जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
मा.अध्यक्षा- सौ.व्ही.व्ही.दाणी
मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन
मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – १४०/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २८/०८/२०१२
तक्रार निकाली दिनांक – ३०/०८/२०१३
श्री.बेगराज रामदीन केसावलेकर. ----- तक्रारदार.
उ.व.७६, धंदा – निवृत्त
रा.विष्णु नगर,विधी महाविद्यालया जवळ
देवपूर,धुळे.
विरुध्द
(१)भारत टी.व्ही.एस.पारोळा रोड, ----- सामनेवाले.
प्रकाश सिनेमा समोर,धुळे.
(नोटीस कनुभाई गांधी यांचेवर बजावावी)
(२)जनरल मॅनेजर,(सर्व्हिस)
टी.व्ही.एस.मोटर कं.लि.,
हरीता होसूर-६३५१०९,तमीलनाडू.
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी )
(मा.सदस्याः सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य: श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकिल श्री.पी.सी.पवार)
(सामनेवाले क्र.१ तर्फे – वकिल श्री.आर.एल.परदेशी)
(सामनेवाले क्र.२ तर्फे – गैरहजर)
निकालपत्र
(द्वाराः मा. सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
(१) सामनेवाले क्र.१ यांच्याकडून घेतलेले आणि सामनेवाले क्र.२ यांच्या कंपनीचे सदोष वाहन बदलून मिळावे यासाठी तक्रारदारांनी ही तक्रार दाखल केली होती. पुढे त्यांनी वाहन बदलण्याची मागणी सोडून दिली. आता त्यांची तक्रार मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी भरपाई मिळावी अशी आहे.
(२) तक्रारदार यांनी दि.०९-११-२०११ रोजी सामनेवाले क्र.१ यांच्याकडून स्कुटी पेप प्लस हे वाहन खरेदी केले. तेव्हापासून त्यात “ऑईल लिकेज” ची समस्या होती. त्याबाबत तक्रारदार यांनी विक्रेते आणि कंपनी (सामनेवाले क्र.२) यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. तक्रारदार यांनी दोघांना नोटीस पाठवून वाहन बदलून देण्याची मागणी केली. पण त्यांना वाहन बदलून मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी ही तक्रार दाखल केली.
(३) तक्रारदारांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयार्थ नि.नं.६ वर शपथपत्र, नि.नं.११ सोबत नि.नं.११/१ वर अर्जदाराने पाठविलेले पत्र, नि.नं.११/२ वर सामनेवालेंनी दिलेले बिल, नि.नं.११/३ व ११/४ वर वर्कशॉपने दिलेली स्पीप, नि.नं.११/५ वर बिझनेस रिप्ले कार्ड, नि.नं.११/६ वर पेमेंट डिटेल्स, नि.नं.११/७ वर इन्शुरन्स पावती, नि.नं.११/८ वर मोटार वाहन कव्हर नोट, नि.नं.११/९ वर पॅन कार्ड, नि.नं.११/१० वर टॅक्स इनव्हाईस हे कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केले आहेत.
(४) सामनेवाले क्र.१ हे मंचासमोर हजर झाले, मात्र त्यांनी मुदतीत कोणताही खुलासा दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द म्हणणे नाही (नो-से) असा आदेश दि.०८-०७-२०१३ रोजी करण्यात आला आहे. तसेच सामनेवाले क्र.२ हे या प्रकरणी गैरहजर आहेत, त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला आहे.
(५) तक्रारीच्या पुष्टयार्थ तक्रारदार यांनी विक्रेता आणि कंपनीकडे वेळोवेळी केलेल्या तक्रारींच्या प्रती दाखल केल्या आहेत. त्याशिवाय त्यांनी स्वत: आपला युक्तिवाद केला. त्यावेळी सामनेवाले क्र.१ यांनी वाहन दुरुस्त करुन दिले आहे. त्यामुळे वाहन बदलून देण्याची मागणी आपण मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि वाहन बंद असलेल्या कालावधीत आपल्याला शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला आणि त्यापोटी रु.२०,०००/- नुकसान भरपाई आणि रु.५,०००/- तक्रारीचा खर्च मिळावा ही मागणी कायम ठेवली आहे.
(६) तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र पाहता तसेच तक्रारदारांच्या विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकला असता, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब) सामनेवाले यांच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होते काय ? | : होय. |
(क) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे. |
विवेचन
(७) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी आपले वाहन सामनेवाले क्र.१ यांच्याकडून खरेदी केले या बाबत नि.नं.११/२ वर वाहन खरेदीचे बीलाची प्रत दाखल केलेली आहे. सदर बिलावर तक्रारदार यांचे नांव आहे. तसेच त्यावर Bharat Auto Corporation असे नमूद असून त्यावर त्यांचे अधिका-यांची सही आहे. सदर वाहन खरेदीची पावती पाहता तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक होतात. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.२ यांच्याकडून वाहन थेट खरेदी केले नसले तरी, त्यांच्या कंपनीचे वाहन त्यांनी खरेदी केले आहे. त्यामुळे तक्रारदार त्यांचेही ग्राहक ठरतात. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांनी दि.०९-११-२०११ रोजी वाहन खरेदी केले. त्यानंतर सहा वेळा त्याची सर्व्हीसिंग करण्यात आली. या प्रत्येक वेळी त्यांनी सामनेवाले क्र.१ यांच्याकडे ऑईल लिकेज बाबत तक्रार केली. या बाबत तक्रारदारांनी कंपनीलाही कळविले. सामनेवाले क्र.१ यांनी वेळोवेळी वाहन दुरुस्त करुन दिले. मात्र त्यातील दोष दूर झाला नाही. त्यामुळे वाहन बंद अवस्थेत होते. ही माहिती तक्रारदार यांनी कंपनीलाही कळविली होती. मात्र तरीही त्यांचा प्रश्न सुटला नाही.
वास्तविक वाहनातील दोष दुरुस्त करणे ही सामनेवाले क्र.१ व २ यांची सामूहिक जबाबदारी होती. ती त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडली नाही. म्हणूनच मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(९) अनेक वेळा तक्रार करुनही दोष दूर झाला नाही. अखेर दि.१३-०३-२०१३ रोजी तक्रारदार यांनी पुन्हा वाहन सामनेवाले क्र.१ यांच्याकडे दुरुस्तीसाठी दिले. वाहन दुरुस्त झाल्यानंतर तक्रारदार यांनी “वाहन बदलून” देण्याची मागणी तुर्त मागे घेतली.
(१०) तथापि, सामनेवाले क्र.१ व २ यांच्या निष्काळजीपणामुळे आणि सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदार यांना मोठा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. वाहन असूनही त्यांना त्याचा वापर करता आला नाही. तब्बल पावणेदोन वर्ष त्यांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सोसावा लागला, असे मंचाचे मत आहे.
(११) मुद्दा क्र. ‘‘क’’ – वरील सर्व विवेचनाचा विचार करता आम्ही खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सामनेवाले क्र.१ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तिक रित्या, या आदेशाच्या दिनांकापासून पुढील तीस दिवसांचे आत, तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम १,०००/- (अक्षरी रुपये एक हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम
धुळे.