपासूनचे द.सा.द.शे.11 टक्के दराने रक्कम पदरी पडेपर्यंतचे व्याज अशा संपूर्ण रकमेची मागणी केली असताही जाबदारानी तक्रारदारांची रक्कम अद्याप दिलेली नाही. तक्रारदारानी जाबदारांचे संस्थेत गुंतवलेल्या दामदुप्पट ठेवीची मुदत संपलेनंतर जाबदार संस्था व जाबदारांकडे वेळोवेळी तोंडी मागणी करुनही रक्कम दिली नाही म्हणून तक्रारदारानी आपले वकीलांमार्फत जाबदाराना दि.16-12-13 रोजी रजि.नोटीस पाठवून येणे रकमेची मागणी केली असताही जाबदारानी मुदतीत आजअखेर तक्रारदारांची रक्कमही दिली नाही त्या वेळी व त्या दिवशी या अर्जास कारण या मंचाचे स्थळसीमेत घडले आहे व घडत आहे. तक्रारदार व जाबदारांचे संस्थेत झालेले सर्व व्यवहार या कोर्टाचे स्थळसीमेत व अधिकारक्षेत्रात घडले असलेने सदरचा तक्रारअर्ज चालवणेचा या मंचास पूर्ण अधिकार आहे. तक्रारदारांनी जाबदारांविरुध्द अन्य कोणत्याही कोर्टात दाद मागितलेली नाही. तक्रारदारानी मे.मंचाला खालीलप्रमाणे विनंती केली आहे- अर्ज कलम 4 मध्ये नमूद दामदुप्पट ठेवीची मुदतीनंतर जाबदारांकडून देय असणारी एकूण रक्कम रु.50,000/- जाबदारांकडून तक्रारदारांना देववावी. अर्ज कलम 4 मध्ये नमूद दामदुप्पट ठेवीच्या मुदत संपलेल्या दिनांकापासून होणा-या दामदुप्पट रकमेवर द.सा.द.शे.11 टक्के दराने रक्कम पदरी पडेपर्यंतची होणारी व्याजाची रक्कम जाबदाराकडून तक्रारदारास देववावी. जाबदारांचे कृत्यामुळे तक्रारदारास सोसावी लागलेली आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासापोटीची नुकसानभरपाई रक्कम रु.5,000/- जाबदाराकडून तक्रारदारास देववावी. अर्जाचा संपूर्ण खर्च जाबदाराकडून तक्रारदारास देववावा.
येणेप्रमाणे तक्रारअर्ज असे.
जाबदार क्र.1 ते 4, 6 ते 9 व 11,12 यांना नोटीसा लागू होऊनही ते कोर्टात हजर झालेले नाहीत. त्यामुळे त्यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश दि.12-3-15 रोजी करणेत आलेले आहेत. जाबदार क्र.5 हे मयत असून जाबदार क्र.10 विरुध्द दि.27-8-15 रोजी एकतर्फा आदेश पारित करणेत आलेले आहेत. त्यामुळे सदर कामी जाबदारांतर्फे म्हणणे दाखल नाही.
2. नि.1 कडे तक्रारअर्ज, नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.3 कडे अँड.जगदाळे यांना वकील म्हणून नियुक्तीस परवानगीचा अर्ज, अर्ज मंजूर. नि.4 कडे अँड.गांधी यांचे वकीलपत्र, नि.5 कडे कागदयादी, नि.5/1 कडे जाबदार पतसंस्थेकडे ठेवलेली दामदुप्पट ठेवपावतीची सत्यप्रत, नि.5/2 कडे अँड.जगदाळे यानी जाबदार पतसंस्थेस पाठवलेली दि.16-12-13 ची रजि.नोटीस, नि.5/3 कडे जाबदार क्र.1,3 व 4च्या नोटीसच्या पोहोचपावत्या, नि.5/4 कडे जाबदार क्र.5 चे मयतच्या शे-याने परत आलेला लखोटा, जाबदार क्र.6 व 7 च्या नोटीसची पोहोचपावती, नि.5/5 कडे जाबदार क्र.8,9 व 10 यांची पोहोचपावती, नि.5/6 कडे जाबदार क्र.2 चा लखोटा स्विकारत नसल्याच्या शे-यासह लखोटा परत व जाबदार क्र.11 व 12च्या पोहोचपावत्या, नि.6 कडे तक्रारदाराचा पत्तामेमो, नि.7 कडे मंचातर्फे पाठविलेल्या नोटीसा, नि.7/1 ते नि.7/7 कडे अनुक्रमे जाबदार क्र.1,11,9,12,8,3,7 यांच्या पोहोचपावत्या दाखल, नि.8 कडे जाबदार क्र.10 यांचे परगावी गेलेने लखोटा परत, नि.8/1 कडे जाबदार क्र.5 यांचा व्यक्ती मयत असलेचे शे-याने लखोटा परत, नि.8/2 कडे जाबदार क्र.4 ची पोहोच, नि.8/3 कडे जाबदार क्र.2 ची पोहोच, नि.8/4 कडे जाबदार क्र.6 ची पोहोच दाखल, नि.9 कडे तक्रारदाराचा कागद दाखल करणेसाठी अर्ज, अर्ज मंजूर. नि.10 ने कागद दाखल, नि.11 व 12 कडे तक्रारदाराचा जाबदार क्र.10 यांना फेरनोटीसीसाठी अर्ज, अर्ज मंजूर. नि.13 कडे मंचातर्फे जाबदाराना पाठविलेल्या नोटीसा, नि.14 कडे जाबदार क्र.10 ची पोहोचपावती, नि.15 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.16 कडे तक्रारदाराची पुरावा संपलेची पुरसीस, नि.17 कडे तक्रारदाराचा अर्ज की, दाखल केलेला तक्रारअर्ज, कागदपत्रे व पुराव्याचे प्रतिज्ञापत्र हाच युक्तीवाद समजणेत यावा.
3. तक्रारदारांची तक्रार, त्यासोबतचे प्रतिज्ञापत्र, पुरावे, पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, पुरसीस, यांचे अवलोकन करुन सदर तक्रारीचे निराकरणार्थ मे. मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार व जाबदार यांचेत ग्राहक व सेवापुरवठादार
असे नाते आहे काय? होय.
2. जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय? होय.
3. जाबदार हे तक्रारदारांची रक्कम देणे लागतात काय? होय.
4. अंतिम आदेश काय? तक्रार अंशतः मंजूर.
विवेचन- मुद्दा क्र.1 ते 3-
5. मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. तक्रारदार ही नोकरी करीत असून वर नमूद पत्त्यावर रहाते. जाबदार पतसंस्था ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अन्वये नोंदणीकृत पतसंस्था असून सदर पतसंस्थेचे जाबदार क्र.1 हे चेअरमन व जाबदार क्र.2 ते 11 हे संचालक असून जाबदार क्र.12 हे सचिव आहेत. सदरील सहकारी पतसंस्था प्रचलित नियमाना अधीन राहून ग्राहकांकडून ठेवी स्वरुपात रक्कम स्विकारुन मुदतीनंतर किंवा मुदतपूर्वही ग्राहकाना रक्कम हवी असलेस त्यांच्या रकमा व्याजासह त्याना परत देणे अशा स्वरुपाच्या हेतूने जाबदार पतसंस्था स्थापन झालेली आहे. तक्रारदारांनी जाबदार पतसंस्थेच्या ता.कराड जि.सातारा या पतसंस्थेत शाखेमध्ये दामदुप्पटीसाठी ठेव ठेवलेली होती. तिचा तपशील खालीलप्रमाणे-
ठेवीचा प्रकार ठेवपावती क्र. ठेवदिनांक ठेवपरतीचा दिनांक गुंतवलेली रक्कम रु.
दामदुप्पट ठेव 37 28-2-2005 18-8-2011 25,000/-
प्रस्तुतचे ठेवीमुळे तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक ठरतात. त्यांना त्यांचे पैसे वेळेत सव्याज परत करणे ही जाबदारांची जबाबदारी होती व तक्रारदाराना (ग्राहकांस) द्यावयाची सेवाही होती. जाबदार हे आजपावेतो पैसे परत देऊ शकले नाहीत ही तक्रारदाराना जाबदारांनी द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे. तक्रारदारांनी वारंवार जाबदारांकडे पैशाची मागणी करुनही जाबदारांच्या पैसे न देणेचे कृतीमुळे तक्रारदाराना खूप शारिरीक व मानसिक त्रास झाला आहे. सदर कामी जाबदाराकडून तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत झालेली त्रुटी, तक्रारदारास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रास या सर्वाना जाबदारच जबाबदार आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. जाबदारानी तक्रारदारांच्या रकमा मुदती संपून गेल्या तरी परत केल्या नसल्यामुळेच त्यांचेकडून त्यांच्या-(जाबदारांच्या) कर्तव्यात कसूर झाली आहे व ग्राहकाला त्यांचेकडून दयावयाच्या सेवेत त्रुटी निर्माण झालेली आहे. आजपावेतो जाबदारांनी तक्रारदारांची रक्कम सव्याज परत केलेली नाही, ती त्यांनी त्यांना सव्याज परत केली पाहिजे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
6. जाबदारांचे अशा वर्तनाने तक्रारदाराचे मनस्वास्थ बिघडले आहे. ग्राहकाना योग्य ती सेवा पुरवणेची जबाबदारी जाबदारांची होती व आहे ती ते पुरवू शकले नाहीत. म्हणून आम्ही येथे Co-operate corporate veil चा आधार घेऊन या सर्व गोष्टींना जाबदारांना जबाबदार धरीत आहोत. जाबदार क्र.5 हे मयत असलेने त्यांना वगळणेत येते व जाबदार क्र.1 पतसंस्था व जाबदार क्र.2 ते 6 व 6 ते 11 यांना वैयक्तिक व संयुक्तीकरित्या हे मंच जबाबदार धरीत आहे. जाबदार क्र.12 हे सचिव म्हणजेच पगारी नोकर असलेने त्यांना फक्त संयुक्तीकरित्या जबाबदार धरीत आहोत. येथे आम्ही मे. मुंबई उच्च न्यायालयाच्या रिट पिटीशन नंबर 117/2011 मंदाताई संभाजी पवार वि. स्टेट ऑफ महाराष्ट्र या न्यायनिवाडयाचा व त्यातील दंडकांचा आधार घेतला आहे.
7. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-
-ः आदेश ः-
1. तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.
2. तक्रारदारांना ठेव पावती क्र.37 वरील दामदुप्पट रक्कम रु.50,000/- मुदत संपले तारखेपासून तक्रारदाराचे हाती रक्कम पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराप्रमाणे होणारी एकूण व्याजासह रक्कम जाबदार क्र.1 पतसंस्था व जाबदार क्र.2 ते 4 व 6 ते 11 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या व जाबदार क्र.12 यानी संयुक्तीकरित्या अदा करावी.
3. तक्रारदाराना जाबदार क्र.1 पतसंस्था व जाबदार क्र.2 ते 4 व 6 ते 11 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या व जाबदार क्र.12 यानी संयुक्तीकरित्या आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.4,500/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- अदा करावेत.
4. वरील आदेशाचे पालन जाबदार क्र.1 पतसंस्था व जाबदार क्र.2 ते 4 व 6 ते 11 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या व जाबदार क्र.12 यानी संयुक्तीकरित्या आदेश पारित तारखेपासून 45 दिवसांचे आत करावयाचे आहे.
5. जाबदारानी विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केलेस तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये दाद मागू शकतील.
6. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 24–9-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.