नि.51 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 222/2010 नोंदणी तारीख – 20/9/2010 निकाल तारीख – 31/1/2011 निकाल कालावधी – 131 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ 1. श्री मारुती कृष्णाजी कणसे 2. सौ सरुबाई मारुती कणसे दोघे रा.शेणोली (कणसे मळा) ता. कराड जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री आनंद कदम) विरुध्द 1. श्री कृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा तर्फे चेअरमन श्री दादासो सहदेव सोमदे 2. चेअरमन श्री दादासो सहदेव सोमदे श्री कृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा ----- जाबदार क्र.2 (अभियोक्ता श्री शंकरराव लोकरे) 3. व्हा.चेअरमन, श्री विलास किसन खोत श्री कृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा 4. संचालक, श्री काशिनाथ केशव सोमदे श्री कृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा 5. संचालक, श्री शंकरराव सखाराम काशिद श्री कृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा 6. संचालक, अस्लम पापालाल मुल्ला श्री कृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा ----- जाबदार क्र.6 (अभियोक्ता श्री रणजितसिंह जगदाळे) 7. संचालक, श्री बबनराव परसू पाटील श्री कृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा 8. संचालक, श्री बबनराव बाबूराव हिनुकले श्री कृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा 9. संचालक, श्री कोंडिबा बाबूराव बाकले श्री कृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा 10. संचालक, श्री शंकर पांडुरंग साळुंखे श्री कृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा 11. संचालक, शब्बीर अब्दुल पटेल श्री कृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा 12. संचालक, श्री तानाजी आण्णा भोसले श्री कृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा ----- जाबदार क्र.3,7,8,9,10,11,12 (अभियोक्ता श्री महेश गोरे) 13. संचालिका, सौ जयमाला जालिंदर पाटील श्री कृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा 14. संचालिका, सौ बनूबाई वसंतराव काळे श्री कृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा ----- जाबदार क्र.1,4,5,13,14 (एकतर्फा) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेत कृष्णामाई धनसंचय मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव ठेवलेली आहे. सदरचे ठेवीची मुदत संपल्यानंतर अर्जदार यांनी ठेव रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम परत दिली नाही. सबब ठेव रक्कम व्याजासह मिळावी, तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र.2 यांनी नि. 20 कडे लेखी म्हणणे देवून अर्जदारची तक्रार नाकारली आहे. अर्जदार यांनी ठेवींची मुदत संपणेपूर्वी तक्रारअर्ज दाखल केला आहे. अर्जदार हे जाबदार यांचेकडे ठेवीची रक्कम मागण्यास कधीही आले नव्हते. अर्जदार यांनी जाबदार यांना केव्हाही नोटीस दिलेली नव्हती. जाबदार हे अर्जदार यांना कोणतेही देणे लागत नव्हते. जाबदार संस्थेवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु सदरचे प्रशासकांना याकामी पक्षकार म्हणून सामील केलेले नाही. शासनाचे कर्जमाफी आदेशामुळे कर्जदारांनी कर्ज भरले नाही. त्यामुळे ठेवीदारांच्या रकमा परत करता येत नाहीत. त्याबाबत कार्यवाही सुरु आहे. कर्जदारांकडून वसुल होणा-या रकमेतून ठेवीदारांच्या रकमा परत करण्याचे चालू आहे. अर्जदार यांच्याही रकमा संस्था परत करणार आहे. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.2 यांनी कथन केले आहे. 3. जाबदार क्र.6 यांनी नि. 22 कडे व जाबदार क्र. 3, 7, 8, 9, 10, 11 व 12 यांनी नि.34 कडे लेखी म्हणणे देवून अर्जदारची तक्रार नाकारली आहे. अर्जदार हे जाबदार यांचेकडे ठेवीची रक्कम मागण्यास कधीही आले नव्हते. जाबदार संस्थेवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु सदरचे प्रशासकांना याकामी पक्षकार म्हणून सामील केलेले नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.6 यांनी कथन केले आहे. 