Maharashtra

Kolhapur

CC/10/153

Balgonda Bhau Patil and Others - Complainant(s)

Versus

Shri Khanaidevi Nagari Sah. Pat Sanstha Ltd. - Opp.Party(s)

Adv S M Potdar

13 Aug 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/153
1. Balgonda Bhau Patil and OthersA/p Aalate Tal. Hatkanangale Dist. Kolhapur2. Sou.Akkatai Balgonda Patilr/o. As above3. Shri Santosh Balgonda Patilr/o.As above4. Shri Sachin Balgonda Patilr/o. As above ...........Appellant(s)

Versus.
1. Shri Khanaidevi Nagari Sah. Pat Sanstha Ltd.Nagaon Tal. Hatkanangale Dist. Kolhapur 2. Shri Purndar Anna Shirgave, Chairmanr/o.Nagaon, Tal. Hatkangale, Dist.Kolhapur3. Shri Prakash Maruti Shirguppe, Vice Chairmanr/o.Nagaon, Tal. Hatkangale, Dist.Kolhapur4. Shri Nivrutti Mahadeo Mali, Directorr/o.Nagaon, Tal. Hatkangale, Dist.Kolhapur5. Shri Shivaji Ramchandra Sawant, Directorr/o.Nagaon, Tal. Hatkangale, Dist.Kolhapur6. Shri Sukumar Sakharam Belake, Directorr/o.Nagaon, Tal. Hatkangale, Dist.Kolhapur7. Shri Subhash Bapu Patil, Directorr/o.Nagaon, Tal. Hatkangale, Dist.Kolhapur8. Shri Pradip Kallappa Lambe, Directorr/o.Nagaon, Tal. Hatkangale, Dist.Kolhapur9. Shri Sadashiv Krishna Powar, Directorr/o.Nagaon, Tal. Hatkangale, Dist.Kolhapur10. Shri Kuntinath Anna Solankure, Directorr/o.Nagaon, Tal. Hatkangale, Dist.Kolhapur11. Shri Dagadu Shripati Kamble, Directorr/o.Nagaon, Tal. Hatkangale, Dist.Kolhapur12. Shri Suresh Atmaram Vadar, Directorr/o.Nagaon, Tal. Hatkangale, Dist.Kolhapur13. Sou.Rekha Annaso Ghevari, Directorr/o.Nagaon, Tal. Hatkangale, Dist.Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBER
PRESENT :Adv S M Potdar , Advocate for Complainant

Dated : 13 Aug 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.13.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाले गैरहजर आहेत.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे दामदुप्‍पट ठेवीच्‍या स्‍वरुपात व सेव्‍हींग्‍ज खात्‍यावर रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
मुदतपूर्ण रक्‍कम
1.
5536
9999/-
26.03.2004
26.09.2009
19998/-
2.
5573
9000/-
08.04.2004
08.10.2009
18000/-
3.
5574
9000/-
08.04.2004
08.10.2009
18000/-
4.
5537
9999/-
26.03.2004
26.09.2009
19998/-
5.
5575
9000/-
08.04.2004
08.10.2009
18000/-
6.
5576
9000/-
08.04.2004
08.10.2009
18000/-
7.
5538
9999/-
26.03.2004
26.09.2009
19998/-
8.
5577
9000/-
08.04.2004
08.10.2009
18000/-
9.
5578
9000/-
08.04.2004
08.10.2009
18000/-
10.
5539
9999/-
26.03.2004
26.09.2009
19998/-
11.
5579
9000/-
08.04.2004
08.10.2009
18000/-
12.
5580
9000/-
08.04.2004
08.10.2009
18000/-
13.
6154
9000/-
10.12.2004
10.10.2010
16682/-
14.
6155
9000/-
10.12.2004
10.10.2010
16682/-
15.
6156
9000/-
10.12.2004
10.10.2010
16682/-
16.
6157
9000/-
10.12.2004
10.10.2010
16682/-
17.
6158
9000/-
10.12.2004
10.10.2010
16682/-
18.
6159
9000/-
10.12.2004
10.10.2010
16682/-
19.
6160
9000/-
10.12.2004
10.10.2010
16682/-
20.
6161
9000/-
10.12.2004
10.10.2010
16682/-

 
(3)        सदर ठेवींपैकी काही ठेवींची मुदत संपलेली आहे तर काहींची अद्याप संपलेली नाही. तक्रारदारांना सदर ठेवींच्‍या रक्‍कमांची प्रापंचिक अडीअडचणी, मुलांचे शिक्षण- संगोपन, औषधोपचार व इतर कौटुंबिक गरजा भागविण्‍यासाठी आवश्‍यकता असल्‍याने सामनेवाला यांचेकडे मागणी केली. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्‍कमा देण्‍यास टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रारदारांनी दि.11.09.2009, दि.28.06.2009 व दि.11.12.2009 रोजी लेखी अर्ज देवून व्‍याजासह ठेवींच्‍या रक्‍कमांची मागणी केली. तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या व ठेव मागणी अर्ज इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(5)        सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी एकत्रित म्‍हणणे दाखल करुन तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, सामनेवाला यांनी जबाबदारी ही त्‍यांनी खरेदी केलेल्‍या शेअर्स इतकीच आहे. त्‍यामुळे सामनेवाला यांना तक्रारदारांच्‍या रक्‍कमेबाबत जबाबदार धरता येणार नाही. सामनेवाला यांचेविरुध्‍द सहकार कायदा कलम 88 अन्‍वये कोणतीही चौकशी झालेली नाही व जबाबदार धरणेत आलेले नाही. तसेच, सामनेवाला यांनी बंधपत्रे लिहून दिलेली नाहीत. तसचे, सामनेवाला यांनी कोणतेही गैरकृत्‍य, अफरातफर, बेकायदेशीर व्‍यवहार केलेले नाहीत व त्‍यांचेविरुध्‍द कोणतीही कारवाई अथवा प्रकरण न्‍यायप्रविष्‍ठ नाही.  सबब, सामनेवाला क्र.2 ते 13 यांचेविरुध्‍द वैयक्तिक तक्रार फेटाळणेत यावी व सामनेवाला क्र.1 संस्‍थेविरुध्‍द रक्‍कम देणेचा आदेश व्‍हावा.
 
(6)        तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे ठे़वी ठेवलेल्‍या आहेत. सामनेवाला पतसंस्‍था ही ठेवी स्विकारते. तसेच, सभासदांना कर्जे देते याबाबतची सेवा ही ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 2(1)(O) या तरतुदीखाली येते. त्‍यामुळे प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. यास पूर्वाधार म्‍हणून - थिरुमुरुगन 2004 (I) सी.पी.आर.35 - ए.आय.आर.2004 (सर्वोच्‍च न्‍यायालय), तसेच कलावती आणि इतर विरुध्‍द मेसर्स युनायटेड वैश्‍य को-ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड - 2002 सी.सी.जे.1106 - राष्‍ट्रीय आयोग - याचा आधार हे मंच घेत आहे.
 
(7)        प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्‍लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्‍थेमध्‍ये ठेव रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत; सदर ठेव पावत्‍यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्‍थेमध्‍ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्‍कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव पावत्‍यांपैकी काहींच्‍या मुदती संपून गेलेल्‍या आहेत तर काहींच्‍या संपलेल्‍या नाहीत व सदर रक्‍कमांची तक्रारदारांनी व्‍याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टीप्रित्‍यर्थ कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. तसेच, त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यातील कथनांचा तक्रारदारांच्‍या तक्रारींशी कोणताही दुरान्‍वयेदेखील संबंध नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  सबब, तक्रारदारांच्‍या व्‍याजासह ठेव रक्‍कमा सामनेवाला यांनी न देवून त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा देण्‍याची सामनेवाला क्र. 1 ते 13 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(8)        तक्रारदारांनी प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्‍या या दामदुप्‍पट ठेवींच्‍या असून त्‍यापैकी 5536, 5573, 5574, 5537, 5575, 5576, 5538, 5577, 5578, 5539, 5579, 5580या ठेव पावत्‍यांच्‍या मुदती संपलेल्‍या आहेत असे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे दामदुप्‍पट ठेव पावत्‍यांवरील मुदतपूर्ण रक्‍कमा मुदत संपलेल्‍या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(9)        तक्रारदारांनी प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांचे अवलोकन केले असता 6154, 6155, 6156, 6157, 6158, 6159, 6160, 6161या ठेव पावत्‍यांच्‍या मुदत संपलेल्‍या नाहीत असे दिसून येते. म्‍हणजेच तक्रारदारांनी सदर ठेव रक्‍कमांची मुदतपूर्व मागणी केलेचे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर ठेव पावत्‍यांच्‍या रक्‍कमा या भारतीय रिझर्व्‍ह बँकेच्‍या मार्गदर्शक तत्‍त्‍वानुसार सदर ठेव पावत्‍यांची तक्रार दाखल दि.08.03.2010 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्‍या मुदतीकरिता देय असणा-या व्‍याजदरातून द.सा.द.शे.1 टक्‍का वजाजाता होणा-या व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत.
 
(10)       तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
(1)   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील दामदुप्‍पट रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर कोष्‍टकांत नमूद तारखांपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
 देय मुदतपूर्ण रक्‍कम
व्‍याज देय तारीख
1.
5536
19998/-
26.09.2009
2.
5573
18000/-
08.10.2009
3.
5574
18000/-
08.10.2009
4.
5537
19998/-
26.09.2009
5.
5575
18000/-
08.10.2009
6.
5576
18000/-
08.10.2009
7.
5538
19998/-
26.09.2009
8.
5577
18000/-
08.10.2009
9.
5578
18000/-
08.10.2009
10.
5539
19998/-
26.09.2009
11.
5579
18000/-
08.10.2009
12.
5580
18000/-
08.10.2009

 
(3)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील दामदुप्‍पट ठेव पावत्‍यांच्‍या रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर भारतीय रिझर्व्‍ह बँकेच्‍या मार्गदर्शक तत्‍त्‍वानुसार ठेव तारखेपासून सदर ठेव पावत्‍यांची तक्रार दाखल दि. 08.03.2010 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्‍या मुदतीकरिता देय असणा-या व्‍याजदरातून द.सा.द.शे.1 टक्‍का व्‍याज वजाजाता होणारे व्‍याज द्यावे व दि.09.03.2010 रोजीपासून सदर रक्‍कमांवर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
1.
6154
9000/-
2.
6155
9000/-
3.
6156
9000/-
4.
6157
9000/-
5.
6158
9000/-
6.
6159
9000/-
7.
6160
9000/-
8.
6161
9000/-

 
(4)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT