सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांचेसमोर.
दरखास्त क्रमांक - 07/2011
श्री प्रफुल्लचंद्र व्यंकाप्पा राव
वय 64 वर्षे, धंदा – सेवानिवृत्त,
रा.विघ्नहर्ता कॉम्प्लेक्स,
फ्लॅट नं.एफ – 7, सालईवाडा,
सावंतवाडी, ता.सावंतवाडी,
जिल्हा- सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
1) श्री किरण केशव लिखिते
द्वारा प्रतिक कंस्ट्रक्शन,
रा.जुनाबाजार सावंतवाडी,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
2) श्रीमती अमृता भास्कर समसानी
’अमृता निवास’, म्यु.घर नं.एफ 292,
सालईवाडा, सावंतवाडी,
ता.सावंतवाडी, जिल्हा- सिंधुदुर्ग. ... विरुध्द पक्ष.
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री एस.एन. सावंत व श्री एस.एम. मोर्ये.
विरुद्ध पक्षातर्फे- व्यक्तीशः
- आदेश –
(दि.26/02/2013)
1) मूळ तक्रार क्रमांक 54/2010 मधील पारीत निकालपत्राची विरुध्द पक्षाने अंमलबजावणी न केल्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 27 अंतर्गत सदरचे दरखास्त प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
2) सदर दरखास्तीचे नोटीस विरुध्द पक्ष यांना बजावण्यात आले. दरम्यान सामनेवाला आरोपी यांनी उपरोक्त आदेशाप्रमाणे सर्व रक्कम फिर्यादीस अदा केली असल्याची पुरसीस नि.30 वर उभय पक्षाने दाखल केली असून सामनेवाला आरोपी यांचेविरुध्द कोणतीही तक्रार उरली नसल्याचे कथन केले आहे. दरम्यान जिल्हा मंचाची बैठक न झाल्याने सदरचे प्रकरण आज आदेशासाठी ठेवण्यात आले. त्यामुळे सदरचे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- आदेश -
1) तक्रारदार यांनी नि.30 वर दाखल केलेल्या पुरसिसनुसार सदरचे दरखास्त प्रकरण निकाली काढण्यात येते.
2) आरोपीचे बेलबॉंड रद्द करण्यात येतात.
3) खर्चाबद्दल काही हुकूम नाही.
ठिकाण- सिंधुदुर्गनगरी.
दिनांक - 26/02/2013
Sd/- sd/- sd/-
(उल्का गावकर) (डी. डी. मडके) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सिंधुदुर्ग