4. जाबदार क्र. 1, 4, 5, 13, 14 यांना मे. मंचाचे समन्स नोटीस मिळाली आहे तरीसुध्दा ते गैरहजर आहेत. याबाबत अर्जदारचे नि.37 कडील शपथपत्र पाहिले. सबब जाबदार क्र. 1, 4, 5, 13, 14 विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 5. जाबदार क्र. 2, 3, 6 ते 12 यांनी अनुक्रमे नि. 20, 22 व 34 कडे म्हणणे देवून अर्जदारची तक्रार नाकारली आहे. प्रस्तुत जाबदार यांनी अनेक हरकती घेतल्या आहेत. अर्जदार क्र.1 व 2 हे पती-पत्नी आहेत हे शाबीत केले पाहिजे, अर्जदार यांनी कष्टाचा पैसा गुंतवला आहे हे शाबीत केले पाहिजे, मानसिक त्रास झाला हे शाबीत केले पाहिजे असे आहे. त्याचबरोबर अनेकवेळा तक्रारदाराची आर्थिक अडचण भागवली आहे. तसेच सचिव व चेअरमन यांनी ऍडव्हान्स कर्जे घेतली, ठेवी परत करणे संचालक व कर्मचारी यांना शक्य नव्हते असे कथन केले आहे तसेच प्रशासक यांचे ताब्यात संस्था दिली आहे असे कथन केले आहे. 6. निर्विवादीतपणे अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार दाखल केला आहे. सबब मंचास अर्जदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक-मालक नाते आहे का ? तसेच मालक यांनी ग्राहकाला सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे का ? एवढेच पाहणे न्याय आहे. जाबदार अर्जदारने दाखल केलेल्या जाबदार संस्थेची ठेवपावती (नि.7) नाकारत नाहीत, त्यावरील सही नाकारत नाहीत, ठेव पावती खोटी आहे असे कथन करीत नाही, अशा परिस्थितीत ठेवीदार मागेल त्या वेळेस त्याची रक्कम व्याजासह परत देणे हे मालक या नात्याने जाबदारचे कर्तव्य आहे. निर्विवादीतपणे अर्जदारला स्वतःची ठेव केव्हाही मागणेचा अधिकार आहे. सबब मुदत संपणेपूर्वी अर्जदार ठेवीची रक्कम मागू शकत नाहीत. या जाबदारचे कथनात तथ्य नाही. 7. निर्विवादीतपणे अर्जदार शपथपत्राने अनेक वेळा जाबदारकडे ठेवीची मागणी केली होती परंतु जाबदारने देणेस नकार दिला असे कथन करतात. सबब जाबदारने अर्जदारची ठेवीची रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. निर्विवादीतपणे संस्थेवरती प्रशासन असलेबाबत कोणताही पुरावा दाखल नाही. तसेच संस्थेवरती प्रशासक आहे किंवा नाही याची माहिती अर्जदारास असणेचे कारण नाही. 8. अर्जदार यांनी नि.1 सोबत नि.2 कडे शपथपत्र दाखल केले असून नि. 6 सोबत नि.7 कडे ठेव पावत्यांच्या मूळ प्रत दाखल केली आहे. प्रस्तुत ठेव पावतीचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी जाबदार संस्थेत ठेव ठेवलेचे स्पष्ट होते. तसेच प्रस्तुत ठेवीची मुदत संपलेचेही स्पष्ट दिसत आहे. सबब, नि.2 कडील अर्जदार यांचे शपथपत्र व इतर कागदपत्रे पाहिली असता अर्जदार यांनी ठेव रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्पष्ट दिसते. सबब अर्जदारने वेळोवेळी ठेव रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी ठेव रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत आहे. सबब जाबदारने अर्जदारच्या प्रस्तुत तक्रारीतील फेरिस्त नि. 6 सोबतच्या नि. 7 कडील ठेवींच्या रक्कम पावतीवरील नमूद व्याजासह द्यावी व ठेवीची मुदत संपलेनंतर संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने होणा-या व्याजासह द्यावी या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 9. सबब आदेश. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार क्र.1 ते 14 यांनी स्वतंत्र व संयुक्तरित्या अर्जदार यांना त्यांची ठेव पावती क्र.156 कडील मुदत संपलेनंतरची देय रक्कम मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावी. 3. जाबदार यांनी मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना रक्कम रु. 5,000/- द्यावी. 4. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 31/1/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |