Maharashtra

Satara

CC/10/134

Ku. Aarti Santosh Thorat - Complainant(s)

Versus

Shri Krisnamai Nag.pat. Sanstha Karad Chairman Vishvas dinkar Pisal - Opp.Party(s)

Adv. Kadam

04 Sep 2010

ORDER


ReportsDistrict Consumer disputes redressal Forum Satara Near Cooperative Court Sadara Bazar Satara-415001
CONSUMER CASE NO. 10 of 134
1. Ku. Aarti Santosh ThoratGondsi Tal Karad Dis. SataraSataraMaharashtra ...........Appellant(s)

Vs.
1. Shri Krisnamai Nag.pat. Sanstha Karad Chairman Vishvas dinkar PisalGondsi Tal Karad Dis. SataraSataraMaharashtra ...........Respondent(s)


For the Appellant :
For the Respondent :

Dated : 04 Sep 2010
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

                                                            नि.34
मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर
                                          तक्रार क्र. 134/2010
                                          नोंदणी तारीख – 6/5/2010
                                          निकाल तारीख – 4/9/2010
                                          निकाल कालावधी – 118 दिवस
श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्‍यक्ष
श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या
श्री सुनिल कापसे, सदस्‍य
 
(श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या यांनी न्‍यायनिर्णय पारीत केला)
------------------------------------------------------------------------------------
1. कु. आरती संतोष थोरात
2. कु. पूजा संतोष थोरात
3. कु. अनिरुध्‍द संतोष थोरात
नं.1 ते 3 तर्फे अ.पा.क. म्‍हणून वडील
श्री संतोष रघुनाथ थोरात
सर्व रा.घोणशी, ता. कराड
जि. सातारा                                       ----- अर्जदार
                                             (अभियोक्‍ता श्री आनंद कदम)
      विरुध्‍द
1. श्री कृष्‍णामाई नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    घोणशी तर्फे ता. कराड जि. सातारा
    चेअरमन श्री विश्‍वास दिनकर पिसाळ
2. चेअरमन श्री विश्‍वास दिनकर पिसाळ
    श्री कृष्‍णामाई नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    घोणशी ता. कराड जि. सातारा रा. घोणशी
    ता. कराड जि. सातारा
3. व्‍हा.चेअरमन, श्री बजरंग श्रीपती जाधव
    श्री कृष्‍णामाई नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    घोणशी ता. कराड जि. सातारा रा. घोणशी
    ता. कराड जि. सातारा
4. सचिव श्री नंदकुमार पोपट पिसाळ
    श्री कृष्‍णामाई नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    घोणशी ता. कराड जि. सातारा रा. घोणशी
    ता. कराड जि. सातारा
5. संचालक, श्री अशोक शंकर पिसाळ
    श्री कृष्‍णामाई नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    घोणशी ता. कराड जि. सातारा रा. घोणशी
    ता. कराड जि. सातारा
6. संचालक, श्री एकनाथ परबती पिसाळ
   श्री कृष्‍णामाई नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    घोणशी ता. कराड जि. सातारा रा. घोणशी
    ता. कराड जि. सातारा
7. संचालक, श्री विकास मारुती शिंदे
    श्री कृष्‍णामाई नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    घोणशी ता. कराड जि. सातारा रा. घोणशी
    ता. कराड जि. सातारा
8. संचालक, श्री रघुनाथ पांडुरंग थोरात
    श्री कृष्‍णामाई नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    घोणशी ता. कराड जि. सातारा रा. घोणशी
    ता. कराड जि. सातारा
9. संचालक, श्री भास्‍कर मारुती पिसाळ
   श्री कृष्‍णामाई नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    घोणशी ता. कराड जि. सातारा रा. घोणशी
    ता. कराड जि. सातारा
10. संचालक, श्री संजय रामचंद्र अडसुळे
    श्री कृष्‍णामाई नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    घोणशी ता. कराड जि. सातारा रा. घोणशी
    ता. कराड जि. सातारा
11. संचालक श्री शिवाजी राजाराम कदम
    श्री कृष्‍णामाई नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    घोणशी ता. कराड जि. सातारा रा. घोणशी
    ता. कराड जि. सातारा
12. संचालक, श्री दादासो जयसिंग वायदंडे
    श्री कृष्‍णामाई नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    घोणशी ता. कराड जि. सातारा रा. घोणशी
    ता. कराड जि. सातारा
13. संचालक, श्री मधुकर शंकर ताटे
   श्री कृष्‍णामाई नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    घोणशी ता. कराड जि. सातारा रा. घोणशी
    ता. कराड जि. सातारा
14. संचालिका, सौ मालन उत्‍तम चव्‍हाण
   श्री कृष्‍णामाई नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    घोणशी रा. कोपर्डेहवेली ता. कराड जि. सातारा
15. संचालिका, सौ लतिका संभाजी पवार
    श्री कृष्‍णामाई नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    घोणशी रा. वहागाव ता. कराड जि. सातारा         ----- जाबदार
                                               
 
न्‍यायनिर्णय
 
1.     अर्जदार यांनी जाबदार पतसंस्‍थेत तीन वेगवेगळया ठेवपावत्‍यांन्‍वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्‍हणून ठेवलेल्‍या आहेत. ठेवींची मुदत संपल्‍यानंतर अर्जदार यांनी ठेव रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्‍कम परत दिली नाही. सबब ठेव रक्‍कम व्‍याजासह मिळावी तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्‍हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे.
2.    जाबदार क्र.5, 6, 11, व 14 हे हे नेमलेल्‍या तारखांना मंचासमोर हजर होऊनही त्‍यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्‍यांचेविरुध्‍द म्‍हणणे नाही असा आदेश करण्‍यात आला.
3.    जाबदार क्र.1, 2, 9, 3, 4, 7, 8, 10, 12, 13, 15 यांना मे. मंचाचे नोटीसची बजावणी होवूनही ते मंचात हजर झाले नाही. सबब, त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आला.
4.    अर्जदार क्र. 1 ते 3 अज्ञान असून त्‍यांचेसाठी अ.पा.क. म्‍हणून वडील श्री संतोष रघुनाथ थोरात यांनी तक्रार दाखल केलेली दिसते. नावावरुन तसेच नि.2 कडील शपथपत्रावरुन संतोष रघुनाथ थोरात हे अर्जदार क्र.1 ते 3 यांचे वडील दिसतात.
5.    अर्जदार यांनी नि.1 सोबत नि.2 कडे शपथपत्र दाखल केले असून नि. 32   सोबत ठेव पावत्‍यांच्‍या मूळ प्रती दाखल केल्‍या आहेत. प्रस्‍तुत ठेव पावतींचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी जाबदार संस्‍थेत ठेव ठेवलेचे स्‍पष्‍ट होते. तसेच प्रस्‍तुत ठेवींची मुदत संपलेचेही स्‍पष्‍ट दिसत आहे. सबब, नि. 2 कडील अर्जदार यांचे शपथपत्र पाहिले असता अर्जदार यांनी ठेव रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्‍पष्‍ट दिसते. सबब ठेवीची मुदत संपलेनंतर अर्जदारने वेळोवेळी ठेव रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी ठेव रक्‍कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत‍ आहे. सबब जाबदारने अर्जदारच्‍या प्रस्‍तुत तक्रारीतील फेरिस्‍त नि. 32 सोबतच्‍या ठेवींच्‍या रकमा पावत्‍यांवरील नमूद व्‍याजासह द्यावी व ठेवीची मुदत संपलेनंतर संपूर्ण रक्‍कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने होणा-या व्‍याजासह द्याव्‍यात या निर्णयाप्रत हा मंच आला आहे.
6.    जाबदार क्र. 4 हे सचिव असून संस्‍थेचे संचालक नाहीत किंवा ते संचालक असलेबाबतचा कोणताही पुरावा अर्जदारने दाखल केला नाही. सबब जाबदार क्र. 4 यांना वैयक्तिक अर्जदारची ठेव रक्‍कम परत करणेस जबाबदार धरणेत येत नसून संस्‍थेसाठी त्‍यांना रक्‍कम परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे. सबब जाबदार क्र. 1 ते 3 व जाबदार क्र.5 ते 15 यांना स्‍वतंत्र व संयु‍क्‍तरित्‍या व जाबदार संस्‍थेतर्फे जाबदार क्र. 4 यांना अर्जदारच्‍या रकमा परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे.
7.    सबब आदेश.
आदेश
 
1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे.
2. जाबदार क्र. 1 ते 3 व जाबदार क्र.5 ते 15 यांनी स्‍वतंत्र व संयु‍क्‍तरित्‍या व
    जाबदार संस्‍थेतर्फे जाबदार क्र.4 यांनी अर्जदार यांना त्‍यांची ठेव पावती क्र.
    000257, 000258 व 000259 कडील रक्‍कम ठेव ठेवलेल्‍या तारखेपासून ठेवीची
    मुदत संपले तारखेपर्यंत पावतीवरील नमूद व्‍याजासह द्यावी तसेच मुदत
    संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्‍कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के
    व्‍याजासह द्यावी.
3. जाबदार यांनी मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना रक्‍कम
    रु. 5,000/- द्यावी.
 
4. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्‍यांना या न्‍यायनिर्णयाची सत्‍यप्रत
    मिळाल्‍यापासून 30 दिवसात करावे.
5. सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या न्‍यायमंचात जाहीर करणेत आला.
सातारा
 
दि.4/9/2010
 
 
 
 
(सुनिल कापसे)           (सुचेता मलवाडे)           (विजयसिंह दि. देशमुख)
   सदस्‍य                   सदस्‍या                     अध्‍यक्ष
 

Smt. S. A. Malwade, MEMBERHONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT Mr. Sunil K Kapse, MEMBER