नि.13
मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्या - श्रीमती वर्षा शिंदे
मा.सदस्या – श्रीमती मनिषा कुलकर्णी – रजेवर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 325/2011
तक्रार नोंद तारीख : 15/12/2011
तक्रार दाखल तारीख : 19/12/2011
निकाल तारीख : 31/07/2013
----------------------------------------------
1. श्री राजाराम आण्णा भिसे,
वय 70 वर्षे, व्यवसाय – सेवानिवृत्त
रा.मु.पो.कुंडल, ता.पलूस जि. सांगली
2. सौ कमल राजाराम भिसे,
वय 70 वर्षे, व्यवसाय – सेवानिवृत्त
रा.मु.पो.कुंडल, ता.पलूस जि. सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. श्री ज्योतिर्लिंग ग्रामीण बिगरशेती को.ऑप.क्रेडीट सोसायटी
लि.कुंडल Reg.No. SAN/TGN/RSR(CR) 897/98-99
ता.पलूस जि. सांगली
2. चेअरमन श्री विजय बाजीराव पवार
मु.पो.कुंडल, ता.पलूस जि. सांगली
3. मॅनेजर,
मु.पो.कुंडल, ता.पलूस जि. सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड श्री पी.एम.मैंदर्गी
जाबदार क्र.1 व 2 : एकतर्फा
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. सदस्या - श्रीमती वर्षा शिंदे
1. प्रस्तुतची तक्रार सामनेवाला यांनी मागणी करुनही ठेव रक्कम अदा न केलेने दाखल केली आहे. सामनेवाला क्र.1 व 2 यांना नोटीस आदेश झाला. सामनेवाला क्र.1 व 2 यांना पाठविलेली नोटीस Not claimed या शे-यानिशी परत आली. सबब त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविणेचा आदेश नि.1 वर करणेत आला. नि.1 वर तत्कालीन मंचाने पारीत केलेल्या आदेशानुसार सामनेवाला क्र.3 बाबत अपूर्ण तपशील नमूद केला असल्याने केवळ सामनेवाला क्र.1 व 2 यांचेबाबतच प्रस्तुत तक्रार दाखल करुन घेण्याबाबत नमूद केलेले आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी –
तक्रारदार हे कुंडल गावचे रहिवासी असून सामनेवाला क्र.1 ही महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यान्वये नोंदणीकृत संस्था असून सामनेवाला क्र.2 हा सामनेवाला क्र.1 संस्थेचा चेअरमन व सामनेवाला क्र.3 हा मॅनेजर आहे. तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 पतसंस्थेमध्ये मुदत ठेव अंतर्गत खालील तपशीलाप्रमाणे ठेवी ठेवलेल्या होत्या.
अ.क्र. |
नाव |
पावती/ खाते क्र. |
ठेवीची तारीख |
ठेव रक्कम |
मुदत संपणेची तारीख |
मुदती
नंतरची रक्कम |
व्याजदर
% |
1 |
राजाराम आण्णा भिसे |
400/537 |
28/5/03 |
10000 |
29/10/08 |
20000 |
13 |
2 |
राजाराम आण्णा भिसे |
518/649 |
23/12/03 |
15000 |
23/5/09 |
30000 |
13 |
3 |
राजाराम आण्णा भिसे |
862/21 |
21/3/05 |
15000 |
22/8/11 |
30000 |
11 |
4 |
राजाराम आण्णा भिसे |
863/22 |
21/3/05 |
15000 |
22/8/11 |
30000 |
11 |
5 |
कमल राजाराम भिसे |
797/1118 |
11/5/07 |
15000 |
12/10/13 |
30000 |
11 |
6 |
कमल राजाराम भिसे |
519/650 |
23/12/03 |
15000 |
23/5/09 |
30000 |
13 |
7 |
कमल राजाराम भिसे |
399/536 |
28/5/03 |
10000 |
29/10/08 |
20000 |
13 |
8 |
कमल राजाराम भिसे |
865/24 |
21/3/05 |
15000 |
22/8/11 |
30000 |
11 |
9 |
कमल राजाराम भिसे |
251/392 |
9/10/02 |
25000 |
12/4/08 |
25000 + व्याज |
10.5 |
10 |
कमल राजाराम भिसे |
250/391 |
9/10/02 |
25000 |
12/4/08 |
25000 + व्याज |
10.5 |
11 |
कमल राजाराम भिसे |
864/23 |
21/3/05 |
15000 |
22/8/11 |
30000 |
11 |
