ग्राहक तक्रार अर्ज क्र. 283/2010
ग्राहक तक्रार अर्ज दाखल दि.28/09/2010
अंतीम आदेश दि.30/08/2011
नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नाशिक
श्री. प्रकाश संपतराव रणदिवे, तक्रारदार
रा.फ्लॅट नं. टी-3, विश्वसागर अपार्टमेंट, (अँड.बी.के.आडके)
250/ब/5 नागाळा पार्क, कोल्हापूर.
विरुध्द
कॅप्टन एव्हिशन (इंडिया) प्रा.लि.,
तर्फे संचालक,
1. श्री. कुणाल गायकवाड, सामनेवाले
रा. ए-6, ड्रीम रॉयल,शिवाजीनगर, (अँड.एस.एम.दायमा)
नाशिक 6.
2. श्री. प्रविण गांगुर्डे, (क्र.2 तर्फे अँड. व्ही.एच.जाधव)
रा. 451, के.आर.टी.हायस्कुलजवळ,
मौजे सुकेणे,ता.निफाड,जि.नाशिक.
3. श्री.दिलीपराव मधुकरराव उदगीरकर, (क्र.3 अँड.एस.वाय.देशमुख)
कॅप्टन एव्हीशन इंडिया प्रा.लि.
6,ड्रीम रॉयल, शिवाजीनगर, नाशिक.6
रा.मधुमालती, गुप्ते रोड, जठारपथ,
अकोला, ता.जि.अकोला.(विदर्भ)
(मा.अध्यक्ष श्री.आर.एस. पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांना तक्रार अर्ज कलम 3 मध्ये वर्णन केलेली संपूर्ण रक्कम सामनेवाले यांचेकडून वसूल होऊन मिळावी, या रकमेवर 12% प्रमाणे व्याज मिळावे या मागणीसाठी अर्जदार यांनी हा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे.
सामनेवाले क्र.1 यांनी पान क्र.32 लगत लेखी म्हणणे व पान क्र.33 लगत प्रतिज्ञापत्र, सामनेवाले क्र.2 यांनी पान क्र.41 लगत लेखी म्हणणे व पान क्र.42 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र.3 यांनी पान क्र.30 लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले
तक्रार क्र.283/2010
सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः
मुद्देः
1. अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय?- होय
2. सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय?- होय
3. अर्जदार हे सामनेवाले यांचेकडून जमा केलेली रक्कम व्याजासह वसूल होऊन
मिळणेस पात्र आहेत काय?- होय
4. अर्जदार हे सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रासापोटी तसेच तक्रार अर्जाचे
खर्चापोटी व नोटीस खर्चापोटी रक्कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत
काय?- होय
5. अंतीम आदेश? - अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले विरुध्द अंशतः मंजूर
करणेत येत आहे.
विवेचनः
याकामी अर्जदार यांचेवतीने पान क्र.70 लगत लेखी युक्तीवाद दाखल करण्यात आलेला आहे. सामनेवाले क्र.1 यांनी पान क्र.45 लगत लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे. सामनेवाले क्र.2 यांचेवतीने पान क्र.56 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे व अँड. व्ही.एच.जाधव यांनी युक्तीवाद केलेला आहे. सामनेवाला क्र.3 यांनी पान क्र.83 लगत लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे.
सामनेवाले क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये, “त्यांनी अर्जदार यांचेकडून रक्कम रु.2,50,000/- स्विकारलेले नाहीत, सामनेवाले क्र.1 यांनी अर्जदार यांचेकडून रक्कम स्विकारलेली असून ही रक्कम सामनेवाले क्र.1 यांचेकडेच आहे. सेवा देण्यात कमतरता केलेली नाही, अर्ज रद्द करण्यात यावा,” असे म्हटलेले आहे.
सामनेवाले क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये, “सामनेवाले हे पूर्वी कॅप्टन एव्हिशन (इंडिया) प्रा.लि. या कंपनीमध्ये संचालक होते. सामनेवाले क्र.1 हे पायलट असल्यामुळे ते फक्त ट्रेनिंग देण्याचे काम करीत आहेत. सामनेवाले क्र.2 हेच कंपनीचे आर्थिक व्यवहार पाहत होते. सामनेवाले क्र.1 हे दि.26/08/2009 रोजी कॅप्टन एव्हिशन (इंडिया) प्रा.लि.या कंपनीमधून निवृत्त झालेले आहेत. अर्जदार व सामनेवाले क्र.2 यांचेबरोबरच सर्व व्यवहार झालेले आहेत. सेवा देण्यात कमतरता केलेली नाही, अर्ज रद्द करण्यात यावा,” असे म्हटलेले आहे.
तक्रार क्र.283/2010
या कामी सामनेवाला क्र.3 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार व विरुध्द पक्षकार यांचे नातेसंबंध ग्राहक व व्यापारी या संज्ञेत बसत असल्याने अर्ज चालण्यास पात्र नाही. अर्ज दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. अर्जदार व सामनेवाला क्र.3 यांची कधीही भेट अथवा ओळख झालेली नव्हती व नाही. कथीत व्यवहाराची माहिती ग्राहक न्यायालयाचे समन्स प्राप्त झाल्यानंतर झाली. सामनेवाला नं.2 यांचेबरोबर अर्जदार यांनी व्यवहार केलेला आहे. तसेच सामनेवाला क्र.3 यांचेबरोबर कोणताही व्यवहार झालेला नाही. सामनेवाला क्र.3 हे आज रोजी कंपनीचे संचालक नाहीत. सामनेवाला क्र.3 यांनी दि.4/5/2009 रोजी कॅप्टन एव्हीएशन (इंडीया) कंपनीचा राजीनामा दिलेला असून तो रजिष्टर ऑफ कंपनीज मध्ये मंजूर झालेला आहे. तक्रार अर्ज रद्द करण्यात यावा असे म्हटलेले आहे.”
याकामी अर्जदार यांनी पान क्र.21 लगत दि.30/12/2008 रोजीची सामनेवाले क्र.1 यांनी दिलेली रु.48,500/- ची मूळ पावती, पान क्र.22 लगत सामनेवाले क्र.1 यांनी दिलेली दि.30/12/2008 रोजीची रु.62,500/- ची मूळ पावती, पान क्र.23 लगत सामनेवाले क्र.1 यांनी दिलेली दि.30/12/2008 रोजीची रु.62,500/- ची मूळ पावती, पान क्र.24 लगत सामनेवाले क्र.1 यांनी दिलेली रु.62,500/- ची दि.30/12/2008 रोजीची मूळ पावती, पान क्र.25 लगत दि.30/12/2008 रोजीची रु.14,000/- ची मूळ पावती अशा एकूण पाच मूळ अस्सल पावत्या दाखल केलेल्या आहेत. सामनेवाले क्र.1 यांनी पान क्र.32 लगत जे लेखी म्हणणे दाखल केलेले आहे व पान क्र.33 लगत जे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. यावरील सामनेवाले क्र.1 यांची सही व पान क्र.21 ते 25 लगतच्या एकूण पाच मूळ अस्सल पावत्यांवरील सही यांची तुलना करता पान क्र.21 ते 25 लगतच्या एकूण पाच मूळ अस्सल पावत्यांवर सामनेवाले क्र.1 यांची सही आहे हे स्पष्ट होत आहे. अर्जदार यांनी तक्रार अर्जात सामनेवाले क्र.1 व 2 यांचे प्रशिक्षणार्थी ट्रेनिंग कंपनीची नोंदणीकृत संस्था आहे असा उल्लेख केलेला आहे. सामनेवाले क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये अर्जदार यांचेकडून संपूर्ण रक्कम सामनेवाले क्र.1 यांनी स्विकारलेली आहे असा उल्लेख केलेला आहे. सामनेवाले क्र.2 हे कॅप्टन एव्हिशन (इंडिया) प्रा.लि. या कंपनीमध्ये संचालक नाहीत हे दर्शविण्यासाठी सामनेवाले क्र.2 यांनी पान क्र.65 लगत दि.16/01/2009 चे मिटींगबाबतची कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सामनेवाला क्र.2 यांचा राजीनामा मिटींगचे तारखेपासून म्हणजे दि.16/1/2009 पासून मंजूर केलेला आहे हे पान
तक्रार क्र.283/2010
क्र.365 चे कागदपत्रावरुन स्पष्ट होत आहे. अर्जदार यांनी सामनेवाला यांना दि.30/12/2008 ते दि.02/02/2009 या कालावधीत सर्व रक्कम अदा केली आहे. सामनेवाला क्र.2 हे संचालक असतांना अर्जदार यांचेबरोबर व्यवहार झालेले आहेत. तसेच सामनेवाला क्र.3 यांचे कथनानुसार दि.4/5/2009 रोजी त्यांचा राजीनामा मंजूर झालेला असल्यामुळे व दि.16/01/2009 रोजी तो सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे मिटींगमध्ये मंजूर केलेला असल्यामुळे व अर्जदार यांनी सामनेवाला यांचेबरोबर दि.30/12/2008 ते 26/1/2009 रोजीचे कालावधीमध्ये म्हणजेच दि.4/5/2009 पुर्वी अर्जदार यांचेबरोबर सर्व व्यवहार झालेले आहेत हे स्पष्ट होत आहेत. याचा विचार होता व वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले क्र.1 ते 3 यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाले क्र.1 व 2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी अर्जदार यांना वैमानिक ट्रेनिंग दिले किंवा नाही याबाबतचा कोणताही उल्लेख केलेला नाही. अर्जदार यांना सामनेवाले क्र.1 व 2 यांचेकडून वैमानिकचे ट्रेनिंग मिळाले नाही व रक्कमही परत मिळाली नाही असा स्पष्ट उल्लेख अर्जदार यांनी तक्रार अर्ज व प्रतिज्ञापत्रामध्ये केलेला आहे. पान क्र.21 ते 25 लगतच्या एकूण पाच मूळ अस्सल पावत्या व पान क्र.27 चे बँक स्टेटमेंट यांचा विचार होता अर्जदार यांनी सामनेवाले यांचेकडे रु.2,50,000/- जमा केलेले आहेत हे स्पष्ट होत आहे. परंतु अशाप्रकारे रक्कम मिळालेनंतरही सामनेवाले यांनी अर्जदार यांचा मुलगा कु. प्रतिक प्रकाश शिंदे यांना वैमानिक ट्रेनिंग दिलेले नाही व प्रवेशही दिलेला नाही. याचा विचार होता सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
तक्रार अर्ज कलम 4 मधील अर्जदार यांचे कथन, पान क्र.21 ते 25 लगतच्या एकूण पाच मूळ अस्सल पावत्या, पान क्र.27 चे बँक स्टेटमेंट यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले क्र.1 ते 3 यांचेकडून त्यांनी जमा केलेली रक्कम रु.2,50,000/- परत मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांना सामनेवाले क्र.1 ते 3 यांचेकडून रक्कम रु.2,50,000/- इतकी मोठी रक्कम योग्य त्या वेळेत परत मिळाली नाही, यामुळे निश्चितपणे अर्जदार यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले क्र.1 ते 3 यांचेकडून आर्थिक नुकसान भरपाई म्हणून शेवटची रक्कम दिल्याची तारीख 02/02/2009 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्याज मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
तक्रार क्र.283/2010
सामनेवाले यांचेकडून रक्कम परत मिळावी या मागणीसाठी अर्जदार यांना सामनेवालेविरुध्द या मंचासमोर दाद मागावी लागली आहे. तसेच अर्जदार यांनी सामनेवाले यांना पान क्र.28 नुसार अँड.पी.जे.अतिग्रे यांचेमार्फत दि.26/05/2010 रोजी रजिस्टर पोष्टाने नोटीस पाठविलेली आहे. वरील सर्व कारणांमुळे निश्चितपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे व नोटीस पाठविण्याकरीता व तक्रार अर्ज दाखल करण्याकरीता खर्चही करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले क्र.1 ते 3 यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.7,500/-, नोटीस खर्चापोटी रु.500/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.1,500/- अशी रक्कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे तसेच सामनेवाले क्र.1 ते 3 यांचे लेखी म्हणणे, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, सामनेवाले क्र.1 तर्फे लेखी युक्तीवाद, सामनेवाले क्र.2 तर्फे वकीलांचा युक्तीवाद व सामनेवाला क्र.3 तर्फे लेखी युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.1 ते 3 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी आजपासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रकमा दयाव्यातः
2)अ. रक्कम रु.2,50,000/- दयावेत व आर्थिक नुकसान भरपाई म्हणून या
रकमेवर दि.02/02/2009 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत 9% प्रमाणे व्याज दयावे.
ब. मानसिक त्रासापोटी रक्कम रु.7,500/- दयावेत.
क. नोटीस खर्चापोटी रक्कम रु.500/- दयावेत.
ड. तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- दयावेत.
(आर.एस.पैलवान) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
अध्यक्ष सदस्या
ठिकाणः- नाशिक.
दिनांकः-30/08/2011.