सदरच्या रकमांची तोंडी व लेखी मागणी करुनही रक्कम दिली नाही तसेच पैसे मागण्यासाठी न येण्याची धमकी देवून हाकलून लावून दिले. तदनंतर दि.29/10/2011 रोजी सामनेवालांकडे रजि.ए.डी.ने पत्र पाठवून रकमेची मागणी केली असता ती Not claimed या शे-यानिशी परत आले. त्याचदिवशी सदर पत्राची एक पत्र मा.संघटक, ग्राहक पंचायत पलूस तसेच सहा.निबंधक सहकारी संस्था, पलूस यांना देवून त्याची पोच घेतली आहे. मा.सहायक निबंधक यांनी 16/11/11 रोजी जा.क्र.1493 अन्वये पत्र पाठवून सामनेवाला यांना तक्रारदारच्या ठेवी देण्याबाबत कळविले आहे तरीही ठेव रकमा न दिल्याने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब वर नमूद तपशीलाप्रमाणे ठेव रक्कम रु.1,75,000/- सामनेवाला यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तरित्या आजअखेरच्या व्याजासहीत अदा करणेबाबत तसेच मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रु.5,000/- अदा करणेबाबत सामनेवालांना हुकूम करावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारीच्या पुष्ठयर्थ नि. 2 ला शपथपत्र व नि.4 चे फेरिस्तसोबत 4/1 ते 4/11 प्रमाणे ठेव पावत्यांच्या सत्यप्रती, नि.4/12 ला लेखी मागणी केल्याचे पत्र, त्याची पोच, नि.4/13 व 4/14 वर सहायक निबंधकांना सदर पत्राची प्रत दिलेबाबत पोच व अर्ज, नि. 4/16 ला सहायक निबंधकांनी सामनेवालांना ठेव रक्कम अदा करणेबाबत कळविलेचे लेखी पत्र इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. तक्रारदाराची तक्रार, व पुराव्यादाखल कागदपत्रे यांचा विचार करता सदर प्रकरणी खालील मुद्दे आमच्या निष्कर्षाकरिता उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हे सामनेवालांचे ग्राहक होतात काय ? होय.
2. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे काय ? होय.
3. तक्रारदार ठेव रकमा व्याजासह व अन्य मागण्या मिळण्यास पात्र
आहे काय ? होय.
4. अंतिम आदेश खालीलप्रमाणे
कारणे
मुद्दा क्र.1
5. तक्रारदाराने सामनेवाला पतसंस्थेत मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेवी ठेवलेल्या आहेत हे नि.4/1 ते 4/11 वरील ठेवपावत्यांचे प्रतींवरुन तसेच नि.11/1 ते 11/11 वरील ठेवपावत्यांचे साक्षांकित प्रतींवरुन दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवालांचे ठेवीदार ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.2
6. सामनेवाला संस्था व नमूद पदाधिका-यांनी तक्रारदाराच्या ठेवी मागणी करुनही व्याजासह अदा न करुन सेवात्रुटी केलेली आहे. याचा विचार करता व Lifting of Corporate veil चा विचार करता सामनेवाला क्र. 1 व 2 वैयक्तिक व संयुक्तरित्या जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच आले आहे. यासाठी मा.उच्च न्यायालय, मुंबई यांचेसमोरील रिट पिटीशन क्र.117/11, मंदाताई संभाजी पवार व इतर विरुध्द स्टेट ऑफ महाराष्ट्र यामधील आदेशाचा आधार घेतला आहे. सामनेवाला क्र.3 यांचेविरुध्द तक्रार दाखलच करुन घेतलेली नसलेने त्यांचेविरुध्द हे मंच कोणताही आदेश पारीत करीत नाही.
मुद्दा क्र.3
7. तक्रारदार क्र.1 व 2 हे पती-पत्नी आहेत. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार एकत्रितरित्या दाखल केली आहे. नि.4/1 ते 5/11 प्रमाणे सत्यप्रती दाखल केल्या आहेत व नि.11/1 ते 11/11 ला ठेवपावत्यांच्या साक्षांकीत प्रत दाखल केल्या आहेत. त्यानुसार तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे खालील तपशीलाप्रमाणे ठेवी ठेवलेल्या होत्या.
परिशिष्ट अ
अ.क्र. |
नाव |
पावती/ खाते क्र. |
ठेवीची तारीख |
ठेव रक्कम |
मुदत संपणेची तारीख |
मुदती
नंतरची रक्कम |
व्याजदर
% |
1 |
राजाराम आण्णा भिसे |
400/537 |
28/5/03 |
10000 |
29/10/08 |
20000 |
13 |
2 |
राजाराम आण्णा भिसे |
518/649 |
23/12/03 |
15000 |
23/5/09 |
30000 |
13 |
3 |
राजाराम आण्णा भिसे |
862/21 |
21/3/05 |
15000 |
22/8/11 |
30000 |
11 |
4 |
राजाराम आण्णा भिसे |
863/22 |
21/3/05 |
15000 |
22/8/11 |
30000 |
11 |
5 |
कमल राजाराम भिसे |
797/1118 |
11/5/07 |
15000 |
12/10/13 |
30000 |
11 |
6 |
कमल राजाराम भिसे |
519/650 |
23/12/03 |
15000 |
23/5/09 |
30000 |
13 |
7 |
कमल राजाराम भिसे |
399/536 |
28/5/03 |
10000 |
29/10/08 |
20000 |
13 |
8 |
कमल राजाराम भिसे |
865/24 |
21/3/05 |
15000 |
22/8/11 |
30000 |
11 |
9 |
कमल राजाराम भिसे |
251/392 |
9/10/02 |
25000 |
12/4/08 |
25000 + व्याज |
10.5 |
10 |
कमल राजाराम भिसे |
250/391 |
9/10/02 |
25000 |
12/4/08 |
25000 + व्याज |
10.5 |
11 |
कमल राजाराम भिसे |
864/23 |
21/3/05 |
15000 |
22/8/11 |
30000 |
11 |
सामनेवाला यांनी अनुक्रमांक 1 ते 8 व 11 वरील नमूद ठेवपावत्यांची मुदतीनंतर मिळणारी रक्कम तक्रारदारास अदा करावी. तसेच मुदतीनंतर ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत मूळ ठेवमुद्दल रकमेवर द.सा.द.शे.6 टक्केप्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. अनुक्रमांक 9 व 10 ठेवपावत्यांची रक्कम प्रत्येकी रु.25,000/- प्रमाणे अदा करावेत व सदर ठेवरकमेवर नमूद मुदतीप्रमाणे नमूद व्याजदर द.सा.द.शे. 10.5 प्रमाणे व्याज अदा करावे व मुदतीनंतर सदर ठेव रकमेवर संपूर्ण रक्कम फिटेपावेतो द.सा.द.शे.6 टक्केप्रमाणे व्याज अदा करावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे
8. सामनेवाला यांच्या सेवात्रुटीमुळे तक्रारदारास प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे, त्यामुळे झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रकमा मिळणेस तक्रारदार पात्र आहेत.
सबब, खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करणेत येत आहेत.
2. तक्रारदार यांना सामनेवाला नं. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या वर नमूद परिशिष्ट
अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे मुदतीनंतर मिळणा-या ठेवरकमा तसेच दिले निर्देशाप्रमाणे व्याज
अदा करावे.
3. तक्रारदार यांना सामनेवाला नं. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या शारीरिक आर्थिक,
मानसिक ञासापोटी रुपये 5,000/- अदा करावेत.
4. तक्रारदार यांना सामनेवाला नं. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारीच्या
खर्चापोटी रुपये 2,000/- अदा करावेत.
5. जर सामनेवाला यांनी या आदेशाचे तारखेपूर्वी तक्रारदार यांना वर नमूद खात्यातील काही
रक्कम अदा केली असेल तर सदरची रक्कम वळती करुन घेण्याचा सामनेवाला यांचा हक्क
सुरक्षित ठेवण्यात येतो.
6. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार यांनी या आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसांत
करणेची आहे.
7. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द
ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 31/07/2013
( वर्षा शिंदे ